MEGAN CHANCE

About Author

Birth Date : 31/12/1959




मेगन चान्स ही समीक्षकांनी गौरविलेली आणि अनेक मानसन्मानप्राप्त लेखिका आहे. तिच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. अनेक उत्तमोत्तम परीक्षणांनी ‘भारावून टाकणारे अद्भुतरम्य ऐतिहासिक लेखन’ या शब्दांत तिचे कौतुक केले आहे. अ‍ॅमेझॉन डॉट.कॉमने (AMAZON.COM) तर ‘प्रत्येक वेळी नव्या कलाकृतीद्वारे ती वाचकांपुढे काही खास आणि अस्सल घेऊन येते’ असा तिचा सन्मान केला आहे. कार्यशाळेतील ‘प्रभावी वक्त्या’ म्हणूनही तिची ख्याती आहे. नॉर्थवेस्ट रायटर्स असोसिएशन, द असिस्टन्स लीग, टिंबरलँड रीजनल लायब्ररीज इ. अनेक ठिकाणी तिने हजेरी लावली आहे. ‘द स्पिरिच्युॲलीस्ट ’(२००८), ‘अ‍ॅन इन्कव्हिनियंट वाइफ’(२००४) यांसारख्या तिच्या अद्भुतरम्य ऐतिहासिक लेखनाबरोबरच तिने आठ प्रणयरम्य ऐतिहासिक कादंबऱ्यांचेही लेखन केले आहे. तसेच तिच्या कादंबऱ्यांची अनेक भाषांत भाषांतरेही झाली आहेत. चान्सचा जन्म कोलंबसमधील ओहायो येथे झाला आणि तिच्या पुढील कारकिर्दीसाठी ती वॉशिंग्टनमध्ये आली. वेस्टर्न वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून ‘ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन्स’ या विषयात पदवी प्राप्त केल्यावर सुरुवातीला तिने वृत्तवाहिनीवर वृत्तछायाचित्रकार म्हणून काम केले. आता तिच्या दोन मुली आणि पतीसमवेत ती पॅसिफिक नॉर्थवेस्टमध्ये स्थायिक झाली आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE SPIRITUALIST Rating Star
Add To Cart INR 320
TBC Classic Book

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.