* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANADI-ANANT
  • Availability : Available
  • Translators : AVINASH DESAI, USHA DESAI
  • ISBN : 9788184980851
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 175
  • Language : Translated From KANNADA to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE 8TH NOVEL BY THE AUTHOR AADYA RANGACHARYA. THIS NOVEL CASTS A LIGHT ON THE RELATIONSHIP BETWEEN A MAN AND A WOMAN. ACTUALLY, NOWHERE IN THIS NOVEL HE DESCRIBES THE INTIMATE ACTS BETWEEN A MAN AND WOMAN BUT MERELY SUGGESTS. HIS STYLE REFLECTS THE INNER CORE OF THE HUMAN BEINGS. THOUGH VERY SIMPLE THIS STYLE IS VERY EFFECTIVE. THIS NOVEL IS BASED ON THE RELATIONSHIP OF A HUSBAND AND HIS SICK WIFE, A REAL BED-RIDDEN ONE WHO IS UNABLE TO GIVE HIM ANY PHYSICAL PLEASURE. AFTER HER DEATH, HE MARRIES HER COUSIN TO WHOM HE WAS ATTRACTED TERRIBLY. THE WHOLE NOVEL THEREAFTER IS BASED ON THEIR RELATIONSHIP. IT ENDS ABRUPTLY, WHEN WE THINK THAT IT IS GOING TO TAKE SOME GOOD TURN.
आद्य रंगाचार्य (श्रीरंग) ह्यांच्या लिखाणात विचारनाविन्याची देणगी आणि प्रयोगशीलतेची आवड कटाक्षाने जाणवते. अनादि-अनंत मध्ये त्यांनी स्त्रीपुरुष संबंधांची समर्थपणे उकल केली आहे. डॉ. जी. एस. अमूर. ह्या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचं विश्लेषण आहे. त्यामुळे हिची शैलीच निराळी आहे. मी नाटककार असल्यामुळे ही शैली सहजसुलभ आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे. आद्य रंगाचार्य (श्रीरंग)
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ANADI-ANANT #ANADI-ANANT #अनादिअनंत #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #AVINASHDESAIDESAIUSHA #ADYARANGACHARYA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK GAONKARI 18-4-2010

    आद्य रंगाचार्य (श्रीरंग) हे कानडी भाषेतील आधुनिक साहित्यिक ते प्रथमत: एक उत्तम नाटककार सुपरिचित आहेत. त्याचबरोबर विविध साहित्य प्रकार आणि संशोधनही त्यांच्याकडून हाताळले गेले आहेत. त्यांचीच अनादी अनंत ही कादंबरी उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी अनुवादत केली आहे. या कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण असल्याने या कादंबरीची शैली निराळी आहे. मी नाटककार असल्याने ही शैली सहज सुंदर आणि परिणामकारक वाटली असल्यास आश्चर्य नसावे, असे आद्य रंगाचार्य यांनीच म्हटल्यामुळे लेखनाच्या शैलीबद्दल वेगळे काही सांगण्याचे कारणच उरत नाही. ...Read more

  • Rating StarDainik Matrubhumi 14-2-2010

    स्त्री-पुरुषांमधील तरल संबंधांचा मागोवा ‘अनादि-अनंत’ या कादंबरीत घेतला आहे. या संबंधाचे विश्लेषण तटस्थपणे कादंबरीत येत राहते. ‘अनादि-अनंत’ ही आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांची कादंबरी. या कादंबरीचा अनुवाद उषा देसाई आणि अविनाश देसाई यांनी केला आहे. कर्नाकमधील प्रसिद्ध साहित्यिक आद्य रंगाचार्य यांनी स्त्री-पुरुष संबंधाची अनादि-अनंत काळापासून असलेली उकल समर्थपणे केली आहे. कादंबरीत पात्रांच्या अंतरंगाचे विश्लेषण आहे. साहाजिकच या कादंबरीची शैली स्वत:ची ओळख निर्माण करून देणारी आहे. कादंबरी दोन भागात अनादि आणि अंत या प्रकरणातून उलगत जाते. कुमुद, रामण्णा ही पात्रे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि भाष्य सांगत जातात. १९५१मध्ये या कादंबरीचा पहिला भाग ‘अनादि’ प्रसिद्ध झाला. यावेळी अश्लिलतेची पायरी न चढता स्त्री-पुरुष समस्यांची चर्चा करण्यात यश प्राप्त केलेली ही कादंबरी असा अभिप्राय समीक्षकांनी या कादंबरीसंदर्भात व्यक्त केला होता. आजचं साहित्य सामान्यांना समजलं पाहिजे असा उपदेश केला जातो. आपण स्वत: असामान्य आहोत या भ्रमात असा उपदेश करणारी मंडळी जगत असतात. परंतु, कोणताही अभिनिवेश न बाळगता आद्य रंगाचार्यांनी अतिशय जटिल आणि गुंतागुंतीच्या स्त्री-पुरुष संबंधाचा उलगडा सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केला आहे. उषा देसाई आणि अविनाश देसाई या दोघांनी मराठी भाषांतर करताना रंगाचर्यांच्या अक्षरगाभ्याला कोठे धक्का लावला नाही. अत्यंत सोपे आणि तरल स्वरूपाचे भाषांतर त्यांनी केले आहे. वाचकांच्या थेट हृदयास हाक घालणारे हे भाषांतर आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 6-6-2010

    स्त्री-पुरुष नातेसंबंध हा अत्यंत गहन विषय. त्यावर अनेक विचारवंतांनी आपापले विचार, विविध कालखंडात मांडले, तरीही या नातेसंबंधाची उकल अजूनही पुरती कुणाला करता आलेली नाही. नव्या कालखंडात अन् आजूबाजूचं वास्तव बदलत असताना, विस्तारत असताना या नातेसंबंधात नव आयाम दिसू लागतात आणि मग पुन: नव्यानं स्त्री-पुरुष नातेसंबंध आहे तरी काय याचे नवेच निकष सामोरे येऊ लागतात. आद्य रंगाचार्य (श्रीरंग) यांनी आपल्या ‘अनादि-अनंत’ या कादंबरीमध्ये पुन: एकदा स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्र्वार्ध ‘अनादि’मध्ये नायक रामण्णा, त्यांची अंथरुणाला खिळलेली पत्नी सरला आणि सरलेनेच तिच्या नात्यातील तिला घरकामात मदत व्हावी म्हणून आणलेली तरुणी कुमुद एवढीच तीन पात्रं. रामण्णा हा सृजनशील लेखक, कादंबरीकार. त्याचं सरलावर प्रेम. पण सरलाच्या आजारपणात त्याला तिच्याकडून शारीरिक सुख नाही. मूलही नाही. त्याची आता शक्यताही नाही. सरलाला मात्र तिचं घर मुलाबाळांनी भरलेलं असावं असं वाटतं. त्यासाठी रामण्णानं दुसरं लग्न, तेही कुमुदाशी करावं ही तिची इच्छा. पण तत्पूर्वीच एका मोहाच्या क्षणी रामण्णा आणि कुमुद यांचा शरीरसंबंध होतो. आपण चूक करतोय की बरोबर हा निर्णय होण्यापूर्वीच हे सारं घडतं. यातून प्रश्न निर्माण होतो तो नैतिकतेचा. आद्य रंगाचार्य यांनी या पात्रांच्या मनोवस्थेतून, त्यांच्या विचारातून हा मुद्दा विविध स्तरावर तपासून पाहिला आहे. रामण्णाचं खरं प्रेम कोणतं? सरलेवरचं की शारीरिक उपासमारीतून कुमुदकडे आकर्षिले गेलेलं, कुमुदमध्ये अडकणारं? सरलाच्या मृत्यूनंतर रामण्णा कुमुदशी लग्न करतो. कुमुदही त्यास तयार होते, ती तिच्या पोटात रामण्णाचा अंश वाढत असतो म्हणून की तिला रामण्णा आवडत असतो म्हणून? प्रतारणा कोण कुणाशी करतं? नेमकं प्रेम म्हणजे काय? स्त्री-पुरुष यांच्यातील नात्याचा अर्थ भावनिक पातळीवर श्रेष्ठ की शारीर पातळीवर? लेखक श्रीरंग एके ठिकाणी म्हणतात, ‘हृदयं एक झाली नसता शरीरांना एकत्र आणणं हीच खरी वेश्यावृत्ती, लग्न झालं तरी वेश्यावृत्तीच ना!’ रामण्णश-सरला, रामण्णा-कुमुद या नातेसंबंधांचा विचार करताना श्रीरंग यांनी कालिदास, भवभूती यांच्या काव्याचे दाखले देत त्यांच्या नात्यांचा, वागण्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे. पुराणातील उदाहरणं आणि रामण्णा-कुमुदचा पोरकटपणा यातील साम्य मात्र इथठ ओढून-ताणून आणल्यासारखं, कृतक वाटतं. त्या उदाहरणांनी श्रीरंग यांचा व्यासंग दिसतो, पण रामण्णा-कुमुद ही पात्रं मात्र अ-लौकिक होत नाहीत. तरीही कधी कधी त्यांचे अनुभव तत्त्वज्ञानाच्या पातळीवर व्यक्त होतात. उदा. ‘एकाचं सुखदु:ख दुसऱ्याच्या हातात नसतं’किंवा ‘मनुष्याला ज्या घटना अचानक घडल्या असं वाटतं त्या निसर्गाच्या नियमानुसार घडतात.’ उत्तरार्ध ‘अनंत’मध्ये दहा वर्षानंतरचा कालखंड. त्यात कुमुदनं घर सोडलं. रामण्णाशी संबंध ठेवला नाही. मुलगा मोहन दहा वर्षांचा झाला. आता त्या दोघांमधील एकमेव दुवा ‘मोहन’. पण त्याच्या अकस्मात जाण्यानं रामण्णा आणि कुमुद यांच्या नात्याला काय अर्थ राहिला, असा प्रश्न उपस्थित करून ही कादंबरी संपते. अगदी अपवादानंच यात अलंकार येतात. सुंदर अशी श्रीरंगची निवेदनशैली आहे. प्रारंभी कथानक एकाच मुद्याभोवती घोटाळत राहतं. उत्तरार्धातही तसंच. पात्रांचे स्वाभाविक विस्तार जाणवत नाहीत. स्त्रिया तर हिंदुस्थानी पारंपरिक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणाNया, त्यादृष्टीनं यात आधुनिक विचारही जाणवत नाही. उषा देसाई-अविनाश देसाई यांचा अनुवाद उत्कृष्ट. चंद्रमोहन कुळकर्णींचं मुखपृष्ठ आशयानुसार अर्थचित्रासारखं सुबक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more