* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357200004
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2023
  • Weight : 375.00 gms
  • Pages : 448
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :BABARAO MUSALE COMBO SET - 6 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
VISHAL LIVING IN PUNE, PREPARING FOR COMPETITIVE EXAMS. HIS HOUSE IS IN THE TALUKA PLACE SMALL TOWN. HIS PARENTS AND YOUNGER SISTER ARE LIVING THERE. HIS FATHER IS A LABORER, HIS MOTHER IS A HOUSEWIFE, AND HIS SISTER IS STILL STUDYING. A BIG SHOT BUSINESSMAN WANTS TO ERECT A GRAND BUILDING IN THE CENTRAL PART OF THE TOWN. THE SAME SMALL HOUSE BUILT BY VISHAL`S FATHER WAS COMING IN HIS WAY. VISHAL COMES HOME TO HANDLE THE MATTER. HE COMES AND GETS STUCK, GETS INVOLVED IN POLITICS, PARENTS, OTHER RELATIVES AND HIS NEWLY WEDDED WIFE. ON THE ONE HAND, THE POLITICS, FIGHTS, KIDNAPPINGS AND ON THE OTHER HAND, THE SUPPORT FROM FAMILY, LOVE OF HIS LIFE AND HIS RELATIONSHIP WITH HIS ZUND WHO STANDS ALONG WITH HIM IN TROUBLES. THIS IS A STORY OF VISHAL’S ZUND. THE NOVEL WILL GIVE A POSITIVE ENERGY AND OVERWHELMING EXPERIENCE TO THE READERS.
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विशाल. तालुक्याच्या गावी त्याचं घर. घरी आई वडील आणि लहान बहीण. वडील मजुरी करणारे. आई गृहिणी. बहीण अजून शिकतेय. एका बड्या असामीला गावात मध्यवर्ती भागात एक भव्य इमारत बांधायची आहे. विशालच्या वडिलांनी बांधलेलं यांचं छोटंसं घर त्याच्या आडवं येतं. त्या वादाचा तोडगा काढण्यासाठी विशाल पुण्याहून गावी येतो. येतो तो अडकतो. तालुक्यातलं राजकारण, आई वडील, इतर नातेवाईक आणि त्याची नव्याने झालेली जीवनसाथी या सगळ्यांमध्ये गुंतत जातो. एका बाजूला राजकारणाल्या कुरघोड्या, लढाया, हाणामारी, अपहरण आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाकडून मिळालेली साथ, प्रेम आणि झुंडीसोबतचे ऋणानुबंध. राजकारणी आणि व्यवसायातल्या बड्या ध्येंड्यांशी दोन हात करताना त्याच्या पाठीशी उभी राहते तरुण पोरांची झुंड. विशालच्या झुंडीची ही कथा. वाचकाला सकारात्मक भावनिक अनुभव देणारी उत्कंठावर्धक कादंबरी.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #झुंड #बाबारावमुसळे #कादंबरी #राजकीय #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #LOVESTORY #MARATHINOVEL #MEHTAPUBLISHINGHOUSE #ZUND #BABARAOMUSALE #NOVEL #MARATHINOVEL #POLITICS
Customer Reviews
  • Rating Starलक्ष्मण खेडकर

    मराठीतले अत्यंत महत्वाचे लेखक सुप्रसिद्ध कथा कांदबरीकार मा.बाबाराव मुसळे नानाची "झुंड" कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय ,नानाची ही बारावी कादंबरी आहे ,हाल्या हाल्या दूधू दे पासून सुरू झालेलं कादंबरी लेखन ,वारूळ ,पखाल दंश ,स्मशानभोग ,आर्त, पाटिलकी एक पाऊ पुढे ,झळाळ,नाँट नो नेव्हर ते झुंड पर्यंतच्या नावाजलेल्या बहुचर्चित कांदब-या सोबतच कथा, कविता आणि इतर विपूल लेखन नानाच्या नावावर आहे ,गावखेड्यात राहून आपलं ज्ञानदानाच़ं कार्य इमानेइतबारे करत गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून नाना सातत्याने लेखन करताहेत ,नव्याने लिहिणा-या लेकरांच्या पाठीवर कौतुकाची शबासकीची थाप देताहेत ,विविध विद्यापीठीय अभ्यासक्रम नानाच्या साहित्याचा आजवर सामावेश झालेला आहे ,अशा बहु आयामी पण जमिनीवर पाय असलेल्या साध्या सरळ आपल्याच लेखन कार्यात सदैव मग्न असणा-या साहित्यिकांची इथल्या साहित्य संस्थेने म्हणावी तसी दखल आजवर घेतलेली नाहीय ,नानाच्या कांदबरीला यापूर्वीच साहित्य अकादमी पुरस्कार मिळायला हवा होता असो जे झालं ते झालं ,झुंडच्या निमित्ताने तरी त्याचा विचार व्हावा आणि मराठीतल्या एका मोठ्या लेखकाचा त्यांच्या साहित्यकृतीचा या निमित्ताने गौरव केला जावा, "झुंड"साठी आपले खूप खूप अभिनंदन नाना ---- लक्ष्मण खेडकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more