LEE CHILD

About Author

Birth Date : 29/10/1954


LEE CHILD IS ONE OF THE WORLD’S LEADING THRILLER WRITERS : IT IS SAID THAT ONE OF HIS BOOKS IS BOUGHT EVERY FOUR SECONDS SOMEWHERE IN THE WORLD. HIS NOVELS FEATURING HIS HERO JACK REACHER CONSISTENTLY ACHIEVE THE NUMBER-ONE SLOT IN HARDBACK AND PAPER BACK ON BESTSELLER LISTS ON BOTH SIDES OF THE ATLANTIC, WIN PRIZES, AND ARE TRANSLATED INTO OVER FORTY LANGUAGES. BORN IN COVENTRY, HE NOW LIVES IN AMERICA. JACK REACHER, A MAJOR MOTION PICTURE STARRING TOM CRUISE, BASED ON THE NOVEL ONE SHOT, WAS RELEASED IN DECEMBER 2012.

१९५४ मध्ये इंग्लंडमधील कॉव्हेन्ट्री येथे जन्मलेल्या जिम ग्रॅन्ट या ब्रिटिश लेखकाने ली चाइल्ड या टोपण नावाने अमेरिकेत भटकणारा मिलिटरी पोलीस जॅक रीचर या नायकाच्या साहसकथा लिहिल्या आहेत. १९७४ मध्ये त्यांनी शेफिल्ड युनिव्हर्सिटीच्या लॉ स्कूलमध्ये नाव घातले, पण ग्रॅज्युएशननंतर १९७७ साली मॅन्चेस्टर येथील गॅ्रनडा टेलिव्हिजनसाठी प्रेझेन्टेशन डायरेक्टर म्हणून काम स्वीकारले. ब्राईड्सहेड, द ज्युवेल ऑफ द क्राऊन, प्राईम सस्पेक्ट या शोजशी त्यांचा संबंध होता. अठरा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ४०,००० तासांचे प्रोग्रॅमिंग केले, हजारो कमर्शिअल्स, नवीन कथा, ट्रेलर्स यांचे लेखन केले. १९९५ मध्ये ही नोकरी सुटली. १९९७ मध्ये त्यांनी किलिंग फ्लोअर ही त्यांची पहिली कादंबरी लिहिली. किलिंग फ्लोअर, डाय ट्राइंग, विदाऊट फेल, परसुएडर, द एनिमी, वन शॉट, बॅड लक अ‍ॅन्ड ट्रबल या त्यांच्या पुस्तकांना कुठले ना कुठले पुरस्कार लाभले आहेत. २००७ मध्ये त्यांनी चौदा सहलेखकांसह द चॉपिन मॅन्युस्क्रिप्ट या सतरा भागांच्या सिरीयलचे लेखन केले. २००८मध्ये शेफिल्ड युनिव्हर्सिटीत व्हिजिटिंग प्रोफेसरशिप घेतली आणि तिथल्या बावन्न विद्यार्थ्यांना जॅक रीचर स्कॉलरशिप साठी पैसेही पुरवले.
Sort by
Show per page
Items 1 to 5 of 5 total
A WANTED MAN Rating Star
Add To Cart INR 750
TBC Classic Book
GONE TOMORROW Rating Star
Add To Cart INR 850
NEVER GO BACK Rating Star
Add To Cart INR 550
TBC Classic Book
NOTHING TO LOSE Rating Star
Add To Cart INR 350
TBC Classic Book
ONE SHOT Rating Star
Add To Cart INR 340
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
अनिल सहजे, नाशिक.

`कुलामामाच्या देशात’ हे पुस्तक म्हणजे जंगलातील अनुभवकथांचा एक विलक्षण रम्य प्रवास आहे. रवींद्र वानखडे यांच्या वनाधिकारी म्हणूनच्या प्रत्यक्ष अनुभवातून या कथा जन्माला येतात. प्रत्यक्षात घडलेल्या या कथा इतक्या रंगतदार आहेत की त्या काल्पनिक वाटाव्यात, अी त्यांची गंमत आहे. वानखडे यांच्या अनुभवांमधील कथाबीज अचूकपणे हेरून जी. बी. देशमुख यांनी त्यांना आपल्या रसाळ आणि खुमासदार शैलीत शब्दरूप दिले आहे. देशमुखांची शैली इतकी प्रवाही आणि ओघवती आहे की वाचक कथांमध्ये अक्षरशः गुंगून जातो. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवावेसे वाटत नाही. वन हे सामान्य माणसासाठी तसे अपरिचितच क्षेत्र. जंगलातील जीवन, तेथील नियम-कायदे आणि जंगली श्वापदांचे विश्व याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. वानखडे-देशमुख द्वयी केवळ या अनोख्या जगाची ओळख करून देत नाहीत, तर त्याविषयी वाचकाच्या मनात विलक्षण कुतूहलही निर्माण करतात. ‘खुश रहेना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या दोन क्रमशः कथा तर विशेषतः चटका लावून जातात. त्या केवळ थरारक आणि अविश्वसनीय वाटाव्या अशा अनुभवांनी भारलेल्या नाहीत, तर जंगली श्वापदांची एक हळवी, माणुसकीच्या जवळ जाणारी बाजूही त्या प्रभावीपणे उलगडून दाखवतात. जी. बी. देशमुखांची खुमासदार, मिश्कील आणि रसाळ लेखनशैली वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. रवींद्र वानखडे यांच्या प्रत्यक्ष अनुभवांची सत्यता आणि देशमुखांच्या कथनकौशल्याचा सुंदर मिलाफ ‘कुलामामाच्या देशात’ घडवतो. हे पुस्तक केवळ जंगलातील अनुभवकथांचे संकलन राहत नाही, ते वाचकाला जंगलाच्या एका अनोख्या, रोमांचक आणि हळुवार विश्वाची सफर घडवते आणि नकळत सांगून जाते, ‘वनस्य कथा रम्यः!’ ...Read more

DURDAMYA
DURDAMYA by G.B. DESHMUKH Rating Star
ॲड. प्रशांत यावले, अमरावती

आज "दुर्दम्य" वाचुन पुर्ण झाले. मराठी साहित्याचा एक अप्रतिम अविष्कार. एक व्यक्तीचित्रण पण अत्यंत प्रभावी लेखन. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे गुण वेगवेगळ्या कलात्मक वर्णनाने ईतक्या समर्थपणे मांडण्याचे कौशल्यपूर्ण लिखाण. शेवटच्या प्रकरणाने ईतक्या कठोर व्यक्तमत्वा बदल देखील भावना चाळवल्या. त्या व्यक्तीचे खरे नाव माहीती असुन देखील पुस्तक वाचुन संपवल्यावर ते आठवतच नव्हते ईतका प्रभाव "एकनाथन"चा राहीला. खुप सुंदर. ...Read more