BABU GANJEWAR

About Author

Birth Date : 24/06/1955


BABU GANJEWAR IS THE AUTHOR & CARTOONIST WHO STARTED HIS WRITING IN 1990. HIS CARTOON COLLECTIONS TITLED AKKALDADH & GULLER ARE WELL ACCLAIMED HUMOROUS CREATIONS WHICH PIN POINT THE HUMOR IN DAY TO DAY LIFE OF A HUMAN BEING. HE IS THE RECIPIENT OF MAHARASHTRA SAHITYA PARISHAD AWARD, ACHARYA ATRE FOUNDATION AWARD & MANY MORE. HE HAS BEEN ALSO AWARDED BY MARMIK AWARD BY THE HANDS OF SHRI.BALASAHEB THACKERAY.

बाबू गंजेवार यांचे मूळ नाव लक्ष्मीकांत रामचंद्र गंजेवार असे आहे. नांदेड जिल्ह्यातले कंधार हे टुमदार गाव त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी. ते बालपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. आणि त्यांनी विविध पदांचे दायित्वही सांभाळले आहे. १९९० पासून त्यांनी व्यंगचित्रे रेखाटन व लिखाणास सुरुवात केली. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांना मार्मिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अक्कलदाढ हा त्यांचा पहिला व्यंगचित्र संग्रह. तर गुल्लेर या व्यंगलेखन संकलनास महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. आचार्य अत्रे फाउंडेशन, पुणे यांचा विशेष पुरस्कारही त्यांना लाभला आहे. दै. प्रजावाणी, दै. लोकमत, दै. पुण्यनगरी अशा वर्तमानपत्रातून त्यांचे लेखन व व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. तर आवाज दिवाळी अंकातून त्यांची व्यंगचित्रमाला नियमित प्रसिद्ध होते.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
CHANAKSHA Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
वैशाली देशमुख (पांडे), अमरावती.

काल लायब्ररीतून `छाटीतो गप्पा` हे लेखक जी.बी.देशमुखांचं पुस्तक घेतलं. एका बैठकीत वाचून संपवलं. साध्या, सोप्या, हलक्याफुलक्या भाषेत सांगितलेल्या रंगतदार गोष्टी वाचताना खूप मजा आली. जीवनाची लज्जत वाढवणाऱ्या आणि त्याचबरोबर अंतर्मुख करणाऱ्या या गप्पा लावाब आहेत! मनाला उभारी देणार असं हलकफुलकं पुस्तक क्वचितच हाती येतं. लेखकाला धन्यवाद. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
अविनाश कुळकर्णी, नागपूर.

जी.बी.देशमुख लिखीत `दुर्दम्य ` पुस्तक आज वाचलं. एका व्यक्ती विशेषचं इतक सरस आणि मार्मिक वर्णन लेखकाने ज्या शैलीत साकारलय ते फारच छान. पुस्तकातील शेवटची ४-५ पानं तर हृदय हेलावून टाकतात. लेखकाकडून असेच सुंदर,बहारदार आणी मार्मिक लेखन होत रहावं हीच दिच्छा. अप्रतिम. ...Read more