* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE COUPLES SOUL
  • Availability : Available
  • Translators : Awanti Mahajan
  • ISBN : 9788184981353
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 248
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THESE INTIMATE, INSPIRING AND TRUE LOVE STORIES PAY TRIBUTE TO LOVE`S ABILITY TO ENDURE BEYOND TIME, DISTANCE, DIFFICULTY, AND EVEN DEATH. YOU WILL BE TOUCHED AND UPLIFTED AS YOU READ ABOUT THESE COUPLES AND THEIR SECRETS TO FINDING LOVE AND MAKING IT LAST. EACH HEARTFELT STORY CAPTURES THE DEFINING MOMENTS OF LOVE FROM TENDER BEGINNINGS AND DEEPENING INTIMACY TO OVERCOMING CHALLENGES AND SAYING GOODBYE. SOME STORIES WILL HELP YOU RENEW THE PASSION IN YOUR RELATIONSHIP; OTHERS WILL HELP YOU APPRECIATE HOW LOVE HAS ENABLED YOU TO GROW; AND OTHERS WILL REASSURE YOU THAT ALTHOUGH LOVE CHALLENGES AND BLESSES EACH OF US IN UNIQUE WAYS, YOU ARE NEVER ALONE IN YOUR EXPERIENCE. CHICKEN SOUP FOR THE COUPLE`S SOUL IS FOR ANYONE WHO HAS EVER BEEN IN LOVE, IS IN LOVE NOW, OR HOPES TO BE IN LOVE IN THE FUTURE. THESE STORIES WILL LEAVE AN INDELIBLE IMPRINT ON YOUR HEART AND INSPIRE YOU TO LIVE A LIFE FILLED WITH JOY, HOPE AND GRATITUDE.
चिकन सूप फॉर दि कपल्स सोल देवानी गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पृथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? त्याच्या या कथा! एकांड्या आयुष्यात दुसयाचा प्रवेश झाला, की जावनाचे आयाम बदलतात. मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्नं पुÂलतात. रोमान्स, स्पूÂर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्र्ष आला संकटं आली! एकमेकाच्या मदतीनी त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते. प्रेम कार्यप्रवण बनवतं प्रेम व्यक्तीला स्वतंत्र करतं. कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं कधी आत्मभान जागृत करतं! एकमेकाला गृहीत धरलं तरी एकमेकाचा आदर करायला शिकवतं. मुरलेलें प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. हळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं. कुटुंबसमाज अशा अवघ्या पसाNयात स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवृृत्त करतं. पतीपत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या पण आजही तितक्याच ताज्या वाटणाया कालातीत! देशातीतही. फरक फक्त संस्कृतीचा आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणाया! कपल्ससाठी असणारं हे ‘चिकन सूप’, ‘तुमचं आमचं सेम असतं’ याची प्रचीती देणाया’! अवंती महाजन
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SUNITIKANE #SUPRIYAVAKIL #SHYAMALGHARPURE #AVANTIMAHAJAN
Customer Reviews
  • Rating StarSAKAL 26-9-2010

    एकदा विवाह झाला, की आपल्या आयुष्याचं परिमाण बदलून जातं. आधी आलेल्या समस्यांना आपण एकटे तोंड देत असतो; पण आता ते मिळून द्यायचं असतं. त्या वेळेस आपण नातं कसं निभावतो त्याच्या या कथा आहेत. या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. मूळ इंग्रजी पुस्तकाा अवंती महाजन यांनी मराठीत अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK GAONKARI 13-2-2011

    या पुस्तकाचे लेखन व संकलन पाच लेखकांनी मिळून केलेले आहे. या पुस्तकात प्रेम आणि नातेसंबंधाच्या प्रेरणादायक कथा दिलेल्या आहे. पाश्चिमात्य कुटुंबामध्ये पती-पत्नीच्या नात्यांमध्ये दृढता नसते. या आपल्या सार्वजनिक गैरसमजाला हे पुस्तक वाचून तडा जातो. त्याच्ातील प्रेमाच्या खोलीचं आणि उंचीचे उत्कट दर्शन पुस्तकातून होते. छोट्या-छोट्या मार्मिक गोष्टींमधून पती-पत्नीच्या प्रेमाचे इंद्रधनुष्य लेखकांनी आपल्यापुढे खुलवले आहे. या कथा वाचून या पश्चिमात्य लोकांच्या नसून आपल्या आयुष्यात, आसपास घडणाऱ्या घटना आहेत, असेच वाटते. हसत हसत विचारात टाकणारे मार्गदर्शनपर असे हे पुस्तक आहे. कुटुंब संस्थेचा शोध घेण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे. प्रेम, आदर, त्याग, ताणतणाव, संघर्ष सगळ्यांची सरमिसळ आहे. हे पुस्तक वाचून आपल्या सहचराच्या पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडावे, असे वाटते. पती-पत्नीपेक्षा एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून पाहण्याची नवी दृष्टी आपल्याला मिळते. लेखकाने काही ठिकाणी जीवन जगण्याचा संदेश देणारी विचारवंताची वक्तव्ये/विचार दिलेले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more