* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: HUNKAR
 • Availability : Available
 • ISBN : 9788177665796
 • Edition : 16
 • Publishing Year : MARCH 1997
 • Weight : 130.00 gms
 • Pages : 160
 • Language : MARATHI
 • Category : SHORT STORIES
 • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
A PERFECT GRAPH OF THE ADDITIONS AND SUBTRACTIONS OF THE YOUNG MINDS. YOUTH; THE PERIOD OF EXTREME EXUBERANCE. THE PERIOD TO LOVE, TO LOSE IN LOVE, TO DO ANYTHING IN LOVE. THE PERIOD TO ADMIT OUR SILLY MISTAKES, OUR FIASCO, TO WITNESS OTHER`S LOVE FROM A DISTANCE. BUT SOMETIMES, WE GET HURT AT THE CORE OF OUR HEART. THEN IT BECOMES DIFFICULT TO FORGET AND MORE DIFFICULT TO ACCEPT OUR FAULTS. SOMETIMES WE HAVE TO SHOW COURAGE AND FACE THE FACTS OF LIFE, THEN WE HIDE OUR EMBARRASSMENTS IN SOME SECRET CORNER OF LIFE AND START LEADING TO CREATE A PICTURE OF NORMAL LIFE BUT SOMETIMES WE JUST CANNOT COME OUT OF IT. SOME HAVE THE ABILITY TO CARRY ON AS IF NOTHING HAS HAPPENED, SOME GO ALONG WITH THE TIDE AND ACCEPT LIFE AS IT IS, MAKING IT MORE HAPPY FOR THEMSELVES AND EVERYBODY, BUT SOME FOLLOW THE WRONG PATHS TO GAIN HAPPINESS, DECEIVING THEMSELVES. THE STORIES HERE HAVE MANY SHADES OF LOVE. SOME HAVE VIGOR AND VITALITY, SOME ARE FULL OF PAIN AND AGONY; SOME ARE BASED ON FACTS AND SOME ON FAILURE; SOME RECOGNIZE THE NEED TO ADJUST AND COMPROMISE; SOME HAVE THE POTENTIALS OF TENDERNESS AND AFFECTION; SOME ARE HASTY, SOME ARE NASTY. THEY SOMETIMES WILL MAKE US SMILE, AND SOMETIMES WILL WET OUR EYES; SOMETIMES THEY WILL REVEAL ONLY THE TRUTH AND SOMETIMES THEY WILL PUT OUR MINDS IN CONFUSION.
‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीजवजाबाकीचा आलेखच! तारुण्य आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसयाची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाया, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाया, तर कधी सरळ सत्याला भिडणाया अशा या कथा आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
 • Rating StarParth Bhendekar

  हुंकार वपु ! मराठी वाचन संस्कृतीतील क्वचितच लोक असतील ज्यांना हे नाव माहित नाही. हुंकार हा कथासंग्रह मी वाचलेलं वपुचं तिसरं पुस्तक ! वपुंच्या व्यक्तीमत्तवाचे अनेक पैलु आपल्याला दिसतात एक उत्कृष्ट कथाकार , तत्तवज्ञ , विचारवंत हे त्यातलच काही. असो वपुंसारख्या सागराचं वर्णन मी काय करावं तर मी येतो मुद्द्यावर अर्थात हुंकारवर ! वपुंच्या कथा कधी वाचकाला हसवतात कधी रडवतात तर कधी वाचकांशी तासनतास नुसतं हितगुज करतात, बोलत राहतात. प्रत्येक कथा वाचल्यानंतर विचार केला नाही तर कथा समजणे आणि त्यातील संदेश घेणे थोडं अवघडच ! मी हुंकार हा कथासंग्रह चार दिवसापूर्वीच वाचून वेगळा केला. काय तो अनुभव ! एक वेगळचं जग वपुंच्या कथांमधून अनुभवायला मिळतं. 17 कथांचा हा संग्रह आपल्या प्रत्येक कथेत काहीतरी वेगळेपणा देऊन जातो. यातील पहिलीच कथा हुंकार. ही कथा म्हणजे पुढच्या मेजवानीचे ट्रेलर म्हणायला हरकत नाही. लग्नाआधीचं प्रेम आपल्याला परत भेटतं त्या प्रसंगाची ही गोष्ट. यातील एक वाक्य मला फार आवडतं "सुगंधात आणि स्वप्नात फार साम्य आहे दोघांचीही शेवटी राख होते " त्यानंतरची कथा "चक्रम" थोडी मजेशीर थोडी विचार करायला लावणारी ही कथा. हुंकारमध्ये फक्त वैचिरिक किंवा प्रासंगीक कथा आहेत असचं नाही बरं ! विचारांमार्फत विनोद पोहचवून आपल्याला हसवणं हेच वपुचं मोठं कौशल्य. संग्रहातील "मांजर" आणि "बुमरँग" या कथा वाचल्यावर याची अनुभुतीही आपल्याला येतेच. "शिकार" ही कथा प्रेमयुगल आपल्या लग्नासाठी काय काय शक्कल चढवतात ते दिसते आणि त्याचा जो मजेशीर शेवट होतो तो मात्र वाखाणण्याजोगा आहे. पण त्याच पुढील "पोरकी" ही कथा मात्र डोळ्यात पाणी आणते. मन अधिक संवेदनशील होतं आणि तो प्रसंग आपल्याच डोळ्यांसमोर उभा राहतो. तरुणांसाठी संपूर्ण कथासंग्रहच खूप मार्गदर्शक ठरतो पण यातील "सोनाराने कान टोचले दुसर्‍यांदा" आणि "निर्णय" या दोन्ही कथा आपल्या तरुण वयातील अनेक चूका आणि नैतिकता याबद्दल उपदेश करतात. "हाॅलिडे स्पेशल" ही कथा मला विशेष आवडते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही एक प्रेमकथा वाटते आणि शेवटी कथा अशी काही कलाटणी घेते की वाचक हसल्यावाचून राहात नाही. "कैफियत" आणि "रिकामी खुर्ची" या कथा मात्र आपल्याला फार विचार करायला लावतात. हे झालं कथांबद्दल माझं मत पण या कथांमधून घेण्यासारखं भरपूर आहे जे इथं सांगणं म्हणजे हुंकारचा एक वाचक कमी करण्यासारखं होईल. तेव्हा हुंकार तुम्हीही वाचा मला ज्या गोष्टी कळाल्या त्यापेक्षा काही वेगळ्या तुम्हाला कथा शकतात. त्या तुम्ही मला सांगा मला कळालेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. असचं पुढे जाऊन कारण आपल्याला ही वाचनसंस्कृती पुढे चालवायचीये !😊😊 ...Read more

 • Rating StarOnkar Ingawale

  सर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.

 • Rating StarAALOCHANA - DEC, 1965

  श्री. काळे यांच्या या संग्रहातील कथांचे विषय बालबोध रीतीने सांगता येणार नाहीत. तसेच त्यांतील माणसे व प्रसंग यांना ‘लेबले’ ही लावता येणार नाहीत. म्हणूनच त्या खऱ्याखुऱ्या जिवंत आणि नवीन कथा आहेत. तसे पाहीले तर या कथांना आधारभूत असलेल्या वस्तुनिष्ठ जीवनर्शनात नवे किंवा अपूर्वाईचे काही नाही. त्या त्या जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोनही अ-पारंपारिक आहे असे नाही. पण प्रत्येक जीवनप्रसंग व त्यांत वावरणारी व्यक्ती यांचे जे जीवनास्पंदन काळ्यांनी शब्दांत पकडले आहे ते हुरहूर लावणारे व पीळदार आहे. ही हुरहूर व पीळ यांच्या प्रसंगचित्रणांतून नाजुक भावबंध प्रवाहीत झाले आहेत. या भावबंधात रूजू पण धारदार व्यक्तिदर्शन हे या कथांचे धन. यातल्या सर्वच कथा निर्दोष आहेत. असे नाही पण पण या कथांचे हे धन संगति-विरोधाचे धारदार दर्शन देऊन जाते. ...Read more

 • Rating StarDAINIK MARATHA 22-8-1965

  वाचकांना रिझवू शकणारा... वसंत पुरुषोत्तम काळे यांनी आजकाल अनेक प्रकारच्या अनेक कथा लिहील्या आहेत. विनोदी तशाच गंभीर. पोरकट तशाच प्रौढ. कधी वेगवान घटनांवर उभारलेल्या तर कधी शुद्ध व्यक्तिदर्शनात्मक. अनपेक्षित कलाटणी त्यांच्या कथेचे एकेकाळचे वैशिष्ट्य जही शिल्लक उरलेले दिसते. त्याउलट त्यांची कथा आज सहजपणे विकसित होत जाऊन ठरीव ठशाचे शेवट टाळतानाही आढळते. त्यांच्या कथेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्यांतून सतत जाणवणारा माणसाला समजावून घेण्याचा आणि समजावून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. ‘हुंकार’ ह्या त्यांच्या ताज्या कथासंग्रहांतल्या बहुतेक कथांतून लेखकाच्या मनांत वसत असलेल्या अपार सहानुभूतीच्या छडा गडदपणे पसरलेल्या आढळतात. मानवी व्यथेमुळे आणि अगतिकतेमुळे लेखकाचे काळीज पिळवटून गेल्याचे जाणवते. आणि दु:खामुळे वाटलेले दु:ख वाचकापर्यंत पोचवण्याची त्याची धडपडही जाणवते. हा दु:खाचा छोट नेहमीच आवगाने वाचकापर्यंत कोसळत येतोच असे नाही. तरीपण ‘स्वर’, कैफ’, ‘सत्कार’ किंवा ‘तो माझी वाट पाहत असेल’ ह्यासारख्या कथांतून वाचकाला व्यथित करून तोडण्याची ताकदही जाणवते. ‘हुंकार’ ह्या कथासग्रहांतल्या बहुतेक कथा वाङ्मयीन गुणांनी समृद्ध आहेत. कथेचा घाट, तिचे निवेदन, तिच्यातील व्यक्ती उभ्या करण्याचे कसब, घटना रंगवण्याची हातोटी इत्यादि बाबतीत लेखकाच्या लेखणीतला सफाईदारपणा आणि सरावाने सहज मिळत गेलेले तंत्रावरचे प्रभुत्व ह्यामुळे त्याच्या कथा नित्य वाचनीयच उतरतात. परंतु त्याहीपुढे जाऊन एखादी मोठी झेप लेखक घेऊ शकेल काय असा विचार केल्यास ‘स्वर’सारख्या एखाद्या विलक्षण हृदयस्पर्शी कथेतून दिलासाही मिळतो. ‘स्वर’ ही लेखकाची कथा खरोखरीच अविस्मरणीय आहे. जिला रूप नाही पण स्वर आहे अशा एका टेलिफोन ऑपरेटरचे व्यक्तिचित्र लेखकाने कमालीच्या कलात्मकतेने घडवले आहे. तिच्या कुरूपपणाबद्दल खोटे उमाळे कुठेच नाहीत. त्या व्यंगासकट तिने आपल्या आयुष्याचा हीशोब एका चमत्कारीक थंडपणे आखलेला असतो. जे प्रेम ती मिळवते ते कायम मिळत राहील अशी अपेक्षा तिला नसतेच. त्याचे स्पष्टrकरणही ती अत्यंत विचारीपणे आणि समतोलपणे करते. ‘‘माझ लग्न नक्की होणार आहे. प्रत्येक स्त्रीला-मग ती कशीही असली तरीही तिला पत्करणारा मिळतोच. पण माझ्यासारख्यांची लग्न होतात ती गरजेपोटी होतात. कुणाच्या तरी स्वप्नातली मूर्ती म्हणून नक्कीच माझा कुठं प्रवेश होणार नाही. कोणीतरी अडलेला पुरुष, एखादा बिजवर किंवा व्यंग असलेला, असा कोणीतरी गरजेपोटी मला पत्करणार. त्यात कसला कैफ? माझ्यासारखी मुलगी देखील त्याला वेडंपिसं करू शकत होती, त्यातच नाही का सगळं आलं?’ ह्या मुलीने जे मिळवले आणि ते गमावले त्याबद्दलचे दु:खही तिने विचारपूर्वक आतल्याआत दडपून टाकले. लेखकाने लिहीलेली ही कुरूप मुलीची गोष्ट त्याच्याजवळ असलेली व कल्पकतेनं वापरल्यास तीव्र परिणाम करू शकणारी मनोविश्लेषणाची शक्ती दर्शवते. कथा लिहीताना लेखकाने सांभाळलेला संयम, समतोलपणा व गहीवराचा अभाव वाखाणण्याजोगा आहे. इतरत्र आलेल्या काही व्यक्तीही अशाच काळजाचा ठाव घेऊन जातात. ‘तक्षक’ कथेतला अध:पाताचा प्रवर्तक कांता, ‘निरोप’ मधील पत्नीच्या व्यभिचाराने दु:खवल्यामुळे स्त्रियाकडे विकृतपणे पाहणारा गजा, ‘कैफ’ मधले भीषण धाडसांच्या कैफांत जगणारे विजूचे वडील, ‘पहीली खेप’मधले नाइलाजाने निर्दय बनलेले घाटे, ‘सत्कार’मधले कुणालाच नको असलेले पण पत्नीने सांभाळलेले केशवराव ह्या अशा अनेक व्यक्ती दैवाच्या अटळ प्रहाराखाली झोडपल्या गेल्या आहेत, आपल्या जीवनाची शोकांतिका टाळणे त्यांच्या हातात उरलेले नाही. ‘तो माझी वाट पाहत असेल’ ही लेखकाची एक वेगळ्याच तंत्राची कथा आहे. एखाद्या दडपणाखाली झपाटलेल्या मनोवृत्तींतून निर्माण झालेली. तिच्यात एक भेसूर अंधार आहे. आत्महत्या करावयास जाणाऱ्या माणसांकडे त्यांच्या वस्तु मागायला खाणारा ‘तो’ लोकविलक्षण खरा!’ ‘हुंकार’ ह्या कथेत एकांकिकेचे तंत्र चांगले वापरले आहे. प्रेमाची व्यथा हा तिचा विषय. तो लेखकाने उत्कटपणे, तन्मयतेने रंगवला आहे. ‘हुंकार’ ह्या कथासंग्रहांतल्या कथा विविध प्रकृतीच्या आहेत. त्यांच्यांत रुचिवैचित्र्य आहे. लेखकाच्या लेखनाचे रंग जमत आल्याची साक्ष आहे. कथा हेतूकडे आणि कथावस्तूकडे लेखकाच्या मनोवृत्तीचे झाडून अधिक केंद्रीकरण होत गेले- जे स्वर ह्या कथेत अचूक व अजोडपणे जमले आहेत तर लेखक मराठी कथेच्या क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्याचा ठसा निश्चितपणे ठेवू शकेल. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more