* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SLUMGIRL DREAMING
  • Availability : Available
  • Translators : MAITREYEE JOSHI
  • ISBN : 9788184981094
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
OUR LIVES ARE PRETTY SIMILAR TO THE CHARACTERS WE PLAYED IN THE FILMI WE`VE GONE FROM BEING FROM THE SLUMS OF GARIB NAGAR IN BANDRA EAST TO THE RED CARPET OF THE OSCARS- NINE-YEARS-OLD RUBINA`S JOURNEY HAS BEEN AN ASTONISHING ONE,ALMOST AS ASTONISHING AS JAMAL`S QUIZ SHOW VICTORY IN SLUMDOG MILLIONAIRE. THIS IS HER STORY- OF PLAYING MARBLES IN THE GULEES OF GARIB NAGAR WITH HER FRIENDS, RELUCTANTLY GOING TO SCHOOL, DREAMING OF ACTING IN FILMS, AND THEN HAVING IT COME TRUE. BUT UNDERNEATH THIS FAIRY TALE LIES A GRIMMER REALITY, THE REALITY THAT FACES COUNTLESS NUMBER OF SLUM CHILDREN. RUBINA BRINGS ALIVE THE WORLD OF THE CHAWLS WITH ITS WASTELANDS AND SHANTY DWELLINGS, THE LIVES OF THE CHILDREN WHO GROW UP IN THEM, THE STORY OF HER CART-PULLER FATHER, AND THE REST OF HER FAMILY. SHE TELLS US ABOUT LIFE ON THE FILM SET, THE AFTERMATH OF THE OSCARS (INCLUDING THE CONTROVERSY OVER HER FATHER), AND HOW IT FEELS TO HAVE THE MEDIA SPOTLIGHT ON HER. WHAT DOES IT MEAN FOR A LITTLE GIRL TO MOVE FROM SLUMKID TO STAR SO QUICKLY? WHAT WILL THE FUTURE HOLD FOR HER?
रुबिना अली. मुंबईच्या एका झोपडपट्टीत राहून चंदेरी चित्रपट सृष्टीतली चमचमती तारका बनण्याचे स्वप्न पाहणारी एक सिनेमावेडी मुलगी. वय केवळ ८-९ वर्षांचं. मात्र तिचं हे स्वप्न एक दिवस खरोखरीच साकार होतं आणि ती थेट ऑस्करपर्यंत मजल मारते. ‘स्लमडॉग मिलेनिअर’मधल्या या चिमुरड्या चित्रतारकेचा हा ऑस्करपर्यंतचा प्रवास आपल्याला या पुस्तकात बघायला मिळेल– तोही तिच्याच शब्दांत! ऑस्कर जिंकूनही पुन्हा त्याच बकाल वस्तीत परत येणा-या रुबिनामधे बालसुलभ निरागसता आणि परिस्थितीनं शिकविलेलं शहाणपण यांचं मजेदार मिश्रण आढळतं. कादंबरीच्या अखेरच्या भागात तर अतिक्रमण विभागाकडून तिचं ते झोपडंही पाडण्यात येतं आणि नाईलाजाने ते लोक तिच्या अब्बांच्या मित्राच्या घरी राहायला जातात. एकीकडे असं चटका देणारं दाहक वास्तव तर दुसरीकडे हॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेत. अनुभवलेली रेड कार्पेट ट्रीटमेंट!! तो मानसन्मान, ते सत्कार समारंभ, ती यशाची धुंदी!.... या सा-यांचा ताळमेळ घालत रुबिना एक दिवस फार मोठी अभिनेत्री बनण्याची स्वप्न पाहतीये. हा तिचा दुर्दम्य आशावाद; तो ही इतक्या लहान वयात; कौतुकास्पदच!

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SLUMGIRLDREAMING #SLUMGIRLDREAMING #स्लमगर्लड्रीमिंग #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MAITREYEEJOSHI #RUBINAALI "
Customer Reviews
  • Rating StarDaily Sakal 22-4-17

    बालमित्रांनो, तुम्ही ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट पाहिला असंलच. या चित्रपटात रुबिना अली चिमुकलीनं छोट्या लतिकाची भूमिका केली होती. हे पुस्तक म्हणजे रुबिनाचं बालपण ते नऊ-दहा वर्षांपर्यंतचा प्रवास आहे. तिनं वयाच्या नवव्या वर्षी हे पुस्तक अ‍ॅनी बर्थाड णि दिव्या दुगर यांच्या मदतीनं लिहिलं. मैत्रेयी जोशी यांनी हे पुस्तक अनुवादि केलं आहे. मुंबईतील गरीबनगर झोपडपट्टीत रुबिना तिच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. तिथलं वातावरण, तिच्या मित्र-मैत्रिणी, त्यांचे गमतीदार खेळ या सगळ्याविषयी रुबिनानं या पुस्तकात लिहिलं आहे. टीव्हीवरील चित्रपट, गाणी पाहून ‘स्टार’ होण्याचं तिचं स्वप्न होतं. तिचं स्वप्न होतं. तिचं स्वप्न फक्त प्रत्यक्षात उतरतच नाही, तर ती ऑक्सरपर्यंत जाऊन पोचते. ऑस्कर जिंवूâनही पुन्हा त्याच बकाल वस्तीत परत येणाNया रुबिनामध्ये बालसुलभ निरागसता व परिस्थितीनं शिकवलेलं शहाणपण याचं शहाणपण यांचं मजेदार मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दिल्लीतील पॅâशन शो, हॉलिवूडच्या अभिनेत्रीसोबत राजस्थानमध्ये एका जाहिरातीचे शूटिंग असे काही अनुभव तिनं बालवयातंच घेतले. ‘एखाद्या झोपडपट्टीतील मुलगी ऑस्कर जिंवूâ शकते, तर अशाच वस्तीतला मुलगा कोट्याधीशही होऊ शकतो,’ असं सांगणाNया चिमुकल्या रुबिनचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 04-07-2010

    चंदेरी स्वप्न… स्लमडॉग मिलेनिअर हा चित्रपट ऑस्कर विजेता ठरला. साऱ्या जगभर या चित्रपटाची प्रचंड प्रशंसा झाली. मुंबईतल्या बकाल झोपडट्टीत अंधाऱ्या जगात राहून, मोठी स्वप्नं पाहणाऱ्या मुलांची ही जीवनकथा या झोपडपट्टीतल्याच बालकांनी साकारलेल्या भूमिका गाजल. या चित्रपटात रुबिना अली या नऊ वर्षांच्या बालिकेनेही भूमिका केली आहे. झोपडपट्टीत अत्यंत दारिद्र्यात राहणाऱ्या रुबिनाला बालपणापासूनच चित्रपटाचं प्रचंड वेड होतं. आपणही चमचमत्या चित्रपटसृष्टीत तारका व्हावं, अशी स्वप्नं तिला पडत होती. ते भाग्य तिच्या वाट्याला आलं. एका झोपडपट्टीत जन्मलेल्या, गरिबीतच दिवस कंठणाऱ्या या मुलीला एका दिवसात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानं ऑस्कर जिंकल्यावर ती ऑस्कर पुरस्कार स्विकारायसाठी अमेरिकेत गेली. त्या मान-सन्मानानं तिचं बालसुलभ मन हरखून गेलं. पण, हा पुरस्कार स्विकारल्यावर पुन्हा तिला त्याच बकाल वस्तीत यावं लागलं. आपण, खूप खूप मोठं व्हायचं अशी तिची स्वप्नं होती. आपल्याला सुखाचे दिवस येतील, असे तिला वाटतं होतं. या चित्रपटाच्या निर्मात्यानं, झोपडपट्टीतल्या या चित्रपटात काम केलेल्या बाल कलाकारांचं पुनर्वसन आपण करू, त्यांच्या शिक्षणाची सोय करू, अशी घोषणाही केली होती. पण, प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलंच नाही.झोपडपट्टीतला मुलगा नशिब असेल तर कोट्याधिश बनू शकतो हे या चित्रपटाच कथासूत्र होतं. ते चित्रपटातच राहिलं. ती पुन्हा झोपडीत रहायला लागली आणि एक दिवस मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं तिला सावली देणारं झोपडीचं छप्पर पाडलं गेलं. नाईलातानं रुबिना आणि तिचे वडील तिच्या मित्राच्या घरी रहायला गेले. पैशासाठी तिचे वडिल तिचा विक्री करीत असल्याच्या बातम्याही वृत्तपत्रात झळकल्या. ही चिमुरडी मनोमन हादरून गेली. पण, बालपनापासूनच दारिद्र्य आणि परिस्थितीशी झुंजायची शक्ती तिला मिळाल्यामुळं अस्वस्थ झालेल्या रुबिनानं त्या परिस्थितीवरही मात केली. रुबिनाची ही सारी कहाणी अ‍ॅनी बर्थाड आणि दिव्या दुगर यांनी शब्दबद्ध केली आहे. त्या कहाणीचा अनुवाद मैत्रेय जोशी यांनी केला आहे. साऱ्या जगभर प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या रुबिनाचे पाय अद्यापही जमिनीवरच आहेत. माझी झोपडी, माझा परिवार याबद्दल ती अत्यंत संवेदनशीलपणे लिहिते. या वस्तीतील माणसं तिला आपली वाटतात. या चुस्तकात तिनं आपली ही सारी जीवन कहाणी आपल्याच भाषेत कथन केली आहे. आपल्याला मिळाणाऱ्या पैशातले निम्मे पैसे आपल्या वस्तीजवळचया मोठ्या धर्मादाय वस्तीला देणगी म्हणून दिले जातील, याचा तिला आनंद वाटतो. तिची स्वप्नं भव्य दिव्य होती. ति स्वप्नं पूर्ण होण्यात खूप अडचणी आल्या. पण, तरीही रुबिना आनंदात आहे. ‘तारे कवेत घेण्यापासून मला कुणी रोखू शकेल असं वाटत नाही.’ तिची ही आत्मकहाणी अत्यंत वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more