* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: TINKA TINKA TIHAR
 • Availability : Available
 • Translators : MANJIRI DHAMANKAR
 • ISBN : 9789387789067
 • Edition : 1
 • Publishing Year : APRIL 2018
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 148
 • Language : Translated From HINDI to MARATHI
 • Category : POEMS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
"‘‘EVERY WOMAN IN THIS WORLD HAS EXPERIENCED AN OCCASION WHEN SHE HAS TO CHOOSE BETWEEN REMAINING SILENT AND SPEAKING OUT. WHERE COURTS ARE BUREAUCRATIC, GOVERNMENTS BUSY THINKING AND INSTITUTIONS SPEND TIME MAKING TALL CLAIMS AND THE MIND SHUDDERS - POEMS ARE BORN. THESE POEMS HAVE THE STRENGTH TO SAY – I WAS, I AM, I WILL BE…. YOU WOULD ALSO EXPERIENCE SOME OF THESE UNRAVELED LULLABIES WHICH WITHOUT DOUBT DESPERATELY SEEK A BETTER TOMORROW OUTSIDE.’’ VIMLAA MEHRA VARTIKA NANDA THIS BOOK IS AN EXPRESSION OF WOMEN THAT ARE RESTRICTED PHYSICALLY BUT HAVE FREE MINDS. IT CONTAINS POEMS BY FOUR FEMALE INMATES THAT HAVE BEEN WRITTEN OVER THE LAST FEW MONTHS. COMPLEMENTING THE POETRY ARE RARE IMAGES FROM INSIDE JAIL NO. 6. THESE PHOTOS WERE TAKEN BY THE INCARCERATED POETS THEMSELVES. THEIR PURPOSE IS TO GIVE THE READER AN INTIMATE LOOK INTO INDIA’S MOST FAMOUS OR INFAMOUS PRISON – THE TIHAR JAIL. AND LASTLY, THIS BOOK IS MODELED AFTER TIHAR, IT IS DESIGNED TO KEEP THINGS IN. YOU WILL HAVE TO FREE THE POETRY BEFORE YOU CAN READ IT. "
महिला कैद्यांच्या मनातल्या अगतिकतेचं मनोबलात रूपांतर करण्याच्या भावनेला मूर्त रूप देण्याचंच फलित म्हणजे हे पुस्तक. तिहारमधील बंदी महिलांनी आपली व्यथा मांडणाऱ्या, आयुष्य सावरण्याची स्वप्नं पाहणाऱ्या काही भावना आपल्या कवितांतून व्यक्त केल्या आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
Customer Reviews
 • Rating StarDAINIK SAKAL 28-07-2018

  कारागृहातील नि:श्वास... तिहार जेल हे नुसते नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा उभा राहावा हे साहजिकच! पण इथेही मनाची कोवळीक जपणाऱ्या काही गोष्टी अभिव्यक्त होतात असे जर समजले तर त्यावर कोणाचा विश्वास बसेल का? पण या गजाआडही एका छोट्याशा झरोक्यातून डोकावतात सवप्ने! आसमंतात वाहता राहणारा आशेचा वारा इथेही क्षणभर विसावायला येतो. इथे असते धीमी काळगती; कारण वातावरणच तसे! मने थिजलेली; कारणेही तशीच! पण या थिजलेल्या, गोठलेल्या परिस्थितीतूनही ‘रॉक रोझ’सारखी सुंदर फुले फुलतातच. परिस्थितीशी झगडून, वादळातून तावून सुलाखून बाहेर पडत ती सुंदर फुले उमलतात, त्यांच्या पाकळ्यांचा थरार आणि सुगंध आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपले मनही त्या स्पंदनांनी क्षणभर भावविभोर होऊन उठते. ही सारी किमया घडते एक मनस्वी कविता हातात आल्यावर; जी कविता ‘तिनका तिनका तिहार’ मध्ये शब्दांकित होऊन या पुस्तकाच्या पानापानांवर शब्दांची पखरण करून गेली आहे आणि आपल्याला सांगते आहे... आम्हीही संवेदनशील मने घेऊन वावरणाऱ्या तुमच्या आया, बहिणी आहोत... तुरुंगातील महिला कैद्यांचा हा अनोखा कवितासंग्रह आपल्या हाती दिला आहे तो वर्तिका नंदा आणि विमला मेहरा यांनी. या कवितांचा सुंदर अनुवाद केला आहे तो अतिशय संवेदनशील अनुवादक मंजिरी धामणकर यांनी. एक चांगली कविता आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल या तिघींचेही आभारच मानायला हवेत. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ते त्यांच्या परंपरेला साजेसेच झाले आहे. आपल्या मनोगतात विमला मेहरा लिहितात, ‘मला वाटतं, प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला चांगले-वाईट पैलू असतात. वाईट बाजू प्रबळ झाली, की चुका होण्याची आणि पकडले जाण्याची शक्यता असते. परिणामी तुरुंगवासही घडू शकतो. चांगली बाजू प्रभावी असली, की सगळे नीट समजते; आचरण चांगले राहते. चुकांचा पश्चात्ताप होतो. सुधारण्याची इच्छा होते.’ महिला कैद्यांच्या मनातल्या अगतिकतेचे मनोबलात रूपांतर करण्यासाठी वर्तिकाने त्यांच्याकडे या पुस्तकासंबंधीचा प्रस्ताव अचानक आणला आणि या पुस्तकाच्या निर्मितीला गती मिळाली, ही या पुस्तकाची चित्तरकथा आहे. पुस्तक उघडल्यावर पहिल्याच पानांमधून आपल्याला तिहारचे वातावरण जाणवायला लागते. रुक्ष, कठोर, नीतिनियमांच्या चौकटीत बद्ध झालेले. "Now you are entering in certified jail" आणि मग Man Power ची एक जंत्री वजा पाटी. वर्तिका नंदा लिहितात, ‘‘तिहारच्या पत्त्यावर कोणालाही पत्र पाठवण्याची इच्छा नसते. या दाराच्या आत भौतिक सुखांना प्रवेश नसतो... तिथून आकाश वेगळे दिसते आणि तारेही...’ जिथे सगळी नाती गळून पडतात तिथे उगवतो एक अंकुर. शरीर शृंखलांनी बद्ध असतानाही मनात आशेचा किरण जागता ठेवायला साह्यभूत होते कवितेचे एक मापटे.’ अशाच एका दुपारी त्यांना अचानक ‘तिहार’चा गाभाच गवसल्यासारखे झाले. त्या दुपारी काही महिला कैद्यांनी काही कविता, त्यांच्या भाव भावना व्यक्त करणाऱ्या त्यांना ऐकवल्या. कविता म्हणताना आतापर्यंत कोंडून राहिलेल्या मनातील भावनांचे बांध फुटले. त्यांच्याकडून एकही कविता पूर्ण होऊ शकली नाही. पण त्या जिथे गप्प झाल्या, तिथेच बहुधा कविता सुरूही झाली. या कविता म्हणजे त्यांच्या दु:खाश्रूंमध्ये भिजलेले शब्द, भावना आहेत. त्यांच्या स्वप्नांमध्ये हिंदोळणारे मृदू शब्द आहेत. या कवितांना आहे अपूर्णतेचे अस्तर... या पुस्तकाच्या शीर्षकाचा उगम अशेक चक्रधर यांनी लिहिलेल्या एका दोह्यात आहे. यातून या महिलांच्या मनातली तगमग उभी राहते. ते म्हणतात– तिनका तिनका जोडकर चिडिया नीड बनाय. हत्यारी पापिन मरी पवन उडा ले जाय. काडी काडी जोडून चिमणी बांधते आपले घरटे आणि ती मेली कर्दनकाळ वावटळ येते आणि आपले घरटे उडवून घेऊन जाते. खरे तर हे आहेत इथल्या ‘कळ्यांचे नि:श्वास’! हे नि:श्वास ऐकले, की कविमनही कावरेबावरे होऊन जावे अशी इथली शब्दकळा! साखळदंडांनी जखडलेल्या स्त्रियांचे हे उद्गार म्हणजे बाईच्या अंतर्यामीचा खुलेआम केलेला दस्तऐवजच आहे. इथे आपल्याला त्यांच्या कवितांतून कैदी भेटत नाहीत. त्यांच्या अंतरंगात निवास करणारा माणूस भेटतो. त्यांचे माणूसपण भेटते. इथे भेटते रमा चौहान. अनेक भाषांवर तिचे प्रभुत्व आहे. काही कारणाने ती ‘तिहार’मध्ये आली. आज संपूर्ण कुटुंबाने तिच्याशी संबंध तोडले आहेत. तिची आई, मुलगी कुठे आहेत तिला काहीदेखील माहीत नाही. हाच तिच्या मनाचा दुखरा कोपरा आहे. जो कवितेतून व्यक्त होतो. ‘मना पाखरू’ या कवितेत ती म्हणते. एका पक्ष्याला पिंजऱ्यात कोंडून घालतोस, ना उडू देतोस, वाढू देतोस, ना खेळू देतोस, म्हणूनच माणसा, जीवनात अयशस्वी होतो पिंजऱ्यातून मुक्त कर आपल्या मनोभावनांना, बघ कसे इंद्रधनुष्याचे मोल मिळेल स्वप्नांना! असेच इंद्रधनुष्याचे रंग पाहत असताना हातून झालेल्या चुकीमुळे सीमा रघुवंशी ‘तिहार जेल क्रमांक ६’ मध्ये आली. तिने प्रमोदला आपला जोडीदार निवडले. देवळात जाऊन लग्न केले. पण त्याची रीतसर नोंदणी केली नाही. आज ती आणि प्रमोद एकाच परिसरामध्ये राहत असूनही त्यांची भेट नाही. पण आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या प्रमोदच्या प्रेमाच्या ताकदीवर ती तगून आहे. तुरुंगातून सुटका झाल्यावर ती त्याच्याशी रीतसर नोंदणी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. या कठीण प्रसंगात तिची एकच सहचरी तिला जगण्याचे बळ देते ती सहचरी म्हणजे तिची कविता. ताप भिंती या कवितेत ती म्हणते – सकाळ संध्याकाळ लिहित बसते या चार भिंतीत फक्त, तुझं नाव लिहिते... हे शब्द माझे नव्हेत, काळजाचा हुंकार आहे.. असे काळजाचे हुंकार तिच्या अनेक कवितांमधून आपल्याला ऐकायला मिळतात. इथे लिहिती होते रिया शर्मा. ती आणि तिचे पती दोघेही ‘तिहार’ जेलमध्येच! नशिबाच्या या दृष्ट खेळात दिलासा इतकाच आहे, की पती-पत्नीच्या प्रेमाचा धागा मजबूत राहिला आहे. दर शनिवारी-रविवारी दोघांची भेट होऊ शकते आहे. तरीही तिच्या मनात अनेक प्रश्नचिन्हे उठतात; ज्यांना ती आपल्या कवितेत स्थान देते. तिला वाटते – मी कधी त्या खुल्या हवेत, त्या ढिगात विहरू शकेन? की आयुष्यभर इथेच खितपत पडेन?... मधी माझ्या घरात, माझ्या माणसात जाऊ शकेन? की असं लांबूनच त्यांना पाहून डोळे अश्रू ढाळत राहतील? ही कविता सर्वच महिला कैद्यांच्या मनातले हृदगत उलगडून दाखवणारी आहे. प्रत्येक जण आज त्या बंदिवासात असेच जीवघेणे प्रश्न घेऊन जगते आहे. आणखी एक मनस्वी कवयित्री इथे भेटते. तिचा दिवस उगवतो तो कवितेचे बोट धरून आणि मावळतो तो ही कवितेच्या साक्षीने. आरती हरियानातील यमुनानगर इथली. दैवदुर्विलासाने तिला इथे आणली. तिची चिमुकली मुलगी तिला पडलेले प्रश्न आरतीला विचारते. आरतीजवळ त्याची उत्तरे नाहीत. पण ती आपले मन मोकळे करते कवितेच्या माध्यमातून. ती आपल्या ‘काळ’ या कवितेत म्हणते– प्रत्येक गीतात एक वाद्य असतं, प्रत्येक गुन्ह्यापाठी एक रहस्य असतं, माझ्या गुन्ह्याची चिंता करू नका कुटुंबीयांनो, चमकणाऱ्या चंद्रावरही लांच्छन असतं... तर अशा आहेत ‘तिहार’मध्ये, एका बंदिवासात जन्मलेल्या या कविता, त्यांचे भाग्यच असे आहे, की बंदिवासातही त्यांनी फुलून यावे, डोळ्यात वाहणाऱ्या अश्रूंनी कागदांवर शब्दरूप घ्यावे, माणसातील माणूसपणाचे दर्शन त्यातून घडावे. एवढे करण्याची मोकळीक त्यांना मिळावी, मिळाली हे या कवितांचे भाग्य! या कविता आहे फक्त वानगीदाखल... यांची संपूर्ण दखल घ्यायची असल्यास हा संग्रह मन:पूर्वक वाचावाच लागेल. मन पानोपानी आपल्याला भेटत राहतील त्यांच्या भावभावना, आशा-निराशा, सुखदु:खे आणि ऊन सावल्या. पण त्यांची जगण्याची आणि उमलण्याची जिद्द मात्र अभूतपूर्व आहे. आजपर्यंत तुरुंगवासात असताना अनेक दिग्गजांनी अभूतपूर्व साहित्यनिर्मिती केली आहे. या महिलांनीही एक लहानसा प्रयत्न केला आहे, की लिहिण्याचा पण या लेखनातील जिद्द, आवेश बघून थक्क, स्तिमित व्हायला होते हे नक्की! ‘मी’ या कवितेत आरती म्हणतात– दावाच नाही माझा, सूर्य असण्याचा, पृथ्वीवरचा अंधार नाहीसा करण्याचा मात्र, मी एक दिवली नक्कीच आहे, तमाशा आजन्म लढण्याचा एकमेव वसा आहे माझा, येवोत दु:खांची वादळे, संकटांची वावटळ माझी ज्योत फडफडेल जराशी, पण विझणार नाही... – डॉ. माधवी वैद्य ...Read more

 • Rating StarDAINIK SAKAL 06-05-2018

  तिहार तुरुंगातल्या महिला कैद्यांनी केलेल्या कवितांचा हा संग्रह. या तुरुंगातल्या महिला कैद्यांसाठी काम करणाऱ्या विमला मेहरा आणि तिथं वार्तांकनाच्या निमित्तानं जाणाऱ्या पत्रकार वर्तिका नंदा यांना या कवितांचं महत्त्व जाणवलं. त्यांनी या कवितांचा पाठपुराव केला आणि त्यांचं संकलन केलं. तुरुंग, वेदना, स्वत:चं जगणं, तत्त्वज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर महिला कैद्यांनी कवितांतून लिहिलं आहे. पूरक आणि अर्थपूर्ण छायाचित्रांचाही समावेश पुस्तकात करण्यात आल्यामुळं त्या आणखी जिवंत झाल्या आहेत. मंजिरी धामणकर यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more