* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ADNEYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982770
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPTEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A JOURNEY OF 6 PEOPLE, ALL FROM DIFFERENT PLACES BOUND TOGETHER WITH A DREAM IN THEIR EYES, SET OUT TOGETHER TO FIND OUT THE PLACE WHERE THEIR DREAM WOULD COME TRUE DHARINI, SAKHI, CHETAN, KANCHAN, NAKUL AND ABHIMANYU. THEY DID NOT KNOW EACH OTHER UNTIL THEY SET OUT FOR THIS JOURNEY IN A BOAT. ABHIMANYU BECAME THEIR GUIDE DURING THIS JOURNEY. THEY WERE LEAST AWARE OF WHAT THEY WANTED OR WHERE WOULD THEY GO ON LIKE THIS, BUT FAITH MADE IT SIMPLE FOR THEM. WITHOUT HESITATION, THEY CONTINUED THEIR JOURNEY, ONE STEP AFTER OTHER. IT WAS SAKHI WHO FOUND HER DESTINATION FIRST. SHE MET HER PRINCE CHARMING ON THE WAY. KANCHAN, FINDS HIS PARIS, THE PHILOSOPHER’S STONE WHILE CHETAN FINDS THE TRUE COLOURS OF LIFE. DHARINI AND NUKUL FIND SOLACE IN EACH OTHER’S COMPANY. AT THE END, ABHIMANYU REALIZES THAT HE WAS THE GUIDE BUT HIS DESTINATION WAS BLISS THAT WAS AT THE END OF THE JOURNEY. A WONDERFUL FORMAT OF LITERARY WORK LEAVES YOU THINKING ABOUT THE JOURNEY OF LIFE, THE THINGS WHICH WE REALLY CRAVE FOR, THE DESIRE THAT WE HAVE IN OUR MINDS FOR THE THINGS AROUND US AND EVERY SUCH THING THAT WE HAVE IN OUR MINDS BUT HAVE NEVER GIVEN IT ANY SERIOUS THOUGHT UNTIL TODAY. A MUST TO READ AND LATER TO RETROSPECT
‘‘तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?’’ आदिवासी ‘‘मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती.’’ चेतन ‘‘प्रतिकृती कोणाची?’’ आदिवासी ‘‘माणसांची.’’ चेतन ‘‘माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो. झाडात जीव असतो. ती पुन:पुन्हा उगवतात. तुमचे धातूचे देव असे पुन:पुन्हा उगवतात का? किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार राहते. मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं; झाडं, किडे, प्राणी! कारण माती मूर्तिरूपात असताना आपण श्रद्धा पेरलेली असते. धातू तर साधा ध्वनी स्वीकारू शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो. तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNEYA #ADNEYA #अज्ञेय #FICTION #MARATHI #REKHABAIJAL #रेखाबैजल "
Customer Reviews
  • Rating StarPanchdhara Magazine July-Dec.17

    लेखनातील सातत्य अन् बरोबरीने वाचकप्रियता टिकविणे हे तसे सेपे काम नसते. रेखा बैजल यांच्या लेखनाने मात्र ते साधले आहे. आतापर्यंत कादंबरी, कथा, नाटके, एकांकिका, ललित असे बहुविध साहित्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत यशस्वीरित्या. अनेक पुरस्कार, मानसन्मान देील त्यांना लाभले आहेत. यातच ज्याला मानाचा शिरपेच म्हणता येईल अशी अज्ञेय ही साधारण शंभर पानी लघुकादंबरी मेहता पब्लिशिंगतर्पेâ प्रसिद्ध झाली आहे. अनेक अर्थांनी हे लेखन आगळेवेगळे आहे. हे एक अतिसुंदर रुपक आहे. लेखिकेनेच म्हटल्याप्रमाणे एखाद्या सार्वत्रिक, विश्वव्यापी विचार मांडायचा तर रुपक शैली उपयोगाची ठरते. इथे व्यक्ती, काळ, स्थळ त्याच्या मर्यादा ओलांडून लेखनस्वातंत्र्य घेता येते. हा एक मुक्तविहार असतो, अज्ञेयाच्या प्रवासाचा. खरं तर हे लेखन म्हणजे एक सुंदर प्रवासच आहे. कल्प प्रदेशाचा प्रवास. एका वाटाड्यासह अभिमन्यूसह इथे सहा प्रवासी आहेत. त्यातले पाच ज्ञात. एक अज्ञात. रुपक बंधात वि.स. खांडेकरांनी लिहिलंय फार पूर्वी. गंगाधर गाडगीळांची बिनचेहेNयाची संध्याकाळ पटकन आठवते या संदर्भात. गूढ, अगम्याचा शब्दप्रवास सहज घडविणाNया जी.ए. कुलकर्णी यांच्या रुपक कथाही आठवतात. या शिवाय मला आठवण झाली ती ग्रेस यांच्या कवितेची. कवितेची म्हणू की महाकाव्याची? पण रेखा बैजल यांचे प्रस्तुत लिखाण वाचताना या थोर प्रतिभावंताचे स्मरण व्हावे यातच त्यांच्या लेखनाचा गौरसव आहे, असे प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. खरे तर या लिखाणाला कादंबरी म्हणावे की, आणखीच काही हा देखील साहित्यिक समीक्षेच्या क्षेत्रात वादाचा, चर्चेचा विषय ठरू शकतो. पण आपण त्या वादात पडू या नको..... ज्यांना थोडे ‘हटके’ वाचायची ऊर्मी येते अधूनमधून त्यांनी वाचायलाच हवे असे हे लेखन आहे. हे एक तत्त्वचिंतक रसाळ प्रवचन आहे. प्रवचनात विंâवा कीर्तनात दाखले असतात. रूप (क), रंग असतात. विचार असतो, अनुभव असतो, विवेचन असते. इथेही हे सारे काही एकवटले आहे. सुंदररित्या परस्परात गुंफले गेले आहे. अभिमन्यू, चेतन, कांचन, नकुल, धारिणी यांचा हा अज्ञात प्रदेशाचा प्रवास एका वास्तव, न्याय-अन्याय, नीती-अनीती, सत्य-असत्य अन् ऋ़तू अशा तात्त्विक परिभाषांच्या विश्लेषणातून हे लेखन आपल्यापुढे अवकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य रेखाटतं. इंद्रधनुष्याच्या सातही रंगांची नांव आपल्याला माहिती असतात. वर्णपटलातील त्या रंगांचा क्रमदेखील आपल्याला अचंबित करते, संभ्रमित करते. माणूस अन् निसर्गातले वाढते अंतर, आपल्यातल्या चंगळवादातून अंकुरलेला भोगवाद, नैतिकतेविषयी बदललेल्या संकल्पना, कीर्ती, अहंभाव या मोहजालाची आपल्या शरीराभवतीची पकड, आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवरचे उंचसखल खाचखळगे या या साNया धवलकृष्ण पाश्र्वभूमीवर आयुष्याला रंगीत, सुगंधित करण्याची माणसाची केविलवाणी धडपड सहा प्रवासांची ही प्रवाही कथा प्रत्येक पानावर एक नवा धडा शिकवून जाते. आपण सारेच स्वप्न बघतो. आपण कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या कांचनमृगाचा ध्याय घेतो. स्पर्धेच्या जाळ्यात अडकतो. मोहपाशात गुंतत जातो. विवेक-अविवेकाच्या हिंदोळ्यांवर झुलत कधी, वर आकाशात तर कधी धरणीवर असे हिंदकळत राहतो. खरं काय खोटं काय या प्रश्नांची उत्तरं शोध घेऊनही मिळत नाहीत. मग आपले आपणच ठरवत जातो चांगले-वाईट. आपणच आपला न्यायदेखील करत जातो. स्वतःच स्वतःला शाबासकी देऊन टाकतो. लेखिकेचं हे तिला सर्वाधिक आवडलेलं लिखाण असल्याचं त्यांनी सुरुवातीला म्हटलयं. ते सार्थ आहे. कारण लेखिकेची प्राजंळ, स्फटिकासारखी पारदर्शी अन् प्रतिभेची उत्कट परिसस्पर्श लाभलेली तत्त्वचिंतक भूमिका पानोपानी अनुभवता येते. लेखन अल्पाक्षरी असल्याने हे चिंतन बोजड होत नाही हे महत्त्वाचे. त्यातले ललित्य टिवूâन राहते-शेवटपर्यंत! या कल्प प्रदेशाच्या प्रवासात जीवन अन् निसर्ग हे हातात हात घालून आपल्याबरोबर वाटचाल करतात. नैसर्गिक शक्ती कुठल्यातरी असामान्य शक्तीत आपसूक परिवर्तित होत जाते आपल्या नकळत. आपल्या विचारांच्या परिघाची त्रिज्यादेखील आपसुक वाढत जाते. रबर ताणलं की लांबी वाढते तशी. पण तरीही ताण कुठे जाणवत नाही. इच्छांचं कक्षा ओलांडून स्वप्नांचं रूप धारण करणं बघताना हरखून जायला होतं. चेतनच्या चित्रातले रंग असोत की बासरीवाल्याच्या वेणुतले सप्तसूर. रंग, गंध, स्वर, ताल, शब्द, काव्य या प्रतिभेच्या, कलेच्या छटा आयुष्याच्या विविधांगांना लपेटून एक अद्भू नवा, सृजनात्मक कलाविष्कार घडवून वाचकाला अचंबित करतात. इथे फक्त नीती, सत्य, पावित्र्य, चांगलेपण, विवेक याचाच बोलबाला नाही. इथे धारिणीच्या माध्यमातून स्खलनदेखील आहे. मुळातच माणूस स्खलनशील आहे. चुका करणं हा आपला धर्म आहे. असं वचन आहे. धारिणी इतरांना ऊब देण्यासाठी स्वतःच्या शरीराचं वस्र त्यांना पांघरते. त्यातून ती गर्भ धारण करते. या गर्भाचा नेमका पिता कोण हा प्रश्न पडतो. पण तो इथे चुटकीसरशी सोडवला जातो. ज्याने संगच केला नाही, ते फक्त प्रेम असा नकुल पितृत्त्व स्वीकारतो. शारीरिक गरजांवर शाश्वत प्रेमभावना (इथे प्लेटो आठवतो प्लेटॉनिक लव्ह ही संज्ञा आठवते) मात करून जाते. या प्रवाशांबरोबर वाचकदेखील एका उंच कड्यावर जाऊन मोकळा श्वास घेतो शुद्ध हवेत! आपल्या अवतीभवतीच्या शकडो, हजारो, लाखो माणसांचं प्रतिनिधित्व करणारे हे पाच प्रवासी एकेका चक्रव्यूहातून आपली अलवार सुटका करीत जातात. अभिमन्यू ते की आपण हेही कळत नाही. तशी प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत एक असते. पण कुवत मात्र सारखी नसते. त्या त्या वेळच्या भावना आपल्या कृतीला वेगवेगळ्या दिशा देतात. हा नव्या दिशेचा शोध आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जाणीवा जागवणारा, चैतन्य पुâलविणारा. कारण वेगवेगळ्या कारणाने आपल्या शरीरावर, विचारांवर, प्रतिभेवर चेतनेवर राख पसरत जातो. त्यामुळे आतली उष्णतेची धग असूनही नसल्यासारखी वाटते. अभिमन्यू ही राख बाजूला सारण्याचे, पुंâकर मारून निखारे पेटविण्याचे काम करतो. जंगलात अस्वल मारल्यावर ध्यानात येतं तर गर्भार, पोटुशी अस्वलीण होती. इथे धरिणीतलं ममत्व पाझरतं. धारिणी धरिणी होते. तिच्या मातृत्वाचा नैसर्गिक पान्हा पाझरतो. मोठ्या कष्टानं अस्वलिणीच्या पिलाचा जन्म होतो. आई शेवटी एकच असते. प्राण्यातली, पक्ष्यातली, माणसातली! मातृत्व हे फक्त शरीराशी संबंधित नसतं. ते मनाशी, अंतरंगाशी संबंधित असतं. संग, गर्भधारणा, पालनपोषण, जीवन अन् शेवटी मरण या नैसर्गिक पायNया.. हा एकसंध प्रवास जे निसर्गात, जे चार पायांच्या प्राण्यांत तेच माणसांत पायांच्या संख्येने काही फरक पडत नाही. माणूस हा सारखा काही तरी मिळविण्यासाठी धडपडतो. कीर्ती हवी असते. नाव हवंच असतं. इथे मला अकारण अण्णा हजारे, मेधा पाटकर अन् केजरीवाल यांची आठवण झाली. साNयांचे उद्देश चांगले. पण कीर्तीच्या हव्यासापोटी, नावाच्या प्रसिद्धीच्या मोहापायी चांगल्याचं वांगलं होतं. काही मिळवलं की काय मिळवायचं राहिले ते कळतं. मग ते उरलं सुरलं मिळविण्यासाठी वेगळी धडपड. वेगळी पडझड धडपडीपोटी पडझड आलीच. संन्याशाचं विवेचन उत्तम. आपल्यातल्या प्रत्येकाला दृष्टी असते; पण दृष्टिकोन नसतो. शब्दांच्या या अवघड वाटा लेखिकेनं सहजरित्या ओलांडल्या. पार केल्या. हे एक शिवधनुष्य म्हणायला हवं. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला का कुणास ठाऊक ग्रेसची कविता वाचत असल्यासारखं वाटलं. गूढ अनाकलनीय तरीही मोहून टाकणारं, आनंद देणारं वाचनाचं समाधान देणारं. सत्य दाहक असतं. हादरविणारं असतं. हे सारं वाचताना मनाची पूर्वतयारी हवी. म्हणजे हादरे कमी बसतील. उलट आकाशपाळण्यात उंच उंच झुलण्याचं समाधान लाभेल. रेखा बैजल यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देणारी ही कादंबरी. अज्ञेय प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. पण हे वाचण्यासाठी पेशन्स मात्र हवेत. सर्वांगसुंदर लेखनासाठी, प्रकाशनासाठी लेखिकेचे, प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन. डाॅ.विजय पांढरीपांडे, पंचधारा नियतकालिक ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
साधना साप्ताहिक ३ ऑगस्ट २०२४ ... अशोक राणे

सुनंदा अमरापूरकर यांनी त्यांचं `खुलभर दुधाची कहाणी` हे आत्मकथन पाठवलं तेव्हा `आता हे वाचायचं केव्हा` असा प्रश्न सर्वप्रथम मनाशी आला. देणेकरी दाराशी ठाण मांडून बसावेत तशी अनेक पुस्तकं, कोणी कोणी पाठवलेल्या त्यांच्या फिल्म्स आणि माझे सतराशे साठ व्याप सोर असताना कसा वेळ काढायचा? माझं सबंध आयुष्य सिनेमा, तो आकाराला आणणारे दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा आणि त्यांच्यातला माणूस याचा शोध घेण्यात गेलं. एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते म्हणजे या सर्वांच्या पलीकडे असलेलं, परंतु क्वचितच कळलेलं असं त्यांच्या कुटुंबातल्याच व्यक्तीने वर्णिलेलं अमरापूरकरांचं चरित्र ! सगळी व्यवधानं बाजूला ठेवून सुनंदा अमरापूरकरांचं आत्मकथन वाचायला हे कुतूहल पुरलं. मनोगतातलं पहिलंच वाक्य आहे... `मी या आठवणी का लिहिल्या ?` ...आणि मला चट्‌कन थोर अभिजात अभिनेत्री इंग्रीड बर्गमन हिचं `माय स्टोरी` आठवलं. तिनेही अशीच सुरुवात केलीय. तिची मुलं म्हणाली, `तुझ्या आयुष्याविषयी कुणी तरी तिखटमीठ लावून काहीबाही लिहील, त्याआधी तूच सारं खरं मोकळेपणानं सांगून टाक. तिने जाडजूड ग्रंथात अभिनेत्री म्हणून तिचा सारा प्रवास कसलाही आडपडदा न ठेवता सविस्तर सांगितला. सुनंदाताईंचं पुस्तक आणि त्यातलं हे पहिलं वाक्य वाचताना मला हे का आठवावं? त्यांची पहिली ओळख म्हणजे नाट्य-चित्रसृष्टीतला एक मोठा अभिनेता, दिग्दर्शक सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी आणि अलीकडचा परिचय म्हणजे एक उत्तम अनुवादकर्त्या. तर आता त्या आपल्या प्रसिद्ध नवऱ्याविषयी काय आणि कसं सांगतात, त्याचबरोबर त्यांचं वैवाहिक सहजीवन, एकूणच त्यांचं कौटुंबिक जीवन कसं उलगडून दाखवतात याचं कुतूहल होतं. मुख्य म्हणजे त्यांची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि सदाशिव अमरापूरकरांना मुंबईत स्थैर्य लाभेपर्यंत नगरसारख्या छोटया शहरातला त्यांचा वावर यातून पुढला सारा अचंबित करणारा प्रवास त्या का मांडतात याचीही उत्सुकता मनात होतीच, अमरापूरकर कुटुंबाचा प्रवास हा केवळ नगर ते मुंबई नव्हता. एखाद्या नवख्या नटाने रंगमंचाच्या अंधाऱ्या अवकाशात प्रवेश करावा आणि अचानक त्याच्यावर सर्व अंगांनी प्रखर प्रकाशझोत यावा, त्याचे डोळे इतके दिपून जावेत की त्याला ते नीट उघडून सभोवताल पाहता येऊ नये असाच काहीसा अनुभव या कुटुंबाने घेतला आहे. प्रायोगिक वे व्यावसायिक रंगभूमी हे स्थित्यंतर तसं फार तर कनिष्ठ ते उच्च मध्यमवर्गीय याच काहीशा परिचित अवकाशातलं; परंतु हिंदी सिनेमातली प्रसिद्धी तर भिरभिरावून टाकणारी. ते अंगावर घेत, वागवत या कुटुंबाने कशी वाटचाल केली हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. एवढी प्रचंड प्रसिद्धी आणि वलय लाभूनही अमरापूरकर कधी फिल्मी झाले नाहीत हे वाटतं तितके सोपे नाही. `खुलभर दुधाची कहाणी यातून ते उलगडणार होते... वाचायला सुरुवात केल्यावर ते खूप तपशीलवार आणि पसरटही वाटलं. पण वाचत गेलो तसतसं लक्षात आलं की, सुनंदाताईंनी चितारलेला परिसर तप‌शिलातल्या काही फरकाने आपलाही आहे. आपणच प्रत्यक्ष जगलेले, पाहिलेल वाचतो आहोत. साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आमच्या शाळकरी वयापासून वाचलेल्या साहित्यातून हेच सर्व पाहत आलोय. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या पिढीला तर हा काळ अवकाश सर्वस्वी अपरिचित. हे त्यांच्यासाठीही आहे. आजच्या नव्या पिढीला 2000 चा चित्रपट जुना वाटतो, तेव्हा त्याआधीच्या त्यांच्या आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या सिनेमाशी आपण जसा त्यांचा परिचय करून देतो तसंच आहे हे. शिवाय या कथनाच्या नायिकेने पुढे अपरिहार्य असं जे वळण गाठलं आहे, त्यासाठी हे आवश्यकच आहे. संथ लयीत सुरू झालेलं आणि काहीसं रेंगाळल्यासारखं वाटणारं गाणं उत्तरोत्तर हलक्याशा द्रुत लयीत समेवर यावं असं हे आत्मकथन आहे. तरीही पूर्वार्धावर थोडे अधिक संपादकीय संस्कार झाले असते, तर आवश्यक असणाऱ्या संथ लयीला रेंगाळावं लागलं नसतं. `प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते` या प्रसिद्ध उक्तीच्या पलीकडे इथे काहीतरी आहे. ही नायिका इथे केवळ एवढ्याच भूमिकेत नाही. ही भूमिका पार पाडताना तिने सर्व प्रकारे गांगरवून टाकणाऱ्या परिस्थितीतही स्वतःला जपलं, स्वतःमधल्या गुणांना जमेल तसं आणि तेवढं खतपाणी घालत जोपासलं आणि आपली म्हणून एक ओळख निर्माण केली. ज्या संपूर्णतः अकल्पित, अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊन पडल्या, त्या लीलया पार पाडत तिने आपलं व्यक्तिमत्त्व जपलं. `मीच एकटीने सारं पहायचं` असा सतत तक्रारखोर धोशा लावत एखादी कर्कशा झाली असती; परंतु सुनंदाताईंचं तसं झालं नाही. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर फोनवर मी त्यांना एवढंच म्हणालो, `माउली, कुठून गं इतकी ऊर्जा आणलीस?` 1950 चं दशक, त्याआधीचा आणि नंतरचाही काळ तसा गरिबीचा आहे. समाजाच्या सर्व थरांत अभावग्रस्तता आहे. कसला अभाव आहे याचीही त्या काळ अवकाशाला जाण नाही. आहे ते गोड मानून घेत जगण्याचा हा काळ. या सामाजिक स्तराखाली असाहाय्यपणे जगणारा एक वर्ग आहे. त्याचीही वास्तपुस्त करण्याची गरज या वातावरणात आहे. परंतु सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कारक्षम घडण्याची, घडविण्याची, अभावग्रस्तता तिथे महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या या नायिकेला हे पर्यावरण लाभलं आहे. त्यांचे वडील मुलं लहान असतानाच गेले. नंतर घरही गेलं आणि मुलांना घेऊन आईला देवळात राहावं लागलं. आहे त्या परिस्थितीतून वाट काढावी या धारणेत सभोवतालच्या सुसंस्कृत वातावरणाचाही मोठा आधार होता. ते सारं मुळातून वाचण्यासारखं आहे. यात गरिबीतले दिवस, हलाखी, अभावग्रस्तता यांपेक्षा हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे आहेत हे सहजपणे अधोरेखित केलेले आहे. वर ज्या ऊर्जेचा उल्लेख केलाय ती इथूनच सुनंदाताईंना मिळाली आणि म्हणूनच यशस्वी नवन्याच्या पाठीशी उभ्या राहताना त्या स्वतः सर्वप्रकारे यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या आणि अमरापूरकरांच्या कथेला कुठून कुठे नेऊन ठेवणारं वळण शाळा-कॉलेजच्या वयातच आलं. नाटक ! अमरापूरकर म्हणजे नाटक आणि नाटक म्हणजे अमरापूरकर असं हे रसायन होतं. सुनंदाताईही नगरच्या त्या छोट्या नाट्यअवकाशात मनापासून वावरत होत्या. सोबत, साथ होती अमरापूरकरांची. परंतु हा माणूस स्वतःमधल्या रंगकर्मीत इतका खोलवर बुडालेला होता की, जिच्या तो प्रेमात पडलाय; तिलाही नाटकाची आवड आहे; नोंद घेण्याजोगे कलागुण आहेत, तिच्यातला कलावंत घडविण्यात मात्र त्याने रस दाखविला नाही. इतकंच नाही तर पुढे मुंबईत यश मिळविल्यानंतर, बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतरही सुनंदाताईंनी `यशस्वी पुरुषामागे...` ची सर्व प्रकारची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर जेव्हा ऑफिसच्या नाटकात काम करायचं ठरवलं, तेव्हा यांनी त्यास ठाम नकार दिला. इथे पुस्तकातला एक प्रसंग आठवतो. नगरमध्ये नाटकाची तालीम चालली होती. अमरापूरकर खूप सिगरेट्स ओढतात म्हणून पाकीट लपवून ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी तलफ अनावर होत गेली, तसतसे ते अस्वस्थ होत गेले. नाटकावरून त्यांचं लक्ष उडत चाललं होत. तेव्हा सुनंदाताईनी आपल्या पर्समध्ये लपवून ठेवलेल्या पाकिटातून दोन सिगरेट्स आणून दिल्या. हीच लग्ना आधीची प्रेयसी नंतर पत्नी, गृहिणीच्या भूमिकेतही त्याला असंच सांभाळते. अमरापूरकरांची नाट्यवेडापायी अडलेली त्यांची पदवी या पद‌वीधारक मुलीशी लग्न ठरल्यानंतर ते पूर्ण करतात. इथे लग्न पार पडतं आणि हे भाऊ म्हणतात, `मला पुण्यात राहून एम.ए. करायच आहे. ही बाई हो ला हो करते. नववधू म्हणून तक्रार करत नाही. शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी ही मुलगी नोकरीधंदा न करणाऱ्या मुलाशी लग्न करते. तो काळ आणि लहान गाव हे लक्षात घेतलं, तर कदाचित कल्पना येईल की किती अवघड होतं ते. यांचं भांडवल काय तर पिढीजात वाडा आणि व्यवसाय. बरं त्या व्यवसायात तरी सहभाग तर तोही नाही. दिवसरात्र एकच ध्यास. एकच नाद... नाटक पुढे मिळणारे अमाप यश आणि वैभव यांची काही अंशी तरी शक्यता आणवली असेल, तर तसंही काही नव्हतं. आपलं मानलं आणि निभावलं. असेल तर एक विचार मनाशी असेल आधार द्यायला, याची कलानिष्ठा सोळा आपणे सच ! तिथे अन्य गोष्टीला थारा नाही. ते मात्र खरंच होतं. अमरापूरकरांमधला अस्वस्थ रंगकर्मी त्यांना कायमचा मुंबईत घेऊन आला आणि मग सर्वाच्या वाट्याला येतो तसा स्ट्रगल करत ते आधी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून यशस्वी होता होता अनपेक्षितपणे सिनेमात जाऊन पोहोचले आणि `अर्धसत्य` नंतर रेस्ट इज द हिस्टरी असा पुढला प्रवास घडला. या आत्मकथनात तो तपशीलवार वाचायला मिळेलच. परंतु त्यात महत्त्वाचं आहे ते भाड्याच्या घरात पितळी स्टोव्ह आणून मुंबईतल्या संसाराला केलेली सुरुवात ते नंतर ऑडीसारख्या महागड्या परदेशी गाड्यांपर्यंत झालेला प्रवास... आणि त्याहीपेक्षा हे घबाड सहजपणे घेणं, हाताळणं, स्वतः सुनंदाताईंनी, अमरापूरकरांनी आणि त्यांच्या तीन मुलींनीही. एकीकडे हे वैभव आणि दुसरीकडे मध्यमवर्गीय साध्या राहणीचे संस्कार ! दस्तुरखुद्द अमरापूरकर तसेच होते, परंतु त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमध्ये घरच्या आघाडीवर निगुतीने सांभाळलं, निभावून नेलं ते सुनंदाताईंनी. बरं हे करता करता आपली नोकरीही सांभाळली. मुलींची शाळा- कॉलेज, त्यांची जडणघडण, इतर साऱ्या सांसारिक बाबी, अमरापूरकरांच्या वाढत्या उत्पन्नाचं व्यवस्थापन, त्यासाठी नेमावयाचा चार्टर्ड अकाउंटंट वगैरे. आणि हे सारं करताना जे जग कालपरवापर्यंत आपल्यापासून दूर होतं तिथे सहज शिरकाव करण्याची, तिथल्या स्टार मंडळींमध्ये बावरण्याची संधी असताना ते स्वतःहून दूर ठेवणं, आपल्या मुलींनाही त्याचं आकर्षण वाटणार नाही याची काळजी घेणं हे अवघड काम या माउलीने सहज केलंय. अशीच कमाल त्यांनी केली ती त्यांच्या आई, सासू- सासरे आणि अमरापूरकरांच्या घरातच असलेल्या आत्याबाई ताई यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं आणि रोजचा संबंध यांविषयी लिहिताना. त्यातून त्या वेळचा काळ अवकाश आणि बदलता कौटुंबिक सामाजिक - पोतही सहजपणे दिसून येतो. सासरे म्हणजे घरातला अखेरचा शब्द हे मनाशी कायम मानलेलं. स्वीकारलेलं. परंतु एक वेळ अशी येते की, मागल्या पिढीतलं कुणी दुखावलं तरी त्याची क्षिती न बाळगता, नव्या पिढीला आपली वाट काढावी लागते. कारण तिच्या काळ - अवकाशाचा तो रेटा आहे. तो मागल्या पिढीला कळणे शक्य नाही. स्वतःचा विचार करण्याची ही प्रेरणा खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरते. आणखी एक नोंद घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, स्वतंत्रपणे स्वतःचं आयुष्य घडवणारी तरुण मुलगी कट्टर पुरुषसत्ताक सासरी जाते, तेव्हा तो विरोधाभास पेलणं किती अवघड असतं याचंही उदाहरण इथे प्रस्तुत होतं. या दरम्यान वेगळा विचार करणारा, सर्वांना समजून घेणारा संवेदनशील नवराही मधूनच नवरेपणा गाजवतो, पण अशा वेळी `आम्ही यांच्यासाठी एवढं करतो ,पण आमच्याबद्दल काही वाटत नाही` असा तक्रारखोर विचार दूर सारत आपलं काम करत राहणं यासाठी साधनाच लागली असेल. `स्वतःची समजूत घातली यापेक्षा `परिस्थिती नीट समजून घेतली` हा मा हा मार्ग पत्करला की सोपं होतं. मन शांत होतं. कडवटपणा तर कणभर राहात नाही. सर्जनशीलता आणि मनाचा प्रसन्नपणा ताजा टवटवीत राहतो. आणि मग आपल्याला जे करावंस वाटते ते करता येतं. त्याचं व्यवस्थापन सुचतं, जस सुनंदाताईंना त्यांच्या अनुवादाच्या कामाच्या नियोजनात सुचलं. घर आणि एकूणच कुटुंबाचे सर्व करताना त्यांना त्यांच्या लेखनासाठी वेळच काढता येईना, तेव्हा पहाटे लवकर उठून त्यांनी निवांत दोन तास काढले आणि आपलं काम केलं. एवढंच नव्हे तर कॉलेज, अभ्यास हे चाळीसेक वर्षे मागे पडल्यानंतर पुन्हा त्या मुंबई विद्यापीठात हजर झाल्या आणि मायथोलॉजीवरच्या एक वर्षाच्या घनघोर अभ्यासक्रमात स्वतःला झोकून दिलं आणि त्यात उत्तम गुण मिळवून पासही झाल्या. वयाच्या या टप्प्यावर घरगुती जबाबदाऱ्यांत, लेकींच्या बाळंतपणाचीही एकीचं तिकडे अमेरिकेत भर पडली. आरंभी मी म्हटले तस `कुठून आणते ही ऊर्जा ही माउली...!` असं करता करता आता कुठे स्वतः साठी वेळ मिळतोय असं वाटेवाटेपर्यंत अमरापूरकरांचं शेवट गाठणारं आजारपण सुरू होतं. आता पुन्हा नव्याने सारं नियोजन, आता दिवसाचा प्रत्येक क्षण त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी. अमरापूरकरांची कामं कमी होत चालली होती. जिथून आयुष्याची सुरुवात केली, तिथे जाऊन तिथल्या घरात दोघांनी पुढली वर्ष काढायची असं ठरवता ठरवता तोच सारा वेळ मुंबईत हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. नगरला पोहोचला तो अमरापूरकरांचा निष्प्राण देह... `खुलभर दुधाची कहाणी` ही एका समजदार आणि कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी आहे. त्या कहाणीतून मला जाणवलेलं तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. सुनंदा अमरापूरकर यांना सलाम! ...Read more