Kadambari Mate#ययाति
***** ययाति ( कादंबरी ) वि.स.खांडेकर ******
----- कादंबरी मते.
मराठी साहित्यविश्वातील मैलाचा दगड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी `ययाति`म्हणजे वि.स.खांडेकर यांच्या एकुण साहित्यकृतींच्य रत्नमाळेतील मेरुमणीच होय. ययातिच्या लोकप्रियतेचे गारूड मराठी मनावर आजही कायम आहे. वासना आणि मोह एका मर्यादेपलीकडे गेले की त्याने येणारं आंधळेपण आपल्याकडून काय काय घडवून आणू शकतं याचं उत्तम दर्शन म्हणजे ही कादंबरी.
खरंतर देवयानी आणि ययाति हे महाभारतातील एक अतिशय छोटे उपाख्यान आहे. त्यामुळे या कथेचा आत्माही लहान आहे. पण खांडेकरांनी या कथेवर विस्तारपूर्वक कादंबरी लिहिली आहे.
वि. स. खांडेकर स्वतः म्हणतात, ययाती ही शुद्ध पौराणिक कादंबरी नाही. पुराणातल्या एका उपाख्यानाच्या कथासूत्राचा आधार घेऊन लिहिलेली स्वतंत्र कादंबरी आहे.
उदाहरणच द्यायचे झाले, तर संजीवनी विद्येचे हरण करून देवलोकी गेलेला महाभारतातील कच पुन्हा आपल्याला कधीच भेटत नाही. मात्र या कादंबरीत तो शेवटपर्यंत येत राहतो.
मुळ आख्यान नीट वाचले तर लक्षात येते, देवयानीचे खरे प्रेम कचावर होते, पहिलेवहिले आणि उत्कट प्रेम होते. तिने ययातिशी लग्न केले ते महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन.. तिने शर्मिष्ठाला आपली दासी केले ते सुडाच्या समाधानासाठी... अशी अहंकारी, महत्त्वाकांक्षी, प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी....
या कादंबरीत ययाति हा आजच्या सामान्य मनुष्याचा प्रतिनिधी आहे. पुराणातल्या ययातिची अनिर्बंध कामवासना किती अमानुष स्वरूप धारण करू शकते आणि भोगाच्या समुद्रात मनुष्य किती ठेवला तरी त्याची वासना तृप्त होत नाही याचे चित्रण आले आहे.
आजचा मनुष्य केवळ अंधत्वाने क्रूर कामवासनेला बळी पडत आहे असे नाही तर त्याचे सर्वच मनोविकार अनिर्बंध आणि अनियंत्रित होऊ पाहत आहेत.
कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.
"ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
ययातिची जन्मकथा सांगताना खांडेकर म्हणतात, "संसार हा संकटांनी भरलेला असावयाचाच!कुणाचे हे ओझे हलके असते,कुणाचे थोडे जड असते,कुणाच्या पायात चार काटे अधिक मोडतात, कुणाच्या चार कमी मोडतात. एवढाच काय माणसा-माणसात फरक असतो.आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत."
" मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी,त्यागाची पुराणं देवळात ठिक असतात!पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे."
यति हस्तीनापुरात परत न येण्यामागचे कारण सांगताना म्हणतो की,`या जगात खरा आनंद एकच आहे तो म्हणजे ब्रम्हानंद.`आसक्तीन मनुष्य शरिरपुजक होतो.दु:खी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी होण्याची यतिची इच्छा होती. "जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोप नाही." .
कचरुपात वि.स.खांडेकर यांनी अखिल मानवतेसाठी या संसाररुपी भवसागरातुन आनंदाने तरुन जाण्यासाठीचे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितले आहे. `धर्माचे उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही.पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे तो म्हणजे त्यागाचा .` "संसार करणं हीच मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसाने उपभोग घेवू नयेत अशी ईश्वराची इच्छा असती तर त्याने शरीर दिलचं नसतं.परंतु केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे,
"मृत्यु हा अष्टोप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे."
"प्रिय व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते."
कच म्हणतो, "जीवन नेहमी अपूर्ण असतं तस ते असण्यातच त्याची गोडी सामावलेली असते.` खरं प्रेम नेहमीच निरपेक्ष, निस्वार्थी,निरंहकारी असते.जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य प्रेमापेक्षाही श्रेष्ठ भावना आहे, कर्तव्याला वेळप्रसंगी कठोर व्हावे लागते; पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे."
मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम. विविध इंद्रिय म्हणजे रथाचे घोडे उपभोगाचे सर्व विषय त्याचे मार्ग इंद्रिये आणि मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता. इंद्रिय रूपी घोड्यांना मनाच्या लगामाच बंधन सतत हवं. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवं बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. ` संसार हा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे सहस्त्र अश्वमेध यांचं पुण्य त्यात सामावलेले आहे`
ययाति कादंबरीचे गारूड रसिकांच्या मनावर असे राज्य करणारे आहे. म्हणूनच की काय हिंदी, इंग्रजी, मल्याळम, गुजराथी या भाषिकांनाही ययाति आपलीसी करावीशी वाटली. ययाति वाचत असतानाच मराठी भाषेतील असणाऱ्या अलंकारित शब्दांनी वाचकाचे मन दिपून जाते. खांडेकरांची कथेला कलाटणी देण्याची सुसूत्रता वाचकांना थक्क व्हायला लावते. त्यातील रहस्यरम्यता, यातील प्रत्येक पात्र जणू स्वतंत्रपणे स्वतःशीच संवाद साधत आहे. मात्र, तसे करताना तेच पात्र मात्र त्यांची जीवनगाथा सर्वांनाच सुपरिचित करून देतात.
सुखलोलूप ययाती, अहंकारी देवयानी, प्रेमळ शर्मिष्ठा, कोपिष्ट शुक्राचार्य, शूर-धीर-त्यागी पुरू, संन्यासाश्रमाच्या अतिरेकातून विकृत झालेला यती, संन्यस्त तरीही जीवनातील द्वैत-संघर्ष-सौंदर्य यांचा समंजस स्वीकार करणारा कच या या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
संसारात पैसा, कामवासना सुखं या सगळ्यांपासून असमंजसपणे पळून जाणारा, प्रत्येक सुख म्हणजे पाप आहे असं समजणारा यती विकृतीचं एक टोक आहे तर फक्त सर्वसुखोपभोग म्हणजेच आयुष्य असं मानणारा ययाती हे विकृतीचं दुसरं टोक.
जीवनातलं सुख-दुःख, प्रेम-वासना, आयुष्याचा आनंद घेणं- त्यामध्ये वाहून जाणं याबद्दल ही उद्बोधक चर्चा आहे. लेखकाचं वैशिष्ट्य असं की ही चर्चा कथेच्या ओघात येते, पात्रांच्या सहज संवादात येते, चर्चा नीरस होत नाहीच उलट कथानक पुढे घेऊन जायला, प्रसंगाची परिणामकारकता वाढवायलाच मदत करते.
ययाति वाचताना एक गोष्ट लक्षात येते , काळ बदलतो प्रवृत्ती नाही. ऐतिहासिक पात्रांच्या प्रवृत्तीची एखादी तरी आवृत्ती काळाच्या प्रत्येक टप्प्यावर पाहिला मिळते. असंख्य यती, ययाति, कच, देवयानी, शर्मिष्ठा आपल्या आजुबाजूला असतात . फक्त आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही. दैव माणसाला खेळवतं, अगदी वाटेल तसं पण म्हणून जो सारीपाट विध्यात्यानं रचला आहे तो क्षणार्धात आपण उधळून लावू शकत नाही.
भोगा: न भुक्ता: वयम् एव भुक्ताः
तप: न तप्तं वयम् एव तप्ताः।
काल: न यात: वयम् एव याताः
तृष्णा न जीर्णा वयम् एव जीर्णाः॥
आम्ही भोग भोगले नाहीत, तर आम्हीच भोगांकडून भोगले गेलो। आम्ही तप केले नाही, पण आम्हीच तापवले मात्र गेलो। काल गेला नाही (आम्ही काल व्यतीत केला नाही), तर, आम्हीच कालमुखी गेलो। तृष्णा (अतृप्ती) जीर्ण (कमी) झाली नाही, तर, आम्हीच जीर्ण (म्हातारे) झालो।
या जगात जन्माला येण्याचा एकाच मार्ग आहे, तसं मरणाच नाही…
मृत्यु अनेक वाटांनी येतो! कुठून ही येतो तो!
***
आत्मप्रेम
या जगात जो तो आपापल्याकारिता जगतो हेच खरे.
वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात…..
याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री……..पण खरोखरच हे “आत्मप्रेम” असते….
***
आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे,
असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते………
***
अपहार
ते फूल पाहून माझ्या डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे.
ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी.
पण ते तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी वाटतील मला.
मग दूस-यांच्या फूलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल……..
अपहारासारखा अधर्म नाही……….
***
सुख
या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो—–ते मिळत असते तेव्हा…….!
***
प्रिती
प्रिती ही कधी उमलणा-या फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते.
ती कधी चांदणी होते, तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे… ती कधी जीव देते, तर कधी जीव घेते………!!
***
जीवन
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे…
***
प्रेम
प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो,
ते कशावरही जड़लेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा नये.
खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं, निरपेक्ष असतं… मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो,
प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष,
निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते………..
असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो!
***
जग माणसाच्या दयेवर चालत नाही.
ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं.
माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.
मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी ! !
त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.
***
मुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ?
फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ?
प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.
***
दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो
***
माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती,
तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे.
देवान माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे.
शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याच बंधन हवं
त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही ,
ते रणांगण आहे.
1) जगात सर्व गोष्टी मानसाला योग्य वेळी कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुले व फुलांबरोबर फळे येत नाहीत.
2) मानुस शरीरावर प्रेम करतो. त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.
3) सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या फळात किड आढळते. जिवन असेच आहे. ते सुंदर आहे, मधुर आहे. पण त्याला केव्हा कोठून किड लागेल याचा नेम नसतो.
4) जिवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून आत जावून आतल्या काही न दिसणाऱ्या अंधारातून आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतःच शोधून काढले पाहीजे.
5) मानवी मनाची आणि जिवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे. त्यामुळे सुख हा अनेकदा मृगजळाचो शोध ठरतो.
6) सुख ही दुखःची छाया आहे, की दुःख ही सुखाची सावली हे न उलगडलेलं कोडं आहे.
7) रुपवती स्त्री जशी विनयानं शोभून दिसते. तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात.
8) या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव शापीत असतो. कुणाला पुर्वजन्माचं कर्म भोवतं, कुणाला आई बाबांच्या दोषाची फळं चाखावी लागतात, कुणी स्वभावदोषामुळे दुःखी होतात तर कुणाला परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होवून जिविताचा प्रवास करावा लागतो.
9) जिवन हा अनेक शापांनी युक्त असा एक वर आहे.
10) मृत्यू हे एक मोठे अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले, तरी ते मानसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे कूरुप प्रचंड धुड आपला वास काढत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राण कंठाशी येतात.
11) मृत्यू हा अष्टौप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे. याला जगात कोणी विरोध करु शकत नाही.
12) सत्य
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते.
नुकत्याच जन्मलेल्या बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते……….
13) बायकांचं लक्ष पुरुषाच्या जिभेकडं नसतं, ते डोळ्यांकडे असतं !
14) मानसाने जिवनाच्या मर्यादा कधी विसरु नयेत.
15) यौवन म्हणजे वार्धक्यातली पहिली पायरी. मृत्यू ही वार्धक्याची शेवटची पायरी.
16) वृक्षवेलीची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी मानसे सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याचाच जग कधी प्रेम म्हणतं. कधी प्रिती तर कधी मैत्री पण खरोखरच हे आत्मप्रेम असते.
17) द्वंद्वपूर्ण जिवणात तत्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे.
18) या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे. पण मरणाचं तसं नाही. तो अनेक वाटांनी येतो. कुठूनही येतो.
19) मृत्यू हा जीवन मात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टीच्या जन्मानइतकाच नाट्यपूर्ण आणि सहस्यमय भाग आहे.
20) सौंदर्याची पुजा हा “स्त्री’चा धर्म आहे. ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करु शकत नाही.
21) जो घाव घालतो, त्याला तो विसरुन जाणं सोपं असतं. पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो, त्याला त्याचा कधीच विसर पडत नाही.
22) प्रिय व्यक्तिचा तिच्या दोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते. असली पाहिजे.
23) जिवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे. पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे.
24) आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहण्यात अपूर्व आनंद असतो.
25) डोळ्यांत अश्रू येणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे.
26) विचारांच्या सहाय्याने विकारांवर विजय मिळविण्यातच खरा पुरुषार्थ मनुष्यधर्म आहे.
27) दैव मोठं लहरी आणि निर्दयी आहे. ते एका क्षणात आकाशातील उल्केला पृथ्वीवरला पाषाण करुन सोडते.
28) कुणाचंही दुखः असो. ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे. तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना करणे.
29) जी नदी तहानेनं व्याकूळ झालेल्या मनुष्याची तृष्णा शांत करते, तिच पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते.
30) ज्याचा आत्मा स्वार्थाच्या वासनांच्या आणि भोगांच्या आहारी जातो, तो मनुष्य या जगात सदैव दास्यात खितपत पडतो.
31) स्त्रीयांच्या बरोबर चिरकाल स्नेह राहणं शक्य नसते. कारण त्यांची ह्दयं लांडग्याच्या हृदयासारखी असतात.
32) पापाचा विषवृक्ष विश्वव्यापी असतो. त्याची पाने मोहक दिसतात. त्याची फुलं धुंद करुन सोडतात. पण त्याची फळं…. त्याच्या प्रत्येक फळात तक्षक लपुन बसलेला असतो. त्याचा दंश कुणालाही केव्हाही होवू शकतो.
33) दुःखाचे सात समुद्र ओलांडल्याशिवाय आनंदाचे कधीही न सुकणारे फुल मानसाला मिळू नये, असा जिवनाचा नियम आहे की ?
34) मानुस हा देव आणि राक्षस यांचा विचित्र संकर आहे.
35) संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का ?
36) समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मुलं वाळूचा किल्ला बांधतात. भरतीची एक लाट येते आणि तो किल्ला कुठच्या कुठं नाहिसा होवून जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा मानसाचे जीवन काय निराळे आहे ?
37) जे जीवन वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगणं… त्या जिवनातील रस किंवा सुगंध शोधनं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
38) निराशेपेक्षा खोटी आशा फार वाईट असते.
39) जिवनाच्या जमा खर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही. त्याला तो उद्या मिळेलच असे नाही. या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल, उद्याची सोनेरी फुले फुलतील पण त्या उद्याच्या जगात हा वास घेणारा असेलच असे नाही.
40) जीवन क्षणभुंगुर आहे. या जगात कोणत्या क्षणी मानसाला मृत्यू येईल याचा नेम नाही. म्हणून आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण हा मानसाने सुवर्णक्षण मानला पाहिजे. त्यातला रस, सुगंध आनंद अगदी कठोरपणे पिळून घेवून मानसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे.
सुख
या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो—–ते मिळत असते तेव्हा…….!
जीवन
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे…
...Read more