* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DOES HE KNOW A MOTHERS HEART?
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184985665
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 384
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOUR NEIGHBORS HAVE A SON. HE IS NOW THIRTYFIVE YEARS OLD. GOING BY HIS AGE YOU WOULD THINK OF HIM AS A YOUNG MAN AND ON MEETING HIS MOTHER OR FATHER, WOULD ASK, ALMOST OUT OF HABIT, ‘ AND WHAT DOES THE YOUNG MAN DO ?` THAT EXPRESSION, ‘YOUNG MAN’, DOESN’T SIT WELL AS HE IS BUT A CHILD. BUT WHAT IF THE FATHER OR THE FATHER – THE ‘T’ AND ‘F’ CAPITAL, BOTH WORDS ITALICIZED? THAT IS, WHAT IF THE ‘FATHER’IN QUESTION IS ‘GOD’? WHY DO THE REACTIONS AND ANSWER CHANGE FOR SO MANY OF US?
तुमच्या शेजार्‍यांना एक मुलगा आहे. आता तो पस्तीस वर्षांचा आहे. त्याच्या वयावरून तुम्हाला वाटेल की, तो उमदा तरुण असणार. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना भेटल्यावर तुम्ही अगदी सवयीनं विचारणार, ‘‘तुमचा मुलगा काय करतो?’’ पण ‘उमदा तरुण’ हा तुमचा शब्दप्रयोग इथे योग्य ठरणार नाही, कारण तो तरुण मुलगा अजून लहान मुलासारखाच आहे. पिता, म्हणजे जर ‘तो’ – THE FATHER... यातसुद्धा ‘टी’ आणि ‘एफ’ ही दोन्ही अक्षरं ‘कॅपिटल’ आणि ‘इटॅलिक्स’मध्ये असं असेल तर? हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बर्‍याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# GOVERNANCE #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR #MAGILPANAVARUNMAGECH #KALELKATYALAAAICHEMAN #ARUNSHOURIE #THEPARLIMENTARY SYSTEM #TRANSLATEDBOOK #ASHOKPATHARKAR #GOVERNENCE #VALVIGRASTAVRUKSHALAKATERIKUMPANVACHAVUSHAKELKA? #KALELKATYALAAAICHMAN #HESARVAAPALYALAKOTHEGHEVUNJANAR?
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 19-12-2015

    शौरी, दु:खभोग आणि देव... तो चालू शकत नाही. एवढंच काय तो उभाही राहू शकत नाही. उजवा हात काम करत नाही. त्याला फक्त एखादाच शब्दोच्चार करता येतो. त्याचे वडील त्याला चिडून म्हणतात, ‘‘तुझ्यामुळे आमच्या घरात दु:ख आलेय, स्वत:कडे बघ... अशक्त, परावलंबी, तोंडातन लाळ गळतीय, काऽही कामाचा नाही्र्र्र’’ वडील त्याच्यावर ओरडताहेत, शिव्यांची लाखोली वाहताहेत, त्याला मारहाण करताहेत, काळंनिळं होईपर्यंत झोडपताहेत... अशा पित्याबद्दल तुम्हाला काय वाटेल? तुम्ही पोलिसात किंवा तत्सम अधिकारी संस्थेकडे त्याची तक्रार नोंदवून त्याला अटक करायला लावाल ना? त्या मुलाला बापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी तुम्ही तुम्हाला शक्य ते सगळं काही कराल ना? पण पिता म्हणजे जर तो .... असेल तर? म्हणजेच हा ‘पिता’ म्हणजे ‘देव’ असेल तर? हे कळताच आपल्यापैकी बऱ्याच जणांचा दृष्टिकोन अचानक का बदलतो? अचानक ते म्हणू लागतात, की देवानं असे करण्याला नक्कीच काहीतरी कारण असणार? अचानक ते त्या बिचाऱ्या मुलाच्या माथी खापर फोडू लागतात; त्या मुलानं मागच्या जन्मी काहीतरी भयंकर केलं असणार, त्यामुळे त्याच्या वाट्याला असे हाल आले आहे... वरील परिच्छेद आहे अरुण शौरी लिखित Does he know a mother’s heart? या पुस्तकातला. पुस्तकाची सुरुवात होते तीच मुळी, ‘हा अत्याचारी पिता म्हणजे ‘देव’ असेल तर?’ अशा हृदयभेदी आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणाऱ्या या प्रश्नाने! आणि वरील परिच्छेदात उल्लेख केलेलं असहाय मूल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, अरुण शौरी व त्यांची पत्नी अनिता यांचा पस्तिशीतला मुलगा आदित्य! (प्रेमाने त्याला आदित म्हणतात) वेळेआधी जन्माला आलेले हे बाळ, जेमतेम चार पौंडाचं, यातनांच्या आवर्तात, काचेच्या पेटीत ठेवलेलं. त्यांच्या इवलुशा हाताची शिर सापडत नव्हती म्हणून डॉक्टरांनी म्हणून डॉक्टरांनी त्याच्या डोक्याच्या त्वचेत सुया खुपसल्या होत्या... इनक्युबेटरमध्ये ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आदितला मेंदूचा पक्षाघात झाला होता. याचा परिणाम म्हणजे आदित जन्मभरासाठी परावलंबी बनला होता. एवढेच नव्हे तर फिटस् येणे, डोळ्यांशी निगडीत अत्यंत वेदनादायी दुखणी होणे यांसारखे बरेच काही आदितला सोसावे लागत होते आणि आपल्या गोळ्याला असे यातनांच्या आवर्तात पाहताना शौरी व त्यांची पत्नी अनितावर क्षणोक्षणी मानसिक आघात होत होते. हे सारे कमी होते म्हणून की काय, वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी अनिताला पार्किन्सन आजार झाल्याचे निदान झाले! प्रत्येक दिवस हा शौरी कुटुंबीयांसाठी जणू एक आव्हानच. परंतु या साऱ्याला त्यांनी कसे धीराने तोंड दिले. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात काही व्यक्तींनी अगदी देवदूताप्रमाणे कशी मदत केली आणि हळूहळू परिस्थितीशी दोन हात करायला ते कसे शिकले, याचे वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा पहिला अध्याय आहे. पुस्तकाचे शीर्षक, मुखपृष्ठ, अर्पणपत्रिका आणि पुस्तकाचा हा प्रथम अध्याय यावरून असे वाटते, की आदितचं दुखणं आणि त्यास अनुषांगिक एकंदरच शौरी कुटुंबीयांनी दिलेला जिद्दीचा लढा हाच पुस्तकाचा मूळ विषय आहे. परंतु पुस्तकाचे लेखक श्री. अरुण शौरी आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’ या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राचे एकेकाळचे मुख्य संपादक, ‘मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड’, ‘दादाभाई नौरोजी अ‍ॅवॉर्ड’, ‘फ्रीडम टू पब्लिश अ‍ॅवॉर्ड’, ‘अ‍ॅस्टर अ‍ॅवॉर्ड’, ‘पद्मभूषण’ आणि अशा अनेक सन्मानांनी विभूषित अरुण शौरी! असे थोर व्यक्तिमत्त्व केवळ वैयक्तिक दु:खांचे कथन करण्याकरिता पुस्तकाचा प्रपंच नक्कीच मांडणार नाहीत. आदितचं दुखणं ही केवळ पार्श्वभूमी आहे. जसजसे आपण पुढे वाचत जातो, तसतसे हे पुस्तक आपल्याला अधिकाधिक गहन आणि मूलभूत प्रश्नांकडे नेत जाते; जर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान शिवाय दयाघन परमेश्वर असेल, तर प्रचंड दु:खभोग इतक्या प्रमाणात कसे काय दिसले असते? आपले पवित्र धर्मग्रंथ या दु:खभोगांचे स्पष्टीकरण कसे करतात? द्याव्या लागणाऱ्या सत्त्वपरिक्षेपुढे ही स्पष्टीकरणे टिकाव धरतात का? निर्मितीच्या क्षणी एखाद्या व्यक्तिची कोणतीच सत्कर्म अथवा दुष्कर्म नसूनही देव असमान क्षमता व प्रवृत्ती कशा काय बहाल करतो? ब्रह्म वा वैश्विक तत्त्व वा परमेश्वर यांनी त्या व्यक्तीला जे करायला लावलं, त्याबद्दल त्या व्यक्तीला शिक्षा का होते? यांसारख्या असंख्य प्रश्नांच्या संदर्भात हिंदू, मुस्लीम, खिस्ती आणि बौद्ध धर्मांचे काय म्हणणे आहे हे संक्षिप्त स्वरूपात पुस्तकामध्ये उद्घृत केलेले आहे. तसेच थोरा-मोठ्यांची, तत्त्ववेत्यांची, साधू-संतांची यासंबंधीची मतेही दिली आहेत. विविध धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये दु:खभोगांबद्दल जी स्पष्टीकरणे दिली गेली आहेत ती समाधानकारक ठरतात का? शौरींना अखेर कोणत्या धर्मात त्यातल्यात्यात दिलासाजनक उत्तरे सापडतात? गूढ आणि ज्यास आपण ‘आध्यात्मिक अनुभव’ म्हणतो त्याविषयी न्युरोसायंटिस्ट आणि मानसशास्त्रज्ञ कशा प्रकारे अभ्यास करीत आहेत? त्यांचे याबद्दल काय म्हणणे आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतील. अखेर आपल्या दु:खभोगांच्या काळोखात कुढत न बसता त्यास विधायक वळण कसे लावता येईल, या विषयी शौरी यांनी काही अतिशय उद्बोधक असे धडे आहेत. विशेषकरून आपल्यापैकी ज्या कोणाला शौरींप्रमाणेच जिवाभावच्या व्यक्तीचे दीर्घकालीन आजारपण, असहायता पाहावी लागली असेल, त्याची सेवा करावी लागत असेल, अशांना तर शौरींनी दिलेले हे धडे फारच उपकारक ठरतील. एकीकडे आदितची विकलांगता आणि आदितसह एकंदरच शौरी कुटुंबीयांनी त्यांच्या पदरी आलेल्या दु:खभोगाशी दिलेला सन्मानपूर्वक लढा, तर दुसरीकडे दु:ख भोगांबद्दलचे धर्मपर विवेचन, असे दोन्ही विषय पुस्तकात एकत्रितपणे हाताळल्यामुळे दोहोंस परस्परांमुळे वेगळेच परिणाम प्राप्त झाले आहे. पुस्तकामध्ये शौरींनी धर्मनिष्ठांविषयी केलेल्या उहापोहापैकी आपल्याला त्यांची सारीच मते पटतील असे नाही. किंबहुना पटतील की नाही हा मुद्दा निराळा आहे. परंतु त्यांची मते, त्यांनी उबे केलेले प्रश्न यांमुळे आपण विचार प्रवृत्त होऊ हे मत निश्चिंत. शिवाय आपल्या पैकी ज्यांनी कोणी अशाप्रकारच्या विचार मंथनास यापूर्वीच प्रारंभ केला असेल, त्यास विचारांची काही नवी दालने खुली होऊ शकतील. तर अशा या विचारास चालना देणाऱ्या पुस्तकाचा अनुवाद करून मराठी वाचकास उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम ‘सुप्रिया वकील’ यांचे मन:पूर्वक अभिनंदन. अखेर एक गोष्ट नमूद करावी वाटते शौरींनी प्रश्न केल्याप्रमाणे देवाला आईचे मन कळते की नाही ह्याचे उत्तर कदाचित आपल्याला ठाऊक नसेल; परंतु आपण पुस्तकाचे अंतिम पृष्ठ वाचून पुस्तक खाली ठेवतो तोपर्यंत आपल्याला एका बापाच्या काळजाबद्दल मात्र खूप काही कळलेले असते. ...Read more

  • Rating StarDr.Sunilkumar Lawate, Daily Lokmat 31-3-17

    हे पुस्तक अरुण शौरी यांच्या जीवनातील एका घटनेचे सविस्तर विवेचन आहे. त्याला वास्तवाचे कोंदण आहे. अन् चिंतनाची झालरही. शौरींचे मूळ कुटुंब पाकिस्तानातले. भारत-पाकिस्तान विभाजन सन १९४७ मध्ये झाले. तेव्हा जे हजारो लोक भारताच्या ओढीने परतले त्यापैकी हे एक.अरुण शौरी प्रतिवूâल परिस्थितीत शिकत मोठे झाले. विवाह झाला. संसाराची नऊ वर्षे स्वर्ग सुखाची गेली. बाळाच्या ओढीने त्यांनी एका जिवाला जन्म दिला. बाळ सातव्या महिन्यातच जन्मले. खरे तर नैसर्गिक जन्मापूर्वीच बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने मुदतपूर्व जन्माला घालावे लागते. जन्मलेले बाळ अवघे चार पौंडाचे असते. जन्मजात यातनांच्या गर्तेत, आवर्तनात सापडलेले हे बाळ वाचविण्यासाठी त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात येते. त्याला वाचविण्यासाठी हाताची शिर सापडत नाही म्हणून जन्मजात बाळास डोक्यात सुया खोचल्या जातात. बाळाची साखरेची पातळी अस्थिर म्हणून रक्त चढविले जाते. असे महिनाभर जीव वाचविण्यासाठी पालकांना आटापिटा डॉक्टरानांही असह्य होतो. एक हितचिंतक या पालकांना एका क्षणी कठोर सत्य सांगून मोकळे होतात...‘हे मूल तुमचे आयुष्य संपवेल . पूर्ण आयुष्य. तुम्हाला हा असा मुलगा जगावा असे गांर्भीयाने वाटते का?’ बाळाची आजी निक्षून सांगत होती, असे काही नाही, आता अपंग मुले सुद्धा अगदी सक्षम आयुष्य जगतात. बाळाला जीवदान मिळते खरे, पण ते त्याला अन् पालकांना एक जीवघेणे आयुष्य बहाल करते. पुढे बाळाला मेंदूचा पक्षाघात होतो. तो सात वर्षांचा होतो. तर शाळेत यक्षप्रश्न उभारतो. स्पॅस्टिक (प्लास्टिक नव्हे) मुलांच्या शाळेचा शोध सुरु होतो. शाळा मिळते एकदाची., पण पालकांसाठी रात्रंदिनी युद्धाचा प्रसंग. बाळाला आई रोज गाडीतून घेऊन जायची. एकदा त्यांच्या गाडीला एक जीपनी उडविले. बाळ आणि आई दोन्ही जखमी झाले. अपघातात बाळाच्या आईचे दोन्ही खांदे धरले ते कायमचेच. पुढे त्याचे रुपांतर पार्विâन्सन्समध्ये झाले. तेही वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी. आता अरुण शौरी घरातले ‘सर्वसेवक’ झाले. कल्पनासुद्धा करता येणार नाही असे असह्य आघात झेलत अरुण शौरी अविचल मनोधैर्याने आयुष्याला कसे सामोरे जात राहिले त्याचे हृदयद्रावक आत्मकथन म्हणजे ‘कळेल का ‘त्याला’ आईचं मन?’ हा एक आपदग्रस्त बापाचा व्यक्तिगत असला तरी त्याला एका सामूहिक हुंकार, हुंदक्यांचे रुप येऊन गेले आहे. अशा शरणागत क्षणी बुद्धिजीवी, बुद्धिवंतांची प्रज्ञाही गुंग होऊन जाते. मग तो कधी ईश्वर शरण, कधी नशीबवादी, कधी बुवाबाजीच्याही आहारी जातो. पण, सरतेशेवटी शौरींसारखी शहाणीसुरती माणसे दुःखभोगाचे विश्लेषण करण्यातून आयुष्याचा वस्तुनिष्ठ धांडोळा घेणे श्रेयस्कर समजतात. पूर्वार्ध बाळ जन्मास समर्पित आहे. मध्यभाग सुमारे ३०० पृष्ठांचा असून त्यात अरुण शौरींनी ‘जुना करार’ आणि ‘कुराण’ मधील धर्मचर्चेद्वारे जीवनातील ऐहिक घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे. संकटग्रस्त स्थितीत सामान्य माणूस दैवाधिन होतो, पण शौरींसारखा विचारवंत अदैवी स्पष्टीकरणातून आपल्या मनाची कवाडे खुली करीत दुःखभोगाचे स्वरूप स्पष्ट करतो. हे पुस्तक रुढ अर्थाने वाचनीय नसून विचारणीय आहे. वेदेनेचे नवे तत्त्वज्ञान म्हणून या पुस्तकाकडे पाहावे लागते. हे जरुरी नाही की कुणी शौरींच्या मताशी सहमत व्हावे, पण एक निश्तिच की, हे पुस्तक वाचणारा प्रत्येकजण त्यांच्या दुःखाचा नातलग जरुर होऊन जातो. आयुष्यातला दुःखभोग काय असतो? सेवा, धर्म, कर्तव्य, विधायक, उन्नयन, जीवन कौशल्य, त्याग, समपर्ण, शिक्षण आघात काय असते? याचे उत्तर ज्याने आपल्या ववूâब अन् क्षमतेनीच घ्यायचे. मी बालकल्याण संकुलात अनाथ, निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन कार्य करताना आलेल्या एका प्रसंगाची आठवण मला या पुस्तकाने करून दिली. मी संस्था कार्यालयात काम करीत होतो नि पोलिस पार्टी एक वॉरंट घेऊन आली. ‘एस.टी. स्टँडवर एक लोळागोळा मुलगा पडलाय. चला, ताब्यात घ्या, चला. ‘मी अधिकारी, काळजीवाहक गेलो. मुलाला आम्हाला नेणे शक्य नव्हते म्हणून सरकारी दवाखान्यातून रुग्णवाहिका मागविली. ती नव्हती म्हणून पोस्टमार्टमसाठी आलेली शववाहिका बदली म्हणून आली. ती सूचक होती का का कुणास ठाऊक? पण, दवााखान्यात डॉ. रा.अ.पाठक तेव्हा सिव्हिल सर्जन होते. मोठे रुग्णप्रेमी व सेवाधर्मी डॉक्टर. तपासून मला म्हणाले की, ‘डॉक्टर, इसको यही रखना पडेगा. यह तो बेजान है.’ आम्ही त्याचे ‘मानस’ नाव ठेवले. त्याला सलाईन, पुढे पेज ती पण नळीतूनच भरवत जगवत राहिलो होतो. तो जिवंत असेपर्यंत आमची शर्थ वर्णातच हरली. आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. तो मानस अरुण शौरींच्या आदित्यसारखाच होता. जुळा भाऊच म्हणा ना. अशी मुले, मुली येतच राहत होती. पुढे त्या दशकात अशा मुलांसाठी कार्य करणाNया ‘चेतना’, ‘स्वयंम्’, ‘चैतन्य’, ‘जिज्ञासा’ अशा एकामागून एक संस्था कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झाल्या. मी त्यांच्याशी वेगवेगळ्या नात्यांनी जोडला गेलो होतो नि आहे. मला वाचकांना अनुभवाने सांगावेसे वाटते की, ‘कळेल का ‘त्याला’ आईचं मन?’ पुस्तक त्या सर्व तगमगीची कहाणी आहे. ज्यांच्या पोटी बहुव्यंग अपत्य जन्मते त्यांचे जीवन समस्याबहुल राहते ते, ते बाळ पदरी असेपर्यंत. ...Read more

  • Rating StarAmartya Sen March 6, 2017

    "Does He Know a Mother`s Heart?" - one of the best books I know (moving, persuasive and very far-reaching)!"

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more