* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PAVANKHIND
 • Availability : Available
 • ISBN : 9788177661835
 • Edition : 25
 • Publishing Year : MARCH 1981
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 164
 • Language : MARATHI
 • Category : HISTORICAL
 • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
MAHARASHTRA, THE STATE IN WESTERN INDIA, HAD BEEN UNDER THE RULE OF THE MUSLIMS SINCE THE THIRTEENTH CENTURY. FOR ABOUT FOUR HUNDRED YEARS IT HAD TYRANNICAL AND INTOLERANT KINGS FROM OUTSIDE WHO NEVER ALLOWED THE LOCAL POPULATION TO LIVE IN PEACE. LOOT, EXPLOITATION IN THE NAME OF RELIGION, RAPE AND VIOLENCE WERE RAMPANT UNTIL CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ CHALLENGED THE RULERS AND SET UP A MARATHA EMPIRE IN THE SEVENTEENTH CENTURY. HIS MISSION WAS NOT A CAKEWALK: HE HAD ENEMIES FROM WITHIN, OUTSIDE THE STATE AS WELL AS THOSE FROM OTHER COUNTRIES (THE PORTUGUESE AND THE BRITISH HAD MADE THEIR PRESENT FELT BY THEN.) LOYALTY OF HIS FOLLOWERS WAS ONE MAJOR FACTOR THAT HELPED CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ BUILD AN EMPIRE WHICH WAS HELD IN AWE. PAVANKHIND IS A HISTORICAL NOVEL THAT COVERS THE EVENTS LEADING TO THE WAR OF PAVANKHIND. (PAVANKHIND IS A PASS NEAR KOLHAPUR.) THE KING SUCCESSFULLY MADE HIS WAY THROUGH A SIEGE OF THE PASS; THANKS TO BAJI PRABHU DESHPANDE WHO MADE THE BREAK THROUGH POSSIBLE.
हेलकावे घेणाया पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानावर येत होता, ‘‘चला’’ चला! कुठं जायचं? एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर? बाजी! कशासाठी हे कष्ट घेता? कोणाच्या स्वार्थापायी? आणि तेही एका माणसाच्या जिवापायी? कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं? कोणत्या अधिकारानं? जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वत:च्या जीवाचं! मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात? कसल्या आणि कुणाच्या भरवशावर? बाजी, फुलाजी तुम्ही स्वामीकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात? कोणत्या त्यागापायी? हे व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो. पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपुर्द केलंत? यातून खरं काही साधणार आहे का? या पालखीचा वीट येतो! नशिबानं या संकटातून पार पडलोच तर... बाजी, पालखीचा मान तुम्हाला देऊ! त्यावेळी तुम्हाला कळेल ही पालखी केवढं सुख देते ते!

No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
 • Rating StarIshant Sarphare

  पावनखिंड महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचाव तेवढ कमीच आहे. महाराजांचा प्रत्येक मावळा हा हिरे, रत्न मणिकांहूनही अनमोल आहे. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांविषयी वाचताना अभिमान वाटतो, अनेकदा ऊर भरून येतो, अनेकदा डोळेही पाणवतात, अशी स्वामीनिष्ठा बघन तर प्रश्न पडतो की कुठून येते एवढी स्वामिनिष्ठा, आता त्या साठी स्वामीही तसाच असावा लागतो म्हणा. पण हल्ली आपल्या सभोवताली काम करणाऱ्या लोकांकडे बघीतल इतकच काय तर स्वत:कडे जरी पाहील तरी अस वाटतं की महाराजांच्या मावळ्यांमधील 10% गुण जरी आपल्यात आले तरी जिवनाच सार्थक होईल. पावनखिंड पुस्तक फारच छान आहे. अशी पुस्तके शालेय जिवनातच मुलांना वाचायला दिली पाहिजेत. नक्की वाचा. ...Read more

 • Rating StarGitanjali Abhang

  प्रचार सभेत बोलण्याऱ्या आणि मनानेच इतिहासातील प्रसंग रंगवाणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर विचार करायला लावणारे हे पुस्तकं आहे.लॉकडाऊनच्या संधीचा फायदा घेत मी या पुस्तकाचे वाचन केले. खरंच हिरकणी चित्रपटासारखं हे पुस्तकं ही काहीशा छोट्या प्रसंगा रून लिहिले आहे असं वाटते पण असे नाही कितीतरी गोष्टी पडद्या मागच्या कलाकारांसारख्या असतात. त्या कधीच दिसत नसल्या तरी खूप ग्रेट असतात.मग पुढे येणारेच लक्षात राहतात, त्यांच्याच जयंत्या होतात पण असेही अजून खूप लोक आहेत ज्यांनी कधी प्रसिद्धीच्या झोत्यासाठी इतिहास गाजवला नाही. ह्या पुस्तकात अगदी तसच बाजी सोबत त्यांचे सख्खे बंधू फुलाजी ही प्राणाची बाजी लावतात. खूप साऱ्या शिवाजी महाराजांच्या सवई आहेत. तसेच त्याचे किल्ल्याविषयी असलेल प्रेम,काही विशिष्ट आदर ह्या पुस्तकात उत्कृष्टरित्या मांडलेले आहे. तुम्ही सर्वांनी हे पुस्तकं जरूर वाचा. - Gitanjali Abhang ...Read more

 • Rating StarRamesh Patil

  "पावनखिंड" रणजित देसाई यांच १४४ पानांचा पुस्तक सुरवात केली ते ३ तासात शेवट करुनच थांबलो तुमच्यासारखा माणसांमुळे आम्ही इतिहास अनुभवतो खरंच तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.. १३ जुलै १६६०.. इतिहासातील एक भयानक रात्र ३०० मावळा विरूद्ध ५००० गनिम रात्रभ ३०० मावळे चालुन थकलेले जवळपास ३ तास खिंड लढवायची होती..महाराजांनी ३०० मावळे घेऊन विशाळगडाकडे कूच केली होती पण विशाळगडाला वेढा असल्यामुळे अंदाजे ३तास होणारी लढाई ७-८ तास चालली.. जोपर्यंत तोफांचे आवाज ऐकु येणार नाहीत तोपर्यंत खिंड गनिम पुढं जावुन देणार नाही..काय ती स्वामिनिष्ठा २१ तास..पोटात अन्नाचा कण नाही..शरीर थकलय..अशा स्थितीत मावळ्यांनी खिंड लढवली ... कुणासाठी?आपल्या राजासाठी.. तोफांचे आवाज ऐकले अन् बाजी धारातीर्थी पडले पण उडत्या मातिला सांगते झाले लढण्याचा ईतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही..जोवर मैदानात उभा मी..जिंकण नियतीला ही शक्य नाही बाजीप्रभू.. फुलाजी प्रभु..अन बांदलसेना यांच्या असिम त्यागाला..पराक्रमाला.. पराक्रमाच्या जाज्वल्य अखंड परंपरेला मानाचा मुजरा🚩🚩 #ज्वलज्वलनतेजस ...Read more

 • Rating StarSandip Kalyani K K

  कोरोना झाले मुळे न काढता वेळ मिळाला पावनखिंड लहानपणी शाळेत बाजी प्रभू देशपांडे यांचा धडा होता तो कायम आठवायचा म्हणून हे पुस्तकच घेतले पुस्तकाचे पण रणजित देसाई यांच्या मुळे खूप चर्चा ऐकली होती 2 दिवसात काय 5 तासात वाचून काढले एक तर जुनी आठवण अन देसा सरंच वेगवान लेखन अक्षरशः खिळवून ठेवलं या पुस्तकानं ते पण करोना असताना बाजी,फुलाजी कायअन बांदल मावळे काय काय पराक्रम केला या लोकांनी सहज जीव ओवाळून टाकला राज्या साठी थक्क करणारा अनुभव ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHUJABA
KHUJABA by DR.SANJAY DHOLE Rating Star
लोकसत्ता १६-०४-२०२३

आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी माणसाने नेहमी विज्ञानाची मदत घेतलेली आहे. त्यामुळे माणूस सतत विज्ञानात संशोधन करत असतो. आज भौतिक, रसायन, वनस्पती, अंतराळ, हवामान शास्त्रासोबतच जीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवभौतिकी, जैवरसायन, जैवमाहिती, जनुकीयसारख्या आंतरपरणाली शाखांमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. या विविध प्रयोगांची दखल विज्ञान कथालेखक आपल्या कथांमध्ये घेताना दिसत आहेत. सशक्त विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आधारित विज्ञान कथा लिहिणारे डॉ. संजय ढोले एक नावाजलेले विज्ञान कथालेखक आहेत. त्यांचा ‘खुजाबा’ हा सातवा विज्ञान कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात विज्ञानाची परिभाषा करणाऱ्या व समाजातील विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या अशा १२ कथांचा समावेश आहे. कथासंग्रहाच्या सुरुवातीला डॉ. संजय ढोले यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की, विज्ञान कथांमधले विज्ञान हे खरे असून, आज चालू असलेला प्रयोग कदाचित उद्या एक वेगळी तंत्रज्ञानक्रांती घडवून आणू शकतो. एखाद्या विज्ञान कथेतील विज्ञान हे पाच-दहा वर्षांनंतर खरे ठरू शकते. सध्या तंत्रज्ञान एवढं झपाटय़ानं विकसित होत आहे की कितीतरी अशक्य गोष्टी शक्य होताना आपल्याला दिसत आहेत. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा माणूस चांगल्या कामांसाठी जसा उपयोग करू शकतो, तसाच तो स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा दुरुपयोगही करू शकतो. या सगळय़ांचा विचार ‘खुजाबा’ संग्रहातील कथा लिहिताना लेखकाने केलेला दिसून येतो. गुन्हेगारांना शोधणे हे काम पोलिसांचे आहे. परंतु जेव्हा गुन्हेगार सापडत नाही, तेव्हा त्यांना शोधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा व संशोधनाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो हे ‘अपहरण’ व ‘साक्षीदार’ या कथांमधून दिसून येते. संशोधन करणारे काही शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाचा दुरुपयोग करून देशाचे कसे शत्रू बनू शकतात, हे आपल्याला ‘आगंतुक’, ‘अंधार गुणिले अंधार’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मासिक पाळीला अपवित्र मानणाऱ्या स्त्रीला त्याच मासिक पाळीमुळे दुर्धर आजारावर मात करायला कशी मदत होते व तिच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते हे ‘कलाटणी’ या कथेत वाचण्यासारखे आहे. जसे आपले शत्रू आपल्या पृथ्वीवर आहेत, तसेच ते परग्रहावरदेखील असतील अशी कल्पना माणसाच्या मनात नेहमी येत असते. हे परग्रहावरून येणारे आव्हान कसे असू शकेल याची झलक ‘अज्ञात जीवाणू’ व ‘संकेत’ या कथांमध्ये वाचायला मिळते.मानवाने आपल्याला मदत व्हावी म्हणून यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. पण यंत्रमानवात जर मानवासारख्या जाणिवा प्रगल्भ झाल्या तर तो स्वत: निर्णय घेऊन मानवाचा कसा घात करू शकतो हे ‘अपघात’ या कथेत वाचायला मिळते. हा यंत्रमानव जर नॅनो टेक्नोलॉजीने बनलेला, डोळय़ांनी न दिसणारा खुजाबा म्हणजे नॅनो यंत्रमानव असला तरी तो किती भयंकर उत्पात करू शकतो हे ‘खुजाबा’ कथेत वाचून आपण अवाक् होतो. कथासंग्रहाला दिलेल्या शीर्षकाची ही कथा तंत्रज्ञानापुढे माणूस हतबल होऊ शकतो हे दर्शविणारी आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळे, किडनी, यकृत, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. पण जर मेंदूचे प्रत्यारोपण यशस्वी झाले तर काय होऊ शकते हे ‘कालचक्र’ या कथेत वाचायला मिळते. नाभिकीय क्षेत्राशी संबंधित असणारी ‘अगम्य’ कथा व जीवाणू, विषाणूंच्या डी.एन.ए.मध्ये परिवर्तन केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे दर्शविणारी ‘शिखंडी’ कथाही वाचण्यासारखी आहे. डॉ. संजय ढोले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधक असल्यामुळे त्यांच्या कथांमधून विज्ञानप्रसाराबरोबर प्रबोधनही होताना दिसते. प्रत्येक कथेचा बाज वेगळा असल्यामुळे वाचकाची कथा वाचत असताना उत्सुकता ताणली जाते. कथासंग्रहाची भाषा सामान्य वाचकाला समजेल अशी आहे. कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक व कथांना साजेसे आहे. लहानात लहान पेशींपासून माणसाने बनविलेला जीवाणू, जेव्हा माणसासारखा मेंदूचा वापर करू लागतो तेव्हा तो त्याला बनविणाऱ्या माणसालाच खुजं करून अगतिक होण्यास भाग पाडतो. हा आशय बोलका करणारं चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करणारं आहे. २१ व्या शतकातील बदलत्या विज्ञान व तंत्रज्ञानाची साक्ष देणाऱ्या ‘खुजाबा’ कथासंग्रहातील विज्ञानकथा विज्ञान अभ्यासकांबरोबर सामान्य वाचकांनाही आवडतील अशा आहेत. ...Read more

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
डाॅ. बि.एन.जाजू, पुणे.

परवाच जी. बी. देशमुखांच "अ-अमिताभचा " हे पुस्तक वाचून झालं. खूप छान लिहिलंय त्यांनी. प्रत्येक चित्रपटाचा बारकाईनं केलेला अभ्यास, त्यातील प्रसंगांचं आणि अमिताभच्या अभिनयाचं समृद्ध भाषेत केलेलं लेखन आणि लिखाणाचा ओघ (flow) सर्वच अप्रतिम.