* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
REHANA HAQUE, A YOUNG WIDOW, BLISSFULLY PREPARES FOR THE PARTY SHE WILL HOST FOR HER SON AND DAUGHTER. BUT THIS IS 1971 IN EAST PAKISTAN, AND CHANGE IS IN THE AIR. SET AGAINST THE BACKDROP OF THE BANGLADESH WAR OF INDEPENDENCE, A GOLDEN AGE IS A STORY OF PASSION AND REVOLUTION; OF HOPE, FAITH, AND UNEXPECTED HEROISM IN THE MIDST OF CHAOS—AND OF ONE WOMAN`S HEARTBREAKING STRUGGLE TO KEEP HER FAMILY SAFE
’द कॉस्टा फर्स्ट नॉव्हेल अवॉर्ड’ आणि ’द गार्डियन फर्स्ट बुक अवॉर्ड’ यांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेली कादंबरी. 1971च्या वसंत ऋतूमध्ये रेहाना हक आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देत आहे. तिला हे माहीत नाही की, आजच्या दिवसानंतर त्यांची सर्वांची आयुष्यं कायमची आणि पार बदलून जाणार आहेत, कारण हा पूर्व पाकिस्तान आहे... युद्धाला तयार झालेला. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीत रेहानाला एका काळीज पिळवटून टाकणाऱ्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली ’अ गोल्डन एज’ ही कादंबरी क्रांती, आशा आणि अनपेक्षित शौर्य यांची कथा सांगते आणि तीही प्रेमाच्या लांबलचक मार्गावरून जाणारी...!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TECHDINSONERI #AGOLDENAGE #तेचदिनसोनेरी #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BHARATIPANDE #भारतीपांडे #TAHMIMAANAM #तहमिमाअनम "
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 14-5-17

    ब्रिटनस्थित बांगलादेशी लेखिका तहमिमा अनम यांच्या ‘अ गोल्डन एज’ या कादंबरीचा भारती पांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे. ‘माझ्या पतीस, आज मी आपली मुलं गमावली’, या वाक्यांनी सुरुवात झालेली ही कादंबरी प्रारंभीपासूनच उत्सुकता ताणते आणि नंतर पकड घेते. पाकिस्तन आणि बांगलादेश या दोन्ही देशांतील अस्थिर वातावरणाची पाश्र्वभूमी लाभलेल्या या कादंबरीची नायिका आहे रेहाना हक. रेहाना ही सामथ्र्यशाली आई आहे आणि तिच्याच दृष्टिकोनातून ही युद्धकथा मांडली आहे. ती आपल्या दोन मुलांना एक मेजवानी देते. मात्र, त्या दिवसानंतर त्या सगळ्यांच्याच आयुष्याला कलाटणी मिळते. युद्धखोर पूर्व पाकिस्तानात आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी तिला सर्व शक्तीनिशी लढावे लागते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 16-10-2016

    ‘अ गोल्डन एज’ ही १९७५ मध्ये ढाक्यात जन्मलेल्या लेखिका तहमिमा अनम यांची पाहिली कादंबरी आहे. बांगलादेशाच्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीचे भारती पांडे यांनी ‘तेच दिन सोनेरी’ हे मराठी भाषांतर केले आहे. अनुवादासाठी पांडे यांनी निवडलेल्या याकथानकात एका देशाच्या निर्मितीची व एका कुटुंबाची रेशमी भावबंधांची अशी दुहेरी घट्ट वीण असून एक सशक्त कथाबीज लपलेले आहे. यातील घटनांचा आवाका प्रचंड असूनही पात्रांचा फापटपसारा नाही व कुठेही विषयांतर नाही. त्यामुळेच या पुस्तकाची पकड कुठेही सैल होत नाही. यातील नाट्य एवढे पकड घेणारे आहे की यावर एखादा उत्तम चित्रपट किंवा नाटकही निघू शकेल. एका अत्यंत सामान्य आणि अबला भासणाऱ्या स्त्रीमधील सुप्त ऊर्जा तिच्याकडून कोणकोणते धाडस करवून घेऊ शकते याचा एक अत्यंत सहजसुंदर आविष्कार म्हणजे ही कादंबरी. मुलांची ताटातूट झाल्यावर त्यांना परत मिळविण्यासाठी एका निराधार विधवा मातेनं पार पडलेल्या दिव्यांचा रहस्यभेद आपल्या हृदयाचे ठोके वाढवतो. ‘दोन पिढ्यांमधील अंतर संपवून टाकण्यासाठी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी, जपण्यासाठी धडपडणाऱ्या या मातेच्या शांत जीवनाला अंतर्बाह्य ढवळून काढणारा घटनाक्रम थेट आपल्या जाणिवांना हात घालतो.’ पाकिस्तानी लष्करांनी स्त्री-पुरूषांवर केलेल्या अत्याचारांच्या आक्रोशाचा भयानक आवाज, क्रूर मानवसंहाराच्या भळभळत्या जखमा हे सर्व असूनही कुठेही भडकपणा न आणता एक संयत अशी मांडणी करणं हे उल्लेखनीय कौशल्य आहे. एका मातेचं स्वाभाविक अपत्यप्रेम, तरूण-तरुणींचे सलज्ज कोवळे प्रेम, देशप्रेम अशा प्रेमाच्या विविधरुपांसह यात जपलेला धार्मिक सलोखा व शेजाऱ्याचे प्रेम हे सारे आपले भावजीवन समृद्ध करून जाते. एका सुग्रणीने केलेले रुचकर असे सामिष भोजनातील विविध पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीची आतून ओळख करून देतात. बांगलादेशच्या फाळणीची पार्श्वभूमी असलेल्या एका स्त्रीने एका स्त्रीची लिहिलेली ही पाहिलीवहिली गोष्ट जाणून घेताना मिळणारा वाचनानंदही उत्कट असाच आहे. ...Read more

  • Rating StarSAMANA 16.10.16

    सामना १६.१०.२०१६ ‘अ गोल्डन एज’ ही १९७५ मध्ये ढाक्यात जन्मलेल्या लेखिका तहमिमा अनम यांची पाहिली कादंबरी आहे. बांगलादेशाच्या फाळणीच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या कहाणीचे भारती पांडे यांनी ‘तेच दिन सोनेरी’ हे मराठी भाषांतर केले आहे. अनुवादासाठी पांडे यंनी निवडलेल्या या कथानकात एका देशाच्या निर्मितीची व एका कुटुंबाची रेशमी भावबंधांची अशी दुहेरी घट्ट वीण असून एक सशक्त कथाबीज लपलेले आहे. यातील घटनांचा आवाका प्रचंड असूनही पात्रांचा फापटपसारा नाही व कुठेही विषयांतर नाही. त्यामुळेच या पुस्तकाची पकड कुठेही सैल होत नाही. यातील नाट्य एवढे पकड घेणारे आहे की यावर एखादा उत्तम चित्रपट विंâवा नाटकही निघू शकेल. एका अत्यंत सामान्य आणि अबला भासणाNया स्त्रीमधील सुप्त ऊर्जा तिच्याकडून कोणकोणते धाडस करवून घेऊ शकते याचा एक अत्यंत सहजसुंदर आविष्कार म्हणजे ही कादंबरी. मुलांची ताटातूट झाल्यावर त्यांना परत मिळविण्यासाठी एका निराधार विधवा मातेनं पार पडलेल्या दिव्यांचा रहस्यभेद आपल्या हृदयाचे ठोके वाढवतो. ‘दोन पिढ्यांमधील अंतर संपवून टाकण्यासाठी आपल्या मुलांना जिंकण्यासाठी, जपण्यासाठी धडपडणाऱ्या या मातेच्या शांत जीवनाला अंतर्बाह्य ढवळून काढणारा घटनाक्रम थेट आपल्या जाणिवांना हात घालतो.’ पाकिस्तानी लष्करांनी स्त्री-पुरूषांवर केलेल्या अत्याचारांच्या आक्रोशाचा भयानक आवाज,व्रूâर मानवसंहाराच्या भळभळत्या जखमा हे सर्व असूनही कुठेही भडकपणा न आणता एक संयत अशी मांडणी करणं हे उल्लेखनीय कौशल्य आहे. एका मातेचं स्वाभाविक अपत्यप्रेम, तरूण-तरुणींचे सलज्ज कोवळे प्रेम, देशप्रेम अशा प्रेमाच्या विविधरुपांसह यात जपलेला धार्मिक सलोखा व शेजाऱ्याचे प्रेम हे सारे आपले भावजीवन समृद्ध करून जाते. एका सुग्रणीने केलेले रुचकर असे सामिष भोजनातील विविध पदार्थ बंगाली खाद्यसंस्कृतीची आतून ओळख करून देतात. बांगलादेशच्या फाळणीची पाश्र्वभूमी असलेल्या एका स्त्रीने एका स्त्रीची लिहिलेली ही पाहिलीवहिली गोष्ट जाणून घेताना मिळणारा वाचनानंदही उत्कट असाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more