* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666403
  • Edition : 46
  • Publishing Year : 1968
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 1200
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A BIOGRAPHICAL NOVEL ON SHIVAJI MAHARAJ. THIS HISTORICAL NOVEL HAS CREATED HISTORY IN THE WORLD OF LITERATURE AND BOOKS. SHIVAJI MAHARAJ IS THE MOST WORSHIPPED PERSON IN MAHARASHTRA. EVERY SINGLE HOUSEHOLD HERE KNOWS SHIVAJI. HE IS THE MOST RESPECTED AND WORSHIPPED CHARACTER. HE WAS A DREAM COME TRUE. SHIVAJI WAS BORN AS A HINDU BUT AT SUCH TIME WHEN HINDUISM WAS FORGOTTEN BY THE HINDUS. IN HIS NOVEL RANJIT DESAI PICTURES SHIVAJI FROM HIS BIRTH RATHER HE STARTS WITH THE DAYS PRIOR TO HIS BIRTH. BEFORE WRITING THIS NOVEL DESAI HAS SEARCHED HISTORY, HE HAS NOT LEFT ANY STONE UNTURNED WHILE DOING SO. WRITING ON SHIVAJI WAS A VERY DIFFICULT TASK. SHIVAJI HAD MANY QUALITIES AND THE LAST 34 CENTURIES HAVE CHANGED PEOPLE`S VIEW ABOUT HIM. THEY HAVE BECOME MORE POSSESSIVE ABOUT HIM ADDING UNNECESSARILY, AND UNTRUTHFULLY TO HIS QUALITIES CONSIDERING HIM A GOD. ON THIS BACKGROUND IT WAS VERY DIFFICULT TO PORTRAY SHIVAJI AS PERFECT AS POSSIBLE DESAI HAD REALISED HIS RESPONSIBLITY. HE HAS PICTURED SHIVAJI METACULOUSLY IN THIS NOVEL. RELIGIOUS BUT NOT SUPERSTITIOUS, STRICT BUT NOT WICKED, ADVENTUROUS BUT NOT IMPETUOUS, PRACTICAL BUT NOT AIMLESS, REALISTIC, VISIONARY BUT NOT DREAMY. GRACEFUL BUT NOT PRODIGAL. DESAI HAS SUCCEEDED IN HIGHLIGHTING SHIVAJI`S HUMAN NATURE. HIS BASE WAS THAT OF A HUMAN. HE VALUED ALL, RESPECTED EVERY RELIGION. HE WAS AN EXPERT COMMANDER. HE AWAKENED THE LOVE FOR MOTHERLAND IN THE SLEEPING MIND, OF PEOPLE. HE IGNITED THEIR CONFIDENCE. WHILE DESCRIBING THIS, DESAI HAS BROUGHT MANY OF SHIVAJI`S QUALITIES INTO LIMELIGHT. SHIVAJI WAS A NOBLE KING BUT HE WAS A NOBLEMAN. HE ALSO HAD HIS OWN SUFFEREINGS. HE LOST MANY, BUT HIS FIRST PREFERENCE WAS HIS MOTHERLAND. AS WE GO ON READING WE GET INVOLVED IN THE BOOK SO MUCH THAT WE LIVE EACH MOMENT AND WHEN DESAI ENDS THE NOVEL WE FEEL THAT "WE` HAVE LOST SHIVAJI.
श्रीमान योगी रणजीत देसाई शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसिध्द ऐतिहासिक कादंबरी.

No Records Found
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIHINDIRADHAKRISHNA PRAKASHAN https://www.rajkamalprakashan.com/index.php/radha/shreeman-yogi-1770
MARATHIENGLISHHARPERCOLLINS INDIA https://harpercollins.co.in/product/shivaji/
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starअविनाश बडगुजर

    श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इिहासाचे पुस्तक वाचतो असे वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड अक्षरशः जिवंत केला आहे. त्यामागची त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेले संशोधन प्रत्येक प्रकरणात दिसून येते. अशा थोर पुरुषाच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे प्रचंड मोठे शिवधनुष्य रणजीत देसाई यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीतून आपल्याला महाराजांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतात ज्या आतापर्यंत मी कधी ऐकल्या नव्हत्या. शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे. यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते. शिवाजी महाराज लहान असताना बंगलोरला शहाजीराजांच्या राज्यात (जहागिरीत) जिजाऊंसोबत जातात तेव्हाचे तिथले वातावरण, शिवाजींचे सावत्र भाऊ वगैरे (हा भाग मला माहित नव्हता) यात वाचायला मिळतो. राजमाता जिजाऊ शिवाजींना बेंगलोरला न राहू देण्याचा निर्णय का घेतात ते सर्व कळते. स्वराज्य निर्मिती आणि शिवाजींची जडणघडण यात जिजाऊंसोबत अनेक जणांचा वाटा आहे. दादोजी कोंडदेव, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळे, जीवा महाला, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी, पानसंबळ, तानाजी मालुसरे, मोरोपंत, त्रंबकपंत डबीर अशी आणखी खूप नावे घेता येतील. त्यांच्याशी असलेले राजांचे बंध, तसेच आई जिजामाता, वडील शहाजीराजे तसेच शिवाजीराजांच्या राण्या, मुलगी सखुबाई, मुलं संभाजी व राजाराम आणि इतर नातेसंबंध यांचा संपूर्ण परामर्श लेखकाने घेतला आहे. शहाजी राजांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे शिवाजी महाराज जिजाऊंना सांभाळून घेऊन निराशेतून बाहेर काढतात त्याच प्रकारे नंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहामुळे गमावलेल्या गड आणि किल्ल्यांमुळे निराश झालेल्या राजांना जिजाऊ निराशेतून बाहेर काढतात आणि दोघांचा जगण्याचा एकच उद्देश्य असतो - स्वराज्य ! याची ते एकमेकांना आठवण करून देतात. राजांचे संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याशी असलेल्या बंधाचेही दर्शन आपल्याला यातून होते. त्यांचा राजांच्या जीवनावर आणि विचारांवर होणारा परिणामसुद्धा यात दिसतो. औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून छोट्या संभाजीसह नाट्यमय सुटकेनंतर कादंबरीत निश्चलपुरी, कवी कलश, गागा भट्ट अशी नवीन पात्रे कादंबरीत प्रवेश करतात. यात हीच पात्रे आहेत असे नाहीत तर शिवनेरी, रोहिडा, राजगड, तोरणा, पन्हाळा, विशालगड, लाल महाल, रायगड, जंजिरा, लोहगड, कर्नाळा, प्रतापगड, पुरंधर, चाकण, कोंढाणा ही सुद्धा स्वतंत्र पात्रेच म्हणावी लागतील इतके त्यांचे स्वराज्यातील महत्त्व आहे. मिर्झाराजांच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेब तह मोडून हिंदूंवर जिझिया कर लादतो त्यानंतर वेगळ्याच घटना घडायला लागतात. विशेषत: राज्याभिषेक झाल्यानंतर आणि जिजाबाईंच्या मृत्यूनंतर नेमके काय काय होते हे यात अगदी तपशीलवार वाचायला मिळते. पुत्र संभाजी सोबत राजांचा (आणि अष्टप्रधान मंडळाचा) असलेला संघर्ष अचूकपणे टिपला गेला आहे. संभाजीराजे मोगलांशी हातमिळवणी करून नंतर पुन्हा जेव्हा स्वराज्यात परत येतात तेव्हा शिवाजी राजे व संभाजी राजे यांची भेट होते तेव्हाचा दोघांमधला दीर्घ संवाद म्हणजे रणजित देसाईंच्या लेखणीची कमाल आहे. राजांच्या अखेरच्या काळातील रायगडावरील अंतर्गत राजकारण वाचून मन विषण्ण आणि विदीर्ण होते. औरंगजेब दक्षिणेकडे मोगली सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने येणार असतो आणि त्याच्या पाडावासाठी राजांनी बनवलेली योजना राजांच्या मृत्यूमुळे अपूर्णच रहाते याचे खूप वाईट वाटत रहाते. एकाच आयुष्यात राजे इतक्या गोष्टी करतात की ते अवतारी युगपुरुषच होते यावर शिक्कामोर्तब होते. नुसतेच आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशीच राजांना आयुष्यभर लढावे लागले नाही तर इंग्रजांना आणि पोर्तुगिजांना पण राजे वेळोवेळी वठणीवर आणतात. अनेक स्वकीयसुद्धा राजांच्या विरोधात जातात पण त्या सर्व गोष्टीसुद्धा राजे समर्थपणे हाताळतात. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आणि थोडक्यात चरीत्र वर्णन करणाऱ्या इतर अनेक पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील ठळक घटना जुजबीपणे आपण वाचलेल्या असतात परंतु त्यामागचा संगतवार घटनाक्रम, त्या घटनांमागची अनेक कारणे आणि त्या घटनांचे परिणाम हे जाणून असतील तर या कादंबरीशिवाय पर्याय नाही. तसेच अनेक संकटांतून मात करण्यासाठीचे सकारात्मक बळ ही कादंबरी नक्कीच आपल्याला देते. बाकी जास्त मी काही सांगत नाही. मात्र एवढे नक्की सांगतो की, ही कादंबरी जरूर वाचा ...Read more

  • Rating StarPrathamesh Kate

    सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार रणजित देसाई यांनी आपल्या ` श्रीमान योगी ` या ऐतिहासिक कादंबरीतून अवघ्या महाराष्ट्राचे आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सादर केले आहे. श्रीमान योगी मध्ये आपल्याला कधीही न चुकणारा, प्रत्येक गोष्टी मुळातच परफेक्ट असणारा कादंबरीचा टिपीकल नायक नाही तर कधीकधी चुकणारे, त्या चुकांतून शिकणारे, कधी खचलेले, निराश झालेले ; पण माता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने तर कधी कटू बोलांनी पुन्हा जिद्दीने उभे राहिलेले, परस्त्रीला मातेसमान मानणारे, कर्तव्याआड कधी नातीगोती न येऊ देणारे, सर्व धर्मांचा आदर करणारे ( महाराजांच्या सैन्यात, अगदी अष्टप्रधानमंडळात देखील इतर धर्मातील व्यक्तींचा समावेश होता, हे याचे उत्तम उदाहरण आहे. ), सहकाऱ्यांना सन्मान देणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्राचे खरेखुरे नायक `आपले महाराज` दिसतात. आणि महाराजांबद्दल आपल्या मनातील प्रेम व आदर कित्येक पटीने वाढतो. हे कादंबरीचे पहिले मोठे यश. दुसरं म्हणजे महाराजांना आयुष्यात अनेक दु:खद घटनांना, स्वत:वर आणि स्वराज्यावर कोसळलेल्या अनेक संकटांशी सामना द्यावा लागला. सर्व दु:खांना महाराजांनी नेहमीच धैर्याने तोंड देऊन, संकटांवर माता जिजाऊंच्या, समर्थांच्या मार्गदर्शनाने, निष्ठावान मावळ्यांच्या सोबतीने शौर्याने व चातुर्याने मात करून महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. महाराजांची शिकवण लेखकांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून अत्यंत साध्या सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. अशी ` श्रीमान योगी ` ही महाराजांच्या जीवनावर आधारित, रणजित देसाई लिखित कादंबरी एकदा नक्कीच वाचावी @ प्रथमेश काटे ( मराठी कथा आणि लेख ) ...Read more

  • Rating StarSacchit Erande

    श्रीमान योगी.... हे नक्की चरित्रलेखन आहे की आत्मकथन असा पानोपानी प्रश्र्न पडावा इतक्या मधूर आणि आत्मीय शब्दसंपन्नतेत सखोल मांडणी तेही भावनीक ओल कुठेही हलू न देता. एखाद्याच्या डोक्यावरची सगळी कर्जे फिटली तरी महाराजांनी हिंदू म्हणून जगण्याचे सौभा्य मिळवून दिले त्याचे ऋण फेडणं कोणांसही केवळ अशक्य! आणि ते कदाचित फिटूही नये... नपेक्षा ते फेडण्याची अवकात असलेला या भुमंडलावर अवतारित होऊच शकत नाही! 🚩🚩🚩🚩🚩 ...Read more

  • Rating StarPankaj Datare

    *📖श्रीमानयोगी📖* शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. कारण.शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललत वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी महाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे.तिचे शेकडो पैलू आहेत.शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. इतिहास आणि कल्पना याचा मनोरम संगम घडल्यानेच उच्च कोटीची ऐतिहासिक ललितकृती तयार होते.श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्‍यांचा वापर केला आहे. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more