* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: AABHALZUNJ
 • Availability : Available
 • ISBN : 9788177665277
 • Edition : 2
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 286
 • Language : MARATHI
 • Category : FICTION
Quantity
DUE TO THE ADVENT OF ART DEVELOPMENT, THE MENTAL, FAMILY, ECONOMIC, POLITICAL, SOCIAL AND CULTURAL DIVIDE OF DIFFERENT COMMERCIAL DISPLACED PERSONS IN GAKKUSA DUE TO THE ADVENT OF ARTISTIC DEVELOPMENT OF THE PEASANTS AND PEASANTS. THE WHOLE OF TRADITIONAL AND NATURAL FOLKLORE AND SLOWLY GETTING POISONED! WAMAN NAVYA, WHO FACES MANY STRUGGLES AT THE SAME TIME, HAS TO DEAL WITH PEOPLE`S INTERESTS IN THE FIELD OF MARKETING, COMPETITION AND ADVERTISING. STILL, HE WAS GIVEN NEW ENERGY TO THE GROUP OF LONELY GROUPS AGAINST THE CORRUPT SYSTEM.
सावेगावच्या तिन्ही बाजूनं वाहणार्या नदीवर धरण मंजुरतं. गावातील सत्ताधार्यांच्या विरोधामुळे बांधाची उंची घटवून नदीकाठच्या अर्ध्या गावाचं माथ्याकडल्या हेटीवर पुनर्वसन होतं. पुनर्वसनाच्या पैशातून नव्या वस्तीत वामनच्या पुतण्यानं सुरू केलेल्या अद्ययावत सलूनमुळं, वामनची पोत्यावरच्या बैठ्या हजामतीची ग्राहकी कमी होते. वामनच्या मुलाला- सागरला त्याचे मित्र बाजारात दुकान लावण्याचा सल्ला देतात. पण वामन दुकानासाठी घरची गाय विकायचं नाकारतो. सागरच्या शहरी बायकोला- प्रगतीला घरच्या हजामतीच्या केसांचा तिटकारा असतो. त्यातून सासरा-सुनेचे खटके उडतात. सागर बाजारात टिनांचं शेड उभारून त्याचं सलून सुरू करतो. वामनची उरलीसुरली ग्राहकी सागरकडं वळते. वामनच्या मुक्या मुलीचा शकूनचा पुलावच्या मजुराकडून विनयभंग होतो. सागरला त्याच्या दुकानच्या सामानसाठी शेत गहाण करू दिलं नाही, म्हणून सागर एक दिवस घर सोडून किरायाच्या घरात हेटीवर राहू लागतो. नर्मदा पेचात पडते. पुलाजवळ सपाटीकरणाचे काम करणाऱ्या रोलरच्या पुढल्या चाकाखाली सावलीत लोटलेला रमेश- चिंधाईचा मुलगा रोलर सुरू होताच भुईसपाट होतो. चिंधाई आकांत मांडते. धरण भरताच गावाभोवतीची नदी तुंबून शेतशिवाराचे रस्ते पाण्याखाली बुडतात. उंदीर, घुशी, मसण्याउद, सापांचा उपद्रव गावात वाढू लागतो. चिंधाईला सर्पदंश होतो. मुसळधार पावसानं गावाचं बेट तयार होतं. अवघं गाव सामानसुमानासह नव्या हेटीवरील धर्मशाळेत जातं. बापूरावची बंडी परतताना पुलाच्या नालीमुळं उलटते. बापूराव जायबंदी होतो तर धुरकरी लक्ष्मणाचा मृत्यू. स्मशानाची पूर्वापार वाट पाण्यात बुडाल्यानं शेताच्या कुपाटीतून शिरताना लक्ष्मणाचे प्रेत तिरडीवरून खाली पडते. लोक पळू लागतात. वामनच्या मुक्या शकूनचं एका बिजवराशी लग्न होतं. नवऱ्याचा लैंगिक छळ असह्य होऊन ती परत माहेरी येते. नदीकाठची झाडी उखडल्यामुळे वामनला आसपास पत्रावळींकरिता पानं मिळत नाहीत. हजामत पत्रावळीच्या बुडालेल्या धंद्यामुळे विडीकाडीलाही महाग झालेला वामन बाजारात तट्ट्यांचं दुकान उभारतो. तिथेही धंदा चालेना म्हणून न पेलवणाऱ्या किरायाची खोली भाड्यानं घेतो. नर्मदा पोराकरिता त्याला विरोध करते, पण तो बायकोला जुमानत नाही. बापलेकांचे समोरासमोर दुकानं. ग्राहकांसाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. ’एका कटिंगीवर दाढी फ्री’सारख्या अनेक चढ्या व विनोदी जाहिराती बापलेकांकडून केल्या जातात. चिंधाईची मुलगी अन् तिच्या चोळी-बांगडीची साधी अपेक्षाही भावानं पूर्ण न केल्यामुळे त्याला धरणात गेलेल्या शेताच्या रकमेत वाटा मागते. बहिणभावांत वितुष्ट येतं. गुलब्या हा कारागीर कुंभार त्याची चवचाल बायको धरणाच्या सुपरवायझरमागं लागलेली बघून पागल होतो. इमली सुपरवायझरचा हात धरून पळून जाते. वामनच्या घरामागच्या भिंतीत धरणामुळं तुंबलेल्या नदीचं पाणी मुरल्यामुळं रात्री झोपेतच भिंत कोसळते. वामन नुकसानभरपाईचा मिळालेला शंभर रुपयांचा चेक बँकेत फाडून टाकतो. कन्यालाल जहागिरराव- हुकूमसह यांचं पायखेच राजकारण गावाच्या मुलावर येते. बापूरावचे दोन्ही पोरं पैश्यांचा वादामुळं कुटुंबातून वेगवेगळे होतात. बापूराव शेवंताईला गोठ्यात राहायला पाठवतात. वामन दुकानाचा थकलेला किराया भरता यावा म्हणून नर्मदाच्या विनंतीवरून म्हसी भादरायला जातो. त्याचवेळी निवडणुकीचा नारळ नेणारी मिरवणूक रस्त्यानं वाजतगाजत जाते. वाजंत्र्याच्या आवाजानं म्हैस भुजाडून वामनला पायाखाली तुडवते. हाडं खिळखिळून लोळागोळा झालेला वामन गुबडं घासत दारात बसतो. नातवाला व उमेशला धरणामुळं झालेली गावाची वाताहत तळमळून सांगतो. पोरांना प्रेरणा मिळून ते निवडणुकीवर बहिष्कार घालायचं ठरवतात. लोकांना प्रवृत्त करण्यासाठी मोर्चा काढतात. मोर्चाच्या घोषणात वामन बसल्याजागी त्याचाही आवाज मिसळवतो. नदीकाठी पाण्यानं सडलेलं जुने चिंचेचं झाड उन्मळून पडतं. विझण्यापूर्वी वामननं दिलेल्या घोषणा वाऱ्यानं मोर्चापर्यंत पोचून मोर्चाला बळ येतं. भालचंद्रा सुतार खड्या आवाजात सूर धरतो- तिफनीच्या नळीतून रे ऽऽ ...कष्टकऱ्या ऽ माझ्या ऽऽ पेरू ठासून बारूद आता होऊ द्या उठाव करू गिधाडं गारद!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AABHALZUNJ #AABHALZUNJ #आभाळझुंज #FICTION #MARATHI #BHOYARANANT "
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAKAL 29-01-2006

  ग्रामीण भागाचा स्वातंत्र्यानंतर शिक्षणामुळे, साखर कारखान्यांमुळे व अन्य उद्योगांमुळे कायापालट झाला; पण त्यात वरच्या थरावरचे नेते, गुंड वगैरेंनीच हात धुऊन घेतले. भोयर यांनी ग्रामीण भागातील धरणामुळे काही लोक कसे गब्बर झाले आणि त्यांनी इतरांना फसवून आपल तुंबडी कशी भरली याचे दाहक चित्रण ‘आभाळझुंज’मध्ये वामन न्हाव्याच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेतून केले आहे. ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 08-01-2006

  ‘आभाळझुंज’ ही अनंत भोयर यांची किमान गरजांसाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची केविलवाणी कहाणी आहे. विदर्भातील वऱ्हाडी मातीचा जिवंत बाज आणि साज गुंफताना लेखकांनी स्वाभाविकत:च तेथील प्रादेशिक जीवनशैली, लोकसंस्कृती, त्यांची विचारसरणी, राहणीमान, वैशिष्ट्यपूर् बोली कादंबरीत एकजीव केलेली आहे. ...Read more

 • Rating Starडॉ. देवमन द. कामडी

  धरणच मरणाच्या दारात कोंडते तेव्हा... ‘आभाळझुंज’च्या निर्मितिप्रक्रियेबाबतचा अनंत भोयरांचा अनुभव जिवंत आहे. ज्या गावात लहानाचे मोठे झालेले भोयर त्याच गावाचे पुनर्वसन शासन करते, परंतु ते पुनर्वसन अर्ध्याच गावाचे झाल्याने पुनर्वसितांचे ‘अवॉर्ड’ने निर्मण केलेले प्रश्न आणि उरलेल्या जुन्या गावातील बलुतेदारापासून तर अलुतेदारापर्यंतचे पोटासाठी जगण्याचा जीवघेणा संघर्ष अशा दुहेरी टप्प्यावर ही कादंबरी झुंजताना विचारते, माणसाचा कोणता विकास ‘जगण्याचा’ की ‘मरणाचा’, हा संदिग्ध सवाल जिवंत मनाच्या माणसाला कादंबरी वाचताना वेळोवेळी छळतो आणि अजब शासनाचा गजब कारभार ही न्यायपूर्ण शासनाची विसंगत विकासाची प्रगती जगणाऱ्या माणसाच्या मनोधैर्याला धरणात कोंडते. सावेगावातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पडझड हा या कादंबरीचा मुख्य विषय असून मानवाला नैसर्गिक जगण्याचा अधिकारच शासन कसा हिसकावून घेतो, याचा सर्वसाक्षेपी विचार लेखकांनी बेंबीच्या देठापासून मांडलेला आहे. मेलेल्या जनावरांचे सांगाडे जसे शिंदबनात आढळावे तसे घरांचे सांगाडे प्रकल्पबाधित आणि पुनर्वसित अशा जुन्या-नव्या गावामध्ये आपल्या जगण्याची आणि मरणाची हकीकत बयाण करतात. जुन्या गावातील ही खंडारे मरणपंथी माणसासारखी शेवटची घटका मोजत आहे, तर नव्या गावातील विटामाती-सिमेंटच्या नव्या कोऱ्या घरांवर अद्यापि स्लॅब किंवा कवेलू न पडल्याने आपल्या मालकाच्या आटल्या गेलेल्या पैशाची कारुणिकता विशद करते. कादंबरीतील दाहकता रसिक मायबापाला क्षणोक्षणी आपली झुरलेली केविलवाणी काया आपल्या आस्वादक सौंदर्याच्या नजरेने टिपण्यास ही कादंबरी आकृष्ट करते, हेच तिच्या यशाचे सर्वांत मोठे गमक ठरते. या कादंबरीतील नायक वामन न्हाव्याचा एकाकी संघर्ष आणि मोडेन पण वाकणार नाही हा त्याचा बाणा मुर्दाड शासनाच्या छाताडावर बसून त्याला लोकशाही मूल्याचा डोस पाजते. वामनचे घडविलेले व्यक्तिदर्शन कणखर, स्वाभिमानी, कष्टाळू आदी व्यूहातून मांडल्याने त्याचा परिस्थितीजन्य जगण्याचा संघर्ष आपणास ऊर्जस्वलता देऊन जगण्याचा नवा मंत्र देते म्हणून ही कादंबरी दुर्मुखलेल्या, भरकटलेल्या, झुरलेल्या माणसाला जगण्याची नवी उभारी देऊन जाते. ‘आभाळझुंज’मधील सर्वच पात्रे आपली सिद्धता स्वत:हून सिद्ध करीत असल्याने त्या पात्रांची निकड आपणास खिळवून ठेवते. वामनची बायको नर्मदा, मुलगी शकून, मुलगा सागर, सून प्रगती या सर्वांची स्थाननिश्चिती कादंबरीत स्वयंभू असल्याने ‘आभाळझुंज’चा ते एक अविभाज्य भाग बनते.’ सावेगावची करुण कहाणी हेरून अनंत भोयरांनी बाधित, वंचित प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न ‘आभाळझुंज’मध्ये केला आहे. धरणापूर्वी गावाची एकता, गुण्यागोविंदाने नांदणारे गाव, गावगाड्यात खूश असणारी जनसंपदा, गावचा रचलारमला डाव, गावाचे वैभव या संपूर्ण गोष्टींवर धरणाने पाणी सोडल्याने आणि शासकीय विकासाच्या नावाने माणसाला माणसापासून तोडल्याने गावात आता एकीनेकीच्या ऐवजी ताटातुटी आली आहे. कादंबरीच्या संदर्भात लेखकांचे मनोगत आपणास अंतर्मुख करून जातं. ...Read more

 • Rating StarSantosh Bobade

  आभाळझुंज हे पुस्तक काल वाचून पूर्ण झाल.वामनची शक्ती आणि तुमच्यात बरच साम्य असाव,अस वाटत.एका धरणाने नुकसान होत हे वाचून होत पण इतक खोलवर होणार नुकसान,मग त्यात पैसा,भावना अन नाती आलीच.मुळात धरण बांधणे हा एकच मुद्दा नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेला जाणारा निर्णय हा कधीही गावकरी,गावाचा निसर्ग पाहून न घेण्याची पद्धत आपल्या सरकारने बऱ्याच वर्षांपासून चालवली आहे.ह्याचा उपहासात्मक फायदा वामनसारख्याना भोगावा लागतो हे तितकच खर.तुम्ही घर पडताना,नाती तुटताना,माणसाचा नरक होताना केलेलं वर्णन शहारे आणत.सगळ्यांची हालत त्या गुलब्या सारखीच आहे,पण सगळे वेडे असल्याच सोंग करतात.वामन काही अंशी खटकलादेखील,आणि सागर कधीकधी पटलादेखील.सरकारला नेहमी खडसावल पाहिजे,नेहमी विचारल पाहिजे,नाहीतर acमध्ये बसून दुष्काळ भागावर निबंधच्या निबंध लिहणारे पुष्कळ आहेत.धन्यवाद हे पुस्तक लिहल्याबद्दल.लिहित रहा.आमचे डोळे उघडत ठेवा. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

Suhas Birhade

सूधा मूर्ती यांची पुस्तकं मला आवडतात. ती पुस्तके हलकी फुलकी असतात. जीवनात आलेले अनुभव लहान मोठ्या प्रसंगातून ते उलगडवून दाखवतात. स्वत:चे अनुभव सांगताना त्यात कुठे बडेजाव नसतो. हे अनुभव बरंच काही शिकवून जातात. "आयुष्याचे धडे गिरवताना" हे मूर्ती यांचे शाच पठडीतले एक पुस्तक. हे पुस्तक देखील एका दिवसात वाचून संपवलं. या पुस्तकात २३ लहान प्रकरणं आहेत. लेखिकेला विविध टप्प्यांवर भेटललेली माणसं काहीतरी शिकवून जातात. जी मरगळ दूर करते आणि जीवनाचे पैलू उलगडवून दाखवते. मेहता प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं असून लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे ...Read more

AAVARAN
AAVARAN by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
Sushant Choudhary

तनिश्क ची जाहीरात ..... व माझ वाचून संपलेल कन्नड लेखक डॉ. भैरप्पा लिखीत व उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली "अवरण" कादंबरी संपवली व fb वर व्यक्त व्हायचा मोह अवरला नाही......तनिश्क च्या जाहीरातीवर केलेली टिका....पुरोगाम्यांना जिव्हारी लागत असेल तर ... अवरण वाचा मग react व्हा..... कधि कधि इतिहास पण वाचला पाहीजे व समजुन पण घेतला पाहीजे.... कादंबरीची नायिका "लक्ष्मी" उर्फ रझिया, तिचा नवरा "आमिर", दोघांचा धर्माच्या चालिरीती चे सिंमोलंघन करुन (लक्ष्मी ने बरका) लग्न केले.... लक्ष्मी चे वडील "अप्पाजी", त्यांची एकुलती एक कन्या.... आप्पाच्या तथाकथित बुरसटलेल्या विंचाराचा चक्का चूर करुन विवाह.... कादंबरीचा काळ १९९० नंतरचा विशेषतः बाबरी पाडल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सामाजिक सलोखा तयार करणे साठी अमीर वर Documentary बनवन्याचे काम सोपलेले असते....script लिहन्याचे काय रझियाचे.....पण हंपी चे भग्न अवशेश पाहून तिला अस्वस्थ होते व सत्याच्या शोधात जाते.... आप्पाजी वारतात त्यांचे तीस वर्षे कसलेही संबंध राहत नाहीत पण ती त्यांचे काही विधी करते व आप्पा नी जमा केलेली ग्रंथ संपदा अभ्यासते. बाबर, अकबर, हुमांयू, शहाजहान व औरंगजेबा.... मंदीरांचा झालेला विनाश व सरकारने चालवलेले इतिहास बदलाचे कारस्थान यांची संदर्भासाठी केलेली एकत्र गुंफण कादंबरीची परिणामकारकता वाढवते. एखाद्या ऐतिहासिक पात्राचे उद्दातीकरन कस केले जाते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे म्हैसूर चा टिपू सुलतान त्याला राष्ट्र अभिमानी दाखवताना त्याने केलेल्या हिंदू समाजाच्या कत्तली तसेच त्याने हिंदुस्थानाला काफीरां (हिंदू ) पासून मुक्त करण्यासाठी अफगाणी सुलतानांना पाठवलेली आमंत्रण ह्याचा कुठेही उल्लेख नसने. ह्याचा संदर्भ देऊन केलेले लिखान अगदी मन सुन्न करुन सोडते..... संपूर्ण हिंदुस्थानचा समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक वारसा, ज्ञानकेंद्रे आणि त्याचा चौदाव्या व त्या पुढील शतकापासून बाहेरील आक्रमकांकडून झालेला विध्वंस हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. धर्माच्या मागासलेल्या रुढी, परंपरा, दुराभिमान, अशिक्षित मनोवृत्ती आणि जीवनपद्धती, असहिष्णुता यावर नायिकेच्या तर्फे लेखक प्रहार करतात. तत्कालीन राजकारण, समृद्ध आणि सहिष्णु परंपरेचा स्वार्थासाठी इतिहास बदलण्याचा समकालीन पुरोगामी आणि बुद्धिवादी लोकांचा अट्टाहास, त्यासाठी झालेली एकजूट, वाचकांना चीड आणल्याशिवाय रहात नाही.पुरोगामी व सेक्युलर वद्यांच्या सनसनित चपराक, वर्षानुवर्षे चांगले दडपण्यासाठी चाललेले, जनकल्याणाचे सोनेरी आवरण घातलेले कपटी कारस्थान वाचकांसमोर उघड होते. बुद्धिवादी, सेक्युलर म्हणवणाऱ्या लोकांचा मुखवटा टराटरा फाडते. लेखकाने प्रत्येक गोष्टीची केलेली मांडणी हि संदर्भ घेऊन केलेली तसेच कादंबरी चे लिखान पूर्णतः सत्य संदर्भावर आधारलेली आहे. संदर्भ ग्रंथांची यादी कादंबरीत लेखकाने समाविष्ट केली आहे त्यामुळे कादंबरीला वास्तवाचा भक्कम आधार आहे. संदर्भ ग्रंथ वाचल्यावर तिची झालेली अवस्था व जगाला दाखवन्या साठी मुद्दाम हुन केलेले प्रयत्न ह्यात फार अंतर असते हे दाखवून देनारी कादंबरी. डॉ. भैरप्पा यांचे वाचलेले हे चौथे पुस्तक..... पर्व, सार्थ, तडा व अवरण.... प्रतेक पालकाने (विशेष करुन मुलींच्या पालकाने) अवश्य वाचावी अशी कादंबरी.... ॲड. सुशांत चौधरी, उच्च न्यायालय औरंगाबाद. ...Read more