* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
 • Original Book Title: GEETANJALI
 • Availability : Available
 • Translators : AMITA GOSAVI
 • ISBN : 9788184984088
 • Edition : 5
 • Publishing Year : AUGUST 2012
 • Weight : 0.00 gms
 • Pages : 116
 • Language : Translated From BENGALI to MARATHI
 • Category : POEMS
 • Available in Combos :RAVINDRANATH TAGORE COMBO SET - 6 BOOKS
Quantity
Buying Options:
 • Ebooks:
 • Print Books:
GEETANJALI IS A BOOK OF POEMS WRITTEN BY THE OBEL LAUREATE, RABINDRANATH TAGORE. THIS BOOK CONTAINS THE TRANSLATED VERSIONS OF 103 BENGALI POEMS WRITTEN BY THE FAMOUS POET. IT WAS PUBLISHED ORIGINALLY IN THE YEAR 1910, IN BENGALI. THE ENGLISH VERSION OF THE BOOK WAS FIRST PUBLISHED IN THE YEAR 1912. RABINDRANATH TAGORE BECAME THE FIRST NONEUROPEAN TO WIN THE NOBEL PRIZE FOR LITERATURE, THANKS TO GEETANJALI. THE WORD GEETANJALI DIRECTLY TRANSLATES TO ‘SONG OFFERINGS’, AND THE POEMS IN THE BOOK HAVE MANY METAPHYSICAL ELEMENTS. THESE POEMS EVEN REFER TO A UNION WITH THE ‘SUPREME BEING’. RABINDRANATH TAGORE’S POEMS REFLECT HIS VIEWS ON LIFE AND SPIRITUALITY, AND TALK ABOUT THE MYSTERY, MELANCHOLY, AND COLOR SURROUNDING EVERYDAY LIFE. RABINDRANATH TAGORE WAS BORN ON MAY 7, 1861. TAGORE WAS A NOVELIST, POET, ESSAYIST, WRITER, PLAYWRIGHT, SONG COMPOSER, AND PAINTER. HE IS WIDELY KNOWN FOR CHANGING THE FACE OF BENGALI AND INDIAN LITERATURE AND MUSIC THROUGH HIS WORKS. TAGORE IS ONE OF THE MOST ESTEEMED RENAISSANCE FIGURES OF INDIA AND WAS RESPONSIBLE FOR PUTTING INDIA ON THE LITERARY MAP WITH HIS AWARDWINNING WRITING. HE WAS ALSO WIDELY ACCLAIMED AS A POLITICAL, RELIGIOUS, AND SOCIAL THINKER AND INNOVATOR, DUE TO HIS WORK THROUGH SANTINIKETAN AND VISWABHARATI. HIS OTHER FAMOUS WORKS INCLUDE THE HOME AND THE WORLD, THE POST OFFICE, CHOKHER BALI, KABULIWALA, GORA, THE GARDENER, AND THE LAST POEM.
हे छोटंस फूल पटकन खुडून घे, विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर धुळीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल; पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानितकर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघताबघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भीती वाटते. ह्या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे. वेळेतच त्याला खुडून घे.
THE NOBEL PRIZE IN LITERATURE 1913
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRANATHTAGORE#MEDHATASKAR #POSTMASTER #MRUNALINIGADKARI #AMITAGOSAVI #NILIMABHAVE #NASHTANEED #GEETANJALI # BAUTHAKURANEERHAAT #KABULIVALAANI ITARKATHA #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #MARATHIBOOKS
Customer Reviews
 • Rating StarDilip Shete

  "गीतांजली " विसाव्या शतकातील राष्ट्रभक्तीचे जाज्वल्य स्वाभिमानी रूप आणि राष्ट्रगीताचे आद्य प्रवर्तक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची नोबेल विजेती काव्यरचना म्हणजे गीतांजली... काव्याचे मनोहारी विभ्रम पद्यरूप अनोख्या आणि मोजक्या शब्दात गुंफून मुक्तंदात घडवलेले शब्द सौष्ठवतेच सौन्दर्यदर्शन म्हणजे गीतांजली... समस्त मानवजातीला `मी कोण आहे` या अनादी काळापासून सतावणाऱ्या प्रश्नाला अगदी अचूक उत्तर म्हणजे गीतांजली... जोपर्यंत हा अनाहत नाद आपल्या स्वमध्ये घुमत नाही, तोपर्यंत याचे उत्तर आपल्याला भेटत नाही कारण मी जो आहे तोच, जसा आहे अगदी तसाच आणि जितका आहे तितकाच स्वीकारन्यात काहीही न्यूनगंड नाही हा सत्याभास आपल्याला प्रथम गुरुदेवांनी गीतांजलीतुन दिला .. 🙏🙏🙏🙏 ब्रिटिशांनी एक तृतीयांश जगावर राज्य केले पण प्लेटोच्या रूपात ग्रीकांनी दिलेलं तत्वज्ञान म्हणजेच सौन्दर्यवाद आणि भारताचा गुरुदेवांनी दिलेला अध्यात्मवाद सगळ्यांना पुरून उरले आहे असं म्हणायला काही हरकत नाही... जिथे सार्त्रचा अस्तित्ववाद, कामूचा निरर्थकवाद आणि काफाचा शून्यवाद जन्मालाही आला नव्हता तिथे गुरुदेव या सर्व इझमच्या पूर्वसंध्येला खाली दिलेल्या एकाच ओळीतून वरील सर्व इझमचे दर्शन घडवतात हा माझा वैयक्तिक अभिप्राय 🙏🙏 `हे छोटंसं फुल पटकन खुडून घे विलंब करू नकोस, अन्यथा ते कोमेजून जाईल, याची मला भीती वाटते.... अशा जादुई ओळींच्या नगरीत आपली आनंदयात्रा सफल होवो अशी आशा... 👏👏 ...Read more

 • Rating StarDAINIK TARUN BHARAT 26-01-2013

  जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कविता... १९२०च्या दशतकात भारतात दोन थोर व्यक्ती होऊन गेल्या. एक महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. टागोरांनी स्वत:ला नेहमीच कवी म्हणवून घेतले असले तरी ते एक महान साहित्यिक होते. १९१३ सालचे आशियातील पहिले नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ उत्तम कवी, गीतकार, कादंबरीकार, कथाकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार, नट, निबंध लेखक आणि समीक्षक होते. चोखेरन बाली, गोरा, घरेबाहर या त्यांच्या कादंबऱ्या आजही जनमानसात उच्च स्थान मिळवून आहेत. त्यांच्या काव्याप्रमाणेच त्यांच्या कथा हे बंगाली साहित्याचेच नव्हे, तर भारतीय साहित्याचे अमूल्य धन आहे. काबुलीवाला, समाप्ती नष्ट नीड वा त्यांच्या काही गाजलेल्या कथा. त्यांनी आपल्या कथांतून माणसाच्या मनाचा वेध घेतला, स्त्री मनाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन घडविले. सबल स्त्रीची प्रतिमा समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. माणूस केंद्रस्थानी असलेल्या या कथा त्याकाळी आधुनिक बंगाली कथेचा पाया ठरल्या आणि त्या आजही तेवढ्याच ताज्या, टवटवीत वाटतात, कालातीत ठरतात. टागोर यांच्या गीतांजलीचा भावानुवाद करणाऱ्या लेखिका डॉ. अमिता गोसावी आपल्या मनोगतामध्ये म्हणतात. भारतात पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणाऱ्या थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह वाचण्याची आणि त्यातील सौंदर्य जाणून घेण्याची फार दिवसांपासून इच्छा होती. बंगाली भाषा अवगत नसल्यामुळे काव्याचा रसस्वाद घेणे अशक्यच होते पण अचानक एक दिवस रवींद्रनाथांनी स्वत:च गीतांजलीचा बंगालीतून इंग्रजीत केलेला पद्य अनुवाद वाचण्यात आला. सुरुवातीला अनेकदा वाचूनही त्यातला नेमका अर्थ उलगडला नाही. पण हळूहळू पुनर्वाचनानंतर रवींद्रनाथांना नेमके काय म्हणायचे आहे. ते ध्यानात येऊ लागले आणि वाचनातील गोडी वाढली. रवींद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ. एका बाजूला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार तर दुसरीकडे त्याची प्राप्तीची तळमळ, स्वत:च्या उणिवांची आणि मलिनतेची जाणीव अंत:करण शुचिर्तेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार, उपमा, अत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणाऱ्या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-आहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करून सहजपणे सांगितलेले जीवनविषयक शून्य व तत्त्वज्ञान या सर्वच गोष्टी थक्क करणाऱ्या होत्या. एके ठिकाणी कवी म्हणतो, -हे छोटंसं फूल पटकन खुडून घे. विलंब करू नकोस! अन्यथा ते कोमेजून जमिनीवर पुढीत पडेल, अशी मला भीती वाटते. त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही. तरी चालेल, पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणाऱ्या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे. मी सावध होण्याआधी बघता बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल. अशी मला भीती वाटते. या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला, तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे वेळेतच त्याला खुडून घे. दुसऱ्या एका कवितेत मृत्यूचे स्वरुप विशद करताना कवीने म्हटलं आहे. मला माझी नौका घेऊन निघालेच पाहिजे. किनाऱ्यावर सुस्तावलेला दिवस माझ्यासाठीच दीर्घकाळ रेंगाळला आहे. फुलांना बहर आणून वसंत ऋतूने निरोप घेतला आहे आणि आता पाकळ्या गढणाऱ्या रंग उडालेल्या फुलांचे निरोपयोगी ओझे घेऊन मी रेंगाळत वाट बघतो आहे. लाटा उचंबळायला लागल्या आहेत आणि पलीकडे किनाऱ्यालगत सावली देणाऱ्या वृक्षांची जीर्ण पिवळी पाने पटापट गळू लागली आहेत. तू कुठल्या शून्यात नजर लावून बसला आहेस? पैलतीरावरून धान्याच्या झुळकीबरोबर येणारी दूरवरच्या गाण्याची लकेर तुला जाणवत नाही का? ऐकू येत नाही का? अशी ही भावपूर्ण गीतांजली टागोर स्वत: एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्याने रेखाटलेल्या चित्रासारखे काव्यांतून नादमय शब्द चित्र आपल्या डोळयांसमोर उभे करण्याची त्याची हातोटी केवळ अवर्णनीय! लेखिकेला जे सौंदर्य ... ते मराठीत अनुभवण्यासाठी कलेला हा सुरेख भावानुवाद इंग्रजी न जाणणाऱ्या वाचकांना रवींद्रनाथांची प्रतिमा उलगडून दाखविण्याचा केलेला हा सुंदर प्रयास. -डॉ. शैलजा गायकवाड ...Read more

 • Rating StarDAINIK LOKPRABHA

  रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाचा मराठी भावानुवाद डॉ. अमिता गोसावी यांनी केला असून ते गीतांजली या पुस्तकाच्या रुपात मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. देशाला प्रथमच साहित्यातील नोबेल मिळवून देणाऱ्या त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाा मराठी भावानुवाद उत्तम साधला आहे. या काव्यसंग्रहातून हळुवार कवी, नितळ मनाचा माणूस उलगडतो. आशा निराशेवर हिंदकळणारं मन या कवितांमधून प्रकट होतं. समर्पक शब्दांमध्ये मांडलेले जीवन तत्वज्ञान, सहज सुलभ भावाविष्कार वैशिष्ट्यांसह टागोरांची कविता व्यक्त होते. ...Read more

Write Your Own Review
 • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more