* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MY STORY
  • Availability : Available
  • Translators : ASHA KARDALE
  • ISBN : 9788171615995
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 512
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE GREAT ACTRESS`S ACCOUNT OF HER CAREER, HER PERSONAL LIFE, AND THOSE WITH WHOM SHE HAS WORKED IS ACCOMPANIED BY INFORMATION ABOUT AND REACTIONS TO HER FROM HER DIRECTORS, CO-STARS, HUSBANDS, AND CHILDREN INCLUDES CHRONOLOGY OF THE FILMS, PLAYS, AND TELEVISION APPEARANCES OF INGRID BERGMAN FILMOGRAPHY ONE OF THE WORLD`S FINEST STAGE AND SCREEN ACTRESSES GIVES US AN AUTOBIOGRAPHY AS OUTSTANDING AS SHE IS. MORE THAN JUST AN ACCOUNT OF HER ILLUSTRIOUS CAREER, HERE IS A TOTALLY CANDID SELF-PORTRAIT OF A REMARKABLE WOMAN: HER PERSONAL FAILURES AS WELL AS HER PUBLIC SUCCESSES..
जगप्रसिद्ध स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचं हे गाजलेलं आत्मकथन. तीन वेळा ऑस्कर पारितोषिकं आणि तीन वेळा न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स अवार्ड्स मिळवणाऱ्या या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीनं या पुस्तकात स्वत:ची पडद्यावरची कहाणी तर सांगितलेली आहेच; पण पडद्यामागची कहाणीही हातचं राखून न ठेवता, प्रांजळपणे सांगितलेली आहे. नाटक आणि चित्रपट हे तिचे जणू श्वास आणि उच्छ्वास होते. त्यापुढं तिनं आपलं वैयक्तिक जीवन सदैव तुच्छ मानलं. या आत्मकथनात तिच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या खुणा वाचकांना ठायी ठायी आढळतील. हा केवळ तिच्या एकटीच्याच कलाजीवनाचा प्रवास नाही, तर 1934 ते 1979 या जवळजवळ अर्धशतकाच्या कालखंडातील चित्रनाट्य व्यवसायाचा आणि कलावंतांचाही चालता-बोलता, समृद्ध इतिहास आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#29AUGUST1915 #29AUGUST1982 #MYSTORY #INGRIDBERGMAN #ACADEMYAWARDS #ALANBURGESS #ASHAKARDALE #ROBERTOROSSELLINI #OSCARAWARWINNER #LARSSCHMIDT # PETTER LINDSTROM #ROBINISABELLA #SWEDISHACTRESS #DAVIDOSELZNICK #FRIEDELPIALINDSTROM # INTERMEZZO: A LOVE STORY (1939) #CASABLANCA (1942) #FOR WHOM THE BELL TOLLS (1943) #GASLIGHT (1944) #SARATOGA TRUNK (1945) #HITCHCOCK FILMSJOAN OF ARC (1948)#STROMBOLI AND "NEOREALISM" #ANASTASIA (1956) #MURDER ON THE ORIENT EXPRESS (1974) #AUTUMN SONATA (1978) #A WOMAN CALLED GOLDA (1982) #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #
Customer Reviews
  • Rating StarEknath Marathe

    माय स्टोरी. मूळ लेखक -- इनग्रिड बर्गमन आणि ॲलन बर्गेस , मराठी अनुवाद -- आशा कर्दळे प्रकाशक -- मेहता पब्लिशिंग हाऊस ..... सिनेमा हा विषय मला अभ्यासाच्या दृष्टीने आवडतो. मी सिनेमे फारसे बघितले नसले तरी ते बनतात कसे हा माझ्या आवडीचा विषय आहे. हिंी सिने सृष्टीतील राजेश खन्ना, रफी, हेमा मालिनी, ऋषी कपूर यांची आत्मचरित्रे / चरित्रे मी वाचली आहेत. मराठीत माडगुळकर, सुधीर फडके, मोहन जोशी, सचिन पिळगावकर यांची सुद्धा चरित्रे वाचलेली आहेत. हॉलीवूड अभिनेत्री इनग्रीड बर्गमन हीचे चरित्र सुद्धा एका आगळ्या कुतूहलाने वाचून काढले. इनग्रीड बर्गमन ही स्वीडिश अभिनेत्री 1920 ते 1960 हा काळ गाजवून गेली. सिनेमा व रंगभूमी , दोन्ही तिने चार दशके गाजवून सोडले. तिची आई लहानपणीच गेली तर वडील 13 व्या वर्षी गेले. काकांनी मोठे केले पण त्यांना सिनेमा क्षेत्र अजिबात आवडत नव्हते. पण हिला मात्र अगदी लहानपणापासून अभिनयाचे प्रचंड वेड. काकांशी हट्ट करून ती नाटक शिकवणाऱ्या शाळेत प्रवेश घेते पण तिकडे वर्षे पूर्ण होण्या आधीच तिला सिनेमात काम करायची संधी मिळते. 40 वर्षाच्या तिच्या कारकीर्दीत तिने इटालियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश अशा सर्व भाषिक सिनेमात काम केले. कारकीर्दीत तिने अनेक चढउतार बघितले. आपल्या सर्वच दिग्दर्शकां बरोबर तिचे कडाक्याचे वाद झाले. काहीनी तिच्या हट्टापुढे मान तुकवली काही ठाम राहिले. या अशा वादातून सिनेमा किंवा नाटक कसे आकार घेते हे सुद्धा छान आले आहे. समकालीन तारकांबरोबर तिचे सूर अजिबात जुळले नाहीत. लोकांचे प्रचंड प्रेम व तेवढीच हेटाळणी सुद्धा तिने अनुभवली.पत्रकार कलाकारांच्या खाजगी आयुष्यात कोणताही विधिनिषेध न बाळगता कसे डोकावतात याचे सुद्धा भयंकर वर्णन यात आले आहे. जवळपास 6 फूट उंच असल्याने, उंची दिसू नये म्हणून काम करताना तिला सतत वाकून रहावे लागे. उंच टाचांच्या चपला ती कधी घालूच शकली नाही ! ती दिसायला मादक नव्हती पण आकर्षक मात्र होती आणि आपला अनोखा ठसा उमटवू शकली. तिचे खाजगी जीवन सुद्धा साधे सरळ नव्हते. तिची 3 लग्ने झाली व तेवढेच घटस्फोट. 3 मुली व एक मुलगा यांचा ताबा मिळवा म्हणून केलेली कायदेशीर लढाई यात वाचायला मिळते. युरोप आणि अमेरिका यांच्या संस्कृतीत किती टोकाचा फरक यात दिसतोच पण अगदी युरोपात सुद्धा प्रत्येक देशात लोकांचे वेगवेगळे स्वभाव तिने अनुभवातून उलगडून दाखवले आहेत. आई, आदर्श पत्नी, हाडाची कलाकार, सामाजिक दायित्व हे सर्व घटक सांभाळताना आपली कलेशी असलेली निष्ठा जपताना होणारी तिची घालमेल अस्वस्थ करते. हे सर्व सांभाळताना तिला अखंड संघर्ष करावा लागला. तत्कालीन अनेक थोर लेखक, कलाकार, राजकारणी यांचा सहवास तिला लाभला. शेवटच्या प्रकरणात तिने दिलेली कर्करोगाशी झुंज आहे. मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद आशा कर्दळे यांनी खूप सुंदर केला आहे. कादंबरी बऱ्यापैकी मोठी आहे. निवांत शनिवार रविवार असे जोडून घेवून तब्येतीत वाचावी अशी आहे ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more