* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: STEVE JOBS : EK ZAPATLELA TANTRADNYA!
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983173
  • Edition : 8
  • Publishing Year : NOVEMBER 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 164
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STEVE IS NO MORE WITH US, BUT HIS WORK REMAINS AND REMINDS ABOUT THE REVOLUTION CREATED BY HIM MAKING IT SMOOTHER AND EASIER. THE PCS, THE I- PHONES, THE I-PODS, THE TABLET PCS ALL WILL BE A CONSTANT REMINDER OF THE GENUINE AND WITTY WAYS THAT STEVE HANDLED AND FONDLED. HE WAS ALWAYS LOST IN A WORLD OF HIS OWN. HE HUGGED THE GLORY AND THE DOWNFALLS WITH EQUAL ALOOFNESS. NOT ONCE WERE HIS BELIEFS SHATTERED. THROUGHOUT HIS LIFE, HE STRUGGLED AND DARED TO BRING HIS DREAMS COME TRUE. HIS DREAMS HAD A SILVERY LINING OF CONSISTENCY, PERSUASION AND INTENTION. HE WAS UNIQUE IN EVERY WAY. THE LIFE THREATENING DISEASE OF CANCER COULD NOT PREVENT HIM FROM WORKING TILL HIS LAST BREATH, LITERALLY. THOUGH STUBBORN AND DOMINANT BY NATURE HE STOOD AS A MAGICIAN IN THE FIELD OF TECHNOLOGY. HERE IS A SIMPLE GESTURE TO PAY HIM RESPECT AND HONOUR. A MAGNIFICENT JOURNEY PRESENTED AUTHENTICALLY.
तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिद्ध जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरा-या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
STEVEJOBS#ACHYUTGODBOLE#ATULKAHATE# अच्युत गोडबोले#अतुल कहाते#स्टीव्ह जॉब्ज#
Customer Reviews
  • Rating StarAKASH JADHAV - INSIDE MARATHI BOOKS

    स्टीव्ह जॉब्ज या व्यक्तिमत्वावर अनेक पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत पण अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते लिखित स्टीव्ह जॉब्ज एक झपाटलेला तंत्रज्ञ हे पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. एकतर मराठी भाषेत स्टीव्ह जॉब्जवर लिहिलेलं हे पाहिलं पुस्तक आहे. अच्युत गोडबोल आणि अतुल कहाते यांनी हे पुस्तक विक्रमी वेळात लिहून पूर्ण केलं आहे. हे पुस्तक स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवतं . अँपल या कंपनीचा गॅरेज ते जगप्रसिद्ध होण्याचा प्रवास आणि स्टीव्ह जॉब्जचा जीवनप्रवास या दोन गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतलेल्या आहेत कि त्या वेगळ्या करणे जवळ जवळ अशक्य. लेखकांनी पुस्तकात हा गुंता योग्यरित्या हाताळलेला आहे. ज्यांना स्टीव्ह जॉब्ज अधिकृत चरित्र वाचण्यासाठी वेळ नाहीये त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणीच आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे. ते आपल्याला स्टीव्हची अँपल कंपनीवर असलेली छाप दाखवून देत. पुस्तकात स्टीव्हची काही कृष्णधवल छायाचित्रंही आहेत जे वाचकांना पुस्तकाच्या नायकाशी कनेक्ट करायला मदत करतात. नक्की स्टीव्ह जॉब्ज कोण होता?? त्याला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली?? त्याने कोणती उत्पादन बाजारात आणली?? त्याची व्यवस्थापन पद्धत कशी होती?? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. हे पुस्तक विशेषतः कॉम्पुटर / सॉफ्टवेअर / इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहित करेल. ...Read more

  • Rating StarVarsha Mahakal

    स्टीव्ह जाॅब्ज.....हे नाव परिचीत नसलेली व्यक्ती आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुम्हाला कुठेही आढळणार नाही. त्याचं बालपण जितकं खडतर अन रोमांचकारी आहे तितकचं किंबहुना त्याहुनही अधिक त्याच तरूण आयुष्य. अतिशय उंच झेप घेतल्यानंतर तितक्याचं वेगात खाली मिनीवर कोसळणं.....अन पुन्हा झेप घेण्यासाठी पंख पसरले असतांना कॅन्सरसारख्या आजाराने अक्राळविक्राळ रूप धारण करत त्याच्या ध्येयप्राप्तीत अडसर आणणं.... पण त्याचा हट्टी स्वभाव, त्याची जिद्द त्याला त्याचं ध्येय प्राप्त करुन देते.पण हा दुर्धर आजार काही त्याचा पिच्छा सोडत नाही...त्याला आपल्यासोबत घेऊनचं जाॅब्ज या जगाचा निरोप घेतो....आपल्यासाठी खुप काही मागे ठेवुन. स्टीव्ह जाॅब्जच्या रंजक, संघर्षमय अन जिद्दी आयुष्याची ही कहाणी आपल्याला नक्कीचं आवडेल. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 27-11-2011

    तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात प्रसिध्द जादूगार नुकतेच हे जग सोडून गेला. त्याने आपल्या अदभुत अशा कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले संगणक, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स. टॅब्लेट पीसी हे सारे जगाला त्याची आठवण करुन देत राहणार आहेत. जगातील लोकांच्य कल्पनाशक्तीपलिकडची उत्पादने त्याने प्रत्यक्षात आणून दाखवली. पण एका वेगळ्याच विश्वात तो जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आले. सगळ्यांहून वेगळे आणि अगदी सर्वोत्तम करण्यासाठी त्याने सातत्याने धडपड केली. कर्करोगाने शरीर पोखरले तरीही त्याने कल्पनांच्या भराऱ्या अखेरपर्यंत थांबवल्या नाहीत. त्याच्या जगण्याची हीच सफर या पुस्तकातून उलगडते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book