* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353175092
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 352
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘TREAT ALL FAIRLY, OR THEY WILL SEEK REVENGE.’ A GREAT WORDS FROM CHRISTOPHER PAOLINI FORMS THE BASELINE FOR THE NOVEL. THE NOVEL IS BASICALLY A HISTORICAL EVENTS BASED REVENGE STORY, BUT DON’T GET MISUNDERSTOOD OVER HERE. IT IS NOT A PERSONAL REVENGE STORY, IT IS A NATIONAL REVENGE STORY. WE ARE VERY FORTUNATE THAT WE ARE LIVING IN A COUNTRY WHOSE HISTORICAL HERITAGE HAS ENRICHED WITH NUMBER OF STORIES AND THE PLOT OF NOVEL IS ONE OF THESE STORIES. WE ALL KNOW THE BLOODY CARNAGE HAPPENED AT JALIANWALABAGH. 13 APRIL, 1919 WAS THAT STAR CROSSED DAY. GENERAL DYER HAD SET UP FIRING ON NUMBERS OF INNOCENT PEOPLE WHO HAD GATHERED UP IN JALIANWALA BAGH. BUT WHAT WAS THE REASON BEHIND THIS CARNAGE? WHAT ACTUALLY HAPPENED OVER THERE? IS THIS INCIDENT LIMITED FOR THIS CARNAGE ONLY? OR THERE ARE MANY INCIDENTS WHICH LEADS TO THIS BLOODSHED AND FURTHER MORE HAPPENINGS? DOES THIS STORY END WITH MASSACRE? THE NOVEL GIVES ANSWER TO THE ABOVE MENTIONED QUESTIONS. THIS IS A STORY OF AN IDEALIST WHO HAS TAKEN OATH TO AVENGE THIS INHUMAN TREATMENT GIVEN TO INDIANS. THIS IS A STORY OF A CONTUMACIOUS HERO WHO NEVER LOSE HOPE.
इंग्रजांच्या विरोधात पंजाबात १९०७मध्ये घडून आलेली ‘पगडी संभाल जट्टा` चळवळ आणि १९१४मधील गदर उत्थान चळवळ यामुळे इंग्रज सरकारने सुरू केलेली दडपशाही... त्यामुळे पेटून उठलेली पंजाबी जनता... ब्रिटिशांनी लागू केलेला रौलट कायदा, ज्यानुसार सरकारने राज्यकत्र्यांना मनमानी कामकाज करण्याचा दिलेला परवाना... त्याची परिणती म्हणून १३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत बैसाखी निमित्त जमलेल्या शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या शपथेच्या मार्गाने सुरू राहिलेली त्याची वाटचाल... या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका स्वातंत्र्यवीराची धगधगती कहाणी
1.कै. इंदुबाई शिर्के स्मृती कादंबरी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर, मंगळवेढा 2.सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, अखिल भारतीय साहित्य परिषद, नाशिक 3.श्री. अशोकसिंह ठाकुर पुरस्कृत राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार, सूर्यांश साहित्य आणि संस्कृती मंच, चंद्रपुर 4.राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार, साहित्य विहार संस्था, नागपूर 5.राष्ट्रीय संत नामदेव कादंबरी साहित्य पुरस्कार, हिंगोली
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#जालियनवालाबाग #कादंबरी #अमेयअशोकजाधव #उधमसिंग #लंडनमधलादहशतवादी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JALLIANWALABAG #AMEYASHOKJADHAV #UDHAMSINGH #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating Starस्नेहल ठाकरे

    कादंबरीत केवळ ऐतिहासिक घटना सांगितल्या नाहीत, तर त्या घटनांचे परिणाम, लोकांच्या भावना आणि ब्रिटीश सत्तेचा क्रूर चेहरा यांचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नायकांचे संघर्ष, त्याग आणि त्यांच्या बलिदानाची कथा अतिशय उत्कटपणे मांडल आहे. "जलियांवाला बाग" ही केवळ इतिहास जाणून घेण्यासाठीच नव्हे, तर स्वातंत्र्यसंग्रामातील नायकांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठीही आवश्यक वाचन आहे. इतिहासाची गोडी असलेल्या प्रत्येकाने ही कादंबरी वाचली पाहिजे. ...Read more

  • Rating StarPrasad J

    खुप सुंदर लिखाण....must read👍 इतिहासात हरवलेली एक क्रांतिकारी गाथा..

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more