* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NANA PATIL WAS BORN IN A WARKARI FAMILY. ON THE DAY OF NAMING CEREMONY, HIS GRANNY LAID AROUND HIS NECK A `HOLY-BASIL MAAL (NECKLACE)`. HIS NATIVE PLACE WAS `YEDE MACCHHINDRA` WHERE HE STUDIED TILL SEVENTH STANDARD. LATER, HE BECAME A TALATHI. SINCE CHILDHOOD, HE HAD A KEEN INTEREST IN SOCIAL WELFARE. HE HAD IMMENSE EMPATHY TOWARDS THE POOR PEOPLE. RATHER, WELFARE OF THE POOR WAS HIS LIFE MOTTO. HE ALSO WISHED TO CARRY FORWARD THE WORK OF SATYASHODHAK MOVEMENT INITIATED BY MAHATMA JYOTIBA PHULE. HE HAD PARTICIPATED IN THE `CIVIL DISOBEDIENCE MOVEMENT` INITIATED BY MAHATMA GANDHI. LATER, MAHATMA GANDHI WARNED THE BRITISH WITH THE SLOGAN `GO BACK` IN 1942 WHILE ASKED THE INDIANS TO `DO OR DIE`. NANA PATIL, WHO WAS IN SATARA, WAS INSPIRED BY THIS. HE QUIT HIS JOB AS A TALATHI TO GET ENROLLED IN THE CONGRESS PARTY, BECOMING A FREEDOM FIGHTER THEREAFTER. MANY A TIME, HE WAS PUT BEHIND THE BARS FOR HIS REVOLUTIONARY EFFORTS AGAINST THE BRITISH. HE WENT UNDERGROUND FOR FOUR YEARS OR SO TO COMPLETE HIS TASK. ALONG THE WAY, HE GATHERED MANY HONEST CO-WORKERS WHO HELPED HIM TO FORM PATRI SARKAR IN SATARA DISTRICT. THROUGH THIS VENTURE, PATIL BROUGHT INTO REALITY THE DREAM SEEN BY MAHATMA GANDHI, THAT OF `VILLAGE RAJ`. IT IS IMPERATIVE THAT TODAY`S YOUTH GET TO KNOW THE WORK DONE BY THE GREAT FREEDOM-FIGHTER, THE FOUNDER OF PATRI SARKAR AND THE SUCCESSFUL PERSON WHO IMPLEMENTED `GRAM-RAJYA` IN A TRUE MANNER. THE SAID BOOK IS A PERFECT ONE, INTRODUCING US TO THE LIFE AND WORK OF NANA PATIL.
’क्रांतिसिंह नाना पाटील’ हे संपादित पुस्तक...नाना पाटील यांना लहानपणापासून असलेली सामाजिकतेची जाण व गोरगरिबांविषयी असलेला विशेष कळवळा...किंबहुना, गरिबांच्या कल्याणाची तळमळ हेच त्यांच्या जीवनकार्याचे सूत्र...महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव...महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग...1942मध्ये तलाठ्याची नोकरी सोडून काँग्रेस पक्षात सामील होऊन स्वातंत्र्यलढ्यात मारलेली उडी... इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारल्यामुळे अनेक वेळा सोसावा लागलेला तुरुंगवास...सुमारे चार वर्षे भूमिगत राहून सुरू ठेवलेले कार्य...सातारा जिल्ह्यात स्थापन केलेले प्रति-सरकार)...महात्मा गांधींच्या मनातील ग्रामराज्याचा राबवलेला प्रयोग...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेच्या मागे लागलेल्या काँग्रेसमधील अनेक नेत्यांमुळे सुराज्य स्थापनेच्या संदर्भात पाटील यांचा झालेला भ्रमनिरास...गोरगरीब, शेतकरी व कामगार यांच्यावरील शतकानुशतकाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरी नष्ट करणे हे क्रांतिसिंह नानांच्या जीवनकार्याचे मूळ सूत्र...त्यामुळे शेतकरी व कामगार पक्षात प्रवेश करून पुढे सुरू ठेवलेले कार्य... पुढे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश...गावोगावी जाऊन केलेली भाषणे...नाना पाटील यांचे जीवन व कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा आदर्श ग्रंथ
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#डॉक्टरजयसिंगरावपवार #मेहतापब्लिशिंगहाऊस #महाराष्ट्राचामाळकरीमार्क्सवादी #पत्रीसरकारआणिसमाजवाद #क्रांतिसिंहनानापाटील #चरित्रात्मक #प्रतिसरकारचीतुफानीसेना #सातारचासिंह #प्रतिसरकार #रझाकारविरोधीचळवळ #ग्रामराज्यलोकराज्य #क्रांतिपर्वा #अखेरचेपर्व #संग्रामाचीधगधगतीमशाल #चलेजावआंदोलन #तुफानसेना #बेचाळीसचालढा #मार्क्सवाद #राष्ट्रसेवादल # मराठीसाहित्य #छत्रपतीसंभाजीस्मारकग्रंथ #राजर्षीशाहू #कर्मवीरभाऊरावपाटीलआणिप्रबोधनकारठाकरे #आमच्याइतिहासाचाशोधआणिबोध #शिवचरित्रापासूनआम्हीकायशिकावे? #राजर्षीशाहूछत्रपतींचीभाषणे #राजर्षीशाहूछत्रपती:एक मागोवा #राजर्षीशाहूछत्रपती:पत्रव्यवहारआणिकायदे #राजर्षीशाहूछत्रपतींचेजाहीरनामेवहुकूमनामे #शिवछत्रपती:एकमागोवा #मराठेशाहीचेअंतरंग #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #छत्रपतीसंभाजी:एकचिकित्सा #मराठ्यांचेस्वातंत्र्ययुद्ध #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #VEDHITIHASACHA #DRJAISINGRAOPAWAR #KRANTISINHANANAPATIL #CHARITRQATMAK #PRATISARKARCHITUFANISENA #RASHTRASEWADAL #KARMAVEERBHAURAVPATILAANIPRABODHANKARTHAKARE #AMACHYAITIHASACHASHODHAANIBODH #MARATHESHAHICHEANTARANG #MARATHYANCHESWATANTRAYUDHA
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more