* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666250
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Sub Category : BUSINESS, INDUSTRY, SPORTS
  • Discount : SPECIAL OCTOBER DISCOUNT 33/50 PERCENT(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
J. R. D. TATA IS THE FIRST TO BE FELICITATED WITH THE HIGHEST AWARD, `BHARAT RATNA`; AND HE IS THE ONLY INDUSTRIALIST UPON WHOM THIS HONOUR HAS BEEN BESTOWED. HE HAS ALWAYS PREFERRED THE WELFARE OF THE COUNTRY IN COMPARISON WITH PERSONAL WELFARE. HE ALWAYS FEELS THAT WHATEVER IS BEST FOR MY NATION IS BEST FOR TATA. TODAY THE CULTURE OF TATA HAS MANY SALIENT FEATURES. TATA ALWAYS FOLLOWS PRINCIPLES, REMEMBERS THE CONSCIENCE, ALWAYS CARES FOR THE HANDS AND MINDS THAT KEEP THE BUSINESS RUNNING SUCCESSFULLY, USES THE NATIONAL WEALTH FOR THE WELFARE OF THE NATION, AND ALSO DEVELOPS THE AREA WHERE THEIR INDUSTRIES ARE SET. J. R. D. HAS ALWAYS BOOSTED NEW IDEAS, NEW MINDS. HIS IS THE LION`S SHARE IN SHAPING MANY AN INDUSTRIALISTS. HE TRUDGED ALONG NEW PATHS; HE FOUND NEW WAYS, CREATED NEW TOUCHSTONES. HE HIMSELF HAS A RICH AND VARIED HERITAGE, CULTURED BACKGROUND, AND A VERSATILE PERSONALITY. THE ARTICLES IN THIS BOOK BRING US ACROSS MANY ASPECTS OF HIS PERSONALITY. WHAT WE LIKE THE MOST ABOUT THIS LEADING INDUSTRIALIST IS THE COMPASSIONATE, CONNOISSEUR, SILVER-TONGUED AND HAPPY HUMAN IN HIM.
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले पहिले अन् एकमेव उद्योगपती जेआरडी टाटा यांनी उद्योगाचा विकास करताना ‘जे देशाच्या भल्याचे ते टाटांसाठी उत्तमच असेल’ हा विचार प्रधान मानला. नीतीमूल्यांची बूज राखत व्यवहार, उद्योग चालवणारे हात अन् मने जपणे, समाजातून मिळवलेली संपत्ती समाजाच्या विकासासाठी वापरणे, उद्योग उभा असलेल्या परिसराचा विकास ही टाटा उद्योगसमूहाची संस्कृती आहे. नव्याचे स्वागत करत जेआरडींनी अनेकजणांना घडवले, नव्या वाटा खोदल्या, नवे मापदंड निर्मिले. त्यांना लाभलेला उज्ज्वल वारसा, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, नवे आयाम मिळत विकसित झालेले त्यांचे समृद्ध, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व याची ओळख या पुस्तकातील लेख करून देतात. विशेषत: अनेकविध भूमिकांना पुरून वर दशांगुळे उरणारा त्यांच्यातील सहृदय, रसिक, संभाषण चतुर, आनंदी ‘माणूस’ वाचकाला अधिक भावतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#JRDTATA #MADHURISHANBHAG #BHARATRATNA # #JRDTATA #MADHURISHANBHAG #BHARATRATNA #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI
Customer Reviews
  • Rating StarRevan Lonkar

    " उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन " हे स्वधर्मीय ब्रीद अक्षरशः जगलेले कुटुंब म्हणजे " टाटा कुटुंब ". टाटा ..नावातच सर्व काही टाटा म्हणजे दूरदृष्टी टाटा म्हणजे समर्पण टाटा म्हणजे दातृत्व टाटा म्हणजे निस्सीम देशभक्ती.. आणि या सरव गुणांचा महामेरू म्हणजे " जहांगीर रतन दादाभाई उर्फ जेआरडी. कोणतीही औपचारिक पदवी हाताशी नसताना दूरदृष्टी , माणसांची पारख , त्यांना हाताळण्याचे कसब , कामाप्रती असलेले समर्पण आणि वेळप्रसंगी घेतलेले कठोर निर्णय यामुळे त्यांनी टाटा उद्योगसमुह एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. आकाशाप्रती असलेल्या प्रेमातून सुरू केलेली विमानसेवा नंतर तेवढ्याच प्रेमाने देशाला अर्पण केली. १ रुपया या नाममात्र वेतनावर सुमारे ५ दशके तिचे अध्यक्षस्थान भूषविले हा तर एक विक्रमच आहे. परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या जेआरडी यांनी स्टॅटिकल , व्यवस्थापनशास्त्र , प्रशिक्षण केंद्र यांसारखे त्याकाळी एकदम अपरिचित असलेले विभाग सुरू करून दूरदृष्टी दाखवली. "दातृत्व म्हणजे टाटा " या समिकरणास जेआरडी ही जागले. नारळीकर पितापुत्र , शास्त्रज्ञ डॉ. रामन्ना , माजी राष्ट्रपती के आर नारायण आणि या सारख्या सुमारे २००० पेक्षा जास्त बुद्धिवंत लोकांना टाटा स्कॉलरशिप चा लाभ मिळाला.टाटा कॅन्सर हॉस्पिटल , टीआयफर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैक संस्थांना टाटांची भरीव देणगी व जेआरडी यांच्या सारखे भक्कम पाठबळ लागले. देशाचा विचार करताना आणलेला " बॉम्बे प्लॅन " असो अथवा लोकसंख्या वाढीचा विचार करता आणलेले " फॅमिली प्लॅंनिंग फौंडेशन " असो. आपल्या समूहाची गरज बाजूला ठेवून त्यांनी नेहरू वा इंदिरा गांधी सरकारला मदतीसाठी अनेक वेळा आपली तज्ञ मंडळी पाठवून दिली.वेळप्रसंगी एक जागरूक नागरिक बनून काही सरकारी विरोधही दर्शवला. खरंतर जेआरडी यांचे इतके पैलू आहेत की ते पुस्तक वाचल्या शिवाय कळणारच नाहीत.त्यांच्या या पैलूंमुळेच त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार " भारतरत्न " प्राप्त झाला. त्यावेळेस असे म्हटले गेले , " भारतरत्न या पुरस्काराचा सन्मान झाला ". ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL

    पुलादनिर्मितीपासून विमानसेवेपर्यंत अनेक क्षेत्रांत जेआरडी टाटा यांचे कर्तृत्व लखलखीत आहे. म्हणूनच ते ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले उद्योजक ठरले. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाविषयी, त्यांनी मिळवलेल्या व्यावसायिक यशाविषयी सर्सामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. जेआरडींची जडणघडण, त्यांचे लहानपण, वडील रतन टाटा, फ्रेंच आई, इतर भावंडे, पत्नी या वैयक्तिक बाबी मांडण्यात आल्या आहेत त्यांनी उद्योगसमूहाच्या प्रगतीसाठी घेतलेले कष्ट, त्यांची गुणग्राहकता, हवाई सेवेच्या क्षेत्रात त्यांनी कमावलेले यश याविषयीही येथे माहिती मिळते. त्यांच्याबाबतच्या अनेक प्रसंगांतून वाचकांचे मनोरंजन होईल व बोधही मिळेल. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. आर. एम. लाला यांच्या इंग्रजी लेखनाच्या आधारे हे पुस्तक लिहिले गेले आहे. -धरित्री जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-07-2006

    एक चतुरस्र माणूस ... ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ हा शब्द सर्वपरिचित आहे. परंतु जे आर. डी. यांचे जीवन पाहिले, वाचले म्हणजे वाटते या माणसाच्या जीवनाचे पैलू मोजताच येणार नाहीत. ‘बियाँड द लास्ट ब्ल्यू माऊंटन’ हे आर. एम. लाला यांनी लिहिलेले जे. आर. डी. टाटाचे चरित्र वाचून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारून न जाणारा वाचक विरळाच लाला यांनी टाटा उद्योगसमूहावर अनेक लेख, पुस्तके लिहून सर्वसामान्य वाचकाला जेआरडीची ओळख करून दिली. त्यांच्या पुस्तकाचा व अनेक लेखांचा संदर्भासाठी उपयोग करून प्रा. माधुरी शानभाग यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. फक्त बेळगावकरांनाच नाही, तर ‘अग्निपंख, स्वप्नाजमन सत्याकडे’... यासारख्या अनेक पुस्तकांद्वारे हे नाव आता सर्वपरिचित झाले आहे. या पुस्तकाची अर्पण-पत्रिका मला फार भावली. लेखिकेने लिहिले आहे, जेआरडी टाटा उद्योगसमूह, त्यातील माणसे यांची देशाला यथार्थ ओळख करून देणाऱ्या आर. एम. लाला यांच्या अभ्यासपूर्ण लेखणीला सादर समर्पण. पुस्तकाच्या अनुक्रमावरूनच या महान व्यक्तिमत्त्वाची चटकन ओळख पटते आणि व्यक्तिमत्त्वातील अनोखेपण जाणवते. दहा प्रकरणांमध्ये लेखन कंपन्या होत्या. एवूâण व्यवहार सतरा कोटी रुपयांच्या आसपास होता. १९० साली त्यांनी चेअरमनपद सोडले तेव्हा एकूण कंपन्यांची संख्या ९५ होती आणि व्यवहाराने दहा हजार कोटीचा आकडा ओलांडला होता. ‘परफेक्शन इज इन डिटेल्स’ हे त्यांचे सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाचे सूत्र होते. अचुकता हा कामाचा निकष होता. ‘अंदाजे’ हा शब्द त्यांना आवडत नसे. कोणत्याही उद्योगात, संस्थेत चल-अचल संपत्तीपेक्षा उत्तम माणसे महत्त्वाची, अमोल असतात अशी जेआरडींची धारण होती. तीन वचन सांगते, एक वर्षांची विकास योजना आखायची असेल तर मका पेरा, पंचवीस वर्षे पुढे पाहायची असतील तर झाडांच्या बिया पेरा आणि शंभर वर्षे विकास साधायचा असेल तर माणसे पेरा. जेआरडींनी अशी माणसे पेरली आणि त्यांनी आपापले भोवताल हिरवेगार, समृद्ध केले. अर्थतज्ज्ञ दिनशॉ, जे. डी. चोक्सी, नानी पालखीवाला, होमी मोदी, दलाल, रुसी मोदी, जॉन मथाय, ए. डी. श्रॉफ, मेहता, सुमंत मुळगावकर, अजित केरकर, पेंडसे, दरबारी सेठ, मिनू मसानी अशा अनेकांना निमंत्रण देऊन जेआरडींनी टाटांच्या सेवेत सामावून घेतले. या उद्योगाच्या महामेरूकडे सौंदर्यदृष्टीसुद्धा पुरेपूर होती. याचे सुरेख उदाहरण म्हणजे केरळमधील मुन्नारजवळचे हत्तीसाठी असलेले आरक्षित जंगल अन् हजारो एकर पसरलेले चहाचे मळे. ‘हॉटेल ताजमहाल’ या देशातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलची उभारणी आणि पुढे यातूनच देशभरात उभी राहिलेली ताल ग्रुप ऑफ हॉटेल्सची साखळी. पारशी वडील, फ्रेंच आई असलेल्या जेआरडींचा जन्म जरी पॅरिसमध्ये झाला, शिक्षण फ्रान्स, इंग्लंड आणि भारतात झाले तरी आपली कर्मभूमी भारत आहे याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. सर्वांत मोठ्या गणल्या जाणाऱ्या उद्योगसमूहाचा प्रमुख म्हणून देशाशी असलेली बांधीलकी त्यांनी कृतीतून व्यक्त केली. देशहिताचे अनेक उपक्रम राबवले. हे देशप्रेम एका कार्यक्षम, कर्तृत्ववान माणसाचे असल्याने ते डोळस, द्रष्टे विस्तारले आहे. १. वारसा– कुटुंबाचा, उद्योगाचा, संस्काराचा, २. उद्योगाचा महामेरू, ३. जडण-घडण, ४. माणसे पेरणारा नेता, ५. आकाशाचा महाराजा, ६. डोळस, द्रष्टा देशभक्त, ७. दातृत्वाची जेथ प्रचीती, ८. वक्ता दशसहस्रेषु, ९. कवडसे, १०. घरातले जेआरडी. यामध्ये आकाशाचा महाराज आणि वक्ता दशसहस्रेषु ही प्रकरणे विस्तारित आणि अभ्यासपूर्ण आहेत. टाटा कुटुंबीय मूळ गुजरातेतील नवसारी या गावचे रहिवासी, कपड्याचा व्यापार करण्यासाठी मुंबईला आले. युरापियन पद्धतीने राहत असलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू, श्रीमंत समाजात त्यांचा वावर होता. त्यामुळे जेआरडींची आई फ्रान्सची असूनही येथे मिसळून गेली. इंजिनियरिंग पदवीचे शिक्षण घेण्याची इच्छा अपूर्ण ठेऊन त्यांना उद्योगात शिरावे लागले. वडिलांची आज्ञा प्रमाण मानून वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी टाटा सन्समध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. तर नौरोजी सकलानवाला यांच्या अकस्मात मृत्यूनंतर चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली. उद्योगात बदलत जाणाऱ्या गरजेनुसार त्यांनी अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, एअरइंडिया, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, (टीआयएफआर), अ‍ॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज, अशा अनेक संस्था स्थापन केल्या. जेआरडींनी आपल्या हाती सूत्रे घेतली, तेव्हा एकूण टाटा समूहात चौदा .......... आहे याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. सर्वांत मोठ्या गणल्या जाणाऱ्या उद्योगसमूहाचा प्रमुख म्हणून देशाशी असलेली बांधिलकी त्यांनी कृतीतून व्यक्त केली. देशहिताचे अनेक उपक्रम राबवले. हे देशप्रेम एका कार्यक्षम, कर्तृत्ववान माणसाचे असल्याने ते डोळस, द्रष्टे नेतृत्व होते. ‘बॉम्बे प्लॅन’ त्याचेच मूर्त स्वरूप. हवाईसेवेतील योगदानाबद्दल जेआरडींवर अनेक सन्मानांचा वर्षाव झाल. एफ. एस. आय. संस्थेचे सुवर्णपदक, एडवर्ड वर्नर पुरस्कार हे प्रतिष्ठेचे आहेत. ‘डॅनियल गगनहेम’ पदकाने त्यांच्या सन्मानांवर शिरपेच खोवला. जानेवारी १९९२ मध्ये जेआरडींना भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान दिला. एका उद्योगपतीला हा सन्मान मिळालेले हे पहिले अन् एकमेव उदाहरण होय. जेआरडींच्या मिस्किल व खेळकर स्वभावाचे अनेक किस्से वर्णन करून लेखिकेने आपल्या लेखनाला एक किनार तयार केली आहे. एवढ्या उच्च पदावरील माणूस सामान्य लोकांच्यातसुद्धा किती खेळीमेळीने राहू शकतो हे वाचून आश्चर्य वाटते. शेवटी म्हटल्याप्रमाणे– ‘जीवनाची शर्यत उत्तम धावून जिंकली आपली कर्तव्ये उत्कटतेने पार पाडली आत्म्याची शांती माणुसकीने कमावली मानसन्मानांना धावत यावेच लागले हे पवित्र आत्म्या– सुस्वागतम्!’ हेच खरे. जेआरडी म्हणजे काय हे सर्वार्थाने कळण्यासाठी, समजून घेण्यासाठी, हे पुस्तक आबालवृद्धांनी जरूर वाचावे व त्यापासून प्रेरणा घ्यावी. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 14-05-2006

    मोठ्याचे छोटे चरित्र… भारताच्या औद्योगिक विकासात टाटा उद्योग समूहाचा वाटा सिंहाचा आहे, ही बाब सर्वज्ञात आहे. पोलादापासून हवाई सेवेपर्यंत अनेक क्षेत्रांत टाटा समूहाने केलेली कामगिरी देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण ठरली आहे. या साम्राज्याचा पाया ालणारे जमशेटजी टाटा आणि समूहाला प्रगतीचा कळस गाठून देणारे जेआरडी अर्थात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा ही उत्तुंग व्यक्तिचित्रे. जेआरडी तर ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च सन्मान मिळविणारे पहिले उद्योजक ठरले. जेआरडींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या लोकांबाबत, त्यांनी मिळविलेल्या व्यावसायिक यशाबाबत, त्यांच्या वैयक्तिक, आयुष्याबाबत सामान्य लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. जेआरडींबाबत सामान्य मराठी वाचकांना असणारी उत्सुकता शमविण्यात ‘जेआरडी-एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व’ हे प्रा. माधुरी शानभाग यांनी लिहिलेले चरित्रात्मक पुस्तक माफक प्रमाणात यशस्वी झाले आहे. आर.एम.लाला यांनी इंग्रजी भाषेत जेआरडींवर विपुल लिखाण केले आहे. त्या लेखनाच्या आधारे प्रा. शानभाग यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जेआरडींची जडणघडण, उद्योग समूहाच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट, हवाई सेवेच्या क्षेत्रात त्यांनी कमावलेले यश, त्यांची गुणग्राहकता आदी बाजूंवर प्रकाश टाकणारे लेख पुस्तकात आहेत. टाटा घराण्याचा इतिहास, जेआरडींचे लहानपण, त्यांचे वडील रतन टाटा, त्यांची फ्रेंच आई, इतर भावंडे, पत्नी या वैयक्तिक बाबीही वाचकांच्या समोर येतात.पुस्तक वाचताना एक बाब मात्र सातत्याने खटकते. हे लेखन म्हणजे इंग्रजी लेखांचे जसेच्या तसे भाषांतर आहे, हे वाचताना सतत जाणवत राहते. ज्या व्यक्तीचे चरित्र लिहिले जात आहे, तिच्या अंतरंगात शिरणे चरित्रलेखकाला काही अंशी तरी साध्य झाले आहे, असा भास वाचकाला झाला की चरित्रात्मक लेखन प्रभावी होते. हा लेखसंग्रह वाचताना काही वेळा तर लेखिकेलाही त्या प्रसंगी काय झाले हे नेमके समजले आहे की नाही, असा प्रश्न पडतो व लेखन उथळ होऊन जाते. (उदाहरणार्थ जेआरडी व केंद्रीय मंत्री किडवई’ यांच्यातील मतभेदाचे कथन.) अर्थात जेआरडी टाटा यांचे व्यक्तीमत्त्वच इतके उत्तुंग आहे की, लेखनात उणिवा असल्या तरी पुस्तकात आलेले अनेक प्रसंग वाचकांचे मनोरंजन करून जातात. हे प्रसंग, आठवणी नुसत्या मनोरंजकच नव्हे, बोधकही आहेत. तथ्यात्मक बाबी कळून घेण्यासाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरावे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
Arvind deshpande

Mirza Ghalib is the Jewel in the Urdu literature. He is the pioneer in setting new trend in it. Authar Shabbir Romani excellently explained it. Everyone who is not acquainted with urdu literature should go throw it. The socio political and historicalenviorn of that time is skillfully reflected in his poetry and was narrated by author shabbir Romani. ...Read more

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
गार्गी म्हात्रे

पेरुमाल मुरुगन ह्या तामिळ लेखकाच " नदीमुख" हे अनुवादित पुस्तक वाचले. मराठी मध्ये दाक्षिणात्य भाषां मधल्या तामिळ भाषेच्या उत्तम साहित्याची वाचन संधी या पुस्तकाच्या निमित्ताने मिळाली. साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीला वेगाने ,खर तर अती वेगाने बदलत जाणाऱ्ा तंत्रज्ञान व तरुण पिढीची मानसिकता यांचे सुंदर चित्रण या कादंबरी मध्ये करण्यात आले आहे. माणूस किंवा असुर पालक असला की मुलांच्या भविष्याची चिंता त्यामधून उद्भवणारा संघर्ष साध्या सोप्या पण प्रवाही भाषेमधून आपल्या समोर उभा राहातो. कुमारासुराच्या एकसुरु झापडे लावून घेतलेल्या आयुष्यात `नदीमुख` दर्शना नंतर झालेली तगमग व बदल यांचे खूप सुंदर वर्णन शेवटी आलेल आहे. डॉ. मानसी जयंत केळकर यांनी अतिशय प्रवाही भाषेत व उत्कृष्ट समर्पक शब्दात पुस्तक अनुवादित केल्यामुळे कांदबरीची मजा घेता येते. मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य वाचनाला उपलब्ध करुन दिल्या बद्दल मेहता पब्लिशिंग हाऊस व डॉ मानसी केळकर यांचे आभार ! ...Read more