* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PIZZA TIGER
  • Availability : Available
  • Translators : SUDHIR RASHINGKAR
  • ISBN : 9789353172435
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FOUNDER OF DOMINO`S PIZZA EXPLAINS HOW HE EXPANDED HIS BUSINESS INTO THE LARGEST PIZZA DELIVERY COMPANY IN THE WORLD, DISCUSSING HOW INGENUITY AND STRICT PERSONAL ETHICS HAVE MADE THE AMERICAN DREAM COME TRUE.
टॉम मोनाघन... डॉमिनोज पिझ्झा या आज जगभर विस्तारलेल्या पिझ्झाच्या फास्ट फूड साखळीचा संस्थापक... टॉमचं कष्टमय बालपण... ‘मरिन कोअर’मधील निवृत्तीनंतर झालेली आर्थिक फसवणूक... त्याच्या भावाने आणलेला पिझ्झा स्टोअर चालवण्याचा प्रस्ताव... हा व्यवसाय करतानाही अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना... मात्र, त्या अडचणींना तोंड देत सुरू केलेलं पिझ्झा स्टोअर... त्यातून एका मोठ्या पिझ्झा-साखळीची झालेली निर्मिती...दर तीन तासांनी जगात कुठेतरी सुरू होणारी ‘डॉमिनोज’ची शाखा... अशा प्रकारे जगभर झालेला विस्तार... तर अशी आहे टॉमची यशोगाथा ‘पिझ्झा टायगर’... प्रेरणादायक आणि वाचनीय
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# पिझ्झाटायगर # टॉममोनाघन # डॉ.सुधीरराशिंगकर # अनुवादितआत्मचरित्र #कहाणीमॅकडॉनल्ड्सची#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#PIZZATIGER # SUDHIRRASHINGKAR#KAHANIMACDONALDCHI
Customer Reviews
  • Rating StarSAMPADA JODANK OCT-NOV2019

    डॉ. सुधीर राशिंगकर यांनी डॉमिनोज पिझ्झा या आंतरराष्ट्रीय पिझ्झा साखळी स्टोअर्सचा संस्थापक टॉम मोनाघन यांचे पिझ्झा टायगर हे आत्मचरित्र अनुवादित करून एका अमेरिकन उद्योजकाच्या धडपडीची आणि त्यातून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजकाच्या धडपडीची आणि ्यातून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगाची प्रेरणादायी चरित्रकहाणी मराठीत उपलब्ध करून दिली आहे. टॉमचा जन्म २५ मार्च १९३७ रोजी अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील एका छोट्या गावात झाला. त्याच्या वयाच्या ४थ्या वर्षी त्याचे वडील वारले आणि टॉम आणि त्याचा धाकटा भाऊ जिम यांचे हाल चालू झाले. आईने गरीबीमुळे पैसे वाचवायचे म्हणून. दोघांना अगदी लहानपणी ६ वर्षे अनाथाश्रमात राहण्यासाठी पाठवले. तिथून परत आल्यावर घरी आईशी त्याची कडाक्याची भांडणे व्हायची म्हणून तिने टॉमला २-३ कुटुंबात आश्रित म्हणून रहायला पाठवले. तिथेच त्याचे शालेय शिक्षण झाले. नंतर तो कॉलेजच्या फीचे पैसे जमवण्यासाठी वृत्तपत्रे विकण्याचे आणि अन्य हलकी कामे करून लागला. पुढे तो सैन्यदलात मरीन म्हणून भरती झाला. त्याला जपान आणि फिलिपाइन्समध्ये पाठवण्यात आले. परतल्यावर त्याचे तिथे साठवलेले २००० डॉलर्स एका लबाड माणसाने ते लखाणीच्या व्यवसायात गुंतवण्यासाठी त्याला गळ घालून हडप केले. तो कंगल झाला. मग एका वृत्तपत्राच्या कचेरीत काम करून आणि नंतर स्वत:चे वृत्तपत्राचे दुकान काढून पैसे कमवू लागला. त्याच्या भावाने एक पिझ्झाचे दुकान विकाऊ होते ते भागीदारीत चालवण्यासाठी घेण्याचा प्रस्ताव त्याच्यापुढे मांडला आणि दोघांनी पैसे जमवून ते दुकान चालवायला विकत घेतले. काही महिन्याने भाऊ त्यातून बाहेर पडला. मग टॉमने पिझ्झा विक्री हे आपले जीवनध्येय ठरवून पिझ्झा साखळी दुकानांचे स्टोअर्स उघडणे १९६० साली चालू केले. त्यात जम बसल्यावर त्याचा विस्तार केला. ३० मिनिटात घरपोच पिझ्झा हे उद्दीष्ट ठेवून पुढील ३० वर्षात हजारो पिझ्झा स्टोअर्स त्याने देशभर आणि परदेशी उघडले. भारतातही ते आहेत. या कामात अनंत अडचणी होत्या. एका प्रसंगी तर कर्जाच्या ओझ्याखाली दिवाळे काढण्यापर्यंत वेळ आली होती, एकदा त्याचे संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, काही स्टोअर्सधारकांनी फसवले तर डॉमिनोज पिझ्झा या नावाच्या साधम्र्यामुळे डॉमिनोज शुगर नावाच्या मोठ्या कंपनीने कॉपीराईट कायद्याअंतर्गत खटला भरला. ५ वर्षांनी तो टॉमने जिंकला. पुढच्या काळात डॉमिनोज पिझ्झा इंटरनॅशनल ही कंपनी स्थापन करून डॉमिनोज पिझ्झा सर्वदूर लोकप्रिय केला. उत्तम ग्राहक सेवा, वाजवी दर आणि दर्जाची हमी या तत्त्वावर भर देऊन जगभर नेले. त्याचा प्रेमविवाह मार्गी या तरुणीशी झाला आणि तिच्यासाठी त्याने सिगारेट आणि मध्यपान कायमचे सोडले. तिने त्याला उद्योगात साथ दिली. टॉमने अनेक नवे उद्योजक स्टोअर्स चालवण्यासाठी विकसित केले. आपल्या गोदामांची घडी बसवली. त्यासाठी प्रशिक्षण संस्था काढली. पुढे कंपनी सार्वजनिक करून तो कोट्याधीश झाला, त्याने बेसबॉलचा टायगर हा प्रसिद्ध संघ आपल्या मालकीचा केला. कंपनीचे भव्य कार्यालय अन् आर्बर येथे बांधले. त्याला अनेक सन्मानही मिळाले... तो अलिशान पद्धतीने राहत होता. पण एका व्हॅटिकनच्या भेटीत त्याला उपरती झाली आणि त्याने समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घ्यायचे जीवनोद्दिष्ट ठरवले, आपला व्यवसाय त्याने १९९८ साली १०० कोटी डॉलर्सला विकला आणि आलेले पैसे या कामासाठी वापरले. त्यातून दक्षिण अमेरिकेत त्याने आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात भरपूर काम केले. प्रत्येकाने आपल्या जीवनाची आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक प्राधान्ये जीवनात ठरवायला हवीत असे ती म्हणतो. त्याने स्वत: ती पाळली. या संपूर्ण जीवनप्रवासाच्या दरम्यान त्याला आलेले अनेक अनुभव, उपलब्धी आणि अपयश याचे अनेक प्रसंग त्याने विस्ताराने आत्मचरित्रात मांडले आहेत. नवउद्योजकांना उपयुक्त अशा टिपणीही दिल्या आहेत. त्यातून यशस्वी उद्योगपतीलाही किती अडचणीतून मार्ग काढून यश संपादन करावे लागते याचे समग्र दर्शन या आत्मचरित्रात घडते. डॉ सुधीर राशिंगकर यांनी साध्या, सोप्या भाषेत अनुवाद केल्याने मूळ पुस्तकातील आशय चांगला राहिला आहे. ...Read more

  • Rating StarVYAPARI MITRA - OCT-NOV, 2019

    ‘पिझ्झा टायगर’ हे डॉमिनोज पिझ्झा या आज जगभर पसरलेल्या पिझ्झाच्या फास्टफूड साखळीचा संस्थापक टॉम मोनाघन यांचे आत्मचरित्र आहे. व्यापारी मित्राचे लेखक डॉ. सुधीर राशिंगकर यांनी ‘‘पिझ्झा टायगर’’ हे आत्मचरित्र अनुवादित करून एका अमेरिकन उद्योजकाच्या धडपडीतूननिर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगाची प्रेरणादायी चरित्रकहाणी मराठीत उपलब्ध करून दिली आहे. वयाच्या ४थ्या वर्षी वडील वारले. टॉम आणि त्याचा भाऊ जिम यांचे हाल सुरू झाले. गरीबीमुळे आईने दोघांना ६वर्षे लहानपणीच अनाथाश्रमात राहण्यासाठी पाठविले. पुढे परत आल्यावर आईशी भांडण झाले. तिने २-३कुटुंबात आश्रित राहण्यास त्याला पाठविले तिथे शालेय शिक्षण झाले. कॉलेज शिक्षणासाठी पैसे जमविण्यासाठी वृत्तपत्रे विकणे व अन्य हलकी कामे त्यांनी केली. सैन्यदलात मरीन म्हणून भरती झाला. तिथे साठवलेले २००० डॉलर्स एका लबाड माणसाने व्यवसायासाठी मागून हडप केले. तो कंगाल झाला. त्याच्या भावाचे पिझ्झाचे दुकान विकाऊ होते ते भागीदारीत चालविण्यासाठी घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि दोघांनी मिळून ते दुकान चालवायला विकत घेतले. काही महिन्यांनी त्यातून भाऊही बाहेर पडला. टॉमने पिझ्झा विक्री हे आपले जीवन ध्येय ठरवून पिझ्झा साखळी दुकानांचे स्टोअर्स उघडणे १९६०साली चालू केले. जम बसल्यावर विस्तार केला. ३० मिनिटात घरपोच पिझ्झा स्टोअर्स देशभर व परदेशी उघडले. या व्यवसायातही पुढे अडचणी आल्या. कॉपीराईट अंतर्गत खटल्याला तोंड द्यावे लागले. या सर्व प्रसंगी त्याने आपली प्रगती कशी केली याचा सविस्तर वृत्तांत वरील पुस्तकात एकूण २१ प्रकरणातून उत्तमप्रकारे मांडला आहे. पुढे कंपनी सार्वजनिक करून तो कोट्याधीश झाला. समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घ्यायचे जीवनोद्दिष्ट ठरवले. १९९८साली त्याने आपला व्यवसाय १००कोटी डॉलर्सला विकला व आलेले पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले. दक्षिण अमेरिकेत त्याने आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरपूर काम केले आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनाची आध्यात्मिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक प्राधान्ये जीवनात ठरवायला हवीत असे तो म्हणतो व त्याने ती स्वत: पाळली. या आत्मचरित्रात नवउद्योजकांना उपयुक्त अशा टिपणीही दिल्या आहेत, यामधून यशस्वी उद्योगपतीलाही किती अडचणीतून मार्ग काढून यश संपादन करावे लागते याचे समग्र दर्शन या आत्मचरित्रात घडते. त्यामुळे प्रत्येक नवउद्योजकांनी तसेच उद्योजकांनी हे अवश्य वाचावे. डॉ. सुधीर राशिंगकर यांनी साध्या, सोप्या अत्यंत सुरेख भाषेत अनुवाद केल्याने मूळ पुस्तकातील आशय चांगला राहिला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 20-10-2019

    पिझ्झा किमयागाराची यशोगाथा... पिझ्झा म्हटले, की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतो तो डॉमिनोज पिझ्झा. एखाद्या पदार्थाशी संबंधीत एखाद्या कंपनीशी नाव जोडले जाणे, ही तशी निश्चितच सोपी गोष्ट नाही. त्या यशोगाथेचा प्रवासदेखील तितकाच संघर्षमय असतो. डॉमिनोज पिझ्झा ंपनीचे संस्थापक अर्थातच सर्वेसर्वा असलेले टॉम मोनाघन यांचे आत्मचरित्र म्हणजे ‘पिझ्झा टायगर’ हे पुस्तक होय. त्यांची ३० मिनिटांत घरपोच पिझ्झा ही संकल्पना अतिशय प्रभावी आणि खवय्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली. या किमयागाराचे पितृछत्र वयाच्या चौथ्या वर्षी हरपले. त्यांचे बालपण, नंतर अनाथाश्रमात गेले. वयाच्या २२व्या छोट्याशा गावातून सुरू केलेला पिझ्झा विकण्याचा व्यवसाय जागतिक पातळीवर पोहोचविला. त्याची ही जबरदस्त आणि प्रेरणादायी कहाणी. -दीपक कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-10-2019

    हल्ली घराघरात पिझ्झा खाण्याचे प्रमाण वाढले आहे. हा विदेशी पदार्थ कधी आपलास झाला, हे कुणालाही कळले नाही. ऑर्डर दिल्यापासून अवघ्या तीस मिनिटांत घरपोच येणारा हा पदार्थ सर्वतोमुखी करण्याचा मान ‘डॉमिनोज पिझ्झा’चे संस्थापक टॉम मोनाघन यांना जातो. अत्यंत हलाीच्या परिस्थितीत वाढलेल्या टॉम यांचा ‘पिझ्झा टायगर’पर्यंतचा प्रवास मोठा रंजक आणि खिळवून ठेवणारा आहे. त्याच्या जीवनात आलेल्या चांगल्या, वाईट अनुभवांची शिदोरी म्हणजे हे पुस्तक असून, अपयशाच्या कहाण्याही त्यांनी विस्ताराने मांडल्या आहेत. या शिवाय नवउद्योजकांना उपयुक्त ठरतील, अशा टिप्सही आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book