RAM PRADHAN

About Author

Birth Date : 27/06/1928
Death Date : 31/07/2020


DURING THE PERIOD 1960 TO 1965, RAM PRADHAN GOT THE OPPORTUNITY TO PARTICIPATE IN THE CONSTRUCTION OF THE NEW MAHARASHTRA WHILE WORKING AS THE SECRETARY TO YASHWANTRAO CHAVAN, THE FIRST CHIEF MINISTER OF MAHARASHTRA. ALSO, WHEN YASHWANTRAOJI WAS THE DEFENSE MINISTER, HE PARTICIPATED IN IMPORTANT WORK LIKE RESTRUCTURING OF THE INDIAN DEFENSE FORCE.

१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम करत असताना नवीन महाराष्ट्राच्या जडणघडण कार्यात सहभागी होण्याची संधी राम प्रधान यांना मिळाली. तसेच यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना यासारख्या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. १९६६ ते १९७७ या काळात त्यांनी जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७२ ते १९७७ या काळात युनोमध्ये संचालक पदावर असताना अविकसित देशांना वाणिज्य व विकास क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७७-१९८१ या काळात ते महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव आणि १९८२-१९८५मध्ये राज्याचे मुख्यसचिव होते. तद्नंतर १९८५-८६ साली त्यांनी भारताचे गृहसचिवपद सांभाळले. त्याच काळात पंजाब, आसाम व मिझोराम हे महत्त्वाचे करार त्यांनी केले. भारतीय प्रशासकीय सेवेत ३४ वर्षे सेवा करून ३० जून, १९८६ रोजी ते निवृत्त झाले. कर्तृत्वसंपन्न लोकसेवेबद्दल १९८७ च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना पद्मभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अरुणाचलचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले. १९९०-१९९२ या वर्षांत महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके : राजीव गांधींच्या सहवासात वादळ माथा शब्दांचे सामर्थ्य यशवंतराव चव्हाण यांची संसदेतील भाषणे (४ खंड) बंधनाचे ऋण पहिली फेरी? - १९६५ भारत-पाक युद्ध
Sort by
Search by Discount
Show per page
Items 1 to 3 of 3 total
33 %
OFF
MAZI VATACHAL : METCALFE HOUSE TE RA... Rating Star
Add To Cart INR 500 INR 335
33 %
OFF
PAHILI PHERI? Rating Star
Add To Cart INR 150 INR 100
33 %
OFF
VADAL MATHA TE 1965 BHARAT-PAK YUDDHA Rating Star
Add To Cart INR 395 INR 265

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more