* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: BEYOND UGLY
 • Availability : Available
 • Translators : ULKA RAUT
 • ISBN : 9788184984958
 • Edition : 1
 • Publishing Year : SEPTEMBER 2013
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 228
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
 • Print Books:
DESPITE HER MOTHER’S CONSTANT PHYSICAL AND PSYCHOLOGICAL ABUSE, CONSTANCE BRISCOE HAS GAINED A PLACE AT NEWCASTLE UNIVERSITY TO STUDY LAW A LONG-HELD AMBITION. SHE FINANCES HER STUDIES BY SEVERAL JOBS AT WEEKENDS AND DURING THE HOLIDAYS, INCLUDING WORKING WITH THE TERMINALLY ILL IN A HOSPICE. SHE ALSO FINDS THE MONEY TO PAY FOR SEVERAL COSMETIC SURGERY TREATMENTS IN AN ATTEMPT TO TRANSFORM THE FACE THAT HER MOTHER HAS CONVINCED HER IS UGLY, UGLY, UGLY. WITH THE DEGREE ACHIEVED, CONSTANCE TAKES UP MICHAEL MANSFIELDS INVITATION TO BECOME A PUPIL IN HIS PRESTIGIOUS CHAMBERS. BUT SHE DIDNT FIND THE SUPPORT AND ENCOURAGEMENT SHE EXPECTED.
स्वत:च्या आईनेच कॉन्स्टन्सला ‘तू कुरूप आहेस, कुरूप’ असं म्हटल्याने तिला अनेक यातना झाल्या होत्या. तिचं शारीरिक, तसंच मानसिक शोषण झालं होतं. पण तिची स्वप्नं आणि तिच्या आशाआकांक्षा यांची झेप मोठी होती. तिची जिद्द चिवट व बळकट होती. कॉन्स्टन्सने कायद्याचा अभ्यास करण्याकरिता विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यावर तिच्या पुढे प्रश्न होता तो, खर्चाचा; तो कसा भागवायचा याचा? पण अर्धवेळ छोट्या-मोठ्या नोक-या करून तिने हा प्रश्न सोडवला. त्यानंतर तिला एका चांगल्या, नामांकित कायदेविषयक फर्ममध्ये काम करण्याची संधी चालून आली, पण कॉन्स्टन्सची ही अडथळ्यांची शर्यत सहजसहजी संपली नाही.... केवळ बाह्य सौंदर्याकडे न पाहता; त्यापलीकडे पाहण्याचा संदेश देणारे, अंतर्मुख करणारे कथन.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #BEYONDUGLY #BEYONDUGLY #बियॉन्डअग्ली #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #ULKARAUT #उल्काराऊत #CONSTANCEBRISCOE "
Customer Reviews
 • Rating Starअविनाश मणेरीकर

  `कॉन्स्टन्स ब्रिस्को` या निग्रो स्त्रीने लिहिलेले, तिच्या बॅरिस्टर बनण्याच्या प्रवासातील अनुभवांचे हे पुस्तक आहे.ब्रिटनमध्ये जमैकन माता-पित्याच्या पोटी ती जन्माला आली, परंतु तिला जन्मापासून स्वतःच्या आईकडूनच अवहेलना, अपमान सहन करत संघर्ष करावा ागला. आयुष्यभर एकाकी राहून उच्च शिक्षणाची जिद्द ठेवत तिने सुट्टीत पैसे उभे करण्यासाठी विविध अर्धवेळ नोकऱ्या करुन बॅरिस्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले त्या सार्‍या प्रवासातल्या असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करताना आलेल्या बऱ्यावाईट अनुभवांचे खूप प्रांजल कथन तिने लिहिले आहे. तिच्या आईने जन्मल्यापासूनच तिचे शारीरिक तसेच मानसिक शोषण केले होते. "तूं कुरुप आहेस, कुरुप!" असे हिणवत तिला अनेक यातना दिल्या होत्या. सावत्र बापाने व आईने शारीरिक त्रासही दिला. या सगळ्या संघर्षातूनही तिची स्वप्नं नि आशा-आकांक्षा यांची मोठी झेप तिने जागृत ठेवली. ती ब्रिटनच्या आरंभीच्या काळात नियुक्त झालेल्या नीग्रो स्त्री न्यायाधीशांपैकी एक होती. या लेखिकेने "अग्ली" आणि "बियॉंन्ड अग्ली" अशी दोन पुस्तके लिहून लहानपणीच्या कटूं अनुभवांविषयी जाहीर वक्तव्य केलं. त्यामुळे तिच्या आईने `कॉन्स्टन्स ब्रिस्को` व प्रकाशक `हॉडर अँड स्टॉहटन` यांच्यावर अब्रुनुकसानीची फिर्याद केली. पण हायकोर्टाच्या ज्युरींनी एकमताने `पुस्तकांमध्ये बदनामीकारक काहीही नाही` असा तिच्या बाजूने निर्णय दिला. आपणही हे तिच्या कॉलेज जीवनातील व बॅरिस्टर झाल्यानंतरच्या संघर्षांचे पुस्तक वाचताना कुठेही तिने कोणाचीच बदनामी केल्याचे वाचत नाही. खूप प्रांजलपणे, स्थिर आणि तटस्थ वृत्तीने तिने कुरुपणावर कशी मात केली व एक निग्रो असूनही जिद्दीने ब्रिटनमध्ये बॅरिस्टर म्हणून, न्यायाधीश म्हणून कसे यश मिळवले याचे अंतर्मुख करणारे आत्मकथन मांडले आहे. कॉन्स्टन्सने तिच्या लहानपणीच्या विदारक अनुभवानंतर घरापासून दूर राहून, हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीला नर्सची नोकरी करुन शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान आपल्या कुरुपतेवर मात करण्यासाठी चेहऱ्यावर ओठांची, नाकाची कॉस्मेटिक सर्जरी करुन घ्यायचीच हा निश्चय तिने केला होता, त्यासाठीचा प्रचंड पैसा तिने उभा केला. त्यातून या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करूनही घेतल्या. वकिलाचे शिक्षण घेतानाही हॉस्टेलमध्ये काटकसरीने राहून व सुट्टीत अनेक कामे करून ती पैसा मिळवते व आपले ध्येय पूर्ण करते. लेखिकेने या आत्मकथनात वकिलीच्या शिक्षणादरम्यान आलेले सहाध्यायींचे अनुभव, शिक्षकांसमवेतच्या व हॉस्पिटलमध्ये सेवा देताना रुग्णांसमवेतच्या अनुभवांचे कथन तिने सांगितले आहे.वकिलीची परीक्षा पास झाल्यावर अनुभवांसाठी विविध चेंबर्समध्ये, कोर्टांमध्ये उमेदवारी करताना आलेले वाईट अनुभवही तिने खूप तटस्थ वृत्तीने लिहिले आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणींबाबत वर्णन करताना असो, शिक्षक, सॉलिसिटर्स, सिनियर बॅरिस्टर यांच्याबाबत असो, तिचे कथन हे कुठेही उद्वेगाने, निराशाजनक वां नकारात्मक दिसत नाही. ती लहानपणापासूनच सतत अवहेलना, अपमान सहन करूनही, संघर्ष करत जीवन जगत असूनही या सार्‍या जीवनप्रवासाचे अनुभव सांगताना तिच्या मनांत कडवटपणा, निराशा,दुसऱ्याबद्दल द्वेष असं कुठेही वाचनांत येत नाही. या सर्व आत्मकथनाचं वाचन करतानाच आपण लंडन व आजूबाजूच्या परिसराचे वर्णन, तिथल्या चेंबर्समधील असलेले राजकारण, हॉस्पिटलमधील व्यवस्था, शहरांमधील समाजजीवन याचेही ओघवते वर्णन लेखिकेने केले आहे. तिच्या कॉस्मेटिक सर्जरीच्या दरम्यानचे विस्तृत वर्णनही तिने वाचकांसमोर ठेवले आहे. "बियॉन्ड अग्ली" हे एका निग्रो बॅरिस्टर स्त्रीचे पुस्तक वाचताना अंतर्मुख व्हायला होते, पण संपूर्ण पुस्तकात आलेले प्रसंग, घटना याचे वर्णन ती इतक्या सहजतेने मांडताना आढळते की, मित्राकडून मिळालेले प्रेम व त्यानंतरचा विश्वास घात याबाबत ती सहज सांगते तर सहकारी वकीलाबरोबर काम करताना, संवादातून निर्माण झालेली जवळीक व त्यातून ती गरोदर राहते याचेही वर्णन ती ओघाओघानेच करते. रुग्णांकडून आलेले वाईट अनुभव असोत, चेंबर्समध्ये टेनन्सी मिळवताना सहकारी बॅरिस्टरांचे आलेले वाईट अनुभव असोत वां आई व सावत्र बापाकडून झालेल्या छळाचे, अपमानाचे अनुभव असोत त्याबाबत सांगताना कुठेही कटुंता, सूडभावना तिच्या मनात असलेली दिसत नाही. पुस्तक वाचताना आपल्या हाती नसलेल्या कुरुपतेच्या गंडावर मात करताना, घरातूनच निर्माण झालेल्या संघर्षावर मात करताना तिने दाखवलेली जिद्द, चिकाटी यामुळे आपण स्तिमित होतो. हे पुस्तक केवळ बाह्य सौंदर्याकडे न पाहतां, त्यापलीकडे पहाण्याचा व तेही सकारात्मक वृत्तीने पाहण्याचा संदेश देते. लेखिकेच्या भावनांचा सहजसुंदर अनुभव मराठीतून अनुवादिकेनेही खूप ओघवत्या शैलीत मांडला आहे. पुस्तक जरुर वाचावे असेच आहे! ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book