BORIS PASTERNAK

About Author

Birth Date : 10/02/1890
Death Date : 30/05/1960


BORIS LEONIDOVICH PASTERNAK WAS A RUSSIAN POET, NOVELIST, COMPOSER, AND LITERARY TRANSLATOR. COMPOSED IN 1917, PASTERNAKS FIRST BOOK OF POEMS, MY SISTER, LIFE, WAS PUBLISHED IN BERLIN IN 1922 AND SOON BECAME AN IMPORTANT COLLECTION IN THE RUSSIAN LANGUAGE

बोरिस लिओनिदोविच पास्तरनाक हे एक रशियन लेखक व कवी होते. त्यांचा जन्म १० पेÂब्रुवारी १८९० रोजी झाला. त्यांनी १९१७ साली रचलेला ‘माझी बहीण, जीवन’ हा कवितासंग्रह रशियन साहित्यामध्ये मैलाचा दगड मानला जातो. पास्तरनाकने योहान वोल्फगांग, फॉन ग्यॉटे, फ्रीडरिश शिलर, विल्यम शेक्सपियर इत्यादी अनेक विदेशी कलावंतांनी लिहिलेली नाटके रशियन भाषेत अनुवादित केली. १९५६ साली पास्तरनाक यांनी लिहिलेली ‘डॉक्टर झिवागो’ ही कादंबरी १९०५ सालची रशियन क्रांती व दुसरे महायुद्ध या दरम्यानच्या कालखंडाचे चित्रण करणारी होती. पास्तरनाकचे समाजवादावरील स्वतंत्र विचार सोव्हियेत कम्युनिस्ट पक्षाला न रुचल्यामुळे सोव्हियेत सरकारने या कादंबरीच्या प्रकाशनावर बंदी घातली. १९५७ साली ही कादंबरी इटलीमध्ये प्रकाशित केली गेली. ही कादंबरी रातोरात जगप्रसिद्ध झाली व १९५८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक या कादंबरीला जाहीर झाले; परंतु सोव्हियेत कम्युनिस्ट पक्षाने पास्तरनाकला नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास मनाई केली. अखेर १९८८ साली पास्तरनाकच्या वंशजांनी नोबेल पारितोषिक स्वीकारले. १९६० साली पास्तरनाकच यांचे निधन झाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
DOCTOR ZHIVAGO Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

THE DA VINCI CODE
THE DA VINCI CODE by DAN BROWN Rating Star
V. Pawar

खूप छान कादंबरी आहे. अगदी मनाला गुंतवून ठेवणारी. 👌👌

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
स्वप्निल सोनवडेकर

#वाचनवेडा लेखक रणजित देसाई यांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांची लेखन शैली मला वेगळ्या जगात घेऊन जाते. त्यांच्या पुस्तकात शब्दसंपत्ती मुबलक लाभते.ओघवते लिखाण कांदबरीची पुढील पानं झपझप पलटवतात.त्यांच्या प्रत्येक कादंबरीतलं अलवार लिखाण मनाला भिडणारं असत.राधेय हि अशी कादंबरी आहे,जी प्रत्येक पुस्तकप्रेमीने वाचली आहे.राधेय पुस्तकाचे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या वाढत्या वयाच्या परिपक्वतेवर ही कादंबरी पुन्हा पुन्हा वाचावी वाटते.जेवढी नव्याने वाचावी ती अजून उलगडत जाते. राधेय वाचताना कर्ण,दुर्योधन,शकुनी तथा महाभारताचा खरा राजकारणी कृष्ण यांची प्रतिमा मेहंदीसारखी रंगू लागते.कारण ती वाचकांच्या ओंजळीत रणजीत देसाई यांनी रेखाटलेली असते. एखाद्या लेखकाने कादंबरी लिहावी आणि ती अजरामर व्हावी ती ही अशी... महाभारतात उपेक्षित ठरलेला योद्धा म्हणजे कर्ण.जन्मानंतर ज्याला स्वतःच्या आईनेच स्वतःपासून दूर केलं असा कर्ण आयुष्यात कधी कुणाचा कसा झाला असता..! सूतपुत्र म्हणून आयुष्यभर हिणवल्या गेलेल्या कर्णाला तो राधेय नाही तर कौंतेय आहे हे कृष्णाकडून उमगतं तेव्हा तो भावविभोर नं होता रोरांवत्या प्रश्नांच्या वादळात गुरफटून जातो.धरणीकंप व्हावा आणि हे सत्य असं ज्वालारसाप्रमाणे बाहेर यावं.ह्या ज्वालारसातील दाह कसा कोणी सहन करावा..! अर्ध आयुष्य जगल्यानंतर,नात्यांची मूळं खोल शिरल्यानंतर हे सत्य ऐकून काय बदलणार होत.?कानात तळपता रस टाकल्याप्रमाणे या सत्याचा त्रासच अधिक होईल. हे सत्य कळल्यानंतर देखील आपल्या मैत्रीला जपणाऱ्या ह्या वीर योद्धाची जीवनगाथा रणजीत देसाई यांनी या पुस्तकात काय सुंदर मांडली आहे. राधेय कादंबरी वाचताना उलगडत जाणारा कर्ण हा उगवत्या इंद्रधनुष्यप्रमाणे वाटू लागतो. त्याच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा आपल्या मनाला स्पर्श करू लागतात. द्रौपदी स्वयंवर आणि द्रौपदी चीरहरण प्रसंग काय सुंदर मांडले आहेत या कादंबरीत.या पुस्तकातील काही ओळी मला फार भावतात. `हे नरेंद्र धर्म वाकवावा तसा तो वाकतो.` हे वाक्य वाचलं आणि सध्याचं राजकारण डोळ्यांसमोर तरळतं . `अग्रपूजेचा मान बलानं तोलला जात नाही,तो अधिकार धारण करणाऱ्या पुरुषांच्या ठायी सत्वगुणांचा अधिकार असावा लागतो.`ह्या वाक्याला देखील काय सुंदर अर्थ आहे. द्युतपटात तरबेज असणारा शकुनी म्हणतो.`नाना देशींच्या बरोबर मी फासे घोळवले आहेत.प्रियकराला आपल्या सखीची अंगप्रत्यंग जाणवावी तशा कोरलेल्या मुद्रा माझ्या सरावलेल्या हातांना रात्री अंधारातही जाणवतात.` द्रौपदीचे चीरहरण होत असताना तिची अब्रू वाचवायला आलेला कृष्ण उर्मट दुर्योधनाला म्हणतो.`सामर्थ्यशाली पुरुषाला दुर्बलांच्या सभेत प्रवेश करण्यास आमंत्रणाची आवश्यकता नसते.` या पुस्तकातील बरीच वाक्य मी अधोरेखित करून ठेवली आहेत, सगळ्याच ओळी इथे लिहायला गेलो तर अर्ध पुस्तकच लिहावे लागेल. रणजीत देसाई यांच्या कांदबरीवर समीक्षण पोस्ट लिहिणारा मी कोण! ही पोस्ट समीक्षण पोस्ट नसून कौतुक लिखाण आहे. तर राधेय पुस्तकाच्या तुमच्या आठवणी काय आहेत हे नक्की कमेंट्स मध्ये लिहा. ...Read more