* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665697
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF 18 OF DESAI`S SHORT STORIES. THE STORIES WERE PUBLISHED EARLIER. BUT MEHTA CATEGORISED THE STORIES SUBJECTWISE AND PUBLISHED THEM UNDER THE HEADING OF ASHADH IN JAN. 1989. THESE STORIES HAVE A RURAL BACKGROUND. THE LANGUAGE IS USED VERY APPROPRIATELY. IT TAKES US TO THE VILLAGE LIFE IMMEDIATELY. EACH STORY HAS A DIFFERENT STORY TO TELL. THEY ALL REVEAL DIFFERENT MOODS, DIFFERENT ASPECTS OF HUMAN MIND. THIS HUMAN MIND IS SOMETIMES VERY SOFT, SOMETIMES DIFFICULT, YET SOMETIMES IT HANDLES THINGS DELICATELY. THE MORE YOU READ THE MORE DIFFICULT IT BECOMES TO UNDERSTAND THE NATURE OF VILLAGE PEOPLE. WHEN YOU FEEL THAT THEY ARE CONCERNED ABOUT EACH OTHER THEY STOOD TO BE DIFFERENT, WHEN YOU FEEL THAT THEY HARDLY BOTHER ABOUT ANYONE ELSE, THEY REVEAL THE SOFTEST CORNER OF THEIR MIND. THEY REVEAL THE SIMPLICITY, THEY UNMASK DIPLOMACY OF UNIMAGINED TURNS, THEY BETRAY US, THEY CONFIDE IN US.
निसर्ग आणि माणूस यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ऋतूंप्रमाणेच माणसाचे मनही रंग बदलत असते. हीच कल्पना उचलून रणजित देसाई यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक कथा लिहिल्या आणि त्यांना ऋतूंची नावे दिली. जसे वैशाख, आषाढ, मेघ. ग्रामीण पाश्र्वभूमीवर चितारलेल्या या कथा माणसातल्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवतात. निसर्गाच्या ऋतुचक्राचे माणसांच्या दैनंदिन जीवनावर आणि मनावरही जे पडसाद उमटतात ते लेखकाने आपल्या लेखणीत अचूक पकडले आहेत. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarSagar Kasalkar

    Nicee

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 09-04-1989

    रणजित देसाई हे मराठीतील एक मातबर लेखक. स्वामी आणि श्रीमान योगी या त्यांच्या कादंबऱ्यांनी ते जवळपास प्रत्येक मराठी वाचकापर्यंत पोचले. या दोन कादंबऱ्यांना व्यावहारिक यशही खूप लाभलं. या कादंबऱ्याखेरीजही त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली आणि थासुद्धा लिहिल्या. परंतु एवढं चौफेर लेखन करूनही आज ते जास्त परिचित आहेत ते स्वामीकार म्हणूनच! खरं तर स्वामीकारांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगदी या माती संस्कृतीमधली त्यांची अस्सल माणसं, त्यांची सुखं-दु:खं, त्यांचं जीवन याचे अत्यंत सुरेख चित्रण देसाई करतात. त्यांची कथाकथनाची शैली सरळ पण फार आकर्षक आहे. तिला उपमा-अलंकाराचा फाजील सोस नाही. जे त्यांना दिसलं भावलं त्याचं चित्रमय शैलीमध्ये अत्यंत वाचनीय असं चित्रण देसाई करतात. काही वेळा त्यांच्या कथा या त्या-त्या प्रदेशापुरत्या न राहता त्या सर्वव्यापी बनतात. अलीकडेच देसाई यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. हे कथासंग्रह देसाई यांच्या कथा लेखनाची सारी वैशिष्ट्य ठळकपणे दर्शविणारे आहेत. या तीन कथासंग्रहांमध्ये एकंदर चोपन्न कथा (प्रत्येकी अठरा) आहेत. यापूर्वी जाण आणि कणव हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. याच संग्रहातील कथांची विषयदार (देसाई यांच्या म्हणण्यानुसार) निवड करून त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या चोपन्न कथांमधील काही कथा खरोखरच लघुकथा म्हणता येतील अशा आहेत. आणि तरीही परिणामकारकतेत त्या कमी पडत नाही. भोग, दुष्काळ यासारख्या कथा परिस्थितीचा किती जबरदस्त काच माणसाला असतो याचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. तर मी आमदारकी का सोडली? भांडवलदार का राहिले? या अगदी वेगळ्या धाटणीच्या कथा आहेत. पूर नावाच्याच दोन कथा वैशाख आणि मेघ या कथासंग्रहात आहेत. दोन्हींची शीर्षके एक असली तरी मांडणी आणि परिणाम वेगवेगळा आहे. वैशाख संग्रहातील रक्त, मरण, शाळा या कथा अधिक स्मरणात रहाणाऱ्या आहेत. हे तीनही संग्रह रणजित देसाई यांच्या कथांचे सार विशेष उत्तमपणे मांडणारे आहेत. हे नक्की. -अनिरुद्ध शांडिल्य ...Read more

  • Rating StarDarshana Chaphekar

    निसर्ग आणि माणूस यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ॠतूंप्रमाणे माणसाचे मनही रंग बदलत असते. हीच कल्पना उचलून रणजित देसाईयांनी अनेक कथा लिहिल्या आणि त्यांना ॠतूंची नावे दिली. ग्रामीण पार्श्वभूमीवर चितारलेल्या या कथा माणसातल्या सर्व भावभावनांचं प्त्ययकारी दर्शन घडवतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 9-4-1989

    वैशाख, मेघ, आषाढ दूरदर्शनसारख्या दूरगामी माध्यमातून रामायण, महाभारतासारख्या प्राचीन, सांस्कृतिक वारसांचा जीर्णोद्धार होण्याचे हे दिवस आहेत. व्यक्तिवेध, काव्यविचार, जीवनदर्शन इ. अनेक बाबतीत हे नवे दर्शन ढोबळ, अपुरे असले तरी ते निखालस खोटे विंâवा पूरण निरुपयोगी असू शकत नाही. औद्योगिक संस्कृतीची कठोर गती आणि असह्य दडपण याखाली चिरडून मूल्यविचाराबाबत गोंधळून गेलेल्या समाजापुढे अध्र्या कच्च्या रूपात का होईना पण निखळ प्रामाणिकपणाचे महत्त्व, सचोटीची विंâमत, धैर्याचे मूल्य, मूढ आत्मसंतुष्टतेपेक्षा विशाल, निरागस त्यागातले साफल्य अशा गोष्टी ठेवल्या जाणे अगत्याचे आहे. अगदी अशाच पद्धतीने तीस-पस्तीस वर्षापूर्वी मावळत आलेल्या, परंपरागत सदाचाराची कास धरू पाहणाऱ्या सत्त्वशील पिढीच्या काही गोष्टी ‘आषाढ’, ‘वैशाख’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर येतात. या कथा पुनर्मुद्रित आहेत आणि लेखकाचे नावही नवे नाही. महाराष्ट्राचे लाडके लेखक ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्या लेखणीतून उतरलेल्या या कथा आहेत. जीवनाबद्द्ल प्रेम या कथांच्या वाटा आणि वळणे गुंतागुंतीची आणि दुर्बोध नाहीत. कथांचे संदर्भ केवळ प्रासंगिक आहेत, व्याप्तीही मर्यादित आहे, पण कथांच्या अभिव्यक्तीमध्ये त्या त्या लेखकांचे जीवनाबद्दलचे प्रेम आणि कुतुहल अत्यंत प्रांजळपणे, थेटपणाने प्रगट झाले आहे. रणजित देसार्इंच्याबाबतीत हे प्रेम खूपदा सौजन्याच्या चौकटींवर अधिक आहे. माणुसकीचा, उमदेपणाचा गौरव करणारी त्यांची प्रतिभा, खानदानी, अब्रुदार, सज्जन, सुसंस्कृत, लोकलाजेला भिणाNया व्यक्तिशेषांची प्रभावी चित्रे अत्यंत सहज कौशल्याने रंगवते. या चित्रांचे रंग खूपदा नको इतके झगझगीत असतात. म्हणजे अमावस्येचे चित्रही निळ्या रंगाने रंगविण्याकडे कल असतो. दरोडेखोरही विशाल अंत:करणाचे असतात. तिथे इनामदार, पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे? खूपदा परीकथांशी साम्य सांगणाऱ्या या कथांच्या चौकटी आहेत. काही ठराविक टप्पे आणि कल्पनाबंध त्यात जाणवतात. त्यातून नकळत एक संदेश मिळतो. त्यांच्या प्रकाशात वाचणाNयांचं माणुसपण उजळून निघतं. या एकाच सामथ्र्यामुळे आपल्या सर्व तथाकथित मर्यादा ओलांडून या कथा मोठ्या होतात. गंभीर जीवनदर्शन परंतु यापलिकडे झेप घेणारे काही सूक्ष्म तपशील गंभीर जीवनदर्शनाचीही चूणूक दाखवून जातात. रिकामटेकडा आणि नालायक असा धाकटा भाऊ सापासारखा घरात शिरताना असहायपणे डोळे गाळणाNया विठूचे कासावीस हृदय (साप). स्रीत्वाच्या मादक आकर्षणात सापडून एका लहानशाच मर्यादेत पण अस्वस्थ भिरभिरत राहणारे मामाचे मन (चमेली). चारशे रुपये गाठीला घेऊन निघालेल्या म्हाताऱ्याबरोबर अपरात्री प्रवास करत चालत असताना दुर्दैवी जोतिबाच्या डोक्यात फिरणारा विचित्र विचारांचा भोवरा (भोवरा). आपल्याच एकेकाळच्या बायकोच्या आजारी नवऱ्याला वाचविण्यासाठी म्हणून भर पुरात डोण घालणाऱ्या एकाकी सखाच्या मेंदूत माजलेले वादळी काहूर (पूर). अशा कित्येक ठिकाणी त्या सामान्य असूनही जीवनाच्या असामान्य प्रेरणा अनुभवणाNया व्यक्तींच्या जगण्यातली तडफड अगदी सहज व्यक्त झाली आहे. या व्यक्तींना द्यावा लागलेला संघर्ष हा नेहमीच दारिद्र्य, आजार, संकटे अशा ढोबळ संदर्भातला नाही. अनेकदा तो मूल्यांचा संघर्ष आहे. माणसांनीच माणसाला टाकावं, एकाकी करून सोडावं, या प्रकारात जो भीतीदायक एकटेपणा आहे तो प्रत्येकाच्या काळजात ओसाड माळरानाप्रमाणे पसरलेला असतो. तो तुडवताना जी दमछाक होते त्या दमछाकीच्या खुणा या कथांनी वारंवार दाखविल्या आहेत, मात्र यावर उतारा म्हणजे मनाचा मोठेपणा, वैराला प्रेमाने उत्तर असा लेखकाचा विश्वास आहे. नितळ मराठी शैली या दोन संग्रहाची शैली नितळपणे अस्सल मराठी आहे. संस्कृतप्रचुरतेचा तिला वास नाही की ती इंग्रजाळलेलीही नाही. बोली भाषेचा वंâटाळवाणा अतिरेक नाही. ती शुद्ध, निर्भेळ मराठी आहे. अदावत, पावलट, बुकाणा, दाडवान, लेकावळा, गत्या असल्या खास मराठी शब्दांनी रुजलेली ही शैली प्रतिमारुपकांच्या अवघड वाटेला जात नाही. पण अभिव्यक्तीचे तिचे म्हणून एक सामथ्र्य आणि सौंदर्य आहे. या कथांनी ज्यांच्या कहाण्या सांगितल्या त्या सुसंस्कृत व्यक्तीविशेषांना शोभावी अशी ही शैली आहे. डोईवरला पदर हलू न देण्यातला शालीनपणा जपण्यात तिला रस आहे. रणजित देसार्इंच्या या कथासारख्या कथा आता कोणी लिहिणार नाही. कोणत्याच अर्थाने तसे वातावरण आता राहिले नाही. पण मागे वळून पाहताना थोडंसं रेंगाळायला हरकत नाही असा दिलासा देणाऱ्या या जुन्या कथा नव्याने वाचण्यासारख्या आहेत, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more