* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COCKTALE CARNIVAL
  • Availability : Available
  • Translators : MANJIRI DHAMANKAR
  • ISBN : 9789353174958
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 304
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
COCK-TALE CARNIVAL IS A CELEBRATION OF STORIES TO TICKLE YOUR LITERARY BONE. A SCRUMPTIOUS FEAST, WHERE YOU ARE BOUND TO EXPERIENCE THE ENTIRE GAMUT OF EMOTIONS...FROM AMUSEMENT TO INTRIGUE, FROM PATHOS TO AROUSAL TO SURPRISE – AN ORDER, FAIRLY UNPREDICTABLE!
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणाऱ्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#COCKTALECARNIVAL #CHETAANJOSHII #MANJIRIDHAMANKAR #TRANSLATED STORIES #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #कॉकटेलकार्निव्हल #चेतनजोशी #मंजिरीधामणकर #अनुवादितकथासंग्रह #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 30-05-2021

    वेगळ्या वाटेवरच्या कथा... ‘कॉकटेल कार्निव्हल’ हा कथासंग्रह चेतन जोशी यांच्या त्याच नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. हा अनुवाद मराठीत मंजिरी धामणकर यांनी केला आहे. वेगळी वाट चोखाळून लिहिलेल्या या कथा आहेत. प्रत्येक कथेचा आकृतीबंध वेगळा, शैली वेळी, मुळात कल्पनाच वेगळी आणि या वेगळ्या कल्पनेला कुठल्याही साच्यात न अडकता लेखक मुक्त सोडतो, तिच्याशी प्रामाणिक राहतो, असे वाटते, की लेखक शिल्प घडवीत आहे. त्यात प्रयोग करीत आहे. वेगळा आकार देऊन बघत आहे. कदाचित शिल्प स्वत:च्या इच्छेने साकारत जात आहे आणि त्यावेळी लेखक फक्त माध्यम उरतो आहे. ‘अरूपाचे रूप’ कथेत सर्जनाला प्रेरणा देणारा राग निर्मितीचा ध्यास आहे. सात स्वरांतील एक स्वर गायब होणे, ही कल्पनाच विलक्षण आहे. या भन्नाट कल्पनेचा ओहोळ बघता बघता प्रपात होतो, वाचकाला त्यात ओढून पुढे मार्गक्रमण करतो. ‘पैसा झाला खोटा’ असेच एक वेगळे शिल्प. ‘बोलाविता धनी’ ही कथा शब्दभ्रामकाची आहे बोलक्या बाहुल्या घेऊन विविध आवाज काढणाऱ्या अवलियाची कॉलेजात घडणारी ही कथा शेवटी काय वळण घेते, हे कथेतच वाचायला हवे. शेवटची कथा ‘ओ हेन्रीचा शाप’ असाच वेगळ्या वाटेवरचा वेगळा अनुभव देते. ‘लवकर ये रे मित्रा’ ही गूढकथेच्या वाटेवर जाणारी कथादेखील अगदी वेगळे वळण घेते. कुठलेही पान उघडावे अन् कुठलीही कथा वाचावी. कथा छोट्या, कंटाळा येण्यापूर्वीच संपणाऱ्या आणि स्तंभित करणाऱ्या आहेत. ‘द्विभुज त्रिकोण’ यात दुभंग व्यक्तिमत्त्वातील दोघांचेही एकीवरच प्रेम जडते, ही अफलातून कल्पना कथा रूप घेते. ‘वर्षानृत्य’ कथेतील निसर्गाच्या वेगळ्या चपखल शब्दांतील वर्णनात वाचक हरवून जातो. तो देखावा नजरेसमोर साकारतो. कोकिळा कुहुकली, कावळा कावकावला, बिरंगी खंड्या अशा शब्दयोजना वाचताना अनुवादिकेचे कौशल्य दिसते. मुळात अनुवाद हा अवघड लेखन प्रकार. त्यातही अशा वेगळ्या आशयाच्या, वेगळ्या पातळीवरील कथांचा अनुवाद फारच कठीण. तारेवरची कसरत. तीही सहज व्हायला हवी. या अनुवादात ती दिसून येते. ‘रेडिओऍक्टिव्ह प्रेम’, ‘ऍडव्हर्टिब्रेट’, ‘संकेतस्थळ-प्लँचेट’, ‘माउस ट्रॅप’, ‘इतिहासाला स्मरण नसतं’ इत्यादी प्रत्येक कथेचा वेगळा विषय, त्यासाठी प्रत्येक वेळी वापरलेला वेगळा आकृतिबंध, कथा विषयातील ज्ञान, भावनांची प्रामाणिक अभिव्यक्ती, कथेच्या शेवटासाठी केलेला अनेक शक्यतांचा विचार ही चेतन जोशी यांच्या कथालेखनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच त्यांच्या कथा बौद्धिक आनंद देत देत मनोरंजन करतात. कल्पनाबीजाचे रूप साकारताना लेखक त्यावर संस्कार करीत नाहीत. त्याला फुलू देतात. वाढू देतात. कथा पुढे सरकते, दिशा ठरते, त्या दिशेने वाचकांचे विचार पुढे धावतात आणि एका बेसावध क्षणी लेखक वाचकाला सोडून वेगळ्याच मार्गाने निघून गेलेला असतो. वाचक अचंबित, स्तंभित! अनेकदा आपण कविता कशी जन्म घेते ही कवीकडून ऐकतो; पण लेखनसुन्नता - रायटर्स ब्लॉक याविषयी तुम्ही लेखकाचा स्वानुभव कधी ऐकला आहे का? तर मग तो पहिल्याच कथेत वाचायला हवा. कथेचे नाव आहे ‘मोरपंखी शाईची दलदल’. या सुन्नतेत येणारा अनुभव मानसिक पातळीवर कसा असतो, हे शब्दात उतरवणे महाकठीण, लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न, झोकून देणे अशातून हा अनुभवही वाचकांसमोर साकारतो. मानसिक पातळीवरील विचार आणि प्रत्यक्ष जीवन याचा दुपेडी गोफ कथेत गुंफला आहे. मुळात हा विषय नव्हे, अनुभव लिहावासा वाटला, हेच विशेष आणि तो उतरलाही असा, की वाचक लेखकाच्या मानसिक क्लेशाचा साक्षीदार होतो. अनुवादाला कठीण अशा या कथेत अनुवादिकेने लेखकाचा मानसिक अवकाश कवेत घेतला आहे. नावाप्रमाणेच विविध विषय, विविध आकृतिबंध यांनी बनवलेले हे ‘कथांचे कॉकटेल’ रसपूर्ण आणि चवदार बनले आहे. कथांचा रोचक, रंजक व रोमांचक अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे. – प्रतिमा दुरुगकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25.04.2021

    कागद तोच, रंग तेच , कुंचला तोच; पण प्रतिभावान चित्रकार त्यातून पाहता पाहता इतरांपेक्षा वेगळे काही तरी साकारून दाखवितात. हे पुस्तक तसेच आहे. पात्र , प्रसंग आपल्यातीलच ; पण चेतन जोशी या सर्वांना वेगळा आयाम देतात. कथेला सुरुवात करताना वाचक ज्या अपेक्षा ेऊन असतो, त्या पलीकडे ते घेऊन जातात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
Vaishali Dhande, Amravati.

Their is no doubt that G.B.Deshmukh`s writings are very well but when you come across the characters in this book which you had heard from the author himself then the reading felt like you are also part of that story.... the author deserves many cngratulations for this wonderful book "Durdamya ". Amazingly written balancing humor as well as seriousness... It also taught importance of learning the language of the state you work in otherwise Amravati will also have one Udhampur in it. ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
सि.एम. भागडे, नागपूर.

"दुर्दम्य" पूर्ण वाचुन झालं. लेखकाने एकनाथन साहेबांविषयी खुप छान लिहिलं आहे. ते माझे पहीले एसी होते. नवीन निरीक्षक असतांना, त्यांना व्हरांड्यात बसलेले पाहुन, लपुन छपुन रेंज ची डाक देऊन मी पळून जात असे. तेव्हा दर्शन घेऊन प्रत्यक्ष भेटलो असतो तर बे झाले असते, असं आता वाटते. ...Read more