SURESH GUPTE

About Author




चाळीस वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर त्यांनी इ. स. १९९०मध्ये पुन्हा शिक्षणाला सुरुवात करून शिवाजी विद्यापीठाचा पत्रकारितेचा अभ्यासक्रम (B.J.C) पूर्ण करून त्यात ते विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आले. त्यानंतर त्यांनी फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट (FTI ) पुणे येथून चित्रपट परीक्षणाचा लघु अभ्यासक्रम (SHORT COURSE) पूर्ण केला. इ. स. १९९१ ते १९९४ मध्ये शिवाजी विद्यापीठात चित्रपट पत्रकारितेचे (CONTRIBUTORY LECTURER) म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम. ए पदवी प्राप्त केली. सेवानिवृत्तीच्या काळात प्रसिद्ध बंगाली लेखक श्री. शरदचंद्र चटर्जी यांची ‘देवदास’ ही कादंबरी मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतरित केली. तथापि सदर कादंबरीचे अन्य भाषक लेखकांनी यापूर्वीच इंग्लिश भाषेत भाषांतर केले असल्याने ते छापून प्रसिद्ध करण्याच्या मागे ते लागले नाहीत. इ. स. २०१२मध्ये वयाच्या ८२व्या वर्षी मेरी कॉलेरी यांच्या व्हेण्डेट्टा (VENDETTA) या कादंबरीचे भाषांतर केले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
VENDETTA Rating Star
Add To Cart INR 240

Shop by

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
शंतनू

ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे. या पुस्तकाचा सिक्वेल वाचायला आवडेल.