* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: PARVA
 • Availability : Available
 • Translators : UMA KULKARNI
 • ISBN : 9788177666731
 • Edition : 14
 • Weight : 450.00 gms
 • Pages : 792
 • Language : Translated From KANNADA to MARATHI
 • Category : HISTORICAL
 • Available in Combos :S.L BHYRAPPA & UMA KULKARNI COMBO 15 BOOKS
Quantity
THIS NOVEL IS BASED ON THE EPIC MAHABHARATA BY MAHARISHI VYAS. ALL THE CHARACTERS IN THIS ARE DIVINE YET EACH REMEMBERS BEING HUMAN. THEY ALL HAVE THEIR FEET SET FIRMLY ON THIS SOIL. EACH ONE FACES LIFE DIFFERENTLY. EACH ONE STRUGGLES THROUGHOUT. EACH ONE HAS A DIFFERENT PERSONALITY. EACH ONE POSSESSES DIFFERENT INITIATIVES AND EACH ONE FACES DIFFERENT DESTINY. ALONG WITH THIS, WE SEE VARIOUS DIVINE MIRACLES, CURSES AND BLESSINGS. THIS STORY TAKES US TO LEVELS DIFFERENT THAN THAT OF A HUMAN. DR. S. L. BHAIRAPPA THE LEADING NOVELIST, THE PHILOSOPHER FROM KARNATAKA HAS TRIED TO GIVE A MEANING TO ALL THESE MARVELS, THESE CURSES AND BLESSINGS. HE REVEALS THE CHARACTERS HIDDEN BENEATH THEM. HE PICTURES THEM DIFFERENTLY IN THE LIGHT OF MODERN HUMAN SCIENCES, SOCIAL CONCEPTS GIVING THEM A NEW MEANING, PERSONALITY, MAKING THEM UNIQUE AND SENSATIONAL.
व्यासरचित महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीची पात्रे; परंतु सगळ्यांचे पाय मातीचे. अवघी जीवनमूल्ये कसोटीला लावणारे समरप्रसंग. संघर्ष. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या. प्रत्येकाचे प्राक्तनही वेगळे. त्याचबरोबर अनेक चमत्कार; दैवी शाप; दैवी वर. मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक. कर्नाटकमधील अग्रगण्य कादंबरीकार तत्त्वचिंतक डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी या चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या भरभक्कम पडद्याआड लपलेल्या माणसांचा शोध घेतला. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली. त्यामुळेच पर्व ही महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर.
म.सा.प.-स.ह.मोडक पुरस्कार १९९२
Video not available
Keywords
Customer Reviews
 • Rating StarNEHA PRADIP JOSHI

  साधारण ८००-९०० पानांचं पुस्तक, महाभारत हा विषय आणि भैरप्पा यांच्यासारखे मला नवे असणारे लेखक त्यामुळे हा वाचनाचा अनुभव माझ्यासाठी खूपच संस्मरणीय ( शुद्ध मराठीत memorable), होता. महाभारत आणि त्यातली विविध पात्रे यांच्यावर शतकानुशतके महानतेची, उदात्ततेच इतकी पुटं चढवलेली आहेत, की खूपदा त्यांच्या या स्वरूपाचा दुसरा असा काही पैलू असू शकतो, हे मान्य करणं आपल्यासाठी कठीण होउन जातं. लेखकाने या पात्रांवर चढविलेला हा महानतेचा सारा साजसरंजाम उतरवून केवळ तुमच्या आमच्यासारखी माणसं म्हणून त्यांना आपल्यासमोर आणलं आहे म्हणूनच मला या पुस्तकाचा इतिहास अजिबात ठाऊक नसला तरी,जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं असेल तेव्हा नक्कीच विवादास्पद ठरलं असेल असा अंदाज आहे. महाभारतातील अगदी महत्वाची पात्रं म्हणून नेहमी अर्जुन, द्रौपदी, कुंती, कर्ण, कृष्ण आपल्यासमोर येतात. पण या पुस्तकात लेखकाने एक वेगळं लेखन तंत्र वापरलं आहे. . सुरुवात मद्राराजा शल्य याच्या मनात असणाऱ्या कौरव पांडवांपैकी नेमकी कोणाची बाजू धर्माला धरून आहे, या प्रश्नापासून होते. क़्वचितच एक मुख्य नायक म्हणून पुढे आलेला भीम इथे जास्त प्रभावीपणे समोर येतो.कौरव पांडवांच्या युद्धात सहकार्य मिळावं म्हणून भीम आपली प्रथम पत्नी सालकटंकटी उर्फ हिडिंबा आणि मुलगा घटोत्कच यांच्याकडे चालला आहे. तिकडे विदुराच्या घरी कुंती आपल्या मुलांच्या जन्माची कहाणी आठवते आहे. पहिला धक्का मला कर्ण आणि पांडवांच्या जन्मकहाणीचा भाग वाचताना मिळाला. महर्षी दुर्वास साधना करायला आले असताना राजा कुंतिभोज याने आपली कन्या कुंती हिला त्यांच्या सेवेसाठी नियुक्त केले. आणि तिच्या या सेवेवर प्रसन्न होऊन महर्षी दुर्वासांपासून तिला झालेला कानीन पुत्र म्हणजे कर्ण, तर हिमालयाच्या पायथ्याशी आर्य संस्कृतीशी साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या समाजातील यमधर्म, मरुत, देवाजनांचा प्रमुख इंद्र, देववैद्य यांचे आणि कुंतीचे मुलगे अनुक्रमे युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि माद्रीचे नकुल सहदेव असा संदर्भ देण्यात आला आहे. तीच गोष्ट कौरवांची. शंभर कौरव हा कायम एक आश्चर्याचा, त्याहीपेक्षा जास्त चेष्टेचा विषय बनून राहिला आहे. पण यातील केवळ १४ पुत्र आणि दु:शला ही गांधारीची अपत्यं तर बाकी धृतराष्ट्र याचे अनेक दास्यांपासून झालेले दासीपुत्र असे नमूद केले आहे. एरव्ही ज्यांच्याकडे कोणाचंही लक्ष जाणार नाही असे व्यास पुत्र विदुर, धृतराष्ट्र याचा एक सामान्य पण सारासार विचार करून पांडवांची बाजू न्यायाची आहे अशी ठाम भूमिका घेऊन पांडवांसाठी लढणारा दासीपुत्र युयुत्सू, श्रीकृष्णाचं महानत्व अंधपणे न स्वीकारता प्रत्यक्ष तपासून पाहून कृष्णाची बाजू मांडणारा युयुधान अशी अनेक पात्रं ही कथा पुढे घेऊन जातात. लेखकाने कोणीच महान म्हणून घोषित करून त्याचं पात्र रंगवलेले नाही. कुंती, गांधारी, द्रौपदी, कर्ण ,भीष्म, द्रोण, बलराम इतकेच नव्हे तर श्रीकृष्ण, वेदव्यास सामान्य माणूस म्हणूनच डोळ्यापुढे येतात. पाच पांडवांची पत्नी असणारी द्रौपदी आपल्या मनाचं एकाकीपण व्यक्त करते. भीम त्याचं पहिलं प्रेम आणि पहिली पत्नी हिडिंबा हिला अनेक वर्ष भेटला नाही, तसाच विसरलाही नाही. अर्जुन अत्यंत स्वमग्न पण कृष्णावर त्याचा पूर्ण विश्वास आहे, युधिष्ठिर नावालाच थोरला आणि फक्त प्रथम पदाच्या मानाच्या धुंदीत, नकुल सहदेव दोन्ही बाकी तिघांची एक पडछाया, कर्ण कर्तबगार आणि समस्त सुत कुळाचा अभिमान असलेला एक मानी आणि कर्तव्यदक्ष राजा, दुर्योधन सिंहासनाच्या प्रेमात, युधिष्ठिर पुत्रप्रेमात आंधळा, कुंती आपल्या संस्कारांनी, मायेने, आणि धाकाने मुलांची आयुष्य घडवणारी आई, बलराम थोरला, द्वारकेचा राजा पण कृष्णावर सतत चिडलेला आणि मत्सराने जळणारा भाऊ आणि कृष्ण कितीही सामान्य माणूस म्हणून रेखाटायचा ठरवला तरीही एक महापुरुष म्हणून आपल्यासमोर येतो. भावाचा सारा राग सहन करणारा, यादवांचं स्वतंत्र राज्य उभा करणारा, नरकासुराच्या तावडीतून सोडवून आणलेल्या १६१०० स्त्रियांना आपल्या नावाचं कुंकू लावून समाजात उजळ माथ्याने जगण्याचा अधिकार देणारा, जरासंधाशी झालेल्या युद्धात मथुरा सोडून निघून गेल्यामुळे मिळालेली कुचेष्टेने दिलेली ` रणछोडराया` ही पदवीही मानाने मिरवणारा, पांडवांचा आधारस्तंभ असणारा कृष्ण आपल्या मनात घर करून जातो. कोणे एकेकाळी ज्याला जन्म देऊन वाऱ्यावर सोडून दिलं त्या कर्णाकडे पांडवांसाठी अभय मागणारी कुंती त्याच कर्णाने आपलं सगळं रक्त सांडून मातृऋण चुकवलं, यामुळे शोकविव्हल होउन युद्धभूमीवर जाऊन त्यांचं प्रेत कवटाळते, आपल्या पाच पुत्रांच्या मृत्यूचा बदला घ्यायला पांडवांपैकी कोणीच पुढे का आलं नाही असा सरळ सरळ जाब विचारणारी द्रौपदी या महान युद्धाचा विफलतेने भरलेला उत्तर भाग स्पष्ट करतात.आर्य संस्कृती, धर्माचं रक्षण करायला कौरवांच्या बाजूने प्रथम युद्धात उतरलेल्या शल्यराजाची स्वतःची नात राजकन्या हिरण्यवती सुद्धा त्यांचे पिढीजात शत्रू असणाऱ्या नाग समाजाच्या प्रमुखाशी प्रेमविवाह करते. ही विफलता ना राजा झालेल्या युधिष्ठिराला चुकली, ना हिडिंबेला आणि तिच्या संपूर्ण परिवाराला गमावलेल्या भीमाला चुकली. ज्ञानाचे अधिकारी असा ज्यांचा लौकिक त्या वेदव्यासांनाही युद्धकाळात आपला आश्रम सक्तीने सोडावा लागला, हस्तीनापुरचा राजा असूनही धृतराष्ट्राला पाण्याची, दोन वेळच्या भोजनाची सुद्धा भ्रांत पडली. हा केवळ सत्तेचा नव्हे, तर परस्परविरोधी मूल्यांचा, आर्य आणि अनार्य संस्कृतीतील संघर्ष आहे. म्हणून माझ्या मते, महाभारतावरील एस. एल. भैरप्पा लिखित पर्व हे शब्दचित्र म्हणजे एकूणच एक महान पण आतून अनेक ठिकाणी पोकळ असलेले मानवाच्या जीवनाचे भव्य शिल्प ! ...Read more

 • Rating StarVishwas Sanap

  महाभारताकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलून टाकणारी कादंबरी तसेच महाभारतातील कोणत्याही चरीञाचे उदात्तीकरण टाळून केलेले लेखन म्हणजे महान लेखक ""एस.एल.भैरप्पा यांची आणि सौ उमा कुलकर्णी"" यांनी मराठीत अनुवादीत केलेली कलाकृती म्हणजे "पर्व"... आभाळाएवढी ऊंचीगाठलेले महाभारतातील एक एक पाञ, प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व भिन्न, प्रत्येकाचे प्राक्तन वेगळे, जीवनातील प्रत्येकाचे कसोटीमुल्य वेगवेगळे, मानवी पातळीपेक्षा वेगळ्या पातळीवर जाणारे कथानक... चमत्कारांच्या, शापांच्या आणि वरदानांच्या पडद्याआड लपलेल्या महाभारतातील पाञांचा शोध लावण्याचे कार्य भैरप्पा यांनी पर्वच्या माध्यमातून लीलया पार पाडलेले वाचावयास मिळते... आधुनिक मानववंशशास्ञीय, समाजशास्त्रीय संकल्पनांच्या प्रकाशझोतात महाभारतातल्या व्यक्तिरेखांच्या वर्तनाची संगती लावली त्यामुळेच पर्व ही महाभारताची विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणारी कलाकृती ठरली. तशीच खळबळजनकही. त्या महाकादंबरीचा हा रसपूर्ण मराठी अनुवाद. सहजसुंदर, सोप्या भाषेत... ...Read more

 • Rating StarSaroj Kale

  #पर्व हे प्रसिद्ध लेखक एस. भैरप्पा यांचं 775 पानाच पुस्तक 20 दिवसात वाचून झालं ,मला खूप आवडल कारण त्यातील गोष्टी मनाला पटन्यासारख्या आहेत

 • Rating StarVijay Patil

  सामाजिक बांधिलकी जपणारा व विविध सामाजिक, मानवी प्रश्नांना एका एका कादंबरीद्वारे मांडणारा लेखक म्हणजे एस. एल. भैरप्पा हे कानडी श्रेष्ठ लेखक होय.या व्यक्तीने कोणता विषय सोडलेला नाही? लोकांची होणारी सांस्कृतीक घुसमट, स्त्रीवाद, जातीव्यवस्था, आधुनिकतेत ुटत जाणारा हिंदू मुल्यांचा र्‍हास, भारतीय संस्कृती, राजकारण ते भ्रष्टाचार कोणताही विषय भैरप्पांना वज्र्य नाही. इतक्या सार्‍या विषयांना आवाज फोडणारा लेखक म्हणजे तो सखोल अभ्यासक असायलाच हवा. भैरप्पा त्याबाबत निराश करत नाहीत. जगात मी बुध्दिवंत म्हणून गणला जावं यासाठी काही मुद्दे व विषय यांना साचेबध्द भुमिका घेतली तरच तुम्हाला नावजलं जातं पण भैरप्पांमधील लेखक-अभ्यासक हा इथेच जगापासून फटकून वागतो. जे त्यांच्यातील अभ्याकास जाणवले तेच बांधिलकीच्या नात्याने त्यांनी लिहले व जेव्हा लिहले तेव्हा कोणत्याही टिकेचा मुलाहिजा बाळगला नाही. उमा कुलकर्णी या आपल्या मराठी भाषांतरकार लेखिका आहेत त्यांना माझा दंडवत कारण या लेखिकेने अक्षरशः भैरप्पांचा एकन एक शब्द मराठीमध्ये आणून आम्हाला समृध्द केले आहे. भैरप्पांसारखे लेखक मराठी मध्ये कमीच पण उमा कुलकर्णी यांनी त्यांच्या गेल्या ३०-४० वर्षाच्या काळात भैरप्पांची एक एक कादंबरी मराठीत आणून जे प्रश्न मराठीत योग्यपणे मांडले गेले नाहीत त्यांना त्यांनी जागा मिळवून दिली. भैरप्पांची पर्व ही माझी स्वतः सर्वाधिक आवडीची कादंबरी. ८००-१००० पानांची ही कादंबरी पहिल्या काहिपानातच तुमचा ठाव घेते, कारण इथे सांगावसं वाट्ट की भैरप्पाची वर्णनशैली हि लालित्यपूर्ण व जिवंत करणारी आहे. हि कादंबरी ही महाभारताच्या युध्दावर आहे. तसं पहावयास गेलं तर महाभारत व रामायण ही हिंदुस्थानाचे सांस्कृतिक कालवे आहेत. ज्या ज्या भारतातील कोपर्‍यात जश्या ह्या कथा पोहचत गेल्या तसतसे त्या त्या ठिकाणच्या समाजांनी आपल्या गोष्टी, प्रतिके या कालव्यामध्ये सोडून दिल्या व यामुळेच हि दोन कलारत्ने संपूर्ण भारत दर्शवतात. पण भैरप्पांना या सर्व जंजाळ किंवा जादुई पसार्‍याएवजी त्यातील मुळ कथेचा ध्यास होता. त्यामुळे शोध घेऊन महाभारतातील कोणते भाग मागून घुसडले, कोणते आतिशियोक्ती, कोणते सत्य किंवा वास्तववादी कथा शोध घेतला व हा संपूर्ण महाभारताचा युध्द संग्राम हा शेकडो व्यक्तीरेखांना हाताळूनही सौंदर्यपूर्णपणे वास्तवात कसा घडला असेल तो त्यांनी मांडला आहे. तसे पहायला गेले तर हा महाभारताचा अभ्यास व त्यावर कादंबरी लेखन हा अचाट पराक्रम म्हणावा असा आहे. आमच्या महाभारताचे इथके खंड, हजारो पानांची त्याची शब्दसंपदा, कथा, व्यक्तीरेखा हे अभ्यासून त्यातून नाविण्याचा ध्यास घेणं हे सामान्यजीवांचे काम न्हवेच. या कादंबरीस सुरवात ही या युध्दाच्या पूर्वपरस्थिती पासून व दोन पक्षांच्या राजकीय अन सामरिक बांधणी पासून होते. यात सहभागी घराणी, नाती, सत्तासंघर्ष, मूल्ये व नैतिकतेचा आग्रह, त्यांचा कोंडमार व पुर्नमांडणी हे सर्व भैरप्पांनी विस्तारीत, रसभरीत व समग्रतेचा ध्यास घेत चितारले आहे. काही भारतीय लेखक तर यास विसाव्या शतकातील अजोड साहित्यीककलाकृती मानतात. ह्या महाभारतास वेगळा चेहरा व आयाम आहे. हे वास्तदर्शी चित्रण करते. यामध्ये संजय आहे त्यास दिव्यदृष्टीने महाभारताचा संहार दिसत नाही तर तो राजदूताप्रमाणे सर्व पाहून मग सांगणारा आहे, यात पितामह भिष्म हे बाणांच्या शय्येवर नक्षत्र पालटाच्या प्रतिक्षेत स्वतःचा मृत्यू रोखून धरणारे नसून युध्दातील जखमांनी द्विध्द होऊन हा संघर्ष हताश होऊन पाहत मृत्यू पावणारे आहेत. महाभारताच्या मुख्य कथेस मान देऊन तिला वास्तवचित्रणात उमटवणारी ही कादंबरी आहे. आम्हाला, आमच्या समाजाला मौल्यिक व नैतिक आकृतीबंध देणार्‍या दोन हजार वर्षात सर्व मतमतांतरे, बदलते विचार-मूल्ये, बदलत्या समाजपरंपरा, बदलती सांस्कृतीक चौकट यांना सामावून घेत पुढे आलेल्या महाभारत या महाकाव्यास हा दिलेला आपल्या काळाने न्याय आहे असे या कादंबरीचे वर्णन करावेसे वाटते. त्यावेळच्या उपखंडात पसरलेल्या हिंदू संस्कृतीच्या ठिकाणांपासून त्यांचे मुख्य भारतभूमिशी असलेले नाते व अवलंबितता व त्यामुळेच या उपखंडातील राजसत्तांची प्रभुत्व व त्यासाठीच्या सक्षमतेसाठीचा लढा यात दिसून येतो. त्यामुळे भारतीय साहित्य वाचावेसे वाटेल तेव्हा या कादंबरीस अग्रमानांकना मध्ये स्थान असेल हि त्याची महती आहे. पर्व आधी तंतू या त्यांच्या कादंबरीने वेड लावलेले मग वंशवृक्ष मग परिशोध, काठ, तडा व जा ओलांडुनी ते दुसरी त्याचीं सर्वात माझी प्रिय कलाकृती आवरण ह्या सर्वांमधून एकाबद्दलच मला लिहावे लागले याचे दुःख जास्त आहे. शेवटी, संस्कृती समाज घडवते, समाजामधील आम्ही एक घटक असतो व याच संस्कृतीला समजुन घेण्यासाठी या कादंबरी शिवाय तरणोपाय नाही. --- विजय. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BENJAMIN FRANKLIN
BENJAMIN FRANKLIN by BENJAMIN FRANKLIN Rating Star
DAINIK LOKSATTA 01-12-2019

फ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more

SWAMI
SWAMI by RANJEET DESAI Rating Star
Eknath Marathe

मी एकदा वाचलेले पुस्तक परत वाचत नाही पण हे एकमेव पुस्तक त्याला अपवाद आहे. चारदा वाचले आहे. मुलांना मानगूट पकडून वाचायला लावले आहे !