* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE TRANSLATOR
  • Availability : Available
  • Translators : AJIT KULKARNI
  • ISBN : 9788184983449
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"I AM THE TRANSLATOR WHO HAS TAKEN JOURNALISTS INTO DANGEROUS DARFUR. IT IS MY INTENTION NOW TO TAKE YOU THERE IN THIS BOOK, IF YOU HAVE THE COURAGE TO COME WITH ME." THE YOUNG LIFE OF DAOUD HARI-HIS FRIENDS CALL HIM DAVID-HAS BEEN ONE OF BRAVERY AND MESMERIZING ADVENTURE. HE IS A LIVING WITNESS TO THE BRUTAL GENOCIDE UNDER WAY IN DARFUR. "THE TRANSLATOR" IS A SUSPENSEFUL, HARROWING, AND DEEPLY MOVING MEMOIR OF HOW ONE PERSON HAS MADE A DIFFERENCE IN THE WORLD-AN ON-THE-GROUND ACCOUNT OF ONE OF THE BIGGEST STORIES OF OUR TIME. USING HIS HIGH SCHOOL KNOWLEDGE OF LANGUAGES AS HIS WEAPON-WHILE OTHERS AROUND HIM WERE TAKING UP ARMS-DAOUD HARI HAS HELPED INFORM THE WORLD ABOUT DARFUR. HARI, A ZAGHAWA TRIBESMAN, GREW UP IN A VILLAGE IN THE DARFUR REGION OF SUDAN. AS A CHILD HE SAW COLORFUL WEDDINGS, RACED HIS CAMELS ACROSS THE DESERT, AND PLAYED GAMES IN THE MOONLIGHT AFTER HIS WORK WAS DONE. IN 2003, THIS TRADITIONAL LIFE WAS SHATTERED WHEN HELICOPTER GUNSHIPS APPEARED OVER DARFUR`S VILLAGES, FOLLOWED BY SUDANESE-GOVERNMENT-BACKED MILITIA GROUPS ATTACKING ON HORSEBACK, RAPING AND MURDERING CITIZENS AND BURNING VILLAGES. ANCIENT HATREDS AND GREED FOR NATURAL RESOURCES HAD COLLIDED, AND THE CONFLAGRATION SPREAD. THOUGH HARI`S VILLAGE WAS ATTACKED AND DESTROYEDHIS FAMILY DECIMATED AND DISPERSED, HE HIMSELF ESCAPED. ROAMING THE BATTLEFIELD DESERTS ON CAMELS, HE AND A GROUP OF HIS FRIENDS HELPED SURVIVORS FIND FOOD, WATER, AND THE WAY TO SAFETY. WHEN INTERNATIONAL AID GROUPS AND REPORTERS ARRIVED, HARI OFFERED HIS SERVICES AS A TRANSLATOR AND GUIDE. IN DOING SO, HE RISKED HIS LIFE AGAIN AND AGAIN, FOR THE GOVERNMENT OF SUDAN HAD OUTLAWED JOURNALISTS IN THE REGION, AND DEATH WASTHE PUNISHMENT FOR THOSE WHO AIDED THE "FOREIGN SPIES." AND THEN, INEVITABLY, HIS LUCK RAN OUT AND HE WAS CAPTURED. . . . "THE TRANSLATOR" TELLS THE REMARKABLE STORY OF A MAN WHO CAME FACE-TO-FACE WITH GENOCIDE- TIME AND AGAIN RISKING HIS OWN LIFE TO FIGHT INJUSTICE AND SAVE HIS PEOPLE.
पुस्तकाचा लेखक सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी आहे. वंशाने तो ‘झॅघावा’ आहे. ‘झॅघावा’ ही डारफर मधील भटकी जमात. अरब आणि आफ्रिकन या दोन्ही वंशाचे लोक डारफर मध्ये गेली हजारो वर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण गेली काही वर्षे डारफर प्रांतात भयंकर वंशविच्छेद सुरू आहे. वंशाने स्वत:ला ‘उच्च’ समजणाऱ्या अरब वंशीयांना त्यांचे मूळ आफ्रिकन बांधव नकोसे झाले आहेत. सत्ताधारी अरब आणि त्यांना पाठिंबा देणारे माथेफिरू; हे मूळ आफ्रिकन वंशीयांना त्यांच्याच भूमीतून हाकलून देत आहेत. मूळ रहिवाश्यांच्या गावांवर आणि वस्त्यांवर हल्ले करून त्यांना जिवे मारण्यात येत आहे. स्त्रियांवर आणि कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत. लाखो विस्थापितांचे लोंढेच्या लोंढे शेजारील चॅड या राष्ट्रात आश्रय घेत आहेत. दुर्देवाने तथाकथित आधुनिक जगाला या घडामोडींचा मागमूसही नाही. पुस्तकाचा लेखक स्वत: या सर्व परिस्थितीचा बळी ठरला आहे. त्याचे कुटुंबही या अत्याचारातून सुटलेले नाही. आपल्या इंग्रजीच्या ज्ञानामुळे त्याला ‘बीबीसी’, ‘एनबीसी’ या वृत्त वाहिन्या आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने पाठविलेल्या चौकशी दलांसाठी ‘दुभाष्या’ म्हणून काम करण्याची संधी मिळली. त्या संधीचा उपयोग करून डारफरमधील परिस्थिती या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने जगासमोर मांडली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DUBHASHYA #THETRANSLATOR #दुभाष्या #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #AJITKULKARNI #DAOUDHARI "
Customer Reviews
  • Rating Starशुचिता फडके

    नुकतंच दुभाषा हे पुस्तक वाचण्यात आलं. सुदान राष्ट्रातील सत्य अशा घटनेवर आधारित हे पुस्तक आहे. ती घटना अजुनही भूतकाळ न होता वर्तमान काळातच आहे. हा विशेष दखल घेण्याजोगा मुद्दा. शिवाय मूळ पुस्तकाच्या आशयाला कुठेही धक्का न लागू देता केलेला चपखल अनुवाद हाअनुभवण्याजोगा आहे. अनुभवण्याजोगा कारण पुस्तक केवळ वाचलं जात नाहीत तर ते अनुभवलं जातं. मूळ प्रतिभासंपन्न सत्यकथेला मराठीत उतरवताना भाषेचं अवडंबर न माजवता चपखलरित्या संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. अनेकदा असं वाटतं, की आपण तिथेच आहोत सारं काही प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. सत्यकथेची ताकद इतकी जबरदस्त आहे, की आपला दृष्टिकोन बदलायला त्यामुळे नक्कीच मदत होते. हे पुस्तक वाचून मला तरी स्वत:ची वैचारिक भूमिका अधिक प्रगल्भ व सजग झाली आहे. हे जाणवतंय. मेहता प्रकाशनामुळे घरबसल्या इतर कुठलीही भाषा न शिकतादेखील देश-विदेशीची सुख-दु:ख, संस्कृती, आचार-विचार हे सारं आपल्यापर्यंत पोहोचतंय ही एक विशेष उल्लेखनीय बाब आहे. माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा संस्कार होईल तो याच पुस्तकातून. एक अतिशय सुंदर कलाकृती. वास्तवात आणणाऱ्या ‘दुभाष्याचे’ शतश: आभार. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA 2-10-2015

    मानवी परिस्थिती आणि जीवन यांच्याकडे पाहण्याची एक शैली अस्तित्ववादाशी निगडित आहे. माणसाच्या परिस्थितिविषयी, मानवी अस्तित्वाच्या स्वरुपाविषयी आणि माणसानं कसं जगावं याविषयी काही मूलभूत प्रश्न अस्तित्ववादी उपस्थित करतात. हे वाचा-बोलायला ठीक वाटतं, पण मुळत आपल्या अस्तित्वावर घाला पडतो, भवताल बेचिराख होऊ लागतो, तेव्हा मग फार फार आतून गलबलून येतं... कासावीस वाटतं नि आपण जिवंत का आहोत, असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न दाऊद हॅरीला पडला नि त्यानं अनुभवकथन केलं ते ‘द ट्रान्सलेटर’ या पुस्तकाच्या माध्यमातून. त्याचा हा अनुवाद केलाय अजित कुलकर्णी यांनी. ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या लक्षवेधी मुखपृष्ठापासून हे अनुभव कथन लक्षवेधी ठरतं. दाऊद हॅरीच्या कथनाचं सारं सारच जणू या रेखटनातून प्रतिबिंबित होतं. पाठोपाठ येतो तो दाऊदचा फोटो नि त्याची संक्षिप्त ओळख. मग वाचता येतात ते या पुस्तकाविषयीचे अभिप्राय. खुद्द दाऊदची प्रस्तावना नि अनुवादकाच्या दोन शब्दांनी मूळच्या अरब कथनाविषयी आपल्याला कोणत्या क्लेशदायी अनुभवांना सामोरं जावं लागणार याची उत्सुकता वाढते. जेमतेम चारेक पानांचं एक एक प्रकरण असलं तरीही त्यातल्या मजकुरामुळं नि त्यातल्या अर्थवाही शब्दांनी हलून जायला होतं. हॅरी हा सुदान देशातील डारफर प्रांताचा रहिवासी. वंशानं तो तिथल्या झेंघवा या भटक्या जमातीचा प्रतिनिधी. अरब नि आफ्रिकन वंशाचे लोक डारफरमध्ये गेली हजारो वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते, पण गेली काही वर्ष डारफरमध्ये भयंकर असा वंशविच्छेद सुरु आहे. वंशानं स्वत:ला उच्च समजणाऱ्या अरब वंशियांना मूळ आफ्रिकन बांधव नकोसे झालेत. आफ्रिकनांना त्यांच्याच भूमीतून हाकलले जातेय. गाव-वस्त्यांवर हल्ले करुन त्यांना क्रूरपणं मारण्यात येतंय. अशा वेळी प्रथम बळी पडतो तो स्त्रिया नि लहान मुलींचा. दाऊदला भेटणाऱ्या-दिसणाऱ्या प्रत्येकीची हकिगत वेगळी आहे. वृद्धांचा गाव न सोडण्याचा निर्धार नि त्यापायी त्यांचा हकनाक मृत्यु वाचून हळहळ वाटते. निर्वासितांच्या छावण्यांतली, सीमाभागांतील अनेकांच्या कहाण्या वाचून सुन्न व्हायला होतं. स्वत: दाऊद नि त्याचं कुटुंबही या साऱ्या अत्याचारांचा बळी ठरलेय. मात्र आपलं दु:खं मागं सारुन त्यानं आपल्याला येणाऱ्या इंग्रजीच्या बळावर इतरांसाठी शक्य तो मदतीचा हात पुढं केलाय. वृत्त्तपत्र, दूरचित्रवाहिनी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दुभाष्याची भूमिका बजावत त्यानं आपलं काम सुरु ठेवलंय. इतक्या भयानक दु:खाच्या प्रवाहातून जाताना नि इतकी भयाण परिस्थिती अनुभवूनही दाऊदची भाषा सौम्य आणि संयम आहे. ना कुठं दु:खाचं प्रदर्शन ना शोकाचं अवडंबर. तथाकथित आधुनिक जगाला या साऱ्या उलथापालथींचा फारसा मागमूस नाही, हे जाणवल्यावर तो सल जणू दुभाष्याच्याच भूमिकेतून दाऊद हे कथन करतो. ही क्लेशकारक कहाणी असली तरीही दाऊदची दुर्दम्य आशा नि इच्छाशक्ती आपल्यालाही नकळत बळकटीच देऊन जाते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.