* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: SWAMI
 • Availability : Available
 • ISBN : 9788177666441
 • Edition : 37
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 436
 • Language : MARATHI
 • Category : HISTORICAL
 • Sub Category : INDIAN
 • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
"SWAMI (MASTER) THE MARATHA (NON MUSLIM) EMPIRE ESTABLISHED IN MAHARASHTRA BY CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ (D. 1680) AGAINST ALL ODDS LATER PASSED INTO THE HANDS OF THE PESHWAS (PRIME MINISTER) WHO BECAME THE SUPREME LORDS. THE MARATHA EMPIRE WHICH STRETCHED ACROSS A SIZEABLE PORTION OF WESTERN, CENTRAL AND NORTHERN INDIA SUFFERED A SEVERE SETBACK WHEN THE MARATHAS LOST THE (THIRD) BATTLE OF PANIPAT IN 1761. IT WAS AN IMMENSE LOSS OF MEN, MONEY, AND MATERIAL. THE THEN PESHWA NANASAHEB COULD NOT BEAR THE BRUNT OF THE CASUALTIES WHICH INCLUDED HIS ELDEST SON AND YOUNGER BROTHER, AND SOON PASSED AWAY. FOR THE SIXTEEN YEAR OLD MADHAVRAO WHO SUCCEEDED NANASAHEB, IT WAS NOT A PIECE OF CAKE. THE COFFERS WERE EMPTY, THE ROYAL COURT WAS FRAUGHT WITH INTERNAL DISSENSIONS. MADHAVRAO COULD NOT GO ALONG WITH HIS UNCLE, RAGHUNATHRAO, WHO WANTED TO BE THE PESHWA, AND WENT TO ANY EXTENT INCLUDING LOOTING HIS OWN SUBJECTS. THE NIZAM, HYDER, AND THE BRITISH HAD SET THEIR EYES ON THE MARATHA EMPIRE. SWAMI IS BASED ON THE LIFE AND CHARACTER OF MADHAVRAO WHO RESURRECTED THE MARATHA EMPIRE. HE REVIVED THE LOST GLORY AND PRIDE. THE EXTENT OF THE EMPIRE WAS NOW WIDER THAN BEFORE. HE CONTAINED THE ENEMY. SWAMI SKETCHES THE PERSONAL LIFE OF THE PESHWA AND SPECIALLY POIGNANT ARE THE PARTS COVERING THE DISCOMFORT HE FEELS WHEN RAGHUNATHRAO IS A THORN IN HIS FLESH, AND HIS UNTIMELY DEATH. THE NOVEL THROWS LIGHT ON THE POLITICAL, SOCIAL AND CULTURAL HISTORY OF THE MID PESHWA ERA. THE PORTRAYAL OF THE BOND BETWEEN MADHAVRAO AND HIS WIFE, RAMABAI, IS A SPECIAL FEATURE. RANJIT DESAI (1928-1992) TACKLED THE GENRE OF NOVELS WITH SUCH EASE THAT HIS COLLECTION INCLUDES ALL TYPES OF NOVELS: HISTORICAL, SOCIAL, MYTHOLOGICAL, AND BIOGRAPHICAL. HE WAS ALSO A PLAYWRIGHT AND HAS TO HIS CREDIT SHORT STORIES. "
"""महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये `रुपमहाल` हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत.`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी. "" "
* राज्य पुरस्कार १९६२. * ह.ना.आपटे पुरस्कार १९६३. * साहित्य अकादमी पुरस्कार १९६४.

Adaptation TypeTitleLink
TV SerialSWAMI
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHEka
MARATHIGUJRATHIMehta
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
 • Rating StarMahendra Dhalape

  "ती जागा फार सुंदर आहे, प्रशस्त घाट आहे. त्या घाटाच्या जरा वरच्या बाजूला जाऊन उभे राहिले व पहिले की काळ्या फत्तरानी रेखत गेलेला नदीकाठ डोळ्यात भरतो.नदीच्या पात्रावरून वाऱ्याबरोबर सळसळत येणाऱ्या लाटा मनाचे तरंग उठवतात... माधवरांवांचे मस्तक आपल्या मांडवर घेऊन रमाबाई चितेवरूनच दूरवर दिसणारा नदीचा पट्टा नजरेत भरत उराशी साठवत होत्या. अचानक दृश्य धुरकट होऊ लागले,ज्वाला वर चढत होत्या, फुटणाऱ्या लाकडाखेरीज काही आवाज आवाज कानांवर येत नव्हता.. क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेत-पदराचे.... रमाबाईंचे माधवरावांवर असलेलं निस्सीम प्रेम, कधीही एकमेकां कडे काहीही न मागणारे दोन्ही उभयतां, अत्यंत कमी वयात आलेल्या जबाबदारी स्वकर्तुत्वाने सिद्ध करणारे स्वामी...शब्दाच अपुरे आहेत पुढील वर्णनास.. शेवटची ३० पाने म्हणजे अगदी डोळ्या समोर सगळं दृश्य दिसत आहे असा भास आणि त्यातून होणारी मनाची घुसमट.. ...Read more

 • Rating StarPrashant Gosavi

  पानिपतच्या भीषण हानी नंतर नानासाहेब पेशवे देखील गेले आणि अवघ्या सोळाव्या वर्षी माधवराव पेशवे झाले. स्वामी ने अक्षरशः सर्व रूप दाखविली. सुरुवातीला काकांमुळे असहाय झालेले, निजामाचा बंदोबस्त करणारे, राक्षसभुवनच्या लढाईत स्वतः सामोरे गेलेले माधवराव शेवटचया पानांमध्ये रमा माधव यांचे नाते. दक्षिणेत निजाम हैदर यांचा बंदोबस्त करून पानिपत चे अपयश धुवून काढत उभ्या हिंदुस्थानावर मराठ्यांचा भगवा डौलाने फडकावणारे माधवराव वाचून अभिमान वाटला. इंग्रजांचे मनसुबे लक्षात ठेवून त्यांना दूर ठेवणारेही माधवराव. मराठेशाहीचा एक अनमोल हिरा वाचायला मिळाला याचा खूप आनंद झाला. रमा माधवचे तर कमाल प्रेम आहे. एकमेकांकडे काही न मागणारे दोघे. रमाबाईंना नदी काठचा सुंदर प्रदेश माधवरावांना दाखवायचा असतो पण जबाबदारीने जमत नाही. पुस्तकाच्या शेवटी जे वर्णन आहे त्याने गळा दाटून येतो. रमाबाई तो प्रदेश पाहतात पण माधवरावांच्या चितेवरून सती जाताना. रणजित देसाईंना मनापासून धन्यवाद मराठेशाहीचा एक अनमोल हिरा पुस्तकात साठविल्याबद्दल. नमस्कार........ ...Read more

 • Rating StarDr.Bhushan Phadke Akola

  रणजीत देसाई यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी ‘स्वामी’. मराठी वाचनप्रेमी रसिकांनी या कादंबरीवर अतोनात प्रेम केले आहे. या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कारदेखील मिळाला आहे. मी पुण्याला Engineering चे शिक्षण घेत असतांना (१९९२) संभाजी पुलाजवळ जुन्या पुस्कांच्या गठयातून ही कादंबरी विकत घेतली आहे. या कादंबरीचे मी ५० पेक्षा जास्त पारायणे केली असावीत. जेव्हा जेव्हा मला उदास वाटते तेव्हा मला ही कादंबरी जवळ करावीशी वाटते. थोरले माधवराव पेशवे यांचे मुत्सदी, कर्तृत्ववान जीवन लेखकाने आपल्या समोर उभे केले आहे. स्वामी या कादंबरीसारखे इतिहास आणि साहित्य यांचे सुंदर मिश्रण आजतागायत कोणताही लेखक निर्माण करू शकला नाही. १६ वर्षाच्या वयात माधवरावांना पेशवे पद प्राप्त झाले. सद्गुणी आणि कर्तव्यदक्ष माधवरावांना सुरुवातीपासूनच राजद्रोही, भोळसट राघोबा दादांचा सामना करावा लागला. इतिहासाने मुत्सद्दी म्हणून माधवरावांची नोंद घेतली आहे. पण कादंबरीत लेखकाने अनेक प्रसंगांत त्यांच्या इतर गुणांवर ही प्रकाश टाकला आहे. गायकाचे कौतुक करणारे गुणग्राहक माधवराव, काका दरबारात वेळेवर आले नाहीत तरी वेळेवर दरबार सुरू करून कामाप्रती निष्ठा असलेले शासक, लुटीत झालेले प्रजेचे नुकसान खाजगितून देणारे कर्तव्यतत्पर प्रजाहितदक्ष पंतप्रधान आणि या लुटीत प्रत्यक्ष आपले मामा(मल्हारराव रस्ते) सहभागी आहेत हे कळल्यावर त्यांनी दंड ठोठावून आपल्या आईची नाराजी ओढवून घेणारे कर्तव्यकठोर शासक, मोहिमेत अग्रभागी राहून तडफ असलेले कर्तबगार पेशवा आणि स्वतःच्या अंतकाळी पत्नी रमाबाईंच्या सोबतीची अपेक्षा करणारा रमेचा हळवा पती वाचकांसमोर रणजित देसाई यांनी उभा केला आहे. कादंबरीत माधवराव, रमाबाई, राघोबा दादा या मूळ व्यक्तिरेखा उठावदार तर आहेतच पण त्यासोबत गोपिकाबाई, पर्वतिकाकु, आनंदीबाई, सखाराम बापू बोकील, गंगोबा तात्या, माधवरावांचा सेवक श्रीपती, रामजी काका, मैना या व्यक्तीरेखांनाही लेखकाने छान न्याय दिला आहे. मराठ्यांचे बिनीचे सरदार मल्हार राव होळकर आणि माधवराव यांच्यातील संवाद फारच सुंदर आहेत. माधवरावांनी गृहकलहाला तोंड देतांना रामशास्त्र्यांसारखे निस्पृह न्यायाधीश आणि नाना फडणीसांसारखे दौलतीचे इमानी सेवकही पारखले, आणि त्यांना योग्य जबाबदारीही दिली. माधवरावांनी सखाराम बापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजी पंत या तीन शहाण्यांच्या मुत्सद्दीपणाला कसे तोंड दिले याचे सुंदर वर्णन लेखकाने केले आहे. सखारंबापू बोकील यांना झालेली नजर कैद आणि त्यावेळेस बुद्धिबळाचा डाव आणि त्यावर माधवरावांच्या टिप्पण्या माधवरावांचे मुत्सद्दीपण अधोरेखित करतात. राक्षसभुवनाच्या लढाईत माधवरावांनी तडफेने आपले काका म्हणजेच राघोबा दादा यांची सुटका केल्याचे वर्णन वीरश्री निर्माण करणारे आहे. या तरुण तडफदार पेशव्यास असाध्य आजाराने ग्रासले, त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला, विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांची कामावरची निष्ठा तसूभरही कमी झाले नाही याचे चित्रण लेखकाने फार छान केले आहे. रूपसंपन्न रमाबाई आणि माधवराव यांच्यातील भावोत्कट प्रसंगांचे चित्रणही लेखकाने फार उत्कटतेने आहे. “रमा, मृत्यू हा अटळ आहे. जें जें दिसते ते ते एक न एक दिवस नाहीसे होणार, मग ते आज होवो अथवा कैक वर्षांनी होवो." " जीवन व मृत्यूच भय बाळगणाऱ्याला केंव्हाही समृद्ध जीवन जगता येणार नाही—” "रमा जीवन किती वर्ष जगला याला फारसा अर्थ नाही. जीवन कसा जगला याला महत्व आहे नाहीतर चंदनाच नावही राहील नसतं." अश्या अनेक वाक्यांमधून कादंबरीच साहित्य सौंदर्य वाढवून लेखकाने अनेक त्रिकालाबाधित सत्य सांगितली आहेत. माधवरावांच्या अंत समयाच्यावेळेतील गंगा विष्णू वैद्य आणि माधवरावांचे संवादही छान आहेत. “मृत्यू येणार तो सरळ यावा यासाठीही औषधे आहेत, ही वेळेवर घेतली तर पुढील यातना कमी होतील”, “खोटी श्रद्धा जीवनात उपयोगी पडत नाही, एक न एक दिवस पश्चातापाची पाळी येतेच”, अशा वाक्यातून लेखकांनी जीवनाचे तत्त्वज्ञानच सांगितले आहे. वयाच्या २७ व्या वर्षी माधवराव पेशव्यांना राजक्षयामुळे जीवनयात्रा संपवावी लागली. पेशवेपदाच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत राघोबा दादांसोबत लढाई नंतर शरणागती, पुन्हा सत्ता प्राप्ती, सदाशिवराव भाऊ तोतया प्रकरण अशा गृहकलहांसोबत निजाम, हैदर, कर्नाटकातील स्वारी आणि त्यातून माधवरावांचे मुत्सद्दीपण जागोजागी जाणवते. लेखकाने उत्कृष्ट संवादातून सगळेच प्रसंग जिवंत उभे केलेत. राक्षभूवनाच्या लढाईत महादजी शितोळे विठ्ठल सुंदरच्या अंबारीचा वेध घेतो हा प्रसंग वाचतांना डोळ्याच्या कडा पाणावतात. माधवरावांचे निर्वाण आणि रमाबाईचे सती जाणे वाचतांना वाचकाचे मन भरून आल्याशिवाय राहत नाही. माधवरावांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत स्वराज्य विस्तार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आरमाराचे महत्त्व ओळखणारा शासक म्हणून माधवराव ज्ञात आहेत. माधवरावांच्या पदरी असलेला एक गायक माधवरावांना त्यांच्या अंतकाळी भेटतो, त्या वेळचे संवाद वाचतांना हुंदका आल्याशिवाय राहत नाही. माधवराव पेशवे कर्तव्यकठोर होते. या कर्तव्यकठोर ते मुळेच त्यांना अंतकाळी त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांचे दर्शनही झाले नाही. "माणूस आयुष्यात चुकतोच पण पण त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे." यासंदर्भातील माधवराव आणि सखाराम बापू बोकील यांचे संवादही फार भावपूर्ण आहेत. माधवरावांची श्री गजाननावर नितांत श्रद्धा होती. तसाच आदर त्यांना छत्रपतींच्या गादी विषयी होता. आपण राज्याचे स्वामी नसून सेवक आहोत ही भावना त्यांच्या मनात कायम होती. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येणारच, माधवरावांवर ती अतोनात आलीत. पण संकटांना न डगमगता आपले कर्तव्य पूर्ण जोमाने करत राहावे, हे कादंबरीतून शिकलो. व्यवस्थापनातील अनेक संज्ञा जसे planning, staffing, controling, coordination, deligation, Human resource management याची उदाहरणे ही पदोपदी सापडतात. माझ्या व्यवस्थापनाच्या व्याख्यानांमध्ये अनेकदा यातील उदाहरणे दिली आहेत. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. मराठी साम्राज्याचा विस्तार,घरभेदयांच्या कुरघोड्या, परकीय आक्रमणे आणि त्यातून रयतेची माधवरावांनी जिंकलेली मने याचे चित्रण त्यासोबत पत्नी रमाबाई वर असलेले निर्व्याज्य प्रेम त्यामुळे निपुत्रिक असूनही दुसरे लग्न न करणारे माधवराव आणि पती सोबत सती जाणाऱ्या साध्वी रमाबाई यांच्या चरित्रामध्ये वाचक दिपून जातो. जाज्वल्य इतिहास आणि शोकात्मिक प्रेमाचे प्रतीक असलेल्या या कादंबरीला माझ्याच नव्हे तर असंख्य वाचकांच्या हृदयसिंहासनावर आढळ स्थान आहे. आपण ही कादंबरी वाचली नसल्यास जरूर वाचावी डॉ. भूषण फडके. अकोला. ...Read more

 • Rating StarSanket Chinchkhede

  पेशवाईचा समानार्थी शब्द काय या प्रश्नाचं हमखास उत्तर आजही बरयाच अंशी "रुबाब" असं दिलं जाईल. एके काळी भारतातील सगळ्यात मोठी सत्ता असलेली मराठा साम्राज्याची धुरा सांभाळने हे काय येड्या गबाळ्याचं काम नक्कीच नव्हतं. ही कादंबरी अशाच एका पेशव्याची कहाणी सागते. सत्ताधारयांचा सगळ्यात मोठा संघर्ष आपल्याच माणसांशी असतो हे या कादंबरीवरुन लक्षात येते. प्रत्येक सत्ताधारयाच्या कारकिर्दीचं मुल्यमापन त्याने किती सत्ता कमावली यावरुन करता येत नाही हे कादंबरी वाचल्यावर कळतं. काहींची श्रेष्ठता त्यांनी कमावल्या पेक्षा वाचवलेल्या सत्तेत असते ही जाणीव आपल्याला होते. रणजित देसाईंची सर्वोत्कृष्ट कादंबरी `स्वामी` नक्कीच नाहीये. परंतु अलंकारिकतेपेक्षा वास्तविकतेत ज्यांना रस आहे त्यांनी ही कादंबरी वाचावीच..!🍀❤💯 ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
Vineesh Agale

"राधेय" ही रणजित देसाईची कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं, कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परमाण लाभतं. "मृत्युंजय" वाचनानंतर कर्ण हृदयात घर करून होता पण "राधेयच्या" वाचनानंतर ती जागा अधिक घट्ट झाली आहे. "राधेयच्या" प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय" मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी ही कादंबरी. - विनेश आगळे ...Read more

NIGHT
NIGHT by ELIE WIESEL Rating Star
Suhas Birhade

नाईट- पिता पुत्राचा मृत्यूशी संघर्ष नाझींच्या क्रूरतेच्या, नरसंहाराच्या घटना काळजाचा थरकाप उडवतात, अंगावर शहारे आणतात. नाझींच्या छळछावणीतून बचावलेल्या एली वायझल यांनी लिहिलेले ‘नाईट’ हे पुस्तक देखील वाचताना सुन्न करून जातं. १५ वर्षांचें असताना एलीयांना कुटुंबासह छळछावणीत डांबण्यात आलं. एली आणि त्यांच्या वडीलांचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी सामना सुरू होता. या संकटसमयी किशोरवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी कहाणी या पुस्तकातून उलगडते. नाझींच्या छळछावण्या, ज्यू लोकांच्या निर्दयी कत्तली याविषयी अनेक पुस्तके, सिनेमे आहेत. ‘नाईट’ पुस्तकात वडील आणि मुलाच्या नात्याची करूण किनार दिसते. मृत्यूच्या नरकात एकमेकांनी जिवंत रहावे म्हणून दोघांची चालेलली धडपड, हतबलता वाचकांना बधीर करते. मृत्यू एकेक दिवस पुढे ढकल्यासाठी पिता पुत्रांचा संघर्ष सुरू असतो. एकेक प्रसंग काळजाचा ठाव घेतात. त्या कोवळ्या वयात एली यांच्यातील तीव्र इच्छाशक्ती मृत्यूवर मात करते. पुस्तकातील घटनांची कल्पना करवत नाही, एवढ्या भयंकर आहेत. कुठल्याही क्षणी जिवंत भट्टीत टाकले जाईल, गोळ्या घातल्या जातील हे माहित असताना दुदर्म्य इच्छाशक्तीच्या बळावर तग धरून राहत जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असतो. एली वायझेल यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुढे अनेक पुस्तके लिहिली आहेत. ...Read more