* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NO COME BACKS
  • Availability : Available
  • Translators : VIJAY DEODHAR
  • ISBN : 9788171612083
  • Edition : 2
  • Publishing Year : SEPEMBER 1992
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 482
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HERE ARE TEN SUSPENSEFUL, SERPENTINE STORIES OF BETRAYAL, BLACKMAIL, MURDER, AND REVENGE...ALL CULMINATING IN SHOCKING TWISTS OF FATE. WITHIN THESE PAGES LIVE A WEALTH OF CHARACTERS YOU WILL NOT SOON FORGET...PEOPLE WHOSE LIVES BECOME IRREVOCABLY TRAPPED IN A WORLD OF NO COMEBACKS, BEYOND THE POINT OF NO RETURNXFROM THE MANIPULATORS AND THE MANIPULATED TO THE ULTRA-RICH CAPABLE OF BUYING AND SELLING HUMAN LIVES, TO THE EVERYDAY MAN MANEUVERED BY CIRCUMSTANCES INTO PERFORMING DEADLY ACTS OF VIOLENCE.
मार्क सँडरसन : एक अतिशय श्रीमंत, लक्षाधीश उद्योगपती. पण एकाकीपणा हे त्याला सतत टोचणारं शल्य होतं. अशातच रूपसुंदर अँजेला समर्स त्याच्या आयुष्यात आली. पण... पण ती विवाहीत होती. हवी ती गोष्ट काहीही करून मिळवायचीच हा मार्कचा स्वभाव! आपल्या प्रियतमेच्या प्राप्तीसाठी तिच्या नव-याचा काटा काढायचा अत्यंत योजनाबद्ध कट त्यानं आखला... पण प्रत्यक्षात काय घडलं? सॅम्युएल नटकिन : एक सामान्य कारकून. बायकोच्या आजारपणामुळे शरीरसुखाला पारखा झालेला! ही भूक भागवण्याची एक अकल्पित संधी एक दिवस त्याच्यासमोर आली... पण क्षणिक विषयसुखाच्या मोहापायी तो महाबिलंदर ब्लॅकमेलर्सच्या जाळ्यात सापडला...! त्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली का? टिमोथी हॅन्सन : लंडनमधला एक धनाढ्य लक्षाधीश. असाध्य दुखणं जडल्यामुळे मृत्युपत्राद्वारे आपली अफाट संपत्ती त्यानं आपल्या एकमेव नावडत्या बहिणीच्या नावे केली... पण नंतर काय घडलं? हायजॅकर मर्फी : ब्रँडीच्या नऊ हजार बाटल्या चोरून हजारो पौंड्स कमावण्यासाठी हायजॅकर मर्फीनं एक अफलातून घाट घातला. त्यासाठी एक अख्खा जॅगरनॉट ट्रेलर त्यानं चक्क पळवून नेला...! त्याचा तो धाडसी बेत यशस्वी झाला का? हर्बर्ट र्लािकन : जुनं घर पाडून त्याच्या मोबदल्यात नवीन घर दिलं जात असतानाही हर्बर्ट र्लािकन आपलं घर सोडायला तयार नव्हता, म्हणून डब्लिन सिटी कौन्सिलनं या हट्टी म्हाता-याला बळजबरीनं त्याच्या घरातून बाहेर काढलं. त्याचं घर पाडण्यात आलं तेव्हा घरातल्या एका भिंतीमधून एका स्त्रीचा मृतदेह बाहेर पडला! कोण होती ती?... र्लािकनची बायको?... म्हणून तो आपलं जुनं घर सोडायला तयार नव्हता का? वेडी अभिलाषा, खून, फसवणूक, सूड, अलौकिक बुद्धिचातुर्य अशा विविध रहस्यांनी ओतप्रोत भरलेल्या सनसनाटी दहा रहस्यकथांचा जबरदस्त कथासंग्रह. नो कमबॅक्स स्टार्ट टू फिनिश – टोटल सस्पेन्स!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #THEFISTOFGOD #THEAFGHAN #NOCOMEBACKS #दफिस्टऑफगॉड #दअफगाण #नोकमबॅक्स #ANILKALE #BALBHAGWAT #VIJAYDEODHAR #अनिलकाळे #बाळभागवत #FREDERICKFORSYTH #फ्रेडरिकफॉरसाइथ"
Customer Reviews
  • Rating StarVandana Abhade

    Electrifying tales by Frederick Forsyth. जरूर वाचा

  • Rating StarAnil Udgirkar

    लेखकाचा अतिशय रोमहर्षक कथा सन्ग्रह,कल्पक व वाचनिय।

  • Rating StarKiran Borkar

    दहा अतिशय गाजलेल्या रहस्यकथा . प्रत्येक कथा वेगळी आणि अनपेक्षित शेवट असणारी . एकदा वाचायला घेतलेली कथा पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक खाली ठेवूच शकणार नाही .

  • Rating StarLOKPRABHA 10-04-2015

    वाचनीय रहस्यकथा… रहस्यकथांचं गमक हे त्यातलं रहस्य शेवटपर्यंत वाचकाला तर्क करायला लावणं आणि अखेरीस वेगळंच सत्य समोर आणण्यात येतं. प्रसिध्द लेखक फ्रेडी फोर्सिथ यांच्या `नो कमबॅक्स` या रहस्यकथा संग्रहात अशीच दहा सनसनाटी कथानकं मांडली आहेत. गर्भश्रीमत उद्योगपतीने प्रियतमेसाठी आखलेला कट, क्षणिक विषयसुखासाठी ब्लॅकमेकर्सच्या जाळ्यात अडकलेला कारकून, धनाढ्य व्यक्तीच्या मृत्युपत्रानंतर त्याच्या अफाट संपत्तीचं काय घडतं, ब्रँडीच्या नऊ हजार बाटल्या चोरण्याचा बेत अशा एकापेक्षा एक थरारक कथा या संग्रहात आहेत. अनुवादकाराने स्वैर अनुवादाची सोपी शैली वापरली असल्यामुळे सर्वसामान्यांनादेखील या कथा आकर्षित करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more