DR. JAYSINGRAO PAWAR

About Author

Birth Date : 30/12/1941
Death Date : 26/03/2026


DR. PAWAR SOUGHT HIS FIRST M.A. DEGREE AND PH.D. FROM SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR. FOR MORE THAN THREE DECADES, HE HAD BEEN ONE OF THE MOST FAVOURITE PROFESSORS AMONG THE STUDENTS. HE HAS PENNED DOWN 20 ACADEMIC BOOKS FOR THE JUNIOR COLLEGE STUDENTS AS WELL AS THE M.A. STUDENTS. IN 1964, UNDER THE GUIDANCE OF THE FIRST CHANCELLOR AND HISTORIAN, DR. APPASAHEB PAWAR, DR. JAISINGRAO PAWARS CAREER IN RESEARCH BEGAN. HE COULD GET LOTS OF EXPERIENCE IN RESEARCH OF HISTORICAL DOCUMENTS IN THE HISTORY DEPARTMENT OF THE SAID UNIVERSITY. HE HAS WRITTEN MORE THAN 25 BOOKS, ALL BASED ON HISTORICAL FIGURES, INCLUDING THE LIVES OF MAHARANI TARABAI, SENAPATI SANTAJI GHORPADE, TRACKING MARATHA EMPIRE, RAJARSHI SHAHU SMARAK GRANTH, ETC. TILL DATE, HIS ARTICLES HAVE BEEN PUBLISHED IN MORE THAN 45 RESEARCH MAGAZINES AND HISTORY RELATED CONFERENCES. HE HAS CHAIRED MANY HISTORY-RELATED CONFERENCES. HE IS THE FOUNDER MEMBER OF ALL MAHARASHTRA HISTORY COUNCIL AND LATER THE CHAIRMAN FOR 3 YEARS. IN 1992, HE FOUNDED THE MAHARASHTRA ITIHAS PRABODHINI. HE WORKED AS THE DIRECTOR FOR THE SAME. HE AIMS AT RESEARCH IN HISTORY AND SOCIAL AWAKENING THROUGH IT. ACCORDINGLY, IN 2001, THE INSTITUTION PUBLISHED THE RAJARSHI SHAHU SMARAK GRANTH WITH 1200 PAGES DIVIDED INTO 3 PARTS, WHICH IS BEEN TRANSLATED INTO 16 INDIAN LANGUAGES ALONG WITH RUSSIAN, FRENCH, ITALIAN AND JAPANESE. HE WAS FELICITATED AT THE HANDS OF THE PRESIDENT OF INDIA FOR HIS RESEARCH WORK IN HISTORY. HE WAS ALSO FELICITATED AS SHAHUCHARITRAKAR(THE ONE WRITING BIOGRAPHY OF SHAHU) AT PUNE. TILL DATE, HE HAS WRITTEN AND EDITED MORE THAN 25 BOOKS ON VARIOUS SUBJECTS INCLUDING HISTORY. MANY OF HIS BOOKS HAVE BEEN REWARDED AS THE BEST BOOK.

डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एकूण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Sort by
Show per page
Items 1 to 12 of 25 total
AAMCHYA ITIHASACHA SHODH ANI BODH Rating Star
Add To Cart INR 120
CHATRAPATI SAMBHAJI : EK CHIKITSA Rating Star
Add To Cart INR 280
CHHATRAPATI SAMBHAJI SMARAK GRANTH Rating Star
Add To Cart INR 1595
DADAJI KONDEV KON HOTA? Rating Star
Add To Cart INR 170
28 %
OFF
DR.JAYSINGRAO PAWAR & VASUDHA PAWAR ... Rating Star
Add To Cart INR 10779 INR 7761
FRENCH RAJYAKRANTI ANI BADSHAH NAPOLEON Rating Star
Add To Cart INR 250
KRANTISINHA NANA PATIL Rating Star
Add To Cart INR 995
MARATHESHAHICHE ANTARANG Rating Star
Add To Cart INR 250
MARATHYANCHA ITIHAS : KHAND - 1 - SH... Rating Star
Add To Cart INR 750
MARATHYANCHA ITIHAS KHAND 2 PESHWAI Rating Star
Add To Cart INR 650
MARATHYANCHE SWATANTRYAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 370
PANCHGANGECHYA TEERAVARUN Rating Star
Add To Cart INR 1499
123

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more