* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIMUKTA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668117
  • Edition : 3
  • Publishing Year : 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :DADASAHEB MORE COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SATYA WAS DISTURBED. HE FELT THAT DHAMNYA HAD INSULTED THE `PANCHAYAT`. ALL THE PEOPLE GATHERED THERE WERE MURMURING AMONG THEMSELVES. THE WOMEN AND THE KIDS WERE GIVING HORRIBLE LOOKS TO LACHCHI, AS IF SHE WAS A VAMP. BUT LACHCHI WAS LOOKING SATISFIED WITH HERSELF. SANTYA CLEARED HIS THROAT, HE SHIFTED IN HIS SEAT, AND STARTED HIS SPEECH; "THE WORK DHAMNYA AND LACHCHI HAVE DONE IS VERY DISGUSTING. THEY HAVE INSULTED OUR COMMUNITY. THEY TOOK GULAB`S MONEY AND THEN VERY CONVENIENTLY HE KEPT HIS WIFE WITH HIM. WHAT IF THIS PRACTICE PREVAILS? THEN NOBODY WILL BELIEVE ANYTHING, THE WORD FAITH WILL HAVE NO MEANING AT ALL! IT WILL BE AGAINST THE INTEREST OF OUR COMMUNITY IF ALL THE MEN AND WOMEN START BEHAVING IN A WAY TO PLEASE ONLY THEMSELVES. SO, I HEREBY ORDER THAT DHAMNYA SHOULD GIVE HIS TENT WITH ALL THE BELONGINGS TO GULAB AND SHOULD LEAVE AT ONCE WITH HIS WIFE AND FAMILY WITHOUT CARRYING ANYTHING ELSE BUT THE CLOTHES THAT THEY ARE WEARING. THEY ARE FREE TO GO ANYWHERE. HEREAFTER DHAMNYA, HIS WIFE AND HIS CHILDREN ARE FORBIDDEN TO HAVE ANY CONTACT IN ANY FORM WITH OUR COMMUNITY. AFTER HEARING SANTYA`S DECISION, EVERYONE ROSE TO GO HOME. LACHCHI AND DHAMNYA FOLD HANDS OF THEIR CHILDREN AND STARTED IN THE DIRECTION OF THE CITY. ALL THE MEN AND WOMEN, CHILDREN WATCHED THEM, THEY WERE THUNDERSTRUCK. BUT LACHCHI AND DHAMNYA HAD OTHER THOUGHTS IN THEIR MINDS, THEY WERE HAVING CERTAIN SHINE ON THEIR FACES. THEIR CHILDREN WERE WALKING VERY CLOSE TO THEM. LACHCHI AND DHAMNYA DID NOT CAST EVEN A GLANCE AT THE PEOPLE GATHERED THERE. NOW THEY WERE FREE FROM THE WORN OUT TRADITIONS OF THEIR COMMUNITY. THEY BID THEIR FINAL GOOD BYE TO THE CULTURE, THE TRADITION AND THE PEOPLE. THEY STEPPED FORWARD TOWARDS DAWN, THEY LURCHED FORWARD A STEP TOWARD HUMANITY, TOWARDS BEING HUMAN.
संत्या फारच अस्वस्थ झाला होता. धमन्याने जातपंचायतीचा घोर अपमान केला आहे, असेच त्याला वाटत होते. तेथील सर्वच माणसांत कुजबूज सुरू होती. एखाद्या हडळिणीकडे बघावे, तसे बायका, मुलं लच्छीकडे बघत होती. लच्छीच्या चेहNयावर मात्र समाधान दिसत होते. संत्या नीट सावरून बसला. खाकरून त्याने घसा साफ केला आणि निर्णय देऊ लागला, ‘‘धमन्या व लच्छीनं जातीला काळं फासाचं काम केलंय... जातपंच्यातीचा आवमान केलाय... गुलब्याचं पयसं घेतलं ती घेतलं... आणिक बायवूÂबी घरात ठिवून घितली... उंद्याच्याला आपल्या जातीत आसच व्हुया लागलं तर... येकमेकांच्या सबदावर कोण सुदीक इस्वास ठिवणार न्हाय.. परत्येक घरातील बाया, माणसं... मनाला यील तसं वागत्याली... ही जातीच्या हिताचं न्हाय... तवा धमन्यानं... आपलं पाल... आशील त्या... सामानसुमानासकट... गुलब्याच्या ताब्यात देवावं... आणिक
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIMUKTA #VIMUKTA #विमुक्त #SHORTSTORIES #MARATHI #DADASAHEBMORE "
Customer Reviews
  • Rating StarAnil Bhalerao

    विमुक्त हा कथासंग्रह वाचताना मन हेलावून गेलं, आपण संगणक युगात वावरत असताना आज आपले बांधव परिघाबाहेर चाचपडत आहे, यातील कथा सत्य असल्याचे लेखक सांगतात.

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 02-12-2007

    उपेक्षितांच्या व्यथा - वेदनांचे हुंकार… ‘गबाळ’ या आत्मकथनाद्वरे कुडमुडे जोशी जमातीच्या सुखदु:खांचा पट उलगडून दाखवणाऱ्या दादासाहेब मोरे यांनी अन्य भटक्या विमुक्त जमातींच्या व्यथा-वेदना प्रकट करण्यासाठी कथालेखन केले. त्यांच्या १४ कथांचा विमुक्त हा संगरह आहे. मोरे यांनी आपल्या मनोगतात भारताच्या विषम समाजव्यवस्थेतील शेवटचा घटक म्हणूनही भटक्या विमुक्तांना समाजव्यवस्थेपासून दूर ठेवण्यात आलेले आहे. गावगाड्यातील उत्पादन प्रक्रियेमध्ये भटक्या विमुक्तांना सामावून घेण्याचे टाळले गेले आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी या भटक्या जमातीजमतींना सतत फिरावे लागते आणि आध्यात्मिक भटके, मनोरंजन करणारे भटके तसेच जनावरांच्या पालनपोषणासाठी वणवण फिरत राहणारे भटके म्हणून जीवनपद्धतीचा अवलंब करून आपले अस्तित्व टिकवून धरणे क्रमप्राप्त ठरले; आता पारंपारिक व्यवसाय कालबाह्य झाल्यामुळे भटक्या विमुक्तांच्या पारंपारिक कौशल्याचे महत्त्व संपुष्टात आले. भटक्या विमकुक्तांना त्यामुळे उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. अशा एकूण ४२ भटक्या विमुक्त जाती आहेत. त्यामधील बारा-तेरा जमातींचे वास्तव जीवन रेखाटण्यासाठी या कथा मोरे यांनी लिहिल्या आहेत. डॉ. भालचंद्र फडके यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटले आहे. विशेषत: भटक्या विमुक्त समाजातील माणसे, उघड्यानागड्या अवस्थेत आदिमानवाचे जीवन गडद काळोखात जगत आहेत. लाचारपणे भीक मागत. माणसापेक्षा जनावरांच्या संगतीत राहून अन्नाच्या शोधात भटकत आहेत. कुरणशोधक भटके, अन्नशोधक भटके, चरण भटके, आध्यात्मिक करमणूक करणारे भटके, यांना गाव नाही, घर नाही, जातीजमातींच्या, जातपंचायतीच्या तुरुंगात ते बंदिस्त आहेत. भाकरीच्या शिळ्या तुकड्यासाठी त्यांना दारोदार लाचार होऊन भटकावे लागते. या जमातींमध्ये आजही जातपंचायत सर्वांवर अधिकार चालवते. जातिबहिष्कृत होण्याचे भय सर्वांना वाटते. जातपंचायतीचा न्याय सर्वांना शिरोधार्थ मानावा लागतो. त्यानुसार वागावे लागते. लग्न घटस्फोट याबाबत जातपंचायतीचा अधिकार चालतो. आपापसातले तंटे सोडवण्याबाबत जातपंचायतीचा निर्णय अखेरचा ठरतो. जातपंचायतीची न्यायदानाची व्यवस्था जातबहिष्कृतीच्या भयावर टिकून राहिलेली असते. वाळीत टाकले जाणे ही सर्वात भयंकर शिक्षा ठरते, पुन्हा जातीत येण्यासाठीही जातपंचायतीचे काही दंडक असतात. त्यानुसार दंड भरणे, जमातीतील लोकांना मेजवानी देणे, मद्य पाजणे वगैरे गोष्टी केल्यावर पुन्हा जातीत घेतले जाते. ‘विमुक्त’ या पहिल्याच कथेत अशा जातपंचायतीच्या जाचातून स्वत:ला मुक्त करून घेण्याचा बाणेदारपणा दाखवणाऱ्या लच्छीची गाठ पडते. धमन्याला त्याच्या पोराच्या ऑपरेशनसाठी गुलब्या पैसे देतो. त्या मोबदल्यात पैसे परत मिळेपर्यंत धमन्याच्या बायकोला- लच्छीला गहाण म्हणून गुलब्याकडे राहावे लागते. परंतु ही लच्छी पैसे फिरण्याच्या आधीच गुलब्याच्या घरातून बाहेर पडते आणि धमन्याबरोबर व मुलांबरोबर राहू लागते. तेव्हा गुलब्या जातपंचायतीत लच्छीविरुद्ध दावा गुदरतो. धमन्याला त्याचे जातवाले विचारतात, ‘पैकं न्हाईत तर बायकूला गुलब्याकडे धाड आणि जातपंचायतीच्या विरुद्ध कृती केल्याबद्दल दंड भर.. नाहीतर तुला जातीतनं वाळीत पडावं लागेल.’ लच्छीही म्हणते, ‘मी गुलब्याकडे जाणार न्हाय, त्येनं पयशाच्या बदल्यात माज्या पालातलं आशील-नशील ते घेवावं. आमी अंगावरच्या कापडासकट ऱ्हायला तयार हायं.’ जातीपंचायत रात्रभर खल करते. बुजूर्ग सरपंच संध्या काळे निर्णय देतात, ‘धमन्या बायकूबी घरात ठेवून घेतली. उद्याच्यात आपल्या जातीत आसंच बहुधा लागलं तर... एकमेकांचया सबदावर कोणसुदिक इस्वार ठिवणार न्हाय... तवा धमन्यानं आपलं पाल... गुलब्याच्या ताब्यात देवावं... अंगावरच्या कापडासकट आपल्या बायकूपोरास्नी घिऊन कुटंबी जावावं. त्यांचा आणि त्यांच्या बायकू पोरांच्या जातीशी कसलाच संबंध न्हाय. लच्छी आणि धमन्या मग शहराकडे निघतात. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज असते. लेखक शेवटी म्हणतो, ‘लच्छी आणि धमन्या यांनी पालाकडे वा तेथील माणसांकडे ढुंकूनही पाहिले नाही... ते आपल्या जातीच्या, आदिम परंपरापासून, दुष्ट रूढींपासून मुक्त झाले होते. जातीच्या, जमातीच्या बंधनांनाच नव्हे तर जातीजमातीच्या चौकटींना कायमचा रामराम ठोकून, माणूस म्हणून जगण्यासाठी जात होते, त्याचवेळी सूर्य उगवत होता. ही कथा जातीजमातीच्या मर्यादांना झुगारून देून नव्या युगात प्रवेश करू करण्याला प्रेरणा देते. नव्या वास्तवाचे मान देते. बंदिस्त परंपरागत विचारसरणीला आणि समाजव्यवस्थेतील मूल्यप्रणालीला नाकारून स्वत:च्या अस्तित्वाला नवा संदर्भ, नवा आशय देण्यासाठी प्रवृत्त करते. तशा कृतीचा गौरव करते. भटक्यांना आपापले परंपरागत व्यवसाय करणेही आता सोपे राहिलेले नाही. हेही या कथांमधून अधोरेखित करण्यात आले आहे. कंजारभाट हातभट्टी लावून दारू तयार करतात आणि ती विकतात. पोलिसांना हप्ते देतात, चोरून व्यवहार करतात. पण कधी हप्ता चुकला म्हणून तर कधी नवीन आलेले ऑफिसर आपले वर्चस्व दाखवायचे म्हणून हातभट्ट्यांवर छापे घालतात. तयार माल जप्त करतात किंवा फेकून देतात. पोलीस स्टेशनवर तरण्याताठ्या लक्षीला रात्रभर डांबून ठेवले जाते. तिचा बाप भानुदास तिला सोडवायला येतो, तेव्हा तिचा चोळामोळा झालेला असतो. बाबा, गिधाडांनी मात केला माझा म्हणून ती ओक्साबोक्शी रडू लागते. (धंदा) पारध्यांवर चोरीचा आळ घेणे सर्वात सोयीस्कर. कापड चोरल्याच्या केवळ संशयावरून राहिला लोक पकडतात. पारध्यांच्या पालावर गावकरी चाल करून येतात. तुटून पडतात. सरपंच राहिला चावडीत डांबून ठेवतो. माराने अंग ठणकत असते. ‘चार घरं मागून पोट जाळावं म्हटलं तर शिव्यांचा भडीमार, मार. हेच नशिबात लिहिलेले. या जातीत जन्माला आलो हाच आपला गुन्हा ठरला. चोरी करूनही चोर; न करूनही चोर... ही माणसं आपल्याला चांगल्या माणसासारखं का जगू देत नाहीत? असा प्रश्न पारधी महिला, एकमेकींना विचारतात. पारध्यांना आपली पालं त्या गावातून उठवावी लागतात. आपले चंबूगबाळे आवरून गाढवावर लादून दुसऱ्या गावी जावे लागते. (अंधारातील प्रवास) अस्वलाचा खेळ करणाऱ्या कमल्याची अस्वलीण रंगी मरण पावते. नवीन अस्वलाला शिकवून तो पहिलाच खेळ करतो. तर ते अस्वल त्याच्या मुलाला ओरबाडून काढते. मुलगा जखमी होतो. प्रेक्षक चार पैसेही टाकत नाहीत. उलट अस्वलवाल्याच्याच वस्तू पकडून नेतात... (अस्वलाचा खेळ) पिढीजात धंदा करतानाही प्रशिक्षण लागतेच. ‘शिक्षण’ मधला सुभाष पहिल्यांदाच खिसा कापण्याचे प्राथमिक धडे घेऊन बापाबरोबर प्रात्यक्षिक करू लागतो. ‘ह्या तिरंगायला नीट येत नाही. उद्या पोटाला काय बिंब घालणार हाय व्हयं?’ असें म्हणत त्याला बापाने मारून मुटकून तयार केलेला, पत्ती (ब्लेड) नीट धरता येत नाही म्हणून फ़ैलावर घेतलेला सुभाष... बापाबरोबर बाजारात जाऊन सावज हेरतो... एका माणसाचा फुगलेला खिसा पाहून पॅन्टच्या खिशावर पत्ती मारतो... हातात पाकिट येते... पण त्यात कागदपत्रे मिळतात. पैसे किरकोळच मिळतात. बाप लगेच त्यांचे सांत्वन करतो. ‘वाईट वाटून घेऊ नकोस. एकदा ही कला चांगली जमली म्हणजे एकाच्या न्हायीतर दुसऱ्याच्या खिशाला माल घावेल... एकटा तो खिसा कापू पाहतो. पण पकडला जातो. कसाबसा तो पळ काढतो. लपून बसतो. संध्याकाळी हा सुभाष घरी येत नाही म्हणून सर्वजण चिंता करतात. तो येतो... काहीच हाती लागलं न्हाई म्हणून तो हबकलेला असतो. बाप, त्याला सांगतो, ‘आरं मग. भितुयास कशापाय? त्येंच्या हातातनं सुटून आलास... ही काय थोडं न्हाय. तू आज बरंच शिकल्यासारखं हायं. दुसऱ्या दिवशी तो आत्मविश्वासानं दुसऱ्या बाजारला जायला तयार होतो... (शिक्षण) म्हातारा संत्या आपल्या केसांनी मोठा दगड उचलण्याचा खेळ दाखवू पाहतो. पण त्याला ते जमत नाही. त्याची प्रेक्षक मग टवाळी करतात. (निर्धार) कोटीत पहिल्यांदाच गेलेल्या कमलीला कोठीची मालकीण सांभाळून घेते, पाणी दे... पान दे... अशी कामे सांगून सांजच्याला २० रुपयांची नोट तिच्या हातावर ठेवते... ती रात्री कृष्णा नदीत उडी मारून आपले जीवन संपवते. (अभागी कमल) ...अशा विविध व्यक्तिरेखा, विविध समस्या लेखकाने कथारूपात मांडल्या आहेत. भटक्या , विमुक्तांना मानाने, कष्ट करून प्रामाणिकपणे जगायचे आहे. जातपंचायतीच्या अनिष्ट प्रभावापासून मुक्त व्हायचे आहे... माणूस म्हणून जगायचे आहे... न्यायासाठी समतेचा लढा द्यायचा आहे... हे या कथांद्वारे वाचकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो