* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660517
  • Edition : 12
  • Publishing Year : NOVEMBER 1973
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OT;GAUTAM BUDDHA, LAOTSE AND CONFUCIUS WERE SITTING TOGETHER IN THE HEAVEN. THE TIMEFAIRY CAME OVER THERE WITH THREE GLASSE. ALL THE THREE GLASSES WERE FULL UP TO BRIM. SHE OFFERED THEM TO THE TRIO. GAUTAM BUDDHA REFUSED THE GLASS SAYING THAT LIFE IS FULL OF SADNESS. LAOTSE ACCEPTED THE GLASS SAYING THAT “NOW THE GLASS IS ALREADY BEEN OFFERED, LET ME TASTE IT”. CONFUCIUS JUST ACCEPTED THE GLASS.”IF “ASHTAVAKR” REACHES THE HEAVEN THEN WHAT WOULD BE HIS REACTION?”, ONE DISCIPLE ASKED OSHO. OSHO ANSWERED, HE WILL ACCEPT THE DRINK AND THEN FINISH OFF THE TIMEFAIRY TOO AS SHE HERSELF IS TIME, “SAMAY”. THE JUICE IN THE GLASS IS LIFE ITSELF. THE FULLNESS OF THE GLASS INDICATES THAT LIFE IS FULL OF JUICES OR THE JUICE IS FILLED IN THE GLASS OF LIFE. TO ENJOY THE JUICE MEANS TO ENJOY LIFE, TO CONQUER OVER TIME. EVERY MOMENT OF OUR LIVING IS FULL OF VIGOUR AND VITALITY, TO ENJOY IT MEANS TO WIN OVER LIFE. IF YOU MISS EVEN A SINGLE SECOND THEN YOU MISS THE HAPPINESS IN IT TOTALLY, FOREVER. J. KRISHNMURTI CALLS THIS AS AWARENESS. IF WE ARE AWARE THEN WE CAN KEEP OUR EYES OPEN TO EACH AND EVERY MOMENT OF PRESENT. THAT SINGLE MOMENT WILL TEACH US TO INVEST AND SPEND PROPERLY. THOSE PEOPLE WHO COME ACROSS SUCH AWARENESS NEVER REPENT IN LIFE FOR ANYTHING. I CONSIDER MYSELF TO BE VERY LUCKY AS I GOT AN OPPORTUNITY TO MEET SUCH A PERSON IN MY LIFE; FIRST IT WAS MY FATHER AND LATER ON IT WAS DR. SURESHCHANDRA NADKARNI WHO ACTUALLY FINISHED THE TIMEFAIRY. I NEVER CAME ACROSS THE TIMEFAIRY, BUT MY FATHER HAD DRANK TO THE LAST DROP OF LIFEJUICE FROM THE GLASS OF LIFE, HAD ENJOYED IT, HAD STRIVED FOR IT; AND ME? I HAD WITNESSED IT. IT WAS DR. NADKARNI WHO WAS DITTO LIKE MY FATHER; THIS BOOK WHICH IS WRITTEN IN THE MEMORIES OF MY FATHER IS DEDICATED TO HIM." VA PU. "VASANTA; ANNA KALE”S LUCKY SON. ANNA HIMSELF WAS A VERY LUCKY PERSON. HE HAD A BEAUTIFUL COMMAND OVER BRUSH AND THE PEN. VASANTA WAS ALWAYS MORE CLOSE TO THE PEN. BUT BOTH FATHER AND SON HAD SAME ADDICTION; DRAMA AND THE PEOPLE RELATED TO IT. I AM NOT SURPRISED TO SEE THAT THE THIRD GENERATION HAS CONTINUED WITH THE TREND. ANNA”S GRANDSON SUHAS IS ACQUIRING NAME AND FAME AS AN ACTOR AT THE VERY YOUNG AGE AND ALSO HAS A SMOOTH HAND OVER THE BRUSH. SUHAS MIGHT BECOME A SINGER IF PURSUED PROPERLY. ANNA WILL BE 87 YEARS OLD NOW AND WE WISH THAT VERY SOON WE GET A CHANCE TO CELEBRATE THE CENTURY. THOUGH HE IS VASANTA”S FATHER, FOR ALL OF US DRAMATIST HE IS NO LESS THAN OUR FATHER.HE MAINLY WORKED AS A DRAPER AND MANY OF US HAD HAD IT AS THE BACKGROUND. OVER THE YEAR, ANNA AND HIS DRAPERY BOTH HAVE STOOD FIRMLY BEHIND US. HE ALWAYS PASSESSED EVER FRESH ATTITUDE. VASANTA IS LUCKY TO HAVE A FATHER WHO GAVE HIM NOT ONLY GUIDANCE, SUPPORT, BUT A WHOLE LOT OF FRIENDSHIP. HE WAS THE BEST FRIEND OF HIS SON. HE WAS HIS SON”S ROOM PARTNER IN ALL SENSE. HE TRAVELLED BETWEEN PUNE AND MUMBAI THROUGHOUT HIS LIFE. WITH DUE RESPECT, HIS DAUGHTER AND DAUGHTERINLAW ALSO ENJOY TEASING HIM, CAN BE FRIENDS WITH HIM. HE IS SO SWEET BY NATURE THAT HIS KIDS HAVE FORGOTTEN THAT HE CAN SCOLD TOO. EVEN TODAY, MANY A FAMILIES WONDER WHAT IT IS LIKE FOR THE “PA” TO BE FRIENDLY WITH THEM. HIS APPEARANCE IS VERY SIMPLE; THE ART STUDENTS DRESS UP MORE COLOURFULLY THAN HIS PAINTINGS. HE DRESSES ACCORDING TO THE OLD TRENDS BUT COLOURS BEYOND THE SET NORMS. DRAPERY COLOURING IS TIRING MENTALLY AS WELL AS PHYSICALLY; BUT AT THE AGE OF 80, ANNA COLOURED THE DRAPERY FOR THE JUNGLE, PALACE ETC. FOR BALGANDHARVA NATYA MANDIR AT PUNE, IN HIS OWN STYLE. ART ITSELF HAS A FLOW, CREATIVITY, AN INNOVATIVE TREND. ANNA FOLLOWS THE STYLE OF ANANDRAOJI PAINTER. THE STAGE RECOGNIZES THE IMPORTANCE OF TRENDS IN DRAMA AND IN DRAPERY TOO. ANNA IS A MASTER OF IT. I AM VERY MUCH FOND OF ANNA”S DRAPERY AND WRITING. HIS HAND MOVES SWIFTLY AND DELICATELY OVER THE CANVAS AND THE PAPER BUT EQUALLY OVER HIS FRIENDS” BACKS”“. "PU. LA. DESHPANDE".  
व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पुं चे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले. आता सगळं कुटुंब एका ठिकाणी राहू लागलं. वपु अणणांबद्दल सांगताना कधी वर्तमानात असतात, तर कधी भूतकाळात जातात; मात्र अण्णांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचं वर्णन करण्यापेक्षा अण्णांची स्वभाववैशिष्ट्यं सांगण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेपथ्याचं काम अण्णा किती तन्मयतेने आणि कुशलतेने करत याबद्दल ते सांगतात. तसेच एक वडील म्हणून त्यांचं आपल्याशी कसं नातं होतं, हेही सांगतात. मिश्किलपणा, काहीसा हळवेपणा, ओढग्रस्तीच्या आर्थिक परिस्थितीतही त्यांचं आनंदी राहणं, काटकसरीपणा, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा, कधीही कोणाबद्दलही तक्रार करायची नाही किंवा केलीच तर ती वेगळ्या पद्धतीने करायची . त्यांची स्वभाववैशिष्ट्ये वपु नोंदवतात. अण्णा केवळ नेपथ्यकारच नव्हते तर ते लेखनही करायचे, मंगलाष्टकं रचायचे. वेगवेगळे अल्बम्स करायचा छंद त्यांना होता. वपुंच्या काही कथांची शीर्षकंही अण्णांनी सुचवली आहेत. ते रोजनिशी लिहित. त्यांच्या नेपथ्यातील बारकावे, जिवंतपणा आणि कुशलता दर्शवणारे काही प्रसंग वपुंनी सांगितले आहेत. ललितकलादर्शसाठी अण्णांनी केलेल्या कामाचा उल्लेख आणि त्यांचा त्या संस्थेशी असलेला ऋणानुबंध याबद्दलही वपुंनी लिहिले होते. राजकमल आणि ललितकलादर्श या दोन्ही संस्थांच्या यशस्वितेमध्ये अण्णांचंही योगदान महत्त्वाचं होतं; पण त्या संस्थांनी अण्णांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही; उलट व्ही. शांताराम आणि भालचंद्र पेंढारकर यांनी अण्णांच्या बाबतीत जी अनास्था दाखवली त्याबाबतची नाराजी वपुंनी व्यक्त केली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    व. पु. काळे या नावाच्या माझ्या तरुण मित्राला कसले म्हणून ग्लॅमर नव्हते. अशा काळापासून मी ओळखतो आहे आणि एकपरीने त्याच्या अनोख्या मार्गक्रमणातील चढउतारांचा मी साक्षी आहे. त्याच्या कथाकथनाचे आरंभापासून तो अगदी कालपरवापर्यंतचे अगणित कार्यक्रम मी वेळोवेळीमोठ्या कुतूहलाने पाहिले, ऐकलेले आहेत आणि तो केवळ अव्वल श्रेणीचा लोकप्रिय कथाकथन आहे म्हणून त्याची व त्याच्या कथांची आजवर कधी मी अवहेलना केलेली नाही आणि तूर्त त्याच्या एकपरीने अभूतपूर्व अशा पुस्तकाच्या परिचयासाठी म्हणून मी हे लिहित असलो, तरी गेल्या कित्येक दशकांपासून जपलेले आमचे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध लपवण्याचे वा तटस्थ अलिप्तपणाचे सोंग आणण्याचे काही कारण आहे, असे मला वाटत नाही. पहिल्यापासूनच वेळोवेळी वपु आपली कित्येक महत्त्वाची पुस्तके भेट म्हणून मला देत आलेले आहेत आणि त्यांच्या दोन-तीन पुस्तकांची अशीच परिचायक परीक्षणे अधूनमधून केव्हा तरी लिहिल्याचे स्मरते. पण ही घटनाही कित्येक वर्षांपूर्वीची आहे आणि कथाकथक म्हणून अलौकिक असा लौकिक ज्याला तूर्त लाभला आहे. त्याच्या कथापुस्तकांवर काही लिहिण्यापेक्षा त्याच्या तदितर अन्य स्वत्वविशेष अशा पुस्तकांविषयी लिहिण्यात मला अधिक रस व स्वारस्य आहे. वपु सांगे वडिलांची कीर्ती वपु काही दिवसांपूर्वी माझ्या घरी आले ते अशीच वेगळ्या प्रकारची दोन पुस्तके एकदम भेट म्हणून मला देण्यासाठी. ही दोन्ही पुस्तके वेगवेगळ्या कारणांसाठी तशी एक प्रकारे अभूतपूर्व उल्लेखनीय आहेत. पैकी पहिले जे आहे ते ‘वपु सांगे वडिलांची कीर्ती’ पण या नावातील ‘वपु’ हा पहिलाच शब्द वगळला, तर सांगे वडिलांची कीर्ती’ या वपुंच्या पूर्वप्रसिद्ध पुस्तकाची (पुन्हा एकपरीने) ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती पुलांच्या प्रस्तावनेमुळे आणि त्या प्रस्तावनेतील दुर्मिळ असा सहजाभिप्राय एकदम पटण्यासारखा असल्यामुळे जिज्ञासू वाचकांच्या स्मरणात आजही ताजी असेल. पण त्याच पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती असली, तरी त्या पूर्वावृत्तीचे ही दुसरी आवृत्ती म्हणजे काही शब्दत: पुनर्मुद्रण नव्हे. कारण या दुसऱ्या आवृत्तीच्या अखेरीस आता तब्बल बारा वर्षांनंतर वपुंनी तब्बल पत्तीस पृष्ठांचे एक नवेच प्रकरण ‘का?’ नावाचे जे जोडलेले आहे. ते पहिल्या आवृत्तीच्या वाचकांनासुद्धा सकारण विलक्षण मनोरंजक वाटेल, असे आहे आणि खरे तर त्याविषयी जरा हात झाडून मोकळेपणाने लिहायला मला फार आवडले असते. कारण मूळ पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीतील एकूण एक सर्व प्रकरणे वपुंनी आपल्या सदादक्ष वडिलांच्या सदैव जागत्या पहाऱ्यात बसून लिहिली होती. आणि म्हणून लिहिलेली होती ती फार फार हात राखून हे वाचकांनासुद्धा सहज जाणवण्यासारखे होते. अर्थात त्यातही सूचक तपशील तसे पुष्कळच होते. पण ज्यांची कीर्ती वपु सांगत होते, ते त्यांचे तीर्थरूप वडील चित्रकार पु. श्री. काळे, तसे ते इतके मितभाषी की सहसा कधीच काही न बोलणारे, अकारण कृतज्ञतेची जपमाळ सतत ओढणारे आणि सहनशील सोशिकतेने स्वत:पेक्षाही सत्वाला अधिक मानणारे असे सद्गृहस्थ असल्यामुळे स्वत:विषयी आपल्या मुलाने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशब्दावर सक्त नजर ठेवून असत आणि त्यांच्या सच्छील वृत्तीला रुचणार नाही, असा एक शब्दसुद्धा त्यांच्या त्या स्मरणलेखनातून ते कटाक्षाने कटाप करीत असत आणि तोही मुकाट्याने आपल्या ‘वडिलांची कीर्ती सांगत’ असला, तरी त्यांची प्रत्येक आज्ञा तो प्रमाण मानीत असे. पण वडील गेल्यावर त्यांनी पूर्वी प्रतिबंध केलेले खरे ते सारे निर्भयपणे सांगून टाकायला आपण आता मोकळे झालो, अशा भावनेने वपुंनी हे जे अखेरचे प्रदीर्ष असे नवे प्रकरण लिहिले आहे. ते मुळातूनच समग्र वाचण्यासारखे आहे. यासाठी की समाजात मोठी मानमान्यता पावलेली सिनेमा नाटकातील लब्धप्रतिष्ठित माणसे खाली मान घालून सचोटीने व कर्तव्यबुद्धीने काम करणाऱ्या या थोरल्या काळ्यारख्या सालस व्यक्तीशी किती कल्पनातीत अशा कृतघ्न क्षुद्रपणाने वागू शकतात, त्याची यथातथ्य कल्पना यावी. पण वपुंच्याच आग्रहाखातर त्यांच्याच एका जुन्या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती म्हणून विचारात न घेता त्यांचे जे नवे कोरे पुस्तक आहे. ‘कथाकथनांची कथा’ त्याच्या परिचयाकडे आता काहीशा अनिच्छेने पण तरीही उत्साहाने वळले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more