* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: DAVABINDU
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662436
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FROM WHERE DO THESE SEEDS FOR STORIES COME? THEY COME FROM ALL DIRECTIONS. THEY COME FROM SELF EXPERIENCE, THEY COME FROM SOMETHING HEARD. MANY OF THE EXPERIENCES CARRY THESE SEEDS. BUT NOT ALWAYS ARE THEY GERMINATED. WHY? THAT IS BECAUSE OF THE LACK OF CAPACITY TO FERTILIZE A SEED. SEED IS ALWAYS FRUITFUL. BUT THE BEARER MAY NOT BE SO... I AM NOT AN EXCEPTION TO THIS RULE. SOMETIMES, WHEN A PERSON IS SLEEPING SOUNDLY SOMETHING PRICKS HIM INTENSELY. WHICH AWAKENS THE SENSATIONS, GET ENGULFED IN IMAGINATION, FEELINGS AND THOUGHTS AND TAKES BIRTH AS A STORY. I HAVE BEEN WITNESSING THIS FOR THE PAST 50 YEARS. DURING THE INITIAL PHASE OF A DECADE OR TWO I WAS A SLOW LEARNER I WAS TRYING TO WALK BUT WAS OFTEN STUMBLING. BUT I HAD A NEVER ENDING STREAM OF ENTHUSIASM IN ME. AFTER THESE 50 YEARS, THAT STREAM IS STILL THERE WITH ME BUT THE FLOW IS NOW VERY WEAK. THIS COLLECTION OF SHORT STORIES REFLECTS SOME OF MY STORIES WHICH WERE A REFLECTION OF MY IMAGINATION, THOUGHTS AND FEELINGS ONLY IF MY STORIES GIVE INNOCENT HAPPINESS TO SOME, HAPPINESS OF READING GOOD LITERATURE TO SOME, ASSURANCE TO SOME THEN I WILL CONSIDER MYSELF VERY LUCKY.
‘...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून तो सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चारदोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा अनेक अनुभवांत कथाबीजं लपलेली असतात; पण ती सारीच फुलवण्याचं सामथ्र्य पुष्कळांच्या अंगी नसतं. मीही त्याला अपवाद नाही. झोपलेलं माणूस एकदम काही तरी टोचल्यामुळं जागं व्हावं, त्याप्रमाणं ज्या अनुभूतीनं संवेदना सचेतन होते आणि कल्पना, भावना आणि विचार यांच्या त्रिवेणी संगमानं न्हाऊ लागते, तीच पुढं स्वत:ला हवं तसं कथारूप धारण करू शकते. अशा रीतीनं गेली पन्नास वर्षं मी कथापंढरीचा वारकरी राहिलो आहे. पहिल्या दहावीस वर्षांत मी तरुण वारकरी होतो. चालण्यात काय किंवा अभंग आळवण्यात काय, माझ्या ठिकाणी दुर्दम्य उत्साह होता. आता त्या उत्साहाची अपेक्षा करणं सृष्टिक्रमाला धरून होणार नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत ज्यांचा कथारूपानं माझ्या हातून आविष्कार झाला, असे काही अनुभव या संग्रहात प्रतिबिंबित झाले आहेत... या संग्रहातील कथांनी कुणाचं थोडं सात्त्विक रंजन केलं, कुणाला थोडा वाङ्मयीन आनंद दिला, एखाद्याला त्यात दिलासा सापडला, तर त्या लिहिताना मला जो आनंद झाला, तो केवळ वैयक्तिक नव्हता, या जाणिवेनं माझं लेखन सफल झालं, असं मी मानेन.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #दवबिंदू
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 16-07-1989

    वि. स. खांडेकरांच्या कालातीत कथा… लहानपणी वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या, काही गोष्टी मनात कायमचं घर करून रहातात. मराठी दुसरी किंवा तिसरी असताना माझ्या पाठ्यपुस्तकांत एक गोष्ट होती. मला खूप आवडायची ती गोष्ट. ती छोटी कथा अशीच माझ्या मनाच्या कोपऱ्या घर करून बसली होती. सात-आठ वर्षाचं वय असताना वाचलेली आणि आवडलेली गोष्ट का आवडली, हे सांगता येत नाही. या कथेचे लेखक कोण, कथेचं रसग्रहण वगैरे गोष्टी तर दूरच. गोष्ट आवडली आणि तिनं मनात घर केलं ही एकच बाब महत्त्वाची. त्या गोष्टीचं नाव होतं ‘चंद्रकोर’ अंतोनच आणि वसंत हे दोन त्यावेळच्या माझ्या वयाचे जीवलग मित्र आणि त्यांच्या मैत्रीच्या आड आलेला अंतोनचा वडिलांचा दारू विकण्याचा धंदा. ‘‘माझे बाबा रोज संध्याकाळी तुझ्या बाबांच्या दुकानात जातात, आणि मग घरी येऊन आईला मारतात.’ ही त्या दोन छोट्या जीवांच्या निर्मळ मैत्रीमध्ये असलेली काळी छाया, अशी मनाच्या कोपऱ्यात आठवणींचं मोहोळ करून राहिलेली ती गोष्ट. आज जवळजवळ तीस-पस्तीस वर्षानंतर अगदी अलिबाबाची गुहा सापडावी तसं मला झालं. मेहता पब्लिशिंग हाऊसने पुनर्प्रकाशित केलेली वि.स.खांडेकरांची चार पुस्तकं माझ्या हातात पडली. चारही पुस्तकं एकापेक्षा एक अशी सरस आहेत. त्यापैकी दवबिंदू, विद्युतप्रकाश आणि जीवनकला हे तीन कथासंग्रह आहेत आणि वायुलहरीमध्ये ललितलेख वाचायला मिळतात. तीनही कथासंग्रह अगदी साध्या सरळ, पण मनाला भिडणाऱ्या कथांनी परिपूर्ण आहेत. ‘चंद्रकोर’ कथेत तर समुद्र आणि चांदणं यांचा उल्लेख सुरेख रीतीने सतत केला आहे. अंतोनच्या मनातल्या वेगवेगळ्या भावनांचे नाते, समुद्राच्या वेगवेगळ्या रूपाशी जोडून साधलेली भावनिक तरलता मनाला मोहवून टाकते. इंग्रजी शाळेत जायला मिळणार या आनंदाने भारावलेल्या अंतोनच्या मनात ‘‘पौर्णिमेचे चांदणे फुलले. त्याला समुद्राचा आवाज मुलांच्या गोंगाटासारखा वाटू लागला.’’ इंग्रजी शाळेत गेल्यावर भीतीने लटलट कापणाऱ्या अंतोनला एक सुरेख पोषाख केलेला मुलगा हसून जवळ बोलावतो तेव्हा, ‘‘समुद्रात बुडणाऱ्या मनुष्याला जहाज दिसावे.’’ तसे अंतोनला वाटते. या संग्रहातल्या सर्वच कथा १९३४-३५च्या सुमारास लिहिलेल्या आहेत. कालपरत्वे आलेले काही प्रसंग सोडले तर या कथा कुठेही कालबाह्य वाटत नाहीत. सावत्र आई ही दुष्टच असली पाहिजे या नियमाला अपवाद असू शकतो, हे पटवून देणारी, ‘न रुतलेले काटे’ ही कथा काय किंवा एकाच आईची दोन मुलं किती भिन्न मनोवृत्तीची असू शकतात हे सांगणारी, ‘दोन टोके’ अशा दीर्घकाळ लक्षात राहतील अशा कथा ‘दवबिंदू’त आहेत. या सर्व कथांमध्ये एक गोष्ट विशेषकरून जाणवली ती अशी की, कमीत कमी वर्णन करूनही कथेतल्या व्यक्तिरेखा आकार घेतात. सहज घडणाऱ्या घटनांमधूनच कथानक आकार घेत जातं. त्यासाठी वेगळं वर्णन किंवा उकल करण्याची धडपड कुठेही जाणवत नाही. या सर्व सहजतेमुळेच सुमारे पन्नास वर्षापूर्वीच्या या कथा आजही तितक्याच टवटवीत वाटतात. खांडेकरांच्या कथांच्या विषयात विविधता आढळते. जुन्या चाकोरीबद्ध कथालेखनातून कथेला बाहेर काढून नवा मार्ग दाखवण्याचे श्रेय खांडेकरांचेच आहे. वेगवेगळ्या थरांतून सतत नवा वाचकवर्ग तयार होत असतो आणि अशा वाचकांना हे कथासंग्रह नक्कीच आवडतील असा विश्वास वाटतो. गेल्याच वर्षी साहित्याचं मानाचं असं ज्ञानपीठ अवॉर्ड कुसुमाग्रजांना मिळालं. त्या सोहळ्याचा आस्वाद मराठी साहित्याचे रसिक घेत असतानाच या पारितोषिकाचे पहिले मानकरी असलेल्या खांडेकरांच्या साहित्याचं पुनर्प्रकाशन करून, अनिल मेहता यांनी वाचकांच्या आनंदात भरघोस भर टाकली आहे. -सुचेता खोत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more