* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MRUGAJALATIL KALYA
  • Availability : Available
  • ISBN : 9788171616398
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE BUDS IN MIRAGE THIS IS A COLLECTION OF 28 METEORS WRITTEN BY V. S. KHANDEKAR. MANY A PEOPLE WITH UTTERLY GENUINE AND IMAGINATIVE MIND, AND FROM DIFFERENT TIMES AND PROFESSIONS, RIGHT FROM EOSOP TO GIBRAN HAVE TRIED THEIR HANDS ON THIS FORM OF LITERATURE, THEY TAKE THE CREDIT FOR MAKING THIS SHORT FORM OF LITERATURE SO POPULAR AND INTERESTING.METEOR OFTEN APPEARS TO BE A COVERT INSINUATION. V. S. KHANDEKAR HAS VERY CONSIDERATELY AND CAREFULLY TITLED THIS FORM AS "METEOR`.THE TOPICS FOR METEOR HAVE CHANGED WITH THE TIME, BUT METEOR HAS ALWAYS WIDENED ITS CRITICAL SIGHT MAKING IT MORE EXTENSIVE AND UBIQUITOUS. SOMETIMES IT WAS TRIED IN A POETICAL FORM BUT ITS SOUL REMAINED THE SAME. THE OUTER CHANGED APPEARANCE DID NOT CHANGE ITS INNER BEING.THE STRENGTH OF A METEOR LIES IN REVEALING TRUTH VERY SUGGESTIVELY AND IMMACULATELY. IN THIS WORLD, EVERYBODY IS CONTINUOUSLY UNDER A DISGUISE. MOSTLY, BECAUSE OF PERSONAL AND SOCIAL SELFISHNESS AND LUST, THESE DISGUISES FAIL TO SUCCEED IN DECEIVING. THIS COLLECTION WILL MAKE THE READER REALIZE THAT ALL THE METEORS HAVE VERY CLEVERLY AND DEXTEROUSLY UNREVEALED THE SPURIOUS FALSEHOOD AND REVEALED THE TRUTH HIDING UNDERNEATH.
वि. स. खांडेकरांनी लिहिलेल्या अठ्ठावीस रूपककथांचा संग्रह. इसापासून जिब्रानपर्यंत भिन्न भिन्न काळांतल्या आणि निरनिराळ्या पेशांतल्या प्रतिभावंतांनी कथेचा हा चिमुकला, पण चटकदार प्रकार लोकप्रिय केला आहे. रूपककथा ही अनेकदा अन्योक्तीसारखी असते किंवा भासते. `रूपककथा` हे या वांड.मयप्रकारचे शीर्षकही खांडेकरांनी अत्यंत विचारपूर्वक `घडवले` आहे. या प्रकारच्या कथेचे विषय काळाबरोबर बदलत गेले, तरी तिचा टीकात्मक दृष्टीकोन अधिक अधिक व्यापक, सामाजिक व सर्वस्पर्शी होत राहिला. क्वचित तिला काव्यमय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, तरी तिची आत्मशक्ती होती तशीच राहिली. तिच्यात काहीही बदल झाला नाही. या रूपककथांचे खरे सामर्थ्य सूचकतेने, पण अचूक रीतीने केलेल्या सत्यदर्शनात आहे. जग अष्टौप्रहर तोंडावर मुखवटे घालून आपले व्यवहार पार पाडीत असते. व्यक्ती आणि समाज यांची बाह्यरूपे स्वार्थलंपटटेमुळे बहुधा फसवी ठरतात. या सर्वांचे सत्यस्वरूप कळावे, म्हणून त्यांच्या तोंडांवरचे मुखवटे दूर करण्याचा रूपककथा कसोशीने आणि कौशल्याने प्रयत्न करीत असते, हाच प्रत्यय हा संग्रह वाचून वाचकांना येईल.

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #मृगजळातील कळ्या
Customer Reviews
  • Rating StarNEWS PAPAR REVIEW

    पृथ्वी, स्वर्ग आणि नरक धर्मार्थ नौका चालविण्याशिवाय गूहक दुसरे काहीच करीत नसे! आणि त्याने काही करायचे मनात आणले असते, तरी ते करायला त्याला वेळच मिळाला नसता. पहाटे तांबडे फुटण्यापूर्वीच यात्रेकरूंची दोन्ही तीरांवर गर्दी होई. इकडली माणसे तिकडे पोचवायच आणि तिकडली माणसे इकडे आणायची, यातच पूर्वेकडे उगवलेला सूर्य पश्चिमेकडे मावळून जाई. यात्रेकरू देतील ते त्याचे खाणे! कुणीतरी फेकून दिलेले फाटके धोतर हेच त्याचे वस्त्र! संध्याकाळ झाली की, तो अगदी गळून जाई. रहदारी थांबताच नौका तीराला लावून तो तिच्यातच झोपी जाई. झोपेत त्याला एखादेवेळी स्वप्न पडे. त्या स्वप्नात नदीत बुडता बुडता त्याने वाचविलेल्या एखाद्या लहान मुलाचा किंवा स्त्रीचा चेहरा तेवढा त्याला दिसे. या निस्वार्थी आत्म्याच्या पुण्याचे इंद्रला भय वाटू लागले! त्याचा मनात येऊ लागले - उद्या याने आपले इंद्रपद घेतले तर? सर्व देवांचा सल्ला घेऊन त्याने कलीला पृथ्वीवर पाठवून दिले. संध्याकाळ झाली होती. कली एका यात्रेकरूच्या वेषाने गूहकापाशी आला. गूहक अगदी दमून गेला होता. कली त्याला म्हणाला, ``भल्या गृहस्था, तू इतके श्रम करतोस! पण त्याचं फळ तुला काय मिळतं?`` गूहक नुसता हसला. कली मधूर वाणीने म्हणाला, ``इतक्या सुंदर बायका तुझ्या नावेतून प्रवास करतात; पण त्यांच्यापैकी एकीने तरी तुझे वल्ही मारून दुखणारे हात घटकाभर चेपले आहेत का?`` गूहकाने नकारार्थी मान हलविली. कली उद्गारला, ``बाबा, जग असेच कृतघ्न आहे! हे यात्रेकरू तुझ्या नावेतून मेवामिठाई खात जातात; पण तुला कधी त्यांनी गोडगोड खायला दिले आहे का? त्यांच्या हातात पेढा नि तुझ्या पदरात शिळ्या भाकरीचा तुकडा!`` गूहकाच्या मनात आले, ``खरचं हे जग फार कृतघ्न आहे. असल्या कृतघ्न जगात राहण्यापेक्षा -`` पण हे जग सोडून जायचे कुठे? कलीने त्याला दुसऱ्या जगाचा मार्ग दाखवला. त्या जगाचे नाव स्वर्ग! हे नवीन जग जुन्या जगापेक्षा कितीतरी कृतज्ञ आहे, असे गूहकाला वाटू लागले. तो चार पावले चालला न चालला तोच लताकुंजातून एखादी अप्सरा मुरकत मुरकत पुढे येई आणि त्याच्याकडे तिरप्या नजरेनं पाहात म्हणे, ``महाराज, आपण फार दमला असाल! दासीकडून चरणसेवा घ्यावी!`` बोलायला सवड न देताच ती त्याला लताकुंजात घेऊन जाई. तिथे तिचे हात गळ्याभोवती पडले की, कुंजात फुललेल्या फुलांच्या सुगंधावर आपण तरंगत आहोत, असा गूहकाला भास होई. प्रत्येक लताकुंजात एक एक अप्सरा अशा रीतीने त्याचे स्वागत करीत असे. इतकेच नव्हे, रंभा, उर्वशी, मेनका, घृताची या मोठ-मोठ्या अप्सरांना आता भांडणाचा एक नवाच विषय मिळाला. ``गूहकाचे प्रेम कुणावर आहे?`` गूहकाला स्वत:ला ते कधीच सांगता आले नाही. ज्या अप्सरेच्या बाहूपाशात तो असे, तिच्यावर आपले उत्कट प्रेम आहे, असे त्याला वाटे; पण ती दूर जाताच ते प्रेम हा एक गोड भास होता अशी त्याच्या मनात खात्री होई. अमृत प्यायचे नि अप्सरांच्या अलिंगनात कालक्रमणा करायची, एवढाच काय तो त्याला उद्योग उरला. एखादे वेळी आपल्या धर्मार्थ नौकेची त्याला आठवण होई, नाही असे नाही; पण तो कुठल्या तरी मधूर पूर्व स्मृतीत रमून जात असे, असे वाटताच त्याच्या सेवेला असलेली अप्सरा आपला बाहुपाश अधिकच दृढकरी. त्या पाशात त्या दिव्य आठवणीचा चोळामोळा होऊन जाई. असे किती दिवस गेले, ते गूहकाला कळलेही नाही. पण एक दिवस असा उजाडला की, त्याच्याकडे एकाही अप्सरेने ढुंकून पाहिले नाही! कुणीही ठुमकत ठुमकत त्याच्यापुढे अमृताचा पेला ठेवला नाही! या स्थित्यंतराचा अर्थच त्याला कळेना! मोठ्या प्रयासाने त्याने कलीला गाठले. कली त्याला नमस्कार करीत म्हणाला, ``आता हीच तुझी आमची शेवटची भेट!`` ``म्हणजे?`` गूहकाने विचारले. ``स्वर्गातला तुझा शेवटचा दिवस आहे आज! उद्या तू-`` ``उद्या कुठे जाणार मी?`` ``नरकात!`` विकट हास्य करीत कली उद्गारला. ``तुझे पुण्य तू उपभोग घेऊन संपवलंस! फुलांचं निर्माल्य झालं की ती टाकून देतात ना? तसं तुझ्या सारख्या माणसांचही निर्माल्य-`` कली पुढे काय म्हणाला हे गूहकाला ऐकूसुद्धा आले नाही. त्याच्या कानात नरकातल्या दुर्दैवी प्राण्यांच्या किंकाळ्यांचे पतिध्वनी घुमू लागले होते. दुसरे दिवशी देवदूतांनी गूहकाला स्वर्गद्वाराच्या बाहेर आणले आणि यमदूतांच्या हवाली केले. गूहक यमदूतांना म्हणाला, ``नरकात पाऊल टाकण्यापूर्वी एकदा पृथ्वीवर जाऊन येण्याची इच्छा आहे माझी!`` यमदूतांच्या मनातही भटकायचे होतेच! गूहक नदीतीरावरील आपल्या धर्मार्थनौकेकडे धावतच आला. त्याने पाहिले नौका चालवायला कुणी नसल्यामुळे यात्रेकरूंच्या पैकीच कुणीतरी वल्हवीत होता त्याला नीट वल्हवता येत नव्हते. नौका एकदम कलली. एक तान्हे मूल पाण्यात पडले, त्याच्या आईने किंकाळी फोडली. गूहकाने पाण्यात उडी टाकली. हा हा म्हणता तो त्या मुलापाशी पोचला. त्याने मूल बाहेर काढले. मूल फार घाबरले होते; पण ते जिवंत होते. गूहकाला विलक्षण आनंद झाला. त्या बालकाच्या आईचा चेहरा पाहताच त्याचे मन म्हणाले, ``अमृताची माधुरी आणि अप्सरांचे लावण्य या आनंदापुढे फिकी आहेत.`` यमदूतांनी तीरावरून हाक मारली, ``गूहक, चल, वेळ लावू नकोस!`` गूहक तीराकडे आला. त्याला पाहताच ते यमदूत दचकले. एक दुसऱ्याला म्हणाला, ``आपण भलताच मनुष्य घेऊन जात होतो. याच्या भोवतालचा हा पुण्याचा प्रकाश पहा. स्वर्गात जायचा अधिकार आहे याला!`` ``माझा स्वर्ग इथंच आहे!`` गूहक हसत उत्तरला. ``कुठं?`` यमदूताने विचारले. गूहकाने पाण्यातल्या नौकेकडे पाहिले. दृष्टीच्या मागोमाग त्याचे शरीर धावत गेले. पायांची हालचाल थांबताच वल्हविणाऱ्या हातांची हालचाल सुरू झाली. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more