* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666335
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BOOK `VERUL LENYATIL SHILP VAIBHAV` IS BASED ON THE RESEARCH WORK ON THE SCULPTURES OF ELLORA. THE MAGNIFICENT GROUP OF ROCK CUT CAVES OR THE ROCK TEMPLES AT ELLORA REPRESENT THREE DIFFERENT FAITHS. BUDDHISIM, HINDUISM AND JAINISM. IT MARKS THE FINAL STAGE OF CULMINATIONAL ROCK TEMPLE ARCHITECTURE, IN WESTERN INDIA. BEING ONE OF THE GREATEST MONUMENTS OF THE WORLD ELLORA FIGURES IN THE LIST OF THE MONUMENTS OF HUMAN HERITAGE. THE ELLORA CAVES NESTLE IN THE LAP OF THE CHARANADRI HILLS, WHICH IS AN EXTENSION OF THE WESTERN HILLS FAMOUSLY KNOWN AS SAHYADRI, AND ARE SITUATED 26 K.M. AWAY FROM THE FAMOUS HISTORICAL CITY AURANGABAD. THESE CAVES ARE SPREAD IN AND AROUND 2 K.M. OF DISTANCE. THESE ROCK CUT CAVES REPRESENT THREE RELIGIOUS SEATS AND WERE CHIEFLY PATRONIZED BY CHALUKYA AND RASHTRAKUTA RULARS. OUT OF MANY CAVES, 34 CAVES ARE NUMBERED AND ARE DIVIDED IN THE THREE GROUPS, BUDDHIST, HINDU AND JAINS. AT ELLORA, THE MAJOR SIGNIFICANT EXCAVATORY ACTIVITIES WERE CARRIED OUT FROM THE MIDDLE OF THE SIXTH CENTURY TO THE END OF TENTH CENTURY. THE HISTORICAL BACK GROUND, AND THE CULTURAL AND MYTHOLOGICAL IMPORTANCE OF THE SCULPTURES IN ALL THREE GROUPS OF CAVES AT ELLORA HAS BEEN DISCUSSED IN THE BOOK. ALL THE INFORMATION REGARDING THE CAVE ARCHITECTURE AS WELL AS THE DETAILS AT THE ICONOGRAPHIC IMPORTANCE OF THE SCULPTURES HAS BEEN DESCRIBED ELABORATELY IN ALL THE CHAPTERS OF THE BOOK. A MARATHI READER CAN HAVE A PERFECT IDEA ABOUT THE CAVE’S ARCHITECTURE AS WELL AS THE SCULPTURE IN THE CAVES.
‘वेरूळ लेण्यांतील शिल्पवैभव’ हे पुस्तक लेखिका राधिका टिपरे यांनी इतिहास आणि पुराणे यांचा सूक्ष्म अभ्यास करून लिहिले आहे. शिल्पांच्या मुद्रेवरील भावभावनांचा वेध घेत, त्यांच्याशी संवाद साधत लालित्यपूर्ण शैलीत त्यांनी शिल्पांचे तपशीलवार वर्णन केले आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मीयांनी राजाश्रयाने तीन कालखंडात या लेण्यांची निर्मिती केली आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून प्रारंभ झालेली निर्मिती प्रक्रिया एक हजार सालापर्यंत सुरू होती. अगणित अनाम शिल्पकारांनी पिढ्यांन्पिढ्या परिश्रम करून हे अद्भुत शिल्पविश्व साकारले आहे, तेही मर्यादित साधनांच्या साहाय्याने. भारताला प्राचीन अशी सांस्कृतिक परंपरा आहे. उदार, सहिष्णू आणि चंडप्रतापी राज्यकत्यांचे शासन त्या काळी आQस्तत्वात होते. भारतात अनेक ठिकाणी लेण्यांतील विलोभनीय शिल्पकला तत्कालीन कलेची साक्ष देत आहे. औरंगाबादजवळील वेरूळची लेणी त्यातलीच एक. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरातील पाषाण खोदून त्यात कोरलेली समूहशिल्पे वेद-उपनिषिदे, पुराणांतील देव-देवता आणि त्यांचे अलौकित्व विषद करतात. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिाQस्थतीचे प्रतिबिंब या शिल्पकलेतून व्यक्त होते. जीवनमूल्यांना आध्यात्मिक आधार देणारी शिल्पकला आपल्याला जीवन जगण्याची नवी दृष्टी देते. द्वैत-अद्वैत, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि परमेश्वराची निरामयता या गोष्टींना मानवी पातळीवर उद्धृत केले आहे ते या शिल्पकलेनेच. काळ्या पत्थरातून जिवंत झालेला आपला भूतकाळ कोरीव शिल्पांतून मूकपणे आपल्याशी संवाद साधीत असतो. मूर्तीमधून जणू भावनांचा स्रोत निर्माण होतो, तो आपल्या व्यक्त-अव्यक्त अशा कल्पनांना छेद देणारा ‘लोकसंवाद’च असतो. या पुस्तकातील वेरूळ लेण्यातील प्रत्येक शिल्पाचा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ वाचून लेण्यांचे अवलोकन केले, तर मिळणारा आनंद वैÂक पटींनी अधिक असेल, यात शंकाच नाही!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VERULCAVES#AJANTACAVES# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #VERULLENYATEELSHILPAVAIBHAV #वेरूळले‌‍‌णयातीलशील्पवैभव #REFERENCEANDGENERAL #MARATHI #RADHIKATIPARE "
Customer Reviews
  • Rating StarPRIYA DEEPAK KARADKAR, DOMBIVALI

    सौ.राधिका टिपरे यांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान ‘वेरूळ चे लेणे’ हा विषय लघु प्रबंधासाठी निवडला आणि या शिल्पकलेबद्दल त्यांना ओढ निर्माण झाली व या पुस्तकाद्वारे वेरूळ च्या लहान-मोठ्या शिल्पाबद्दल सामग्र माहिती आपल्या समोर आणली. काळ्या पाषाणातून अनामकलाकारांनी निर्मिलेली ही शिल्पकला इतिहासाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. हिंदू, बौद्ध व जैन धर्माच्या प्रसारासाठी या कलेची निर्मिती झाली असे सर्वमान्य दिसते. या शिल्पकलेचे प्रमुख केंद्र म्हणजे मंदिरे, आणि मंदिरांच्या सुशोभनासाठी या शिल्पकलेचा पुरेपूर वापर केला गेला असे त्या म्हणतात. या पुस्तकात वेरूळ लेण्याची पार्श्वभूमी, घृष्णेश्वर शिवमंदिर, भौगोलिक ओळख, मराठी साहित्यात असलेले उल्लेख, ज्ञानेश्वरीतील उल्लेख, उपलब्ध इतर प्रवास उल्लेख, ऐतिहासिक पार्श्वभूमी, कालखंड इत्यादि नमूद आहे. बऱ्याच शिल्पाचे अगदी बारकाईने वर्णन केले आहे. भिंतीवरील शिल्पाची रेलचेल, आकार, त्यांची वस्त्रे, आभूषणे, चेह-यावरील हावभाव नमूद केले आहे. एके ठिकाणी असे वर्णन आहे की – “अवलोकितेश्वरच्या उजव्या बाजूला कोरलेली उभी स्त्री प्रतिमा एक विलक्षण सुंदर स्त्रीची आहे. अतिशय आकर्षक, कमनीय दहयष्टि असलेल्या या स्त्रीची केशरचनाही आकर्षक असून त्यावर घातलेला रत्नजडित मुकुट ही लक्षणीय आहे.....” तसेच तेथे रामायण व महाभारत मधील काही महत्वाचे शिल्पपट देखील आहेत... रावणानुग्रहमूर्तीस रावण कैलास पर्वत हलवत असतानाचे शिल्प आहे... आपले जागतिक वारसा स्थळ ‘कैलास लेणे’ याची खूपच महत्वपूर्ण माहिती यात आहे..... राग, लोभ, मद, मत्सर, कारुण्य, भय हे सारे विकार या निर्जीव शिल्पांच्या मुखांवर उत्कट रीतीने रेखांकीत आहेत असे त्या सांगतातच परंतु ते जसेच्या तसे लिहून देखील काढतात.... तत्कालीन समाजातील सर्वच स्तरातील जीवनशैलीचे प्रतिबिंब या शिल्पात आढळतात. स्त्रियांचे नाजूक सौंदर्य व पुरुषाचे बलशाली पौरुषत्व तसेच खालच्या वर्गातील दासदसींना त्यांच्या वेगळेपणासह चित्रांकीत केले आहेत.... वाचताना डोळ्यासमोर चित्र उभे रहाते... शिवाय या पुस्तकात काही गुंफेतील रेखाचित्र व त्याचे थोडक्यात वर्णन आहेत ज्यामुळे आपणास ब-यापैकी अंदाज येतो... मला आठवते की मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे पहायचा योग आला होता तेव्हा तेथील गाईड आम्हाला म्हणाला होता की आपल्याला मंदिरा बाहेरील मानवी शिल्प नक्की कोणते आहे कळत नाहीत, अशा वेळी त्यांची आयुधे, मुकुट, आभूषणे यावरून ते नक्की कोणते ते ओळखता येते...... मी स्वतः कधीही वेरूळ लेण्या पहिल्या नाहीत, परंतु हे पुस्तक वाचताना सैर करून आले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more