* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386342225
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 92
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
P.V.SINDHU IS A NAME WHO MADE HISTORY IN THE FIELD OF INDIAN SPORTS. SINDHU WON SILVER MEDAL FOR BADMINTON AT RIO OLYMPICS . SHE IS THE FIRST INDIAN WOMAN TO WIN SILVER MEDAL IN THE OLYMPIC. EVEN AFTER 2016 RIO OLYMPIC , SINDHU CONTINUOUSLY IS MAKING COUNTRY PROUD BY HER PERFORMANCE AT INTERNATIONAL LEVEL. ‘RUPERI SINDHU’ BOOK BY ATUL KAHATE TALKS ABOUT SINDHU’S PASSION FOR BADMINTON. IT CONTAINS HER JOURNEY FROM CHILDHOOD TO RIO-OLYMPIC & EVEN AFTER THAT. THIS IS AN INSPIRATIONAL GUIDE FOR YOUNGSTERS WHO ARE TRYING TO MAKE THEIR CAREER IN THE SPORTS .
BADMINTON मध्ये RIO ओल्यमपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही . सिंधू या भारतीय खेळाडून करून दाखवला. अत्यंत साध्या परिस्तिथीत वाढलेल्या सिंधून जिद्द,परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकाचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे सिंधू जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाउन पोहचली. पुढेही ती प्रचंड यश मिळवू शकते , असा आशावाद तिने जागवला आहे. या सिंधूची हि प्रेरणादायी कहाणी.

No Records Found
No Records Found
Keywords
#BADMINTON ASSOCIATION OF INDIA #GOPICHAND ACADEMY #RIO OLYMPICS #P.V. SINDHU #GOPICHAND PULELA #ATUL KAHATE
Customer Reviews
  • Rating Star महेश पाटील

    माझे नाव महेश पाटील असे असून मी मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉबला आहे. मी ठाणे येथे राहतो. आपण लिहिलेले रुपेरी सिंधू हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. सिंधू आणि गोपिचंद सर यांनी खूप मेहनत, कष्ट घेतले आहेत ते जाणवते. मला त्यांच्या कष्टाची जाणीव आहे कारण मझी लहान मुलगी अपूर्वा महेश पाटील ही इंटरनॅशनल ज्यूडो प्लेअर आहे. आजपर्यंत तिने (गेल्या ९ वर्षांमध्ये) नॅशनलला ६ गोल्ड मेडल आणि ३ सिल्वर मेडल मिळवले आहे. तसेच २५ सप्टेंबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या judo commonwealth competition मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. गोपीचंद सर आणि सिंधू यांचे हे यश हा प्रवास आपल्या देशाला प्रेरणा देईल असाच आहे. आणि आपला भारत देश स्पोर्ट्समध्ये ही उत्तम यश मिळवेल. याची मला खात्री आहे. आपण एक उत्तम पुस्तक लिहिलेत त्याबद्दल आभारी आहे. ...Read more

  • Rating StarLOKPRABHA - 22-09-2017

    रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये दमदार खेळणाऱ्या एका खेळाडूचे नाव आपल्या कायमचे लक्षात राहील. पी. व्ही. सिंधू हे ते नाव. ती आली आणि तिने तिच्या खेळाने सगळ्यांनाच जिंकून घेतले. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत अभूतपूर्व पराक्रम करून रौप्यपदक मिवणारी सिंधू एका अत्यंत सामान्य घरात वाढली. साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूची जिद्द, मेहनत, सराव या साऱ्यामुळे आज तिने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या याच जिद्दीची, मेहनतीची कहाणी म्हणजे ‘रुपेरी सिंधू’ हे पुस्तक आहे. या पुस्तकात सिंधूचे राहणीमान, तिची जडणघडण, तिचा सराव, प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यानंतरचा तिचा प्रवास असे सगळे वाचायला मिळेल. सिंधूच्या आयुष्याची प्रेरणादायी कहाणी या पुस्तकाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकरणांमधून समोर आली आहे. ...Read more

  • Rating Starप्रबोधन लक्ष्मी हरी स्मृती न्यासाचे मासिक , ऑगस्ट

    २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये साईना नेहवालने कास्यपदक पटकावले आणि त्यानंतरच्या म्हणजेच २०१६ च्या रिओ ऑलिंपिकला पी.व्ही.सिंधू अंतिम सामन्यात प्रवेश करून रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. या अभूतपूर्व यशामुळे भारतात बॅडमिंटनकडे बघण्याचा दृष्टिोनच बदलून गेला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे उगीच नाही म्हटलं! अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधूनं, साईनानं जिद्द, परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकांचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे दोघी जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाऊन पोहोचल्या आहेत. आपल्या ग्रंथालयात पी.व्ही.सिंधू विषयी माहिती देणारे पुस्तक नव्याने दाखल झाले होते. उत्सुकतेपोटी मी ते लगेच वाचले. अतुल कहाते लिखित हे छोटेखानी पुस्तक एका बैठकीतच वाचून पूर्ण होते. बॅडमिंटन खेळाच्या इतिहासाचा शोध, सिंधूचे बालपण, प्रशिक्षक गोपीचंद यांचे थोडक्यात चरित्र, प्रशिक्षण अकादमी, सिंधूची जडणघडण, रिओसाठी तयारी, रिओनंतरचा पुढचा प्रवास याविषयीची माहिती वाचायला मिळते. पी.व्ही.सिंधू म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते तिची आकर्षक उंची, प्रसन्नचित्त चेहरा आणि बॅडमिंटन कोर्टवरचा आत्मविश्वासपूर्ण वावर! पहाटे चार वाजता उठून आवरून सरावाला आलेली सिंधू दुपारचा सूर्य डोक्यावर आला तरी सरावच करत असते! या पुस्तकातून तिच्या कठोर परिश्रमाची, कसून केलेल्या सरावाची कल्पना येते. कडक डायट, सिनेमा, पार्टीज्, मित्र मैत्रिणींबरोबर सहली कौटुंबिक सणवार गप्पाटप्पांच्या त्यागातूनच ऑलिंपिकच्या यशाची चव सिंधूला चाखता आली हे समजते. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अशा पी.व्ही.सिंधूचे हे पुस्तक एका खेळाडूच्या चॅम्पियन बनण्यापर्यंतचा प्रवास उत्कटपणे उलगडून दाखवते. ग्रंथालयातील सभासदांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, SAPTARANG 05-03-2017

    रिओ ऑलिंपिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिची ओळख करून देणारं हे पुस्तक. अतुल कहाते यांनी ते लिहिलं आहे. बॅडिंमटन या खेळाविषयी आणि सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविषयीही कहाते यांनी माहिती करून दिली आहे. सिंधूची जडणघडण कशी झाल, बॅडमिंटनपटू म्हणून ती कशी घडत गेली, हे त्यांनी नेमकेपणानं लिहिलं आहे. रिओ ऑलिंपिक्ससाठी सिंधूनं कशी तयारी केली, प्रत्यक्ष काय-काय घडामोडी घडत गेल्या, हेही त्यांनी उलगडून दाखवलं आहे. तिच्या आणि गोपीचंद यांच्या काही मुलाखतींचाही पुस्तकात समावेश आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more