* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE WOMANS SOUL
  • Availability : Available
  • Translators : SHYAMALA GHARPURE
  • ISBN : 9788177668018
  • Edition : 7
  • Publishing Year : MARCH 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS LATEST COLLECTION OF STORIES CELEBRATES THE SHARED EXPERIENCES OF BEING A WOMAN IN A 101 NEW WAYS. YOU WILL BE MOVED BY THESE TRUE ACCOUNTS OF HOW WOMEN LIKE YOU HAVE EMBRACED LIFE`S DEFINING MOMENTS BY FINDING LOVE, DEALING WITH LOSS, OVERCOMING OBSTACLES AND ACHIEVING THEIR DREAMS AND GOALS. LIKE SPENDING TIME WITH A TRUSTED FRIEND, A SECOND CHICKEN SOUP FOR THE WOMAN`S SOUL WILL PUT DIFFICULT TIMES INTO PERSPECTIVE, RENEW YOUR FAITH IN YOURSELF AND MAKE YOU AWARE OF THE MIRACLES IN YOUR OWN LIFE.
स्त्रीची व्याख्या अनेक प्रकारांनी करता येईल. विद्यार्थिनी, कन्या, मैत्रीण, पत्नी, आई, गृहिणी, व्यावसायी! प्रत्येक रूप हे खास व अलौकिक असे असते. तरी त्यांतही एक असा सामान्य धागा असतो. तो प्रत्येकीच्या स्वभावात असतो. प्रेमाचे बंध हळुवारपणे जपणारी, आजीवन मैत्री किंवा नाते निभावणारी, निवडलेल्या क्षेत्रांशी बांधिलकी घट्ट करणारी ही स्त्री! कौटुंबिक जीवनात फुलोरा फुलवणारी, त्याचबरोबर सामाजिक जीवनही सुसह्य करणारी! ‘NEW YORK TIMES’च्या ‘CHICKEN SOUP FOR THE SOUL’ ह्या मालिकेत वेगवेगळ्या शीर्षकांखाली भावभावनांचे खास मिश्रण आहे! या पुस्तकामध्ये स्त्रीशी निगडित असलेल्या साऱ्या गुणवैशिष्ट्यांचे मार्मिक चित्रण आढळते. स्त्रीच्या आत्म्याची मंगलता व सौंदर्य इथे प्रगट होते! व्यावसायिक असो की गृहिणी, बालिकेपासून वृद्ध स्त्रीपर्यंत सगळ्यांना हे अनुभव भावतील. ह्यातून त्यांना स्फुर्ती, आनंद मिळेल. इतकेच नव्हे; तर स्वत:चीही ओळख होऊ शकेल. ह्या अनुभवांची सोबत दीर्घकालपर्यंत स्त्रियांना मिळू शकेल.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SHYAMALGHARPURE
Customer Reviews
  • Rating StarSanjay Umbre

    कधीही हे पुस्तक घ्यावं कोणतही पान उघडावं अनं वाचायला घ्यावं... प्रत्येक पान आपल्या मनोवृत्तीशी एकरुप होणारे माझ्याकडे १ते ११ सर्व भाग आहेत दोन वेळा घेतले मित्रांना भेट म्हणुन दिले आता तिसर्‍यांदा आणलेत नेहमी सग्रही असावेच असा संच

  • Rating StarManoj Mohale

    मी खुप वेळा लायब्ररी मध्ये हे पुस्तक पाहिलं,चिकन सूप अस वाचलं..आणि न पाहता हा विचार केला कि असेल हे पुस्तक खा च वगरे म्हणजे पाक कला याच बर का 😋..मी एक दिवस नीट वाचलं कुठे तरी कि चिकन सूप ची सिरीज खूप चागली आहे म्हणून मग योग आला पुस्तक घ्याचा..घेतलं ा.खर तर मी हे माझ्या आई साठी आणलं होतं.मी एक दिवस सहज वाचलं तर मला खुप आवडलं मग माझं वाचनाच पुस्तक बाजूला ठेऊन हेच वाचलं आणि पूर्ण केलं..स्त्री जीवनावर आधारित छोट्या पण प्रेरणादायी कथा.स्त्रीयाचे अनुभव यात मांडले आहते यात खुप छान छान अनुभव सांगितले.यातुन भरपूर शिकण्या सारख आहे..शेवटी वाचाल तर वाचाल..🙏😊... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more