* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: THE LOST SYMBOL
 • Availability : Available
 • Translators : ASHOK PADHYE
 • ISBN : 9788184985580
 • Edition : 1
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 692
 • Language : Translated From ENGLISH to MARATHI
 • Category : FICTION
Quantity
IN THIS STUNNING FOLLOW-UP TO THE GLOBAL PHENOMENON THE DA VINCI CODE, DAN BROWN DEMONSTRATES ONCE AGAIN WHY HE IS THE WORLD’S MOST POPULAR THRILLER WRITER. THE LOST SYMBOL IS A MASTERSTROKE OF STORYTELLING THAT FINDS FAMED SYMBOLOGIST ROBERT LANGDON IN A DEADLY RACE THROUGH A REAL-WORLD LABYRINTH OF CODES, SECRETS, AND UNSEEN TRUTHS . . . ALL UNDER THE WATCHFUL EYE OF BROWN’S MOST TERRIFYING VILLAIN TO DATE. SET WITHIN THE HIDDEN CHAMBERS, TUNNELS, AND TEMPLES OF WASHINGTON, D.C., THE LOST SYMBOL IS AN INTELLIGENT, LIGHTNING-PACED STORY WITH SURPRISES AT EVERY TURN. THIS IS DAN BROWN’S MOST EXCITING NOVEL YET.
फ्रीमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होता. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामथ्र्य प्राप्त करून घ्यायचे होते. पिढ्यानपिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली; तिच्यावरून आता खून, हिंसा , छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली. मग चोवीस तासांत एक थरारक व रोमहर्षक नाट्य सुरू झाले... रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआयएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले... सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचेतरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या... शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का?.... चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंब-यांएवढीच ही एक अगदी अलीकडची उत्कंठावर्धक कादंबरी!

Keywords
Customer Reviews
 • Rating StarSunil Deshmukh

  हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की वाचा.

 • Rating StarEknath Marathe

  खूप छान कादंबरी आहे. अगदी उत्कंठावर्धक ! अगदी वाचायला घेतली की खाली ठेवताच येत नाही. हे सर्व गूढ उलगडताना लेखकाने केलेले परिश्रम, संशोधन, अभ्यास लक्षात येतो. मराठी भाषांतर सुद्धा छान जमले आहे, अगदी ओघवते आहे. अनेक तांत्रिक गोष्टी अगदी सोप्या करून सांितल्या आहेत. ...Read more

 • Rating StarMadhavi Deshpande

  ब्राउन ह्यांची पुस्तकं वाचताना ,एका नवीन जगाची ,खूप मनोरंजक माहिती मिळते

 • Rating StarShrikant Adhav

  जे हरवले अाहे, ते कधीतरी सापडेलच! वॉशिंग्टन डी.सी.मधील हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्रज्ञ ( Symbologist ) रॉबर्ट लँग्डन याला शेवटच्या क्षणी ‘कॅपिटोल’ इमारतीमध्ये संध्याकाळी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले गेले. तथापि, त्याच्या अागमनानंतरकाही वेळातच एक हादरवून सोडणारी वस्तू इमारतीच्या गोल भागात ( Rotunda) सापडली. त्यावरती पाच भेसूर चिन्हे काढलेली होती. ती वस्तू त्या गोल भिंती असलेल्या भागात मध्यभागी ठेवलेली होती. ते पाहताच लँग्डनला कळून चुकले की, निमंत्रण देण्याची ही एक प्राचीन पद्धत अवलंबिली गेली अाहे. त्या निमंत्रणानुसार ती वस्तू स्वीकारणाऱ्याला एक निरोप मिळाला होता. फारच थोड्यांना कळू शकेल, अशा विद्येच्या दीर्घकाळ हरवलेल्या गुप्त जगात येण्यासाठी खुणावले गेले होते! लँग्डनचा मार्गदर्शक व गुरू असलेला पीटर सॉलोमन हा मेसन पंथातील एक अध्वर्यू व मानवतावादी होता. त्याला क्रूरपणे पळवून नेण्यात अाले होते. त्याला सोडवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी जे निमंत्रण दिले गेले अाहे, ते स्वीकारणे एवढाच मार्ग अापल्या हाती अाहे; मग पुढे काहीही होवो, हे लँग्डनला कळून चुकले. त्यासाठी लँग्डनला अमेरिकेच्या त्या सर्वांत सामर्थ्यशाली शहरात अाता हिंडावे लागले. अनेक न पाहिलेली दालने, देवालये, चर्च व भुयारे यातून लँग्डनची शोधयात्रा सुरू झाली. या शहरातील ज्या-ज्या काही वास्तू त्याला ज्ञात होत्या, त्यांचे रूपांतर त्याला अाता अंधाऱ्या व बनावट जगात झालेले दिसले. त्यामध्ये मोठ्या खुबीने भूतकाळ लपवून ठेवला होता. तसेच त्यात मेसन पंथाची गुपितेही ठेवलेली होती. पूर्वी कधीही पाहिली नाहीत, अशी सत्ये त्याला त्यातून उमगली व ती सर्व सत्ये एकच एक अविश्वसनीय सत्य दाखवित होते. झाकला गेलेला इतिहास, अगम्य प्रतिमा व अनाकलनीय संकेत यांनी मिळून एक भव्य पट विणला होता. लँग्डन त्याला जाऊन भिडला होता. ‘द लॉस्ट सिम्बॉल’ ही एक हुशारीने रचलेली व विजेच्या वेगाने घटना घडवणारी थरारक कादंबरी अाहे. ती वाचताना प्रत्येक वळणावर वाचक थक्क होत जातो. शेवटी लँग्डनला कळून चुकते की, अापल्याला या गुपितापेक्षा जास्त धक्कादायक असे काहीही जगात सापडणार नाही. ...Read more

 • Read more reviews
Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BENJAMIN FRANKLIN
BENJAMIN FRANKLIN by BENJAMIN FRANKLIN Rating Star
DAINIK LOKSATTA 01-12-2019

फ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more

SWAMI
SWAMI by RANJEET DESAI Rating Star
Eknath Marathe

मी एकदा वाचलेले पुस्तक परत वाचत नाही पण हे एकमेव पुस्तक त्याला अपवाद आहे. चारदा वाचले आहे. मुलांना मानगूट पकडून वाचायला लावले आहे !