- Prathmesh Kambli
आज Marvel studios च्या "Eternals" या चित्रपटाचा ट्रेलर बघताना लेखक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या "पृथ्वीवर माणूस उपराच" या पुस्तकाची आठवण झाली. एरिक व्हॉन डॅनिकेन या संशोधकाने मांडलेल्या काही सिद्धांताच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात बरेचसे धक्कादायक दावे केले आहेत. सर्वात महत्वाचा सिद्धांत हा, की देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव, व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव. इतिहासातील अशक्य अश्या वाटणाऱ्या पिरॅमिड व बाकी बऱ्याचश्या रचना बनवण्यामागे या अतिप्रगत जीवांची त्याकाळी मदत झाली असावी असे लेखकाचे मत आहे.
Eternals या चित्रपटात अतिमानावांपैकी दाखवलेली एक नायिका पृथ्वीवरच्या मानवांबद्दल बोलते की, "We have watched, and guided them. We have helped them progress. And seen them accomplish wonders. Throughout the years, we never interfered. Until now".
चित्रपट interesting वाटतोय. पुस्तक तर छानच आहे. नसेल वाचले तर नक्की वाचा.
- Kadambari Mate
####### पृथ्वीवर माणूस उपराच #######
मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध.
या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव शोधून काढत आहे;
परंतू तरीही अजून सृष्टीची अनेक गुपितं मानवाला माहित झालेली नाहीत. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत.
मानवी इतिहासाचा शोध घेता घेता अशा एका बिंदूपाशी आपण थबकतो की ह्यापूर्वीचे काही संदर्भ सापडणे कठीण होते. या विषयासंबंधी एरिक व्हॉन डॅनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने काही धक्कादायक सिद्धांत मांडले. देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत.
या सिद्धांताची मनोरंजक माहिती या पुस्तकात दिली आहे. विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक पुस्तक.
ईजिप्तमधले पिरॅमिडस, त्यांची शास्त्रीय रचना,पायाची अशी बांधणी की ज्यामुळे पृथ्वीवरील जमिन आणि पाणी यांची समान भागणी व्हावी,त्यांचा `पाय` या गणितातील सर्वात स्थिर संख्येशी असलेला संबंध, पिरॅमिडच्या आतुन वर पाहीले तर एखाद्या नक्षत्रावर अथवा तार्यावर केंद्रीत होणे,पिरॅमिडमधुन किरणोत्सर्ग बाहेर पडणे...... ई.
ऍडमिरल पिरी रीस याने तयार केलेला जगाचा नकाशा. त्यात आत्ता आत्ता ज्याचा आकार नीट कळला आहे अशा अंटार्क्टीका चा आकार अगदी तंतोतंत आहे. खुप उंचीवर गेल्याखेरीज हे जमणार नाही. चाकाचा शोध लागला नव्हता त्या काळात या लोकांना खगोलशास्त्र आणि विमानविद्द्या अवगत होती?
नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणुन काढलेल्या खुणा.
अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ.
ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही.
ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती ब्राझीलमधील रिओ डि जानेरो मधे एका डोंगरावर आढळते. ह्या शिल्पाची मर्यादारेषा स्पष्ट करण्यासाठी जी फिनिशियन चित्रलिपी वापरण्यात आली आहे ती फिनिशियन जमात मध्यपुर्वेत नांदत होती.फिनिशियन लोक मध्यपुर्वेतुन येथे कसे पोचले असावेत ?
तसेच ईजिप्तसारखेच पिरॅमिडस मेक्सिको मधे आहेत.आणि काश्मीर मधील परिहासपुर येथील मंदीराचे भग्नावशेष पिरॅमिडस ची आठवण करुन देते. ( सर्व ठिकाणी किरणोत्सर्ग आहेच.)
- Kadambari Mate
####### पृथ्वीवर माणूस उपराच #######
मानवाचं जीवन म्हणजे सतत घेतला जाणारा शोध.
या शोधामागं मानवी बुद्धिला पडणारे प्रश्न, निसर्गाबद्दलची जिज्ञासा कारणीभूत आहे. यामुळंच मानवानं आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रमाक्रमानं सृष्टीची गुपितं मानव शोधून काढत आहे;
परंतू तरीही अजून सृष्टीची अनेक गुपितं मानवाला माहित झालेली नाहीत. निसर्गाच्या गुपितांच्या शोधांबरोबरच मानवाला स्वत:च्या उत्पत्ती बाबतही अनेक प्रश्न पडलेले आहेत.
मानवी इतिहासाचा शोध घेता घेता अशा एका बिंदूपाशी आपण थबकतो की ह्यापूर्वीचे काही संदर्भ सापडणे कठीण होते. या विषयासंबंधी एरिक व्हॉन डॅनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने काही धक्कादायक सिद्धांत मांडले. देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत.
या सिद्धांताची मनोरंजक माहिती या पुस्तकात दिली आहे. विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक पुस्तक.
- Rahul Suryavanshi
पृथ्वीवर माणूस उपराच!
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित.
हे पुस्तक प्रत्येकाने जीवनात एकदा तरी वाचावे.
देव हे खरे तर अंतराळातील प्रवासी. हजारो वर्षांपूर्वी ते एकदा पृथ्वीवर आले अन त्यांनी एक नवा जीव निर्माण केला. त्याचं नाव `माणूस!` तेव्हापासून हे अंतराळ प्रवासी चांगला माणूस घडविण्यासाठी धडपडत आहेत. दर सदतीस हजार वर्षांनी ते पृथ्वीवर येतात, चांगल्यांना ठेवतात आणि निकृष्टांना नष्ट करतात. एरिक व्हॉन डेनिकेन या झपाटलेल्या संशोधकाने पंचवीस वर्ष प्रयत्न केला आणि लाख मैलांपेक्षा अधिक भ्रमंती करून त्यांच्या वास्तवयाचा मागोवा घेतला. या प्रयत्नात कोट्याधीश व्हॉन डेनिकेन कफल्लक झाला. पण त्याने आपल्या संशोधनावर ग्रंथ प्रसिद्ध केले अन तो पुन्हा कोट्याधीश बनला. परंतु या खटाटोपात मानवाच्या निर्मितीचं रहस्य मात्र उलगडलं नाही
- Anand Pandare
तर मुलभूत प्रश्न असा की, पृथ्वीवर माणूस अवतरला कसा?? ह्या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारात मिळतं.. पहिलं म्हणजे धर्मात आणि दुसरं म्हणजे विज्ञानात !!! जर धर्माच्या उत्तराचा विचार केला तर त्यात एकवाक्यता दिसत नाही,याचं कारण पृथ्वीवर अस्तित्वात असलेले वेगवेगळे धर्म... त्यांचे वेगवेगळे देव... आणि त्या देवांनी माणसाला जन्माला घातलेल्या वेगवेगळ्या पद्धती व कारणं... परंतु विज्ञानाच्या उत्तरात मात्र अखंड पृथ्वीवर एकवाक्यता दिसते याचं कारण विज्ञान सिद्धता, पुरावे, आणि स्पष्टीकरणाच्या आधारावर उत्तर स्विकारते... आणि त्याच आधारावर जर भविष्यात दुसरे अधिक योग्य उत्तर मिळाले तर आनंदाने, खुल्या दिलाने त्याचा स्विकार करते. परंतु धर्मात हा लवचिकपणा नाही आणि तो येणारही नाही.
असो... सध्या विज्ञान मनुष्य जन्मासाठी डार्विनच्या सिध्दांताला पुरस्कृत करतयं... थोडक्यात, माकडा पासून माणूस जन्माला आला असं विज्ञान म्हणतयं... परंतु अजुनही काही बुद्धीवंत एक वेगळीच वाट दाखवत आहेत, त्याचंच विश्लेषण ह्या पुस्तकात केले आहे. तर यांच म्हणणं असं की, माणूस ह्या पृथ्वीवरचा नैसर्गीक प्राणी नाहीच मुळी !!! परग्रहावरच्या प्रगत सजीवांनी (मनुष्य सदृश्य म्हणा हवं तरं..) कैक वर्षांपूर्वी पृथ्वीवर येऊन, संकर घडवून, मनुष्य प्राणी तयार करुन इथे सोडला.. आणि मग तो स्वतःच्या क्रियाशील मेंदूच्या जोरावर आजतागायत प्रगत होत गेला... हि थेअरी लेखकाने खूप साऱ्या उदाहरणासहित पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. (उदा. पिरॅमिड व त्याची भूमितीय रचना आणि खूप काही... ते तुम्ही वाचूनच पहा)
तर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणार्यांसाठी हे एक रंजक पुस्तक आहे हे मात्र नक्की !!!
जोतिष्या पुढे हात दाखवून आपलं भविष्य जाणून घेण्यापेक्षा एकूण मनुष्य जन्माचा भूतकाळ शोधणं हे अधिक महत्त्वाचं आणि मजेशीर वाटतयं... तुम्हाला काय वाटतयं ???
...आनंद पंदारे.
- A. M Patil
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे पृथ्वीवर माणूस उपराच हे पुस्तक खुप दिवसांपूर्वी वाचले होते.आज पुन्हा काही गोष्टींचा विचार करताना पुस्तकाची आठवण झाली म्हणून पुन्हा वाचले.पुस्तक वाचल्यानंतर खुप प्रश्न पडतात अनेक ठिकाणी विचार येतो की खरंच माणूस हे निसर्गाचे सावत्र अपत्य तर नाही ना? नाडकर्णीं च्या किंवा एरिक च्या विचारांशी किती जण सहमत असतील? ज्यांनी हे पुस्तक वाचलंय त्यांच काय मत आहे ते मला जाणुन घ्यायला आवडेल.
एरीक व्हॉन डॅनिकेन या स्विस संशोधकाच्या संशोधनाप्रमाणे माणूस हा पृथ्वीवरचा नसुन खुप पूर्वी या पृथ्वीवर उडत्या तबकड्या मधुन extra-terrestrials (ज्यांना आपण एलिअन्स किंवा देव म्हणताे)हे पृथ्वीवर आले.कदाचीत त्यांच्यातल्या मतभेदांमुळे काही इथे राहिले आणि काही परत गेले. कदाचित त्यांनी जेनेटीक्स इंजिनीअरींग सारखे तंत्र वापरुन मानव निर्माण केला. परंतु आपण अभ्यास करतो त्या विकास सिद्धान्ताप्रमाणे ड्रायोपिथेकस (Dryopithecus) या सस्तन प्राण्याच्या तीन उपजाती (Species) निर्माण झाल्या. त्यांत ड्रायोपिथेकस पंजाबाय (D. punjabi) पासून गोरिला‚ ड्रायोपिथेकस जर्मनाय (D. germani) पासून चिंपांझी आणि ड्रायोपिथेकस डार्विनाय (D. drawini) पासून मानव निर्माण झाला.मग या मानवाच्या मध्यंतरीच्या बदलत्या स्थित्यंतर-अवस्थांचे पुरावे जगात कुठेही चुकूनसुद्धा आढळत नाहीत असे का? मधला बराचसा काळ पूर्णपणे गायब झाल्यासारखे वाटते.मानवाचा भूतकाळ जर दहा लक्ष वर्षांचा मानला‚ तर त्यांपैकी जेमतेम सात हजार वर्षांचा इतिहास अन् तो देखील अत्यंत विस्कळीत स्वरूपात उपलब्ध आहे.
एक लाख मैलांपेक्षाही अधिक प्रवास एरिक व्हॉन डॅनिकेन यांनी केला आणि आपल्या संशोधनाद्वारे अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात आणल्या तुर्कस्तानातील इस्तंबूल येथील तोपकापी नावाच्या जुन्या राजवाड्यात सापडलेले जगाचे 20 नकाशे पिरी रीस याच्याकडे होते, इन्का चे समांतर रस्ते त्यावर असलेल्या खुणा जणू काय ती त्या अंतराळातील अतिमानवासाठी असलेली धावपट्टीच,अॅन्डीज पर्वतातील पिस्को या डोंगरावर सुमारे आठशे वीस फूट उंचीचा प्रचंड त्रिशूळ कोरण्यात आला आहे हे तर हवाई अड्डे असावेत असे एरिक म्हणतो.
आजच्या प्रगत काळातील स्थापत्यशास्त्राला अशक्य अशा रचना, इजिप्तमधील पिरॅमिडस आणि स्त्रीचे डोके असणारी व सिंहाचे शरीर असलेली अतिभव्य पाषाणमूर्ती स्फिन्क्स,पिरॅमिडच्या गाभ्यामध्ये असलेली किरणोत्सर्गी योजना, या सर्व आणि अशा कितीतरी गोष्टी विचारवंतांना नेहमीच बुचकळ्यात पाडतात.अनेक पुरातत्त्ववेत्त्यांनी अनेक वर्ष संशोधन करूनसुद्धा त्यातुन समाधानकारक उत्तरे मिळत नाहीतच हे सर्व वाचल्यानंतर खुप आश्चर्य वाटते.
कदाचित या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यात माणूस कमी पडला असेलही पण इतिहासातील न उलगडलेल्या या रहस्यमय गोष्टी वाचल्यानंतर मलातरी पुस्तकाचे नाव अगदी योग्य वाटते की पृथ्वीवर माणूस उपराच!
नक्की वाचा.
- AKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS
जवळपास सर्वच धर्मग्रंथांमध्ये देव हे स्वर्गातुन विमानाने पृथ्वीवर येतात असे संदर्भ आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे संहारक शस्त्रे देखील होती. याचाच अर्थ देवांकडे प्रगत तंत्रज्ञान असणार. आज मानवाला उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि पुराणांमध्ये वर्णलेली तंत्र बऱ्यापैकी मेळ खातात. लवकरच मानव इतर ग्रहांवर वस्ती करण्यास सक्षम होईल आणि परग्रहवासीयांच्या शोधात तर मानव आहेच. समजा मानवाने येत्या ५० वर्षात एखाद परग्रहीय जीवन शोधलं आणि तेथे तो स्पेसशिप घेऊन पोचला आणि ते परग्रहीय जीव आपल्यापेक्षा अप्रगत असले तर ते त्या घटनेचं वर्णन – “आकाशातुन विमान घेऊन येणारे देव ज्यांच्याकडे अफाट शक्ती आहे” असच करतील.
पृथ्वीवर माणूस उपराच हे मराठीत लिहिलेलं, ऐतिहासिक घटनांना एका वेगळ्या दृष्टीने बघण्यास प्रवृत्त करणार बंडखोर पुस्तक. एरीक डेनिकेन यांच्याकडून प्रेरणा घेऊन सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल त्यांच कौतुक करावं तितकं कमीच. पुस्तकाच्या नावातील “उपरा” शब्द इथे “बाहेरील” किंवा सरळ सरळ “परग्रहीय” म्हणून घेऊ शकतो.
लेखक प्राचीन काळातील घटनांना वेगळ्या दृष्टीने मांडतो जस कि १६व्या शतकातील पिरि रिस चे नकाशांमध्ये उत्तर-दक्षिण अमेरिकेचा भाग खूपच लांबलचक रेखाटण्यात आला आहे. जेव्हा कैरो शहर मध्यबिंदू धरून अडीचशे मैल उंचीवरील उपग्रहातून पृथ्वीचे छायाचित्र काढले ते पिरि रिस च्या नकाशांशी तंतोतंत जुळले. त्या छायाचित्रात अमेरिकेचा आकार लांबलचक आढळून येतो. आता प्रश्न आहे की १६व्या शतकात पृथ्वीपासून अडीचशे मैल उंचीवरून हा नकाशा बनवणे शक्य नसताना हा नकाशा कसा बनवला गेला?
तसेच इंका संस्कृतीचे रस्ते उंचीवरून बघितल्यास आपल्याला विमानांसाठी रनवे असल्याचा भास होतो. असे एक ना अनेक संदर्भ आपल्याला विचार करायला भाग पाडतात. खरंच मानवी उत्पती आपल्याला माहित असलेल्या परिघाच्या बाहेरील आणि न उलघडलेलं गूढ आहे.
- piyu
This book is really very amazing it shows us a virtual reality of us. Also he says that how fake sayings about humans still exist in this world and this thought in us should be changed . Nice book everyone must read it.
- Sandip R Chavan
माझ्याकडे संग्रही आहे, छान आहे पुस्तक🙏
- Amol Palkar
प्रस्थापित विचारांना कलाटणी देणारे व विचारांच्या कक्षा रुंदवणारे पुस्तक ..........बाबा वाक्यं प्रमाणम... या पद्धतीने विचार न करता या पुस्तकातील सिद्धांतावर किमान आपण विचार तरी करूयात.......
- Amol Palkar
प्रस्थापित विचारांना कलाटणी देणारे व विचारांच्या कक्षा रुंदवणारे पुस्तक ..........बाबा वाक्यं प्रमाणम... या पद्धतीने विचार न करता या पुस्तकातील सिद्धांतावर किमान आपण विचार तरी करूयात......
- Piyush N.
This book is good to read ........i like it
- Vaishnavi, Dhule
Interesting Read !
- Pranav
Good
- अपूर्व वैद्य
प्रस्तुत पुस्तकात डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी एरिक व्हॉन डॅनिकेन या इतिहास संशोधकाने केलेल्या संशोधनाचे विश्लेषण अत्यंत माहितीपूर्ण पद्धतीने केले आहे. देव हे आपल्यासाठी अजूनही एक रहस्यच आहे त्याची उकल करण्याचा अतिशय सफल प्रयत्न या पुस्तकातून झाला आहे .