- Sandeep Patil
रॉबर्ट लॅन्गडन नावाचा अमेरिकी चिन्हशास्त्रज्ञ असतो, त्याला अचानक त्याचा मित्र पीटर सोलमान याचा वॉशिंग्टन येथे व्याखानासाठी फोन येतो, जेंव्हा तो इप्सित स्थळी पोहचतो, तेंव्हा त्याला समजते की, त्याला फसवले गेले आहे. एका चालाख गुन्हेगाराने हे सर्व केलेले असते. त्याला वॉशिंग्टन मधील पुरलेला गुप्त खजिना पाहिजे असतो आणि त्याद्वारे तो माणसाचे परमेश्वरात रूपांतर करणार असतो. ह्या गुप्त रहस्याचा शोध घेण्यासाठी रॉबर्ट लॅन्गडन, कॅथरीन नावाची नोएटिक वैज्ञानिक, सीआयए आणि मालख असे चौघे जण करत असतात परंतु त्यांचे हेतू वेगवेगळे असतात.
द लॉस्ट सिम्बॉल नावाची डॅन ब्राउन ची कांदबरी माणसाला अशी खिळवून ठेवते. तो खजिना शेवटी काय आहे , याचा उलगडा पूर्णपणे तत्त्व नामक पद्धतीने करते. लेखकाने वापरलेली कल्पना अत्यंत अद्भुतकारक आहे, यात अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांचे, वस्तूंचे, `मेसॉन` पंथांचे रहस्य सांगितलें आहे आणि सत्य किती साधे असते, याची प्रचीती या कादंबरीतून येते. कितीतरी वैज्ञानिक शोध लागले, परंतु या वैज्ञानिक शोधानी माणसाच्या मनाचा शोध मात्र घेतला नाही, असे लेखकाचे मत, मात्र प्राचीन संतांनी, महात्म्यांनी माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नांना त्यानी धर्म म्हणून संबोधले. पण काही बाबू आणि बापड्यानी या धर्माचे रूपांतर अधर्मात केले. शेवटी परमेश्वर माणसाने स्वतः च्या देहात शोधायला हवा असा प्रामाणिक संदेश या कंदाबरीतून लेखकाने दिला आहे.तत्त्वज्ञान, विज्ञान, पुराणकथा, रहस्य, मिथ्थक, प्रतीके , चिन्ह, यांचा वापर लेखकाने इतका अप्रतिम केला आहे, की 700 पाने कधी संपली हे कळेलच नाही. सर्वं बाजूनी प्रकाश टाकणारी ही कांदबरी नक्कीच वाचावी.
- Ravindra Chavan
डॅन ब्राऊन भन्नाट च आणि त्यात अनुवाद केलाय अशोक पाध्ये हा मणिकांचन योग... सुरुवात च अंगावर काटा येणारी आहे...
कवटीपात्रातुन वाईन पीऊन लागलाय तो पुढे कथा मार्गस्थ...
- Sunil Deshmukh
हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. नक्की वाचा.
- Eknath Marathe
खूप छान कादंबरी आहे. अगदी उत्कंठावर्धक ! अगदी वाचायला घेतली की खाली ठेवताच येत नाही. हे सर्व गूढ उलगडताना लेखकाने केलेले परिश्रम, संशोधन, अभ्यास लक्षात येतो. मराठी भाषांतर सुद्धा छान जमले आहे, अगदी ओघवते आहे. अनेक तांत्रिक गोष्टी अगदी सोप्या करून सांगितल्या आहेत.
- Madhavi Deshpande
ब्राउन ह्यांची पुस्तकं वाचताना ,एका नवीन जगाची ,खूप मनोरंजक माहिती मिळते
- Shrikant Adhav
जे हरवले अाहे, ते कधीतरी सापडेलच!
वॉशिंग्टन डी.सी.मधील हार्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्त्रज्ञ
( Symbologist )
रॉबर्ट लँग्डन याला शेवटच्या क्षणी ‘कॅपिटोल’ इमारतीमध्ये संध्याकाळी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले गेले. तथापि, त्याच्या अागमनानंतर काही वेळातच एक हादरवून सोडणारी वस्तू इमारतीच्या गोल भागात ( Rotunda) सापडली. त्यावरती पाच भेसूर चिन्हे काढलेली होती. ती वस्तू त्या गोल भिंती असलेल्या भागात मध्यभागी ठेवलेली होती. ते पाहताच लँग्डनला कळून चुकले की, निमंत्रण देण्याची ही एक प्राचीन पद्धत अवलंबिली गेली अाहे. त्या निमंत्रणानुसार ती वस्तू स्वीकारणाऱ्याला एक निरोप मिळाला होता. फारच थोड्यांना कळू शकेल, अशा विद्येच्या दीर्घकाळ हरवलेल्या गुप्त जगात येण्यासाठी खुणावले गेले होते!
लँग्डनचा मार्गदर्शक व गुरू असलेला पीटर सॉलोमन हा मेसन पंथातील एक अध्वर्यू व मानवतावादी होता. त्याला क्रूरपणे पळवून नेण्यात अाले होते. त्याला सोडवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी जे निमंत्रण दिले गेले अाहे, ते स्वीकारणे एवढाच मार्ग अापल्या हाती अाहे; मग पुढे काहीही होवो, हे लँग्डनला कळून चुकले.
त्यासाठी लँग्डनला अमेरिकेच्या त्या सर्वांत सामर्थ्यशाली शहरात अाता हिंडावे लागले. अनेक न पाहिलेली दालने, देवालये, चर्च व भुयारे यातून लँग्डनची शोधयात्रा सुरू झाली. या शहरातील ज्या-ज्या काही वास्तू त्याला ज्ञात होत्या, त्यांचे रूपांतर त्याला अाता अंधाऱ्या व बनावट जगात झालेले दिसले. त्यामध्ये मोठ्या खुबीने भूतकाळ लपवून ठेवला होता. तसेच त्यात मेसन पंथाची गुपितेही ठेवलेली होती. पूर्वी कधीही पाहिली नाहीत, अशी सत्ये त्याला त्यातून उमगली व ती सर्व सत्ये एकच एक अविश्वसनीय सत्य दाखवित होते.
झाकला गेलेला इतिहास, अगम्य प्रतिमा व अनाकलनीय संकेत यांनी मिळून एक भव्य पट विणला होता. लँग्डन त्याला जाऊन भिडला होता.
‘द लॉस्ट सिम्बॉल’ ही एक हुशारीने रचलेली व विजेच्या वेगाने घटना घडवणारी थरारक कादंबरी अाहे. ती वाचताना प्रत्येक वळणावर वाचक थक्क होत जातो. शेवटी लँग्डनला कळून चुकते की, अापल्याला या गुपितापेक्षा जास्त धक्कादायक असे काहीही जगात सापडणार नाही.
- Kiran Borkar
प्रा.रॉबर्ट लँगडन हा प्रसिद्ध चिन्हशात्रज्ञ आहे . त्याला अचानकपणे संध्याकाळी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते .पण तिथे गेल्यावर त्याला एक वस्तू सापडली . ती वस्तू पाहताच तो हादरून गेला . त्यावस्तूवर पाच भेदक चिन्हे होती . अतिशय पुरातन काळात एखाद्याला आमंत्रण देण्याची पद्धत होती . आणि आता रॉबर्ट हे आमंत्रण नाकारू शकत नव्हता .एका गुप्त जगात येण्याचे आमंत्रण होते ते.रॉबर्टचा गुरू आणि मेसन पंथातील प्रमुख पिटर सोलोमन याला पळवून नेण्यात आले होते आणि त्याला सोडवून त्याचे प्राण वाचवायची जबाबदारी रॉबर्टवर लादली गेली आहे .आता रॉबर्टला संपूर्ण शहर पालथे घालावे लागेल .न पाहिलेली दालने ,चर्च पाहावे लागतील. मेसन पंथातील गुपिते जाणून घ्यावी लागतील. चोवीस तासात घडणारी ही वेगवान कहाणी वाचताना अंगावर काटा येतो आणि पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही
- DAINIK AIKYA, SATARA 23-11-2014
उत्कंठावर्धक कादंबरी...
फ्रिमेसन पंथाकडे एक छोटा दगडी पिरॅमिड होता. त्यावर चित्रलिपीत एक गूढ संदेश कोरला होतो. मनुष्यजातीला सन्मार्गावर आणण्याचा हेतू त्यामागे होता. पण एकाला त्या गूढ गोष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्याला त्यातून देवासारखे सामर्थ्य प्राप्त करून घ्यायचे होते.
पिढ्यान्पिढ्या मेसन पंथीयांनी जी गोष्ट जपून ठेवली. तिच्यावरून आता खून, हिंसा, छळ सुरू झाले. ते एवढ्या थराला पोहोचले की, शेवटी अमेरिकेची शासनव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली. मग चोवीस तासांत एक थरारक आणि रोम हर्षक नाट्य सुरू झाले...रेल्वे, हेलिकॉप्टर यांमधून सीआरएच्या माणसांनी पाठलाग सुरू केले... सरकारची नाडी आता खुनी माणसाच्या हातात आली होती! त्याला स्वत:ला ‘देव’ बनायचे होते. त्यातून मग प्राचीन विद्या, धर्मग्रंथ, कुणाचे तरी बळी अशा घडामोडी घडत गेल्या...शेवटी यातून माणसाने गमावलेले ‘ते चिन्ह’ त्याला गवसले का? चोवीस तासांतील या घटना तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. डॅन ब्राऊनच्या इतर तीन कादंबऱ्यांएवढींच ही एक अगदी अलीकडली उत्कंठावर्धक कादंबरी!
- Satish Bhople
I love it