* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE WHISTLEBLOWER
 • Availability : Available
 • Translators : SINDHU JOSHI
 • ISBN : 9788184989168
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 220
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
WHEN NEBRASKA POLICE OFFICER AND DIVORCED MOTHER OF THREE KATHRYN BOLKOVAC SAW A RECRUITING ANNOUNCEMENT FOR PRIVATE MILITARY CONTRACTOR DYNCORP INTERNATIONAL, SHE APPLIED AND WAS HIRED. GOOD MONEY, WORLD TRAVEL, AND THE CHANCE TO HELP REBUILD A WAR-TORN COUNTRY SOUNDED LIKE THE PERFECT JOB. BOLKOVAC WAS SHIPPED OUT TO BOSNIA, WHERE DYNCORP HAD BEEN CONTRACTED TO SUPPORT THE UN PEACEKEEPING MISSION. SHE WAS ASSIGNED AS A HUMAN RIGHTS INVESTIGATOR, HEADING THE GENDER AFFAIRS UNIT. THE LACK OF PROPER TRAINING PROVIDED SOUNDED THE FIRST ALARM BELL, BUT ONCE SHE ARRIVED IN SARAJEVO, SHE FOUND OUT THAT THINGS WERE A LOT WORSE. AT GREAT RISK TO HER PERSONAL SAFETY, SHE BEGAN TO UNRAVEL THE UGLY TRUTH ABOUT OFFICERS INVOLVED IN HUMAN TRAFFICKING AND FORCED PROSTITUTION AND THEIR CONNECTIONS TO PRIVATE MERCENARY CONTRACTORS, THE UN, AND THE U.S. STATE DEPARTMENT. AFTER BRINGING THIS EVIDENCE TO LIGHT, BOLKOVAC WAS DEMOTED, FELT THREATENED WITH BODILY HARM, WAS FIRED, AND ULTIMATELY FORCED TO FLEE THE COUNTRY UNDER COVER OF DARKNESS?BRINGING THE INCRIMINATING DOCUMENTS WITH HER. THANKS TO THE EVIDENCE SHE COLLECTED, SHE WON A LAWSUIT AGAINST DYNCORP, FINALLY EXPOSING THEM FOR WHAT THEY HAD DONE. THIS IS HER STORY AND THE STORY OF THE WOMEN SHE HELPED ACHIEVE JUSTICE FOR.
नेब्रास्कातील पोलीस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरीन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकॉर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे छिन्नभिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची संधी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते. लवकरच ती बोस्नियात पोहोचते. युनोच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी डीनकॉर्पला कंत्राट दिले जाते. तिच्याकडे मानवी हक्क अन्वेषक आणि लिंगविषयक विभागाची प्रमुख म्हणून काम सोपवण्यात येते. योग्य असे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते; परंतु साराजेव्होत आल्यानंतर तिला कल्पना नव्हती, इतक्या वाईट गोष्टींचा ती छडा लावते. जीव धोक्यात घालून कॅथी अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध घेऊ लागते. खासगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटदाराबरोबर, युनो व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटेलोटे असणाऱ्या मानवी व्यापारात गुंतलेल्या महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्याची बिंगे ती फोडते. लवकरच तिची पदावनती करून तिला नोकरीवरून बडतर्फ केले जाते. जिवे मारले जाण्याच्या भीतीने ती बोस्निया सोडते. गोळा केलेले सर्व पुरावे सतत जवळ बाळगून ठेवल्यामुळे डीनकॉर्पविरुद्ध दाखल केलेला खटला ती जिंकते. डीनकॉर्पची काळी कृत्ये उजेडात आणण्यात यशस्वी होते. इथे दुसऱ्या देशात खेळवल्या जाणाऱ्या युद्धाच्या मुळाशी असणारे धोके ओळखून कॅथी सावध राहण्याचा इशारा देत आहे. रक्षण आणि गुलामीसदृश आयुष्य कंठणाऱ्याची शांतता काळात सुटका करण्याच्या जबाबदारीची ती जाणीव करून देते. तुलना होऊ न शकणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीबरोबर मुकाबला करताना आपल्या मनाची पकड घेणारी आणि चांगली कामे करण्यास उत्तेजन देऊन आश्चर्यचकित करणारी, धैर्य आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवणारी ही सत्य कहाणी. अन्यायाविरुद्ध उठणारा फक्त एक आवाज किती किमया करू शकतो, याचा प्रत्यय देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKAKIBAND #THEWHISTLEBLOWER #एकाकीबंड #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SINDHUJOSHI #KATHRYN BOLKOVACCARILYNN "
Customer Reviews
 • Rating StarDivya Marathi 16.12.16

  लैगिंक शोषणासाठी मानवी व्यापार करणा-या लष्करी कंत्राटदाराच्या विरोधात लेखिकेचा न्यायासाठी लढा म्हणजेच द व्हिस्टल बॉलर अर्थात एकाकी लढा हे पुस्तक. नेब्रास्कातील पोलिस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरिन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरीभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे छिन्न-भिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची कामगिरी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते. लवकरच ती बोस्नियात पोहोचते. युनोच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी डीनकॉर्पला कंत्राट दिले जाते. तिच्याकडे मानवी हक्क अन्वेषक आणि लिंगविषयक विभागाची प्रमुख म्हणून काम सोपवण्यात येते. योग्य असे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते. पण साराजेव्होत आल्यानंतर तिला कल्पना नव्हती, इतक्या वाईट गोष्टींचा ती छडा लावते. जीव धोक्यात घालून कॅथी अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध घेऊ लागते. खासगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटाबरोबर, युनो व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटेलोटे असणा-या मानवी व्यापारात गुंतलेल्या महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या अधिका-यांनी भिंगे ती फोडते. लवकरच तिची पदावनती करून तिला नोकरीवरून बडतर्फ केले जाते. जिवे मारले जाण्याच्या भीतीने ती बोस्निया सोडते. गोळा केलेले सर्व पुरावे सतत जवळ बाळगून ठेवल्यामुळे डीनकॉर्पविरूद्ध दाखल केलेला खटला ती जिंकते. डीनकॉर्पची काळी कृत्ये उजेडात आणण्यात यशस्वी होते. अशा सगळ्या घटनांची एक तरल कथा या ‘एकाकी बंड’ या पुस्तकातून देण्यात आली आहे. कॅथरिन बोल्कोव्हॅक आणि कॅरी लीन यांनी ‘द व्हिस्टलबॉलर’ या नावाने हे पुस्तक लिहिले असून सिंधू जोशी यांनी ‘एकाकी बंड’ या नावाने त्याचा अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झालेला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून मानवी व्यापारातील बळींच्या पाठीशी उभे राहण्याचे आणि निर्भीडपणे सत्य समोर आणण्याचे विलक्षण धाडस करणारी कॅथी एक असामान्य स्त्री आहे. हे तर या पुस्तकातून कळतेच, पण एक नवी प्रेरणाही मिळते. ...Read more

 • Rating StarLOKSATTA 7-2-16

  ही कहाणी आहे एका धाडसी स्त्रीची. कॅथरिन बोल्कोव्हॅक ही अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील माजी पोलिस अधिकारी. तिचा जन्म बोल्कोव्हॅक घराण्यातला. ती वडिलांच्या घराण्याकडून क्रोएशिअन आहे, तर तिची आई मूळची ओहायो राज्यातील रहिवासी; पण तिच्या आई-वडिलांबरोबर अेक वर्ष दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केलेली. आई-वडील दोघांकडूनही तिला दणकट शरीरयष्टीचा वारसा लाभला. भावंडांत दुसरी असणारी कॅथरिन लहानपणापासूनच तब्येतीने एकदम धडधाकट, सशक्त होती. सहा फुटांच्या आसपास सणसणीत उंची आणि दणकट बांधा असणाऱ्या कॅथरिनला फुटबॉल, व्हॉलीबॉल असे धसमुसळे खेळ मनापासून आवडायचे. भरपूर व्यायाम करायचा आणि भरपूर आहार घ्यायचा असा तिचा लहानपणापासूनचा दिनक्रम होता. पदवीधर होण्याच्या आतच लवकर लग्न करून वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत ती तीन मुलांची आई झाली. सुरुवातीची काही वर्षं तिने हॉटेलमध्ये नोकरी केली. लग्नानंतर दहा वर्षातच तिने घटस्फोट घेतला आणि नवऱ्यापासून विभक्त झाली. अपयशी ठरल्याच्या भावनेनं तिला घेरून टाकलं. त्याच सुमारास वर्तमानपत्रात आलेल्या लिंकन पोलीस खात्याच्या एका जाहिरातीनं तिचं लक्ष वेधून घेतलं. १९८९ मध्ये तिने त्यासाठी मुलाखत दिली आणि तिची निवड झाली. कामाला सुरुवात केल्यानंतर जणू त्याच कामाकरता आपला जन्म झाला आहे, एवढी आत्मीयता तिला त्या कामाबद्दल वाटू लागली. तिच्या नीडर कार्यपद्धतीमुळे तिला ‘झेना’ (एक लढाऊ राजकन्या) असं टोपणनावही मिळालं. पण आठ-नऊ वर्ष सलग काम केल्यानंतर गुन्हेगार आणि त्यांच्या जगाशी कामामुळे येणारा सततचा संपर्क आणि त्यातील धोके यापासून तिला दूर जावसं वाटू लागलं. आणि त्याच वेळेस तिच्या पोलीस स्टेशनात डीनकॉर्प कंपनीची ‘युनो’च्या ‘इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्स बोस्निया’मध्ये एक वर्षाकरिता निवृत्त पोलीस अधिकाऱयांच्या भरतीविषयीची जाहिरात झळकली. तिने लगेच ती संधी साधून अर्ज भरला आणि अर्थातच प्रशिक्षणाकरिता तिची निवड झाली. इतकचं नव्हे तर त्यातूनही ठणठणीत तब्येत आणि खणखणीत मन यांच्या जोरावर ‘आयपीटीएफ’मध्ये ती दाखलही झाली. वयाच्या अडतिसाव्या वर्षी एका वर्षाकरिता मुलांपासून दूर ५००० मैलांवर असलेल्या ठिकाणी जाण्याचा तिचा निर्णय सोपा नक्कीच नव्हता. परंतु मुलांनीच तिला मनापासून धीर आणि पाठिंबा दिला आणि जून १९९९ मध्ये ती तिच्या पथकाबरोबर बोस्नियातील सारायेव्हो शहरात ‘यूनो’च्या कार्यालयात दाखल झाली. इथे ‘आयपीटीएफ’तर्फे निवडले गेलेले आणि ‘यूनो’च्या ४५ सभासद देशांमधून आलेले जवळजवळ २००० पोलीस अधिकारी एकत्र आले. त्या सर्वांकडे जी कामगिरी सोपवण्यात आलेली होती, त्याला त्या भूप्रदेशातील अनेक वर्ष चाललेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. १९९२च्या सुरुवातीला युगोस्लाव्हिया या देशातील साम्यवादाचं, कम्युनिस्ट सत्तेचं उच्चाटन झालं. परंतु त्याचवेळी सर्बिया प्रांताच्या अध्यक्षांची सत्ता प्रबळ होत होती. या दोन गोष्टींमुळे बोस्निया आणि हरझेगोव्हिया या दोन प्रांतांनी युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र व्हायचं ठरवलं. त्या दोन प्रांतांत पूर्वीपासूनच कॅथलिक पंथाचे क्रोएटस्, सनातनी वृत्तीचे सर्ब आणि मुस्लीम असे भिन्नधर्मीय लोक एकत्र नांदत होते. पण एप्रिल १९९२ नंतर हे सर्व चित्र बदलत गेलं. सर्बियन लोकांनी सारायेव्हो शहरातील मुस्लीम आणि क्रोएट्स समुदायांवर हल्ले करायला सुरुवात केली. जिथे जिथे बोस्नियन नागरिक राहत होते तिथे तिथे हे हल्ले चालू होते. शेवटी तर सर्बियन हुकूमशहाने सारायेव्हो शहराची नाकेबंदी करून शहराला सैनिकांचा वेढा घातला. आजवर जगभरात झालेल्या अनेक युद्धांच्या इतिहासात एखाद्या राजधानीच्या शहराची सर्वात जास्त काळ केलेली ही नाकेबंदी ठरली. शेवटी डिसेंबर १९९५ मध्ये ‘डेटन शांती करारा’’ने साडेतीन वर्ष चाललेल्या या एकतर्फी युद्धाचा शेवट झाला आणि बोस्निया आणि हरझेगोव्हिया असे दोन नवे देश अस्तित्वात आले. ‘डेटन शांती करारा’प्रमाणे ‘यूनो’च्या सुरक्षा समितीने बोस्निया आणि हरझेगोव्हिया या देशांत मनुष्यहिताची कामं करणं अपेक्षित होतं त्यात युद्धात निर्वासित झालेल्या लोकांची सोय बघणं, जमिनीत पेरलेले सुरुंग नष्ट करणं, मानवी हक्कांची जपणूक करणं, निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं, आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करणं, रस्ते, नागरी आणि पायाभूत सुविधा यांची पुर्नबांधणी करणं, पोलीस यंत्रणा नव्याने उभारणं, त्याकरिता पोलीस भरती करणं आणि त्या निवडलेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण करणं, अशी ही अनेक कामांची यादी होती. त्याकरिता बोस्नियात ‘इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्स’ (आयटीपीएफ) आणि नागरी कामांकरिता कार्यालय स्थापन करण्यातं आलं. ‘आयटीपीएफ’ तयार करण्याकरिता ‘यूनो’ला सभासद देशांच्या अंतर्गत पालिस यंत्रणेतून माणसं पुरवण्यात आली. अपवाद होता तो अमेरिकेचा. कारण त्या देशात पोलीस व्यवस्था ही त्या- त्या शहराची आणि राज्याची जबाबदारी असते. म्हणून तिथे अशी भरती करण्याकरता ‘डीन कॉर्प’ या खाजगी संस्थेला कंत्राट देण्यात आलं. ‘डीन कॉर्प’तर्फे कॅथरिन सारायेव्होत दाखल झाली, पण तिला फक्त कार्यालयीन कामात रस नव्हता. म्हणून तिने मानवी हक्क जपणुकीसंबंधीचं कामाचं क्षेत्र निवडलं. त्याकरिता इलिझा गावात तिची नेमणूक करण्यात आली. तिथे तिच्याबरोबर व्हेनेटा नावाची एक अमेरिकन सहकारीही होती. तिच्यावर आता युद्धकाळात घर सोडून पळून गेलेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याची किचकट जबाबदारी होती. कारण युद्धापूर्वी युगोस्लाव्हियातील बोस्नियात सर्व लोक, क्रोएट्स आणि मुस्लिम लोक वेगवेगळ्या भागांत वस्त्या करून राहत होते. परंतु युद्धानंतर सर्वत्र अंदाधुंदी माजली होती. निर्वासितांच्या छावणीत जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा होता. त्यांची सोय लावण्याचं काम कॅथरिनला दिवसभर पुरून उरायचं. याशिवाय बोस्नियातील पोलीस खात्याची नव्याने उभारणी करण्याचं कामही तिच्याच विभागाकडे सोपवण्यात आलेलं होतं. मुळातच अतिशय कमी वेतनावर काम करणाऱ्या तिथल्या पोलीस खात्यात लाचखाऊपणा आणि भ्रष्टाचाराला ऊत आला होता. पोलीसांची नागरिकांशी वर्तणूक मग्रुरीची आणि उर्मट होती. याला वळण लावण्याच्या अतिशय अवघड कामात कॅथरिन तिच्या सहकाऱ्यांसमवेत गुंतली. त्यानंतर काही काळातच तिच्यातील गुणवत्ता हेरून तिच्यावर स्त्रियांवरील हिंसाचाराची परिणामकारक उकल करणं- अशा स्वरूपाची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर १९९९ या कालावधीत झेनिया या सारायेव्होच्या उत्तरेला असलेल्या गावात तिने आपल्या कामाची सूत्र हाती घेतली. या ठिकाणी प्रसंगी जीव धोक्यात घालून कॅथरिनने अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध लावला. ‘डीन कॉर्प’ सारख्या खाजगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटदाराबरोबर, ‘यूनो’ आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटंलोटं असणाऱ्या अधिकाऱयांची मानवी व्यापारात अडकलेल्या स्त्रियांना जबरदस्तीने वेश्या-व्यवसाय करायला भाग पाडण्याची बिंग तिने उघडकीला आणली. ही गोष्ट ‘डीन कॉर्प’लाच काय, पण अमेरिकन परराष्ट्र खात्यालाही परवडण्याजोगी नव्हती. परिणामी लवकरच तिची पदावनती करून तिला कामावरून काढून टाकलं गेलं. पुढे जिवाला धोका उत्पन्न झाल्यामुळे कॅथरिनने बोस्निया सोडलं आणि ती मायदेशी- अमेरिकेला परतली. पण मुळात एक धडाडीची पोलीस अधिकारी असलेल्या कॅथरिनने आपल्या शोधाचे सर्व पुरावे जपून ठेवले होते. त्याच्या भक्कम आधारावर तिने ‘डीन कॉर्प’ कंपनी विरुद्ध खटला दाखल केला आणि तो जिंकला. ‘डीन कॉर्प’ कंपनीची काळी कृत्यं उजेडात आणण्यात ती यशस्वी झाली. ‘द व्हिसल ब्लोअर’ या मूळ इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. मुळात या पुस्तकाच्या कथनाचा आवाका मोठा आहे. त्याला वस्तुस्थितीतील राजकीय संदर्भ आहेत. त्यामुळे अनुवादाचं काम कौशल्याचं होतं. ते ठीक झालं आहे. परंतु काही वेळा शैली बोजड वाटते. ती अधिक सहज असायला हवी होती असं जाणवतं. एरवी बातम्या ऐकताना ज्यांची नावं आपल्या कानावर पडली तरी आपण ज्यांची फारशी दखल घेत नाही, अशा देशांपैकी एका देशातील घडामोडी मराठी वाचकांपर्यंत आवर्जून पोहोचवण्याचं श्रेय या पुस्तकाला द्यावंच लागेल. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
Darshan Jadhav

आज रणजित देसाई यांनी लिहलेली राधेय कादंबरी वाचून पूर्ण झाली. आयुष्यात कोणती कादंबरी आवडली असेल तर ती राधेय. धर्म आणि अधर्म यांच्या कात्रीत सापडलेला कर्ण वाचायला मिळाला.मैत्रीसाठी मृत्यूलाही तळहातावर ठेवणारा, दुर्योधनासारख्या बलाढय मित्राला जो अधर्माचया बाजूने असतांना सुद्धा शेवटपर्यंत तुझ्या सोबत राहीन अस वचन देणारा, कोणताही विचार न करता कवचकुंडले काढून देणारा, मृत्यूच कोणतंही भय न बाळगणारा.. मृत्यूलाही मिठी मारणारा. नेहमी वचनबद्ध असणारा.. ३३ कोटी देवांना सुद्धा ज्याचा अभिमान, सुर्यासारखं प्रखर तेज, आपल्या दातृत्वान समस्त देवसभा ज्याचा आदर करायचे असा तो महारथी कर्ण.बालपणापासून ज्याचा सुतपुत्र म्हणून उल्लेख झाला.सतत अपमान, पितामह भीष्म विदुर ,श्रीकृष्ण यांना त्याच सत्य माहीत असून देखील हा कौतेय शेवटपर्यंत सुतपुत्रच राहिला. युद्धात माता कुंतीला दिलेल्या वचनानुसार आपल्या पाचही भावंडांना अभय देणारा तो जेष्ठ कौतेय. युद्धाच्या शेवटी चिखलात रुतलेल्या रथाच चाक काढण्यात उतरलेल्या कर्णाला कृष्णाच्या कुटणीतीची आठवण जागोजागी झाली.आपल्या तीक्ष्ण बाणांनी घायाळ केलेल्या आपल्या अर्जुनाला बघून माता कुंतीला दिलेलं वचन आठवलं .. आणि मग मनात आलं माते तुला तुझी पाच मुलंच मिळतील. सहावा कधी पाचवा होणार नाही.. संतापाने उठलेल्या अर्जुनाने धनुष्याची प्रत्यंचा खेचली. अर्जुनाचा नेम चुकू नये म्हणून कर्णाने आपली रुंद छाती कलती केली. खर तर कर्णाचा वध कधी झालाच नव्हता. कर्णाने ते दिलेलं दान होत..शेवट हा अश्रू टिपणारा होता. शेवटपर्यंत मित्रता आणि वचनबद्द असणाऱ्या या दानविराला, अंगराज कर्ण, कुरु साम्राज्याच्या सेनापतीला, जेष्ठ कौतेय, राधेय कर्णाला ही प्रस्तावना समर्पित ..... -दर्शन जाधव ...Read more

Vijay Bhadane

पुस्तक परिचय पुस्तक :- वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा लेखक ;- आर के नारायण अनुवाद:- नंदिनी देशमुख आर के लक्ष्मणांच्या प्रभावशाली कथा ! "मालगुडी डेज" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे विख्यात कथालेखक आर के लक्ष्मण यांच्या "Under The Banyan Tee And Other Stories" या इंग्रजी पुस्तकाचा नंदिनी देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद "वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा हे पुस्तक वाचनात आले.28 कथांचा हा संग्रह वाचताना वाचक झपाटून जातो.आर के लक्ष्मण हे वेगळ्या धर्तीचे लेखक होते.आयुष्याच्या पूर्वार्धात रमताराम होउन ते इतस्ततः खुप भटकले. नदी,तलाव,बाजार,डोंगर दऱ्या,गर्दीची ठिकाणे इथे ते माणसांचे निरीक्षण करत.त्यांचे संवाद ऐकत,देवघेवीचे व्यवहार बघत. तिथे त्यांना कथासूत्र सापडे.म्हणून अनुभवाची विपुलता,समृद्धता त्यांच्या लिखाणात ठायी ठायी दृष्टीस पडते.साधीसरळ,संवादत्मक भाषाशैली,लयबद्धता यामुळेच त्यांच्या कथा मोहक,उत्कंठावर्धक,कसदार ठरतात. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतात.परिस्थितीने पिचलेली तरी तीच्याशी नेटाने संघर्ष करीत जगणारी,भोळीभाबडी दयाळू व सर्वच वर्गातील आहे.लेखकाला मनमुराद भटकंतीत,सहज निरिक्षणातुन आपले कथानायक,पात्रे व कथाबीज सापडतात. प्रस्तुत पुस्तक" वडाच्या झाडाखाली" याच्या अनुवादक नंदिनी देशमुख यांनी खुप मेहनत घेउन वाचकाहाती मौल्यवान कथासंग्रह सुपूर्द केला आहे. अनुवाद करताना आर.कें च्या भाषेच ओघवतेपण जपुन दाक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. उत्तम अनुवादीका ही ओळख निर्माण केली आहे. या साऱ्याच कथामध्ये विषयातील वैविध्य,हलकेफुलकेपणा, विनोद,गांभीर्य असे वैशिष्ट्य आढळते.नित्या ही पहिलीच कथा आधुनिकता व पारंपारिकता या दोन विचारसरणींचा संघर्ष दर्शविते.आपल्या जुन्या तत्वावर श्रध्दा, विश्वास असलेले नित्याचे आईवडील मुलाच्या सुधारित विचारांशी टक्कर देता देता मेटाकुटीला येतात त्यांची बाजू घ्यावी तर हे असे का? त्याला काही पुरावा आहे का? असे तर्कशुद्ध बोलणारा नित्याही वाचकांची मने जिंकून घेतो.दोन पिढ्यातील विचारमूल्यांचा संघर्ष लेखकाने छान रंगविला आहे. अर्ध्या रुपयांची किंमत या कथेत शोषक व शोषित,लोभी व गरजु या दोन प्रवृत्तीच दर्शन घडते.तांदळाचा अमाप साठा करून ठेवलेला,पैसे ठेवण्यास जागा नसलेला सुबय्या हा तांदळाचा व्यापारी तांदुळा अभावी भुकेने तडफडत असलेल्या एका गरिबाला केवळ अर्धा रुपया चे तांदूळ नाखुषीनेच देत असताना गोडाऊन मध्ये तांदुळाची थप्पी अंगावर पडून मरून पडतो शेवटी करावे तसे भरावे लागते हे लेखकाने या कथेत दाखविले आहे.अशा कितीतरीं मनाच्या ठाव घेणाऱ्या कथा या संग्रहात आहे शेवटची शीर्षक कथा या कथासंग्रहाची कळसाध्याय ठरावी अशी आहे.नंबी या वरदानप्राप्त व्यक्तीला वार्धक्यात मात्र गावकऱ्यांना गोष्टी सांगता येत नाही.एकाकी ती शक्ती नाहीशी होते.लेखकाला त्यामधून हेच सुचवायचे आहे की कुठल्याही प्रथितयश कलावंतांला कुठे थांबावे याचे तारतम्य,भान हवे अन्यथा इतर कोणी त्यास थांब म्हणतील हे खुप वाईट ठरेल ! विजय रघुनाथ भदाणे 686 रविवार पेठ नाशिक 9552213340 ...Read more