* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAYADA - DAUGHTER OF IRAQ
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177666571
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 294
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MAYADA AL-ASKARI WAS BORN IN A VERY POWERFUL FAMILY OF IRAQ. HER GRANDFATHER HAS FOUGHT BRAVELY ALONG WITH LAWRENCE OF ARABIA. HER OTHER GRANDFATHER IS RECOGNIZED AS THE FIRST NATIONALIST. MAYADA HAD NO IDEA THAT HER LIFE WILL BE CHANGED DRASTICALLY WITH THE RULE OF SADDAM HUSSAIN AND HIS BATH PARTY. SHE WAS A DIVORCEE WITH TWO CHILDREN. SHE WAS SOMEHOW MANAGING WITH THE PRINTING BUSINESS. BUT ON ONE MORNING OF 1999, THE SOLDIERS OF SADDAM`S REIGN ARRESTED HER UNDER THE INDICTMENT THAT SHE IS INVOLVED IN ANTI-SADDAM ACTIVITIES AND WAS PRINTING AND DISTRIBUTING POSTERS FAVOURING THESE ACTIVITIES. SHE WAS IMPRISONED IN THE NOTORIOUS BALDIYA PRISON. THEN SHE REALISED THE MEASURE OF HER BEING ALONE. SHE WAS THROWN INTO THE FOUL SMELLING CELL WHERE ALREADY THERE WERE 17 LADIES LOCKED UP BEFORE HER. ALL THESE FEMALES WERE FROM THE DIFFERENT CLASSES OF IRAQ, BUT THEIR DESTINY SEEMED TO BE THE SAME, IMPRISONMENT WITHOUT ANY TRIAL, TORTURE AND THE CONTINUOUS FEAR OF DEATH. WHILE BEING IN THIS CELL, THEY STARTED SHARING THEIR STORIES WITH EACH OTHER. ALL THE CO-PRISONERS WERE VERY MUCH IMPRESSED WITH MAYADA AND HER LINEAGE WITH SOME GREAT PEOPLE, THE HISTORY OF HER ANCESTORS, THE ASSASSINATION OF THE KING FAIZAL II, HER MEETINGS WITH SADDAM HUSSAIN WHO WAS RESPONSIBLE FOR THEIR IMPRISONMENT; HER PAST LIFE FASCINATED THEM. MAYADA`S STORY GIVES US AN INSIGHT ABOUT THE LIFE IN IRAQ, ITS CULTURE AND HISTORY, THE CIVILIZED WAYS OF IRAQIS, AND THE TRANSFORMATION IN THE MINDS AND LIVES OF THE COMMON PEOPLE OF IRAQ DUE TO SADDAM`S TORTURE.
मयादा अल-अस्करीचा जन्म एका शक्तिवान इराकी घराण्यात झाला. तिचे एक आजोबा लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या बरोबरीने लढले होते, तर दुसरे आजोबा पहिले अरब राष्ट्रवादी मानले जातात. सद्दाम हुसैन आणि त्याची बाथ पार्टी सत्तेवर आली तेव्हा आपल्या एकाकी आयुष्यात एवढे प्रचंड वादळ येईल अशी मयादाला अजिबात कल्पना नव्हती. मयादा— घटस्फोटित, दोन मुलांची आई, लहानमोठी छपाईची कामं करून कसाबसा चरितार्थ चालवणारी़ तिला १९९९ मधील एका सकाळी सद्दामच्या गुप्त पोलिसांनी सरकारविरोधी पत्रकं छापण्याच्या आरोपाखाली अटक करुन अत्यंत कुप्रसिद्ध अशा बलदीयात तुरुंगामध्ये खेचत नेलं, तेव्हा तिला तिच्या एकटेपणाची खरीखुरी जाणीव झाली. आधीच सतरा `सावल्या स्त्रिया` बंदिवान असलेल्या एका दुर्गंधिमय कोठडीमध्ये तिला फेकण्यात आलं. वेगवेगळ्या इराकी सामाजिक स्तरातील या स्त्रियांची नियती मात्र एकच होती – खटल्याविनाच कैद – छळ – आणि मृत्यूची भीती. या छळछावणीत वेळ काढण्यासाठी आधुनिक काळातल्या या शहरजाद्या – या सावल्या स्त्रिया एकमेकींना आपापल्या कहाण्या सांगत दिवस रेटत असत. मयादाच्या खानदानाचा अभिमानास्पद इतिहास, दुसरा राजा फैझलचा वध आणि त्यांच्या आजच्या छळाला कारणीभूत असलेल्या सद्दाम हुसैनशी तिच्या झालेल्या भेटी या तिच्या पूर्वायुष्याबद्दल तिच्या सहकैदी स्त्रियांना फार कुतूहल वाटत असे. अशा या मयादाची कथा आपल्याला इराकचा सुसंस्कृत आणि प्राचीन इतिहास आणि इराकी लोकांचे सुसंस्कृत वर्तन याकडे बघण्याची एक विशेष दृष्टी तर देतेच, परंतु सर्वसामान्य इराकी माणसांच्या आयुष्यामध्ये आणि हृदयामध्ये सद्दामनं जे भयानक भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, त्याचा भरपूर पुरावाही देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #BLASPHEMY #BHARATIPANDE #JEANSASSON #MAYADA #MAYADA - DAUGHTER OF IRAQ
Customer Reviews
  • Rating StarZee Marathi Disha 20-26April

    1991 सालच्या आखाती युद्धानंतर इराक अती क्षुब्ध झाला. हे युद्ध त्यांच्याच अध्यक्षानं, सद्दाम हुसेननं, ओढवून घेतलेली बंधंन जनतेविषयी वाटणार्या कुतुहलातून इंग्रजी लेखिका जीन सॅसन यांनी इराकला भेट दिली. बगदादमध्ये पोहोचल्यावर माहितीखात्याच्या कचेरीत जाऊनतिनं दुभाष्याचं काम करणारी स्त्री हवी आहे, असं सांगितलं. परंतु या कामासाठी फक्त पुरुषच नेमावेत हा सरकारी नियम होता. तरीही लेखिकेच्या हट्टामुळे अखेर जीन सॅसन आणि मयादाची भेट झाली. ती लेखिकेची दुभाषी, वाटाड्या झाल्यानं तिच्या मदतीनं इराकदर्शन झालं मयादा-अल-अस्करी ही एक खानदानी, सुन्नी पंथीय, उच्चस्तरीय घराण्यातली उत्तम इंग्रजी बोलणारी स्त्री. मयादाचं घराण हे तिथलं एक प्रसिद्ध राजकीय घराणं. इराकमध्येच ती लहानाच मोठी झाली. काही दिवस तिनं वृत्तपत्राच्या वार्ताहराचं कामही केलं. सद्दाम हुसेनचा तिला संताप येत असे, कारण तिच्या मते त्यानं इराकला एक मोठा तुरुंग बनवून टाकलं. त्यामुळे त्यादी कारकीर्द संपलेली पाहणं हे तिच्या आयुष्यातील एकमेव स्वप्न होतं. 2003 च्या सुमारास अमेरिकेनं इराकी लोकांच्या मुक्तीसाठी सैन्य पाठवलं आणि सद्दामला सत्तेवरून दूर केलं. त्या वर्षीच मयादानं ठरवलं की इराकमध्ये जे काही पाहिलं, भोगलं ते सार्या जगासमोर आणण्याचं ठरवलं. बराच काळ चर्चा केल्यानंतर तिनं इग्रंजी लेखिका जीन सॅसनला हे पुस्तक लिहायला सांगितलं. आधुनिक इराकचं सत्य जगासमोर आणणारं जीन सॅसनचं पुस्तक आहे -‘मयादा-इराकची कन्या’ देश प्राचीन असला तरी त्यातल्या घटना नजीकच्या आहेत.... आपल्याला अंतर्मुख करायला लावणार्या आहेत. मयादाची, इराकी जनतेची ही कथा भारतीयांना अविश्वसनीय वाटेल, परंतु ती सत्य आहे. हादरवून टाकणारी असली तरी लोकशाहीचं, स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित करणारी आहे, हे निश्चित. ‘मयादा’ वाचून झाल्यावर मनात येतं - आम्ही भारतीय नागरिक लोकशाहीप्रणालीत मुक्तपणे वावरतो. एवढं असूनही देशाविषयीची बांधिलकी, लोकशाहीचं मूल्य, महत्त्व समजून घेण्यात आम्ही कमी पडतो का, असं या निमित्तानं तपासून बघावंसं वाटलं तरी खूप झालं! ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 20-08-2006

    अश्रूंनी भिजलेली कहाणी... इराकचा हुकूमशहा क्रूरकर्मा सद्दाम हुसेन यांनी आपल्याच देशवासीयांवर केलेल्या अत्याचारांच्या कथा सर्वश्रुत आहेत. ‘सब दिन होत न एक समान’ या न्यायाने शेवटी सद्दामचेही दिवस फिरले आणि या शहेनशहाला खडतर आयुष्याला समोरं जावं लागलं े खरं असलं तरी त्याने आपल्या राजवटीत निरपराध आणि निष्पाप लोकांचा जो छळ केला त्याला जागतिक इतिहासात तोड नाही. सद्दामच्या काळ्याकुट्ट राजवटीचं वास्तव ‘मयादा’ (इराकची कन्या) या पुस्तकात प्रभावीरीत्या उभं राहतं. जीन सॅसन ही अमेरिकन लेखिका या मूळ इंग्रजी पुस्तकाची लेखिका. भारती पांडे यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. इ.स. १९९८ मध्ये सद्दाम हुसेन आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख शस्त्रास्त्र निरीक्षक रिचर्ड बटलर यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. नेमक्या याच काळात जीन सॅसन यांनी इराकला भेट दिली. सद्दामवर टीका असलेल्या ‘द रेप ऑफ कुवैत’ या पुस्तकाची ती लखिका. पुस्तकाची प्रत आणि सोबत पत्र पाठवून तिने सद्दामला आपला इराकभेटीचा हेतू कळवला. आपल्या प्रवासकाळात इराकी नागरिकांचं मानस जाणून घेण्याच्या उद्देशाने आलेल्या या साहसी अमेरिकन लेखिकेला इराककन्या मयादा दुभाषी म्हणून भेटते. संवेदनशील मनाच्या या दोन्ही मनस्वी स्त्रिया परस्परांच्या जीवश्चकंठश्च मैत्रिणी बनतात. संभाषणाच्या ओघात मयादा आपल्यावर आणि सद्दामच्या तुरुंगातील अन्य स्त्रियांवरील अनन्वित छळांचे अनुभव लेखिकेला सांगते आणि त्यातूनच आकाराला येतं हे पुस्तक. मयादाच्या आयुष्याला मोठ्या घराण्याचं वलय असल्याने तिच्या निवेदनाला एक खास मोल आहे, महत्त्व आहे. ५२ क्रमांकांच्या कोठडीत डांबलेल्या स्त्रियांच्या नशिबाचे भोग मयादा सांगते आणि सद्दामच्या अधिकाऱ्यांचं राक्षसीपण प्रत्ययाला येतं. प्रत्येक स्त्रीवर बलात्काराचा प्रसंग येतोच. त्याशिवाय कसेही कोठेही फेकून देणे, शरीरावर विजेचे चटके देणे, अश्लील शब्दांनी अवमानित करणे अशा छळांच्या अनेक प्रकारांना या स्त्रियांना समोरं जावं लागतं. अंगावर शहारे उभे करणारे हे प्रसंग. छळणूक किती पाशवी आणि निर्घृण असते याचं प्रत्यंतर आणून देणारे. ‘कबाज पक्षाचं गाणं’ आणि ‘प्रिय समारा’ ही प्रकरणं काहीशी वेगळ्या प्रकारची. मयादाची तुरुंगातून सुटका झाल्यावरची अनुभवकथा ‘वाळवंटातील ओअ‍ॅसिस’चा अनुभव देणारी. -डॉ. नेताजी पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 11-06-2006

    सद्दामच्या छळछावणीची कहाणी… मयादा अल-अस्करी, इराकची कन्या. मयादाचं घर हे एक प्रसिद्ध राजकीय घराणं होतं. मयादा ही एक लाडकी मुलगी आणि नात असल्याने तिच्या कुटुंबानं तिला शिक्षणाचा, विशेष आयुष्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. तिने वैद्यकीय शिक्षण घ्यावे किंा एखादी कला शिकावी, अशी तिच्याकडून अपेक्षा केली जात होती. परंतु इराकमधील राजकीय संघर्षांनी हे बेत उधळून लावले. १९६८मध्ये बाथ पक्ष सत्तेवर आल्यानंतर बहुतेक सर्व बुद्धिवादी शेजारच्या देशात पळून गेले. पण मयादाचे वडील कॅन्सरवर उपचार घेत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी बगदादमध्येच राहण्याचं ठरवलं. सद्दाम हुसेनचे जुलूम वाढतच होते. मयादा इराकमध्येच लहानाची मोठी झाली होती. ती वृत्तपत्र वार्ताहाराचे काम करत होती. तिचा विवाहही इराकमध्येच झाला. तिची दोन्ही मुले अली व फे इराकमध्येच जन्मली. इराण-इराक युद्धानंतर खाडी युद्धातही ती इराकमध्ये टिकून राहिली. मयादाच्या वंशवृक्ष ओटोमन राजघराण्यापर्यंत जाऊन पोहोचलेला होता. तिचे दोन्हीकडचे आजोबा (वडिलांचे वडील जाफर पाशा अल अस्करी व आईचे वडिल साती अल हुसदी) या प्रचंड साम्राज्याचे प्रतिष्ठित नागरिक होते. सद्दामने इराकला एक मोठा तुरुंग बनवला होता. १९९९मध्ये मयादाला सद्दामच्या गुप्त पोलिसांनी सरकारविरोधी पत्रके छापण्याच्या आरोपाखाली अटक करून अत्यंत कुप्रसिद्ध अशा बलदियात तुरुंगामध्ये खेचत नेले, तेव्हा तिला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली. सद्दामच्या राजवाड्यात सन्मानानं जाणाऱ्या मयादाला त्याच्या छळछावणीत काही दिवस वाढावं लागलं. घटस्फोटीत, दोन मुलांची आई, लहानमोठी छपाईची कामे करून कसाबसा चरितार्थ चालवणारी मयादा हिला आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड वादळ येईल, अशी कल्पना नव्हती. आता तिला बलदियातमधील आधीचा सतरा ‘सावल्या स्त्रिया’ बंदियान असलेल्या एका दुर्गंधीमय कोठडीत जावे लागले. इराकमधील वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील या स्त्रियांच्या नशिबी खटल्याविनाच कैद, छळ आणि मृत्यूची भीती होती. वेळ काढण्यासाठी आधुनिक काळातील या शहजाद्या एकमेंकींना आपापल्या कहाण्या सांगत दिवस काढत होत्या. मयादाच्या खानदानाचा अभिमानस्पद इतिहास, दुसरा राजा पैâझलचा वध आणि त्यांच्या आजच्या छळाला कारणीभूत असलेल्या सद्दाम हुसेनशी मयादाच्या झालेल्या भेटी या तिच्या पूर्वायुष्यातील घटनांबद्दल तिच्या या सहकैदी स्त्रियांना कुतूहल वाटत असे. मयादावर राजद्रोहाचा आरोप होता. तिची आई सल्या अल हुसरी म्हणजे अरब राष्ट्रवादाचे जनक साती अल हुसरी तिचे वडील होते. तिच्या नावाचा वापर करूनही तुरुंगाधिकाऱ्यांनी तिला कोठडीत टाकले. तिथे शियापंथीय समारासह सतरा कैदी स्त्रिया होत्या. मयादाला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा तिला वारंवार विनवणी केल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आले. तेथे असणाऱ्या डॉक्टरवर विसंबून तिने तिच्या आईला तिच्याबद्दल कळवण्यास सांगितले. अंधाऱ्या खोलीत रात्र घालवल्यानंतर मयादाला इतर कैद्यांप्रमाणेच छळ करण्यासाठी बोलावणं झालं. त्या अनुभवानंतर ती गारठली. त्यानंतर सर्व कैदी स्त्रियांना ज्या छळाला सामोरे जावे लागले, ते पाहून मयादा वेडी व्हायला लागली, पण समारा व इतर स्त्रियांनी तिला सांभाळलं. मयादालाही छळ करण्यात येणाऱ्या खोलीत नेण्यात आले. तिला लाकडी खुर्चींत बांधून तिच्या सर्वांगात वीजप्रवाह सोडण्यात आला. त्यानंतर तिच्यावर खटला चालवण्यात येऊन तिची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यावर तिला कैद्येत असल्याचा समारा, आलिया, राशा, डॉ. सब्बाह, एमान, वकाल, मे, सारा, रौला, अमानी हयात आणि आशिया, मुना या साऱ्या कैद्याची घरी तिने फोन केले. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले व तिसऱ्या दिवश लाच देऊन तिचे इराकबाहेर पलायन केले. यासाठी तिला घटस्फोट दिलेल्या नवऱ्याशी पुन्हा विवाह करावा लागला. मुलगा अलीसह ती बाहेर पडली पण मुलगी फे हिला काही नेऊ शकली नाही. २०००मध्ये तिने फेलाही सोडवून नेले. २००१मध्ये अतिरेक्यांनी न्यूयॉर्क व वॉशिंग्टन डीसीवर हल्ले केले. त्याचवर्षी जॉर्ज बुश यांनी यांनी इराकमध्ये सैन्य पाठवले. २००३मध्ये बुश यांनी सद्दामला आघाडी सैन्याच्या सहाय्याने सत्तेवरून दूर केले. जीन सॅसनन यांनी सौदी अरेबियात १२ वर्षे नोकरी केली व सौदी स्त्रियांशी जवळीकचे नाते जुळवले. १९७८ मध्ये युनाटेड स्टेट ऑफ अमेरिका सोडून रियाधमधील रुग्णालयात त्यांनी मध्यपूर्वेत प्रवास केला. १९९१च्या आखाती युद्धानंतर मध्यपूर्व भाग, विशेषत: इराक क्षुब्ध बनला. सद्दामच्या बंधनात राहिलेल्या इराकी जनतेबद्दल वारणाचा कुतूहलबेरी त्यांनी १९९८च्या उन्हाळ्यामध्ये इराकला भेट दिली. ‘द रेप ऑफ कुवेत’ या पुस्तकातून त्यांनी सद्दामवर टीका करूनही सद्दामने तिला इराकमध्ये फिरण्याची परवानगी दिली. त्याच काळात मयादाची भेट झाली. त्यानंतर मयादा तुरुंगात गेली, पण जेव्हा बाहेर पडली तेव्हा सद्दानच्या छळाची कहाणी जगाला सांगण्याचा आग्रह मयादाने जीन सॅसननला केला. त्या स्त्रीची ही सत्यकथा. -संदीप आडनाईक ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-08-2006

    बळ उमेदीचं! … सद्दाम हुसेन आता अमेरिकेच्या ताब्यात आहे. एकेकाळी इराकवर निरंकुश सत्ता गाजवणाऱ्या या माणसाने किती कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत, याची गणना करणंही शक्य नाही. त्याच्या हुकूमशाहीचे फटके सोसणाऱ्यांमध्ये जसे सर्वसामान्य होते तसंच काही बड्या कुुंबातलेही होते. मयादा अल अस्करीने कुप्रसिद्ध बलदीयात कारागृहात राहून तब्बल महिनाभर सद्दाम हुसेनच्या गुप्त पोलिसांचा पाहुणचार घेतला. जीन्स सॅसन लिखित मयादा डॉटर ऑफ इराक यात तिने भोगलेल्या यातनाची क्लेशदायक कथा तर आलेली आहेच पण तिच्यापेक्षाही अधिक मरणयातना सोसलेल्या पन्नासेक ‘सावल्या’ स्त्रियांची कथाही आपल्याला सुन्न करते. या पुस्तकात मराठी अनुवाद भारती पांडे यांनी ‘मयादा-इराकची कन्या’ मध्ये केला आहे. तोही मूळ पुस्तकाइतकाच सरस उतरला आहे. सद्दाम हुसेन याच्या राजवटीत वर्षाचे ३६५ दिवस जनतेसाठी छळछावणीसारखेच होते. कारण कुठल्याही क्षणी सरकारचे गुप्तपोलिस येऊन एखाद्या निरपराध माणसाला बंदी बनवून घेऊन जात. अशाप्रकारे पकडली गेलेली व्यक्ती जिवंत आणि सहीसलामत घरी परतणं अशक्यच होतं. कारण तिचा अनन्वित छळ करून तिला ठार मारलं जाई किंवा त्या तुरुंगातच यातना भोगण्यासाठी ठेवलं जाई. मयादा अल अस्करीलाही असाच अनुभव आला होता. एकेदिवशी सकाळी गुप्तपोलीस तिच्या दारात येऊन धडकतात आणि तिला घेऊन जातात. तिची दोन मुलं घरी एकटी असतात, आई दूर जॉर्डनमध्ये असते. नवऱ्यापासून फारकत घेतल्याने तोही संपर्कात असल्याची शक्यता नव्हती. त्यामुळे निमूटपणे तुरुंगात जाण्याऐवजी मयादाकडे कोणताच पर्याय नव्हता. तिथे तिला ५२ क्रमांकाच्या कोठडीत ठेवलं गेलं. ५२ हा आकडा मयादाच्या कुटुंबासाठी अपशकुनी होता. त्यामुळे या ५२ क्रमांकाच्या तुरुंगात आपली कधीच सुटका होणार नाही, याच तिला पक्की खात्रीच पटली. सुरुवातीला ती पुरती कोसळून गेली होती. मुलांच्या आठवणीने व्याकुळही झाली, पण आपल्यापेक्षा इतर बंदी स्त्रियाचं दु:ख शतपटीने मोठं आहे याची जाणीव झाल्यानंतर ती शांत झाली. जोपर्यंत सद्दामची सद्दी संपत नाही तोपर्यंत या छळछावणीतून आपली सुटका होणार नाही, हे त्या तुरुंगातल्या प्रत्येक स्त्रीला माहीत होतं. शारीरिक छळ त्यांना सहन करावा लागतच होता. त्यांनी ते निमूटपणे स्वीकारलंही होतं. जिचं नाव शिक्षेसाठी पुकारलं जाई, ती जिवंत परत येवो, ही प्रार्थना मनोमन करून तिला निरोप देतं. थोड्यावेळाने सुजलेला चेहरा आणि थकलेल्या शरीराने ती परत येई तेव्हा तिच्यासाठी बिछाना तयार असे. तिचं अंग पुसून तिला थोडा धीर दिला जाई. या कोठडीमधली प्रत्येक स्त्री दु:खाने हैराण झाली होती. पण त्यांना हे सर्व सहन करण्याव्यतिरिक्त काहीच करता येत नव्हतं. दु:खातही सुख असतं असं म्हणतात. या नरकयातना भोगताना या स्त्रिया आपापल्या कहाण्या सांगून तर कधी गाणी गाऊन मन हलकं करण्याचा प्रयत्न करत. रक्ताच्या नातेवाईकाप्रमाणे त्या एकमेकींशी बांधल्या गेल्या होत्या. मयादाची ओळख पार सद्दाम हुसेनपर्यंत होती. पत्रकार म्हणून तिने त्याच्या अनेक मीटिंग्जना हजेरीही लावली होती. शिवाय तिची आई सोशलाइट असल्यामुळे ती त्याच्या व्यक्तिगत जीवनातल्या काही प्रसंगांची साक्षीदारही होती. या सर्वजणींमध्ये सद्दामविषयी कमालीचा तिरस्कार होता. त्यामुळे त्याची बायको कशी स्वार्थी आणि मूर्ख आहे, सद्दाम प्रत्यक्षात कसा आहे, त्याचे उत्तराधिकारी म्हणून मिरवणारा अली अल मजीद कसा लोचट आहे. याची रसभरीत वर्णन ती इतरांना ऐकवत असे. त्यामुळे त्यांचं घटकाभर का होईना मनोरंजन होई. तुरुंगातल्या छळाला सरावल्याचा एक महिनाच झाला असताना तिच्या सुटकेचं फर्मान निघतं. ज्या स्त्रियाबरोबर ती एवढे दिवस राहिली, दु:ख वाटून घेतली, त्यांना सोडून जाण्याची भावना तिला जाचत होती. पण मोकळ्या हवेत श्वास घेण्याची, मुक्तपणे फिरण्याची आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुलांना भेटण्याची इच्छा अधिक प्रबळ होती. मयादाच्या सुटकेची बातमी ५२ क्रमांकाच्या कोठडीच्या चर्चेचा विषय बनते. पण स्वातंत्र्याला आसुसलेल्या त्या स्त्रियांना मयादाचा हेवा वाटत नाही, हे विशेष त्या तिला आनंदाने निरोप देतात आणि एकेदिवशी आपणही मोकळे होऊ असा विश्वास त्या स्वत:लाच देतात. आज मयादा एक मुक्त जीवन जगते आहे. मुलंही मोठी झाली आहेत. पण वलदीयातमधली दु:ख आजही विखारासारखी तिच्या मनात धुसमत आहेत. सद्दामचा नायनाट होवो, हीच प्रार्थना ती आजही देवाकडे करतेय. अशा मयादाने भोगलेल्या यातना आपल्याला अस्वस्थ करतातच; परंतु उमेदीच्या बळाची अनोखी कथाही सांगतात. -रुई गावंड ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more