* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RICHARD FEYNMAN : EK HERHUNNERY VYAKTIMATVA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184984514
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2013
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :SUDHA RISBUD COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SURELY YOU ARE JOKING, MR. FEYNMAN! IS A WITTY AND FUNNY SELF-PORTRAIT OF THE FAMOUS THEORETICAL PHYSICIST RICHARD FEYNMAN. THE BOOK IS A TRANSCRIPTION OF SEVERAL TAPED CONVERSATIONS THAT THE PHYSICIST HAD WITH A FRIEND. RALPH LEIGHTON. THE TEXT HAS BEEN CHANGED VERY MILDLY WHEN COMPARED TO THE SPOKEN WORDS IN THE TAPES AND SO, IT HAS A FAST AND CRISP STYLE. RICHARD FEYNMAN WAS A MULTIFACETED PERSONALITY WHO DID NOT LIMIT HIS INTEREST TO JUST PHYSICS. HE WAS CURIOUS ABOUT EVERYTHING AND EXPERIMENTED WITH MANY THINGS TO TEST HIS LIMITS AND DISCOVER NEW TALENTS WITHIN HIMSELF. FEYNMAN WAS A PRACTICAL JOKER WHO LEARNT SAFE-CRACKING FOR FUN. HE COULD PAINT AND WAS A GOOD DRUMMER TOO. THE BOOK IS A COLLECTION OF FUNNY ANECDOTES. ONE INTERESTING ANECDOTE SHARES THE STORY OF HOW HE WAS REJECTED BY THE DRAFT BOARD BECAUSE HE WAS THOUGHT TO BE MENTALLY UNSTABLE. THE REASON WAS THE ANSWER HE GAVE TO THE QUESTION DO YOU HEAR VOICES IN YOUR HEAD?. HE ANSWERED IN THE AFFIRMATIVE AND THEN WENT ON TO DESCRIBE WHY HE FOUND THE PHENOMENON INTERESTING. FEYNMAN SAID THAT WHENEVER HE FELL ASLEEP OR WAS JUST WAKING UP, HE WOULD HAVE IMAGINARY CONVERSATIONS WITH HIS FOREIGN COLLEAGUES. IN THESE FICTIONAL CONVERSATIONS INSIDE HIS HEAD, HE WAS ABLE TO PERFECTLY MIMIC EACH PERSONS ACCENT, BUT HE COULD NOT DO THIS WHEN HE WAS SPEAKING WHILE AWAKE. HE WAS CURIOUS ABOUT HOW ONE PART OF HIS BRAIN HAD SUCCEEDED IN CAPTURING THESE ACCENTS, BUT THE PART THAT WAS RESPONSIBLE FOR ACTUAL SPEECH COULD NOT DO SO. THERE ARE MANY SUCH HILARIOUS EPISODES FROM HIS LIFE, BUT THROUGH IT ALL, FEYNMANS TRUE PERSONALITY COMES THROUGH AS AN ICONOCLAST AND SKEPTIC WHO NEVER ACCEPTED ANYTHING WITH EVEN PROVEN THEORIES WITHOUT TESTING THEM ONCE HIMSELF. HE HAD A PASSION FOR TEACHING AND COULD SIMPLIFY THE EXPLANATIONS OF THE MOST DIFFICULT CONCEPTS TO MAKE THEM EASILY UNDERSTANDABLE TO ANY TYPE OF AUDIENCE. FEYNMAN WAS FIRMLY OPPOSED TO EDUCATION SYSTEMS THAT PROMOTED LEARNING BY ROTE WITHOUT UNDERSTANDING THE CONCEPTS.
प्रसिद्धीचे वलय सदैव ज्या शास्त्रज्ञांभोवती राहिले, त्यातील पहिला शास्त्रज्ञ होता आईनस्टाईन, तर दुसरे नाव होते रिचर्ड फाईनमन! आईनस्टाईननंतर फिजिक्स ज्या टप्प्यावर काही काळ थांबलं होतं, त्या टप्प्यावरून फिजिक्सला पुढे नेण्यामध्ये रिचर्ड फाईनमन यांचा सिंहाचा वाटा होता. ते द्रष्टे शास्त्रज्ञ होते. नॅनो टेक्नॉलॉजीच्या तंत्राची चाहूल त्यांनी अनेक वर्षे आधीच युवा शास्त्रज्ञांना दिली होती. अणुबॉम्बच्या चाचणीचा स्फोट गॉगल न घालता, केवळ उघड्या डोळ्यांनी पाहणा-या या शास्त्रज्ञाने आपले संपूर्ण जीवन, असे उघड्या डोळ्यांनीच व्यतीत केले. प्रतिष्ठा, पदव्या आणि मानसन्मान निग्रहाने नाकारून सदैव भौतिकशास्त्राचेच सेवाव्रत अंगीकारले. संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील आपला प्रामाणिकपणा सातत्याने टिकवत असतानाच, जीवनातील विविध अनुभवांना एका निखळ मिश्कीलतेने फाईनमन सामोरे गेले. विज्ञान क्षेत्रात चिकित्सक वृत्ती जागृत ठेवणारे शिक्षण, हेच खरे शिक्षण असे मानून त्याचा पाठपुरावा विद्याथ्र्यांना करायला लावणारा हा शास्त्रज्ञ म्हणजे बुद्धिमत्ता, सचोटी आणि विज्ञाननिष्ठेचे अजब रसायन होता.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #DHANANJAYBIJALE #PRADEEPTHAKUR #POOJARANA #अण्णा हजारे #ANNA HAZARE BHRASHTACHARACHYA VIRODHATIL BHARTIYA LADHYACHA CHEHARA #
Customer Reviews
  • Rating StarGOMANTAK, SHABDSOHALA, PANAJI 22-06-2014

    शोध एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा… ‘रिचर्ड फाईमन’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकात सुधा रिसबूड यांनी फिजिक्सचे नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाईमन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. फाईनमन यांचे केवळ चरित्र नाही, तर फाईनमन ही व्य्ती म्हणजे काय रसायन होतं, हे या पुस्तकातील प्रसंगावरून कळून येतं. या पुस्तकातील एकूण २५ प्रकरणातून त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग यात शब्दबद्ध करण्यात आले आहेत. ‘रिचर्ड फाईनमन एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व’ या प्रकरणात फाईनमनच्या विज्ञानविषयक कर्तृत्वाचा वेध घेण्यात आला आहे. त्यांना जीवनाबद्दल विलक्षण ओढ होती. नवनवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास होता. बुद्धीनं अत्यंत तल्लख, दांडगी विचारशक्ती, तर्कशुद्धता, गणिताची आणि फिजिक्सची मनातली घट्ट बैठक यामुळे फाईनमन हे द्रष्टे होते. आजचे युग हे नॅनो टेक्नॉलॉजीचे आहे. या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. संगणक्षेत्र, जैविकशास्त्र, रसायनशास्त्र या क्षेत्रात नॅनो टेक्नॉलॉजी उपयोगी पडू शकते हे फाईनमन यांनी १९५९सालीचे सांगितले होते. १९६९साली फिजिक्स विषयात नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या या शास्त्रज्ञाला चित्रकला, ड्रम वाजवण्याचा छंद होता. ‘विज्ञानाचे वैश्विक नाते’ यामध्ये त्यांच्या भौतिकशास्त्र विषयाचं संशोधन कार्य व शैक्षणिक कार्याचा वेध घेतलेला आहे. फिजिक्स शिकवण्यात आणि फिजिक्समध्ये संशोधन करण्यातच त्यांनी आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानली. प्रचंड मानधन मिळणारी नोकरीही त्यांनी नाकारली. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञांची पिढी निर्माण करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. विश्वाच्या रहस्याचे नियम हे भौतिकशास्त्राच्या अभ्यासातून कळू शकतील, असे त्यांचे मत होते. विश्वाची उत्पत्ती किंवा विश्वाचे रहस्य अजून शास्त्रज्ञाला विज्ञानाला कळलेलं नाही हे मान्य करायला फाईनमनना कधीच कमीपणा वाटला नाही. ‘फ्रेंच कव्र्ह आणि कॅलक्युलसचा अभ्यास’ हे प्रकरण फाईनमनच्या शालेय जीवनातील शिक्षणाच्या पद्धती उलगडून दाखवते. त्यांचे कॅलक्युलस शालेय जीवनापासून चांगले होते. पुस्तकी ज्ञानाची घोकंपट्टी त्यांनी कधी केली नाही. त्यांच्या याच वृत्तीमुळेच क्वांटम फिजिक्समध्ये त्यांनी नवे दालन उघडले. फाईनमन डायग्रॅममुळे आईनस्टाईननंतर एका वळणावर येऊन थबकलेल्या भौतिकशास्त्राला फाईनमननी गती दिली. ‘वैद्यकीय तपासणी’ या प्रकरणात त्यांच्या खट्याळ स्वभावाचा मजेदार किस्सा सांगण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैन्य प्रवेशाकरता फाईनमनना वैद्यकीय चाचणीत मानसिकदृष्ट्या ‘अनफिट’ म्हणजे चक्क वेडगळ ठरण्यात आले होते. अत्यंत मिस्कील व खोडकर वृत्तीचे फाईनमन विज्ञानाविषयी बोलताना मात्र गंभीर होत. ‘फिजिक्समध्ये आकंठ बुडलेले फाईनमन’ या प्रकरणात फाईनमनच्या विज्ञानविषयक विचारांचा ऊहापोह करण्यात आला आहे. विज्ञान म्हणजे नेमकं काय, हेही त्यांनी सांगितलं आहे. माणसांनी जोपासलेल्या अंधश्रद्धांचं जंजाळ, साचलेलं अतिरिक्त अनावश्यक माहितीचं जाळं दूर करण्याची युक्तीही त्यांनी शोधून काढली आहे. ही युक्ती म्हणजे चिकित्सा होय. नवीन प्रत्यक्ष केलेल्या प्रयोगाचा अनुभव हा पुनःपुन्हा तपासून घेता येणे म्हणजे विज्ञान होय. वैज्ञानिक सिद्धांताला शास्त्रीय प्रयोगाची जोड असली पाहिजे, असेही त्यानंी आग्रहाने सांगितले आहे. शास्त्रीय सत्य हे सगळ्यांना सारखेच निष्कर्ष देते, हे फाईनमन यांनी आयुष्यभर आग्रहाने सांगितले. फाईनमन हे शोधक वृत्तीचे, सृजनशील प्रज्ञावंत होते. स्वत:ला बुद्धीला चालना देण्यासाठी भौतिकशास्त्रातील काही गोष्टींची कारणमीमांसा शोधून काढण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. थाळी पेâकण्याच्या खेळातली थाळीच्या गतीच्या अभ्यासावर जोर दिला. यातूनच क्वांटम इलेक्ट्रोयनमिकल शाखेचा जन्म झाला. ‘बहूभाषिक प्राध्यापक’ या प्रकरणात फाईनमनच्या बहुभाषिकत्वाचा ऊहापोह करण्यात आला आहे. जपान येथे एक सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी ते जपानला गेले. त्यांनी जपानी भाषा आत्मसात केली. त्यासाठी त्यांनी जपानी महिलेकडून जपानी भाषा शिकण्यासाठी वर्ग सुरु केले. ब्राझीलमध्ये असताना पोर्तुगिज भाषा आत्मसातकेली. ते हजरजबाबी स्वभावाचे होते. सरकार दरबारी लाल फितीचा तिटकारा हा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा एक भाग होता. ‘तेरा वेळा सह्या’ या प्रसंगातून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू दर्शवला आहे. क्वांटम डायनॅमिक्स या शाखेव्यतिरिक्त, द्रवरूप हेलिअमवरील कामासाठीही फाईनमननी केलेल्या कामाचा परिचय ‘सांस्कृतिक किनार’ या प्रकरणात केला आहे. मय लिपीतील खुणा, दंड, उभ्या रेखा, टिंब इत्यादी आकाराचे त्यांनी अर्थ लावले. या खुणा ग्रहांच्या परिभ्रमण कक्षा, ग्रहांच्या कला यांच्याशी निगडित असलेली ही निरीक्षणे आहेत, हेही त्यांनी दाखवून दिले. त्यांनी केवळ हौसेखातर केलेल्या अभ्यासातून मय संस्कृतीची बरीच माहिती जगापुढे आणली. फाईनमन हे असेच द्रष्टे शास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्राचा गाढा अभ्यास, शास्त्रीय विचारांची पक्की बैठक आणि विलक्षण बुद्धिमत्ता यामुळे भौतिकशास्त्रतच नव्हे; तर विज्ञानाच्या कुठल्या क्षेत्रात कशाप्रकारे प्रगती होईल किंवा होऊ शकते हे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे. त्यांना क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील सिद्धान्ताबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी तयार केलेल्या फाईनमन डायग्रॅममुळे भौतिकशास्त्राच्या शास्त्रज्ञांना सूक्ष्म कणांचे स्थलकालातील परस्पर संबंध समजून घेता आले. अत्यंत उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांनी ख्याती होती. त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे आणि स्पष्टोक्तीमुळे सरकार मानसन्मानाच्या नादी ते लागले नाहीत. फाईनमन लेक्चर्स ऑन फिजिक्स हे त्यांची फिजिक्स विषयावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकामुळे त्यांना फिजिक्सचे निष्णात शिक्षक मानले जाते. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ऑरस्टेट मॉडेल हा सन्मानही मिळाला. ‘द कॅरॅक्टर ऑफ फिजिक्स लॉ अँड क्युईडी स्टॅटिस्किट मेकॅनिक्स लेक्चर्स ऑन ग्रॅव्हिटी ही त्यांची गाजलेली काही पुस्तके. नॅनो टेक्नोलॉजीचे महत्त्व शास्त्रज्ञांच्या अभ्यासकांच्या लक्षात आणून देणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यामधील कित्येक रहस्ये ही नॅनो टेक्नॉलॉजीच्या अणूच्या पातळीवर जाऊश्र अभ्यास करण्याच्या प्रयत्नांतून सुटतील अशी या द्रष्ट्या शास्त्रज्ञाची दूरदृष्टी होती. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या या शास्त्रज्ञाच्या आत कुठेतरी एक खट्याळ मूल दडलेले होते याचा प्रत्यय हे चरित्र वाचताना येतो. फाईनमननी संशोधन आणि शिक्षणक्षेत्रातील आपला प्रमाणिकपणा सातत्यानं टिकवला. जीवनातील विविध अनुभवांना ते निखळ मिस्किलतेने सामोरे गेले. विज्ञान क्षेत्रात चिकित्सक वृत्ती जागृत ठेवणारे शिक्षण असे मानून त्याचा पाठपुरावा विद्याथ्र्यांना करायला लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे चरित्र सुधा रिसबूड यांनी कलात्मकरीत्या, सोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडले आहे वाचकांना हे चरित्र आवडले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book