* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662955
  • Edition : 17
  • Publishing Year : OCTOBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
  • Discount : OCTOBER EXHIBITION 2026(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERY UPSET MIND SHOULD PEEP WITHIN. HE OR SHE WILL FIND A RESTLESS AND WRETCHED BEING THERE, JUST MOVING TO AND FRO. A HUMAN LIFE, SUCCESSFUL OR NOT, BIG OR SMALL, WILL ALWAYS HAVE A FEELING OF NOT GETTING OR ACQUIRING SOMETHING WHICH HE WANTS, DESERVES. HE IS ALWAYS FULL OF DISCONTENT AND FEELS THAT HE DESERVES MUCH MORE BETTER IN LIFE WHICH HE IS DEPRIVED OF. THIS FEELING TEASES HIM, SHAKES HIM AND TORTURES HIM. BEHIND EVERY DEPRESSION, BIG OR SMALL, EGO IS THE MAIN CAUSE WHICH PLAYS A VERY IMPORTANT ROLE. UNLESS AND UNTIL, WE SHADE OFF THIS EGO, NO AMOUNT OF BLESSINGS WOULD PULL US OUT OF OUR GRUMPY MIND. HOW DO WE COME OUT OF DEPRESSION? HOW WOULD THE BLESSINGS REACH OUR MIND FULL OF EGO? UNLESS AND UNTIL, THE GLASS IS EMPTY HOW CAN WE REFILL IT? POET SHANTARAM CAPTURES THIS FEELING IN PERFECT WORDS, HE SAYS, "THE ONE WHO SMILES, DRINKS NECTAR`; HOW TRUE IS THIS. ONCE YOUR EGO IS EXTINGUISHED THEN WHAT REMAINS WITH YOU? ONLY HAPPINESS AND GOOD HEALTH OF BODY AND MIND TOO. WE ARE THE WORST OBSTACLE FOR THE PEACE OF OUR MIND. IT IS VERY IMPORTANT TO REMOVE THIS OBSTACLE FROM OUR MIND. IN KABIR`S WORD THIS IS "SAHAJYOG`, SOMETHING ACHIEVED EASILY IN THE SIMPLEST MANNER. THE MOMENT THIS EGO IS BURNT, LIFE ENVELOPES INTO A SERENITY. YOUR OWN HOUSE WILL BECOME AN ABODE, WHEREVER YOU MOVE WILL PROVE TO BE A HOLY PLACE. BUT NOT UNLESS YOUR EGO IS SHADE OFF COMPLETELY, TOTALLY, TILL THEN NO MATTER HOW MANY BLESSINGS YOU ACQUIRE, IT WILL BE IN VAIN.
प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासीन्यामागं एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादानं कोणती शांती मिळणार? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांडं रिकामं हवं, तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत ते सांगितलं, ‘जो हसला, तो अमृत प्याला’ हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे संपला की, स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वत:च येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर ह्यालाच ‘सहजयोग’ म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथंजिथं विहार कराल, तेते तीर्थस्थळ. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarAnjali Barsawade

    मोठे विचार सोप्या शब्द BANDHANI

  • Rating StarApeksha Kulkarni

    मस्त

  • Rating StarRevati Thakre

    दर वेळी एक वेगळा अनोखा अनुभव तरी मजा येते

  • Rating Starनिशा राकेश

    khup mast..vapu chya pustakanchi parayan jhalit....one of my favorite

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
मिना हरीश सहारे, नागपूर.

कुठल्याही पुस्तकावर अभिप्राय देण्याची माझी ही पहिलीच वेळ असली तरी `दुर्दम्य` पुस्तक मनाला भिडल्यामुळे त्यावर लिहीणे मला आवश्यक वाटले. मी पण चरित्रनायक एकनाथनच्या विभागात सेवा दिली आहे. आमच्या सारख्यांना एकनाथन एक कडक तानाशाह ऑफिसर होता इतकंच माित होतं. पण लेखकाच्या नजरेतून जेव्हा त्याचे चरित्र वाचले तेव्हा तो खरा काय होता हे समजले. चरित्र वाचताना पूर्ण होई पर्यंत उत्सुकता कायम होती. कार्यालयीन जीवनातला कालखंड डोळ्यासमोर जिवंत होतो. वाचकाला खिळवून ठेवण्याचं कसब लेखकाच्या लिखाणात आहे.एकनाथन सारख्या विक्षिप्त, हेकेखोर व्यक्तीचा व लेखकाचा नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असला पाहिजे. निवृती नंतरफिरून तीनदा लेखकाच्याच शहरात येणे हा योगायोग वाटत नाही. कथानकातील काही भागातील प्रसंग व घटना मजेशीर, गमतीदार वाटतात. कथेचा शेवट मनाला भिडून जातो. एका करारी, खंबीर माणसाचा अंत वाचताना मन भरून आले. पुस्तक पूर्ण केल्यावर शेवटी एक विचार आला की त्याचं मरण सुखदच झाले असे म्हणावे लागेल कारण एकाकीपणा जरी त्यांनी स्वतः निवडला होता तरी मृत्यूच्या बाबतीत भाग्याने त्यांची साथ दिली होती. त्यांच्या सारखे ताठ कणा व दुर्दम्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिला परावलंबी, असहाय आयुष्य कधीच रूचलं नसतं आणि त्या नंतर आलेल्या करोना काळात त्यांचे काय हाल झाले असते त्याची कल्पनाच न केलेली बरी. कथानक वाचकाच्या मनाला भिडले यातच लेखकाचे यश आहे. पुढील लिखाणा करता शुभेच्छा. बाकी माझ्याकडून पुस्तकाचा दर्जा - खूप छान, बढिया आणि सुपर्ब... ...Read more

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more