OSHO

About Author

Birth Date : 11/12/1931
Death Date : 19/01/1990


RAJNEESH, ALSO KNOWN AS ACHARYA RAJNEESH, BHAGWAN SHREE RAJNEESH, AND LATER AS OSHO, WAS AN INDIAN GOD MAN, MYSTIC, CULT LEADER, AND FOUNDER OF THE RAJNEESH MOVEMENT. DURING HIS LIFETIME, HE WAS VIEWED AS A CONTROVERSIAL NEW RELIGIOUS MOVEMENT LEADER AND MYSTIC. HE REJECTED INSTITUTIONAL RELIGIONS.

ओशो..! एक प्रतिभावान विचारवंत..! काळाच्या कित्येक योजनं पुढे जाणारे विचार मांडणारा हा अवलिया..! थेट मानवी भावभावनांना आव्हान देणारे विचार मांडून करोडो माणसांना ‘प्रॉQक्टकल’ मार्ग सांगणारा थोर विचारवंत..! ओशोंनी सतत समाजाला धक्के देणारे विचार मांडले. आजच्या एकविसाव्या शतकातसुद्धा अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत असणाNया आपल्या समाजासमोर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ओशोंनी काही ठणठणीत उपाय सांगितले. परंतु आपण सामान्य माणसं प्रत्येक विचारवंताला विरोध करत राहतो, काळाच्या पुढे जाणारा माणूस आपल्या आवाक्यात येत नाही, आपण पेलू शकत नाही. ओशोंनी मात्र सगळ्या विरोधाला टक्कर देत, समाजाला सतत जागृत ठेवण्याचं काम अखंडपणे केलं. रोजच्या जगण्याशी पटणारे, शुद्ध विचार समोर ठेवले.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 34 total
AIKA SANTANO Rating Star
Add To Cart INR 160
BANDKHOR Rating Star
Add To Cart INR 150
BHAKTIT BHIJALA KABIR Rating Star
Add To Cart INR 160
DHYAN SUTRA Rating Star
Add To Cart INR 240
EK EK PAUL Rating Star
Add To Cart INR 140
HA SHODH VEGALA Rating Star
Add To Cart INR 190
HASAT KHELAT DHYANADHARANA Rating Star
Add To Cart INR 140
KRISHNA SAKHA Rating Star
Add To Cart INR 270
KRISHNAMRUT Rating Star
Add To Cart INR 270
KRISHNARANG SAVALA Rating Star
Add To Cart INR 270
MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI Rating Star
Add To Cart INR 160
MEE DHARMIKTA SHIKVITO DHARM NAHI Rating Star
Add To Cart INR 140
123

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more