Rasika Hinge *पुस्तक परीक्षण*
मूळ भारतीय वंशाचा पण परदेशात शिकलेला कथानायक त्याच्या अमेरिकन प्रोफेसरच्या सांगण्यावरून भारतात आदिवासी बद्दल अंधश्रद्धा, धर्मांधता, याविषयी संशोधन करायला येतो.
अनिच्छेने इथे आलेल्या कथानायकास सौराष्ट्राच्या जंगलातील न्मदेच्या खोऱ्यात आदिवासी प्रदेशात काम करतांना, त्यांच्या सोबत राहतांना आलेले अनुभव म्हणजे गुजराथी लेखक ध्रुव भट्ट यांची अंजनी नरवणे यांनी अनुवादित केलेली तत्वमसि कादंबरी.
वास्तविक कथानायकाला या आदिवासी बद्दल ना आकर्षण ना इथे काम करण्याची इच्छा. तरीही काही दिवस राहू, माहिती गोळा करू , आदिवासींना काही शिकवता आलं, त्यांच्या श्रद्धा किती चुकीच्या आहेत हे पटवून देण्यासाठी आणि जमलं तर एखादी शाळा वगैरे काढता आली तर पाहू असा विचार करून कथानायक भारत भूवर पाय ठेवतो.
इथे आल्यावर आदिवासी जीवन त्याला जवळून पहायला मिळतं. त्यांच्या श्रद्धा,परंपरा स्वतःवर असलेला विश्वास यामुळे तो नकळत त्यांच्याकडे खेचला जातो. भारतीय परंपरागत संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याची तुलना नकळत होऊ लागते.
आदिवासी प्रदेशातील काही ठिकाणं, काही घटना त्याला अचंबित करतात. तर काही प्रथा विचार करायला भाग पाडतात.
नर्मदेच्या खोऱ्यात परिक्रमेसाठी आलेल्या परिक्रमा वासींची जमेल तशी सेवा करायची हे आदिवासीचे तत्व. मुळात नदीची प्रदक्षिणा करणे म्हणजे अंधश्रद्धा आणि मागासलेपण आहे असे कथानायकाला वाटते.
आदिवासी भाषा शिकतांना, एखादा उपक्रम राबवितांना जसे मध गोळा करणे, शाळा सुरू करणे यासाठी त्याला आलेल्या विविध अडचणी, स्थानिक आदिवासींची परंपरेवर असलेली श्रध्दा या सगळ्या गोष्टी त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेर आहेत असे त्याला वाटत राहतं.
भारतीय संस्कृतीत तीर्थाटन, आचार विचार, परंपरा यांची देवाण घेवाण यामुळे भारत एकत्रित बांधला गेला आहे असे कथानायकाला आदिवासींनी केलेली परिक्रमा वासींची सेवा पाहून पटायला लागतं,.
परिक्रमा करतांना प्रत्यक्ष नर्मदा दर्शन देते यावर त्याचा विश्वास नसतो. आलेल्या परिक्रमवासी शी बोलून माहिती घेण्याचा प्रयत्न कथानायक करतो. पण हे सांगून पटणारी गोष्ट नाही. यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून तो परिक्रमा अनुभवण्यास निघतो. अवघे विश्व एकाच मूलतत्वापासून निर्माण झाले आहे याचा अनुभव नर्मदेच्या तीरावर चालतांना येतो.
नर्मदा नदी ही जिवंत मानली जाते. तिच्या सहवासात ,तिच्या तीरावरील रम्य अनुभव वाचतांना नकळत आपणही मी कोण? विचार करू लागतो......
तत्वमसि आवडली कारण वाचतांना खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे... वाचा आणि अनुभवा एक उत्कट अनुभव.....
©️रसिका राजीव हिंगे ...Read more
Ravindra Parse दिग्विजय, नेपोलीयन बोनापार्ट... ही कादंबरी वाचायला घेतली आणि काय सांगु मित्रांनो ती ख़ाली ठेवलीच जात नव्हती.. या पुस्तक़ात मी अक्षरशः गुन्तलो होतो. नेपोलीयन ग्रेट होता ही माहीत होतं पण या कादंबरी नंतर तर मी त्याचा फ़ैनच झालोय. ४ दिवसात वाचुन संपावलेी कादंबरी आनी बोनापार्ट चे आयुष्य यावर अजुनहि विचार चालू आहें ज़णूकाही बोनापार्ट फ़ीवरच चढलाय मला.... ...Read more